मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

दक्षिणा, कृपया अजून थोडी माहिती देणार का ? कधीपासून हा डीले होतो आहे? काही बदल झाले होते का त्या सुमारास ? मोबाईल अ‍ॅक्सेस आहे का कंप्यूटरवरून आहे?

प्रदीपा : मायबोलीबद्दल अधिक माहिती बघितलीत तर हितगुज-आपल्या गावात या लिंकवर तुम्हाला हवी ती यादी सापडेल.

चैत्रगंधा: प्रशासकांना कळवले आहे.

मला कोणी सान्गेल का...
मी संपर्कातुन मेल पाठवल्या.. मझ्यासाठी देखील एक प्रत घेतली..
पण ते मेल गेलेच नाहीत आणी मलापण त्याचे कॉपी आली नाही ... ते मेल कुठे सापडतील परत फॉरवर्ड करता येतील का..?

प्रदिपा, तुमच्या स्पॅम फोल्डरमध्ये बघा कॉपी आहे का ते. किंवा मग ज्यांना संपर्कातून मेल पाठवली त्यांना विचारा मिळाली आहे का ते.

दुसरे म्हणजे तुमचा इमेल पत्ता योग्य तर्‍हेने स्पेल केला आहे का ते देखील या लिंकवर जाऊन बघा.

पशुपती, इमेज साईज १५० केबी पेक्षा कमी हवा, तर चित्रकला अपलोड करता येईल.
अधिक माहितीसाठी मदतपुस्तिकेतले हे पान बघा.
लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा? | Maayboli

इब्लिस, माझ्या सेन्ट मेल फोल्डर मधे ते मेल्स नाहीत...

नंद्या, मी अवल ने मानुषी या दोघींना मेल पाठवले ते त्याना पोचले नाहीत म्हणून ते मला परत फॉरवर्ड करायचेत.. ते स्पॅम मधे नाहीत...
मी लिहिलेला मेल पत्ता बरोबर आहे कारण मला नोटीफिकेशन्स मिळतात...
त्यान्चे पत्ते बरोबर नसतील तरी मला माझ्यासाठी एक प्रत - वाले मेल पण कुठेच दिसत नाहीत..

काय करु...

मी संपर्कातुन मेल पाठवल्या.. मझ्यासाठी देखील एक प्रत घेतली.. <<< मायबोलीवरून अशाप्रकारे स्वतःला मार्क केलेलं पत्रं आपल्या सेंटबॉक्समध्ये न जाता इन्बॉक्समध्येच येते ना?

माझ्या प्रतिक्रीयेबरोबर 'संपादन' हे का येतंय...? लिखाण सेव्ह केले तरी ...
का ते तसे सगळ्यानाच येतं आणी लोगीन असे पर्यन्तच दिसते..?

का ते तसे सगळ्यानाच येतं आणी लोगीन असे पर्यन्तच दिसते..? <<< हो. 'संपादन' क्लिक करून केलेल्या लिखाणात बदल करता येतो.

नमस्कार,
माझे "लर्न मराठी फ्रॉम इंग्लिश्/हिन्दी" ब्लॉग्स बद्दल महिती देणारे पान काढून टाकण्यात येईल असे मला त्यावर "अ‍ॅडमिन" ने कळवले होते.
हा निर्णय का घेण्यात आला हे मला कळेल का ? मायबोली च्या नियमांबद्दल मला फारशी महिती नाही. म्हणून हा प्रश्न !!

हा प्रश्न मला "अ‍ॅडमिन" ना विचारयचा आहे. पण तसा पर्याय न दिसल्याने, ही मदतपुस्तिका वापरत आहे.

नमस्कार.
नवीन लेखन ह्या दुव्यावरचं पान दिसत नाहीये. म्हणजे वरच्या जाहिराती येतात पण पानावरचा मजकूर वगैरे नाही.
रच्याकने मी IE 10 वापरतेय.

_आनंदी_ आणि देवकी ,

पाउलखुणा सध्या बंद आहेत.

कृपया पाऊलखुणांची सोय तात्पुरती बंद आणि लेखकाचे/लेखिकेचे जुने लेखन पाहण्याची सोय पुन्हा सुरु हे दोन दुवे अधिक माहितीसाठी बघावेत.

रॉबिनहूड
[टेक्स्टबॉक्सवर असलेले] निळे सफरचंद असलेले बटण वापरा, घोड्याची चिंता मिटवा Proud

naween lekhan ughadat naahee नवीन लेखन हा दुवा उघडत नाही

रंगीबेरंगी पान विकत घेण्यासाठी कुठे संपर्क करावा?त्यासाठी वार्षिक वर्गणी किती भरावी लागेल?

आपण लिहिलेला लेख किंवा पाककृती किती जणांनी वाचली आहे हे कसे कळते ?
फक्त प्रतिसाद दिसतात पण वाचन संख्या कशी कळेल ?

आपण लिहिलेला लेख किंवा पाककृती किती जणांनी वाचली आहे हे कसे कळते ?
फक्त प्रतिसाद दिसतात पण वाचन संख्या कशी कळेल ?

उत्तर द्या ना कोणीतरी . admin , तुम्ही तरी सांगा .

Pages