बुद्ध

Submitted by संजय क्षीरसागर on 13 September, 2013 - 14:20

परवा मित्राकडे गेलो होतो तर बुद्धाची ही प्रतिमा दिसली... बघत रहावं अशी. इतकी विलोभनीय की मूर्तीकाराच कौतुक वाटलं. पद्मासनात बसलेला आणि विरक्त दिसणारा अश्या अनेक प्रतिमा आहेत पण ही मूर्ती अत्यंत साधीये. कुठलाही अभिनिवेश नाही तरीही बुद्धाची चित्तदशा सहीसही प्रकट होतेय. इतकी की तिच्याकडे पहात राहिलं तरी आपण बुद्धाच्या चित्तदशेशी संलग्न होतो.

मग दोन दिवसासाठी त्याच्याकडून मागून आणली. मुलाला म्हटलं तू या प्रतिमेचं एक सुरेख कॉंपोझिशन कर. त्याचा मित्र आला होता त्यानं रेफरन्ससाठी हा फोटो घेतला... वाटलं आज बुद्धाविषयी लिहावं

Sitting Buddha.jpg

बुद्धाला समजावून घ्यायच असेल तर प्रथम लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे बुद्ध ही व्यक्ती नाही, स्थिती आहे.

बुद्धाला आपण व्यक्ती समजलो तर नजरीया बदलतो. आपण त्याच्या जीवनाचा शोध घ्यायला लागतो. वी सर्च इंटू हीज बायोग्राफी. तो कोण होता, त्याचा जन्मानंतर राजजोतिष्यानं काय सांगीतलं, त्यानं संसारत्याग कसा केला, त्यानं किती साधना केली, त्याला ज्ञान कुठे झालं, असे एकनाअनेक प्रश्न निर्माण होतात.

बुद्ध ही स्थिती आहे हे लक्षात आलं की फक्त तीनच प्रश्न उरतात:

एक, त्यानं सत्याचा शोध का घेतला, दोन, त्याला ज्ञान नक्की कशामुळे झालं आणि तीन, आपल्याला ज्ञान व्हावं म्हणून त्यानं कोणती प्रक्रिया सांगीतलीये.
_______________________________

तर पहिला प्रश्न : त्यानं सत्याचा शोध का घेतला?

बुद्ध राज्यातल्या एका उत्सवासाठी निघाला होता. अचानक एक अत्यंयात्रा रथाला सामोरी आली. वडिलांनी आतापर्यंत बुद्धाला मृत्यू कळू नये अशी दक्षता घेतली होती. बुद्धाच्या आयुष्यात ही पहिलीच घटना होती. त्यानं सारथ्याला विचारलं आणि नाईलाजानं सारथी मृत्यूविषयी बोलला.

त्यावर बुद्धानं सारथ्याला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला, ‘मला देखील मृत्यू आहे?’

सारथी प्रश्न टाळू शकला नाही, म्हणाला ‘हो राजन प्रत्येकाला मृत्यू आहे’.

बुद्ध म्हणाला `रथ माघारी घे'.

बुद्धाला तत्क्षणी लक्षात आलं सारे भोग, सारी संपन्नता, सर्व सत्ता मृत्यू व्यर्थ करत असेल तर या राजस्वितेचा काहीही उपयोग नाही. अर्जुनाला युद्धभूमीवर झाला तसा बुद्धाला सारी सुखं समोर असतांना विषाद झाला. आणि बुद्ध सत्याच्या शोधात, जे मृत्यू हिरावून घेऊ शकत नाही अश्या शाश्वताच्या शोधात निघाला.

तो केंव्हा निघाला, रात्री की दिवसा, त्या वेळी यशोधरा काय करत होती आणि त्याचा मुलगा किती वर्षाचा होता हे ऐतिहासिक तपशील आहेत त्यांचा साधकाला काहीएक उपयोग नाही.
_______________________________

दुसरा प्रश्न : त्याला ज्ञान नक्की कशामुळे झालं?

बुद्धानं किती वर्ष साधना केली आणि तो कुठेकुठे फिरला याचा उपयोग नाही. त्यानं अनेकानेक साधना केल्या पण त्याला सत्य गवसलं नाही आणि तो अत्यंत निराश झाला. त्याला वाटलं आपण भोग सोडला आणि त्यागही आपल्याला सत्याप्रत नेऊ शकला नाही. आपलं जीवन दोन्ही बाजूनं व्यर्थ झालं. दीर्घ साधनेनं त्याचा देह देखील अत्यंत कृश झाला होता.

त्या रात्री एका साध्याश्या पाण्याच्या प्रवाहातून पलिकडे जातांना त्याचा तोल गेला आणि तो प्रवाहाबरोबर वाहून जायला लागला. मोठ्या मुश्किलीनं त्यानं तिरावरचं गवत पकडून ठेवलं आणि त्या विमनस्क स्थितीत त्याचं लक्ष आकाशाकडे गेलं. त्या वेळी तिथे एक तारा चमकत होता. आता जाणीवेच्या क्षेत्रात फक्त दोनच गोष्टी उरल्या, एक बुद्ध आणि दुसरी, तो तारा.

पुढल्या क्षणी तो तारा विझला आणि बुद्धाची तार्‍यावर रोखलेली जाणीव सरळ त्याच्याकडे परतली. त्याच्या जाणीवेच्या क्षेत्रात काहीही उरलं नाही... त्याक्षणी त्याच्या लक्षात आलं सारं जग शून्य आहे! आपण निराकार आहोत... कुणाच्याही आत कुणीही नाही.

____________________________

तिसरा प्रश्न : ज्ञान होण्यासाठी त्यानं कोणती प्रक्रिया सांगीतलीये?

बुद्धाला सत्य गवसलं याचा अर्थ आपण व्यक्ती नसून स्थिती आहोत हा उलगडा झाला. ही स्थिती निर्वैयक्तिक आहे, निरंतर आहे. आत्ता या क्षणी आणि सदैव आहे. त्यामुळे ती मृत्यूनं अनाबाधित आहे.

सत्य समजल्यावर बुद्ध म्हणला ‘जग शून्य आहे’. लोकांनी त्याचा अर्थ काढला जग व्यर्थ आहे. जग शून्य आहे याचा अर्थ व्यक्तीत्वामुळे आपण आहोत असा भास होतो पण वास्तविकात कुणाच्याही आत कुणीही नाही. जर देहात कुणी नसेल तर मृत्यू कुणाला येणार?

जगात प्रक्रिया आहेत आणि जाणीव देखील आहे पण जाणीव व्यक्तीगत नाही, ती निराकार आहे.

आपलं चित्त जे सदैव दैहिक आणि मानसिक प्रक्रियांनी वेधून घेतलंय ते स्वतःकडे वळण्याचा अवकाश की बुद्धाला काय म्हणायचय ते लक्षात येईल. कसं वळेल ते चित्त?

तर बुद्धानं एक अत्यंत सोपी साधना सांगीतलीये : तो म्हणतो `जाणीवेचा रोख श्वासाकडे वळवा' (विपश्यना). काय होईल त्यानं?

तुम्ही समग्रतेनं फक्त चालू असलेल्या श्वासाची दखल घेतली आणि तिथे स्थिर राहिलात तर तुमच्या लक्षात येईल. श्वास आपोआप चालू आहे. आपल्याला तो कळतोय नक्की पण करणारा कुणीही नाही.

श्वासाच्या या रहस्यमय प्रक्रियेनं तुम्ही कृतज्ञ झालात तर सार्‍या जगाचा, सार्‍या व्यवधानांचा तुम्हाला विसर पडेल. जाणीवेच्या क्षेत्रात फक्त दोनच गोष्टी उरतील, चालू असलेला श्वास आणि तुम्ही.

असेच संपूर्ण शांत राहिलात तर एका क्षणी श्वासावर रोखलेली जाणीव, सर्व अंतर्बाह्य व्यापून असलेल्या व्यापक आणि निराकार जाणीवेशी एकरूप होईल. तीचं व्यक्तीगत स्वरूप विलीन होईल. कारण मुळात जाणीव एकच आहे.

ते शांतता शांततेत मिसळून जाण्यासारखं आहे. मग तुमच्याही लक्षात येईल की शांतता हेच आपलं मुळ स्वरूप आहे. आपण ती शांतताच आहोत. शांतता अविभाज्य आहे, सर्वत्र एकसंध शांतताच आहे. कुणाच्याही आत कुणीही नाही. बुद्ध म्हणतो तसं जग शून्य आहे.

_________________________________

एखाद्या निवांत वेळी, सुट्टीच्या दिवशी, सहलीच्या ठिकाणी, निर्वेध चित्तदशा असतांना ही साधना करून पाहा. लगबगीनं प्रतिसाद देण्याची घाई करू नका. विषय वादाचा नाही, अनुभवाचा आहे. कदाचित तुमची चित्तदशा बुद्धाच्या चित्तदशेशी संलंग्न होईल. आणि तुम्ही म्हणाल, ‘क्या बात है’!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुद्दाम हसेन तुम्ही लेखक्महाशयांनी इतरत्र केलेली रुणझूण आणि लादेन ती ध्यानपद्धती वाचलेली नाही त्यामुळे तुम्हाला 'इथेपण' चा अर्थ कळला नाही. असो.
ते गूगल नसुन गुर्हाळ आहे.

तसेच तुम्ही प्रतिसादातील रीड बिटवीन द लाईन केलेले नसल्याने लेखक महाशयाम्चे 'संशोधन संपलेले आहे' म्हणजे काय हे तुमच्या ध्यानात आलेले नाही.
एकदा हे सगळे ध्यानात आले की तुम्हि माझ्या प्रतिसादाला मुद्दाम हसणार नाही.
Wink

अच्छा
साती म्हणूनच मी त्यांना तुम्ही तेच आहात का हे विचारलं होतं. त्यांचा एक ब्लॉग सापडला. ते संशोधक म्हणवून घेतात खरं, पण अत्यंत सामान्य लिखाण आहे.. ज्यांच्याबद्दल इथं विचारलं होतं.

@ नांवात काय आहे

>बुद्धास जे झाले त्यासच आत्मज्ञान म्हणतात काय ??

= येस. आपण निराकार आहोत हा उलगडा म्हणजे आत्मज्ञान.

>कुणाच्याही आत कुणीही नाही<<<< कुणी नाही चा अर्थ काही नाही असा घ्यायचा काय ??

= अस्तित्व आहे पण व्यक्तीत्व नाही असा त्याचा अर्थ आहे. व्यक्तीत्व ही प्रत्येकानं स्वतःविषयी केलेली कल्पना आहे. आणि ते सर्व दु:खाच कारण आहे.

______________________

@ विस्मया
>....कशावर ध्यान एकाग्र करायचं हे उद्दीष्ट महत्वाचं नाही का ?
ध्यानाचा अर्थ जाणीवेचा रोख जगाकडून जाणत्याकडे (स्वतःकडे) वळवणं.

>....हे आर्ट ऑफ लिव्हिंगचे उद्दीष्ट आहे. हीच विपश्यना, ध्यान असं सांगितलं जातं. #

तुम्ही कधी श्वासाची फक्त दखल घ्या. एकाग्रतेची गरज नाही. इट इज सच अ रिलॅक्सेशन. जस्ट ट्राय. आपोआप जाणीवेचा रोख जगाकडून स्वतःकडे वळायला लागतो.

>उलट दु:खाचं मूळ कशात आहे या प्रश्नाशी बुद्ध अडून राहिला होता. ......

येस! दु:खाचं मूळ स्वतःला व्यक्ती समजण्यात आहे. बुद्धाला ज्या क्षणी शून्यत्त्वाचा उलगडा झाला (तो कुणालाही होऊ शकतो) तेव्हा त्याच्या लक्षात आलं बंधन मान्यतेचं आहे. आपण स्वतःला जी व्यक्ती समजतो ती बंधनात असल्यासारखी वाटते. खुद्द आपण सदैव मुक्त आहोत.

>...केवळ एकेका घटनेतून विचाराला प्रक्रिया मिळाली ...

= मृत्यूची अनिवार्यता लक्षात येणं हा कुणाच्याही आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे.

>...कामात असतानाही मन एकाग्र झाल्यास ध्यान लागू शकते असं ओशोंचं म्हणणं आहे.

= माझ्याकडे कम्युनची मेंबरशिप आहे. ओशोंच्या सर्व ध्यानप्रणाली स्वतः करुन पाहिल्या आहेत आणि त्यांच्या सर्व साहित्याचा सखोल अभ्यास केलेला आहे. ध्यानाच्या अनंत व्याख्या ते करतात. (उदा. `मेडिटेशन द फर्स्ट अँड लास्ट फ्रिडम', किंवा `द बुक ऑफ सिक्रेट्स' मधे एकशेबारा पद्धती आहेत) तुम्हाला एकच सूत्र हवं असेल तर ते `जाणीवेचा रोख जाणत्याकडे वळवणं हे आहे'.

=))

आला का इथेही
शेवटचा मार्ग

मी मराठी वरून तुम्हला कुत्र्यासारखे हाकलून लावले
मिसळपाव वर तुमचा बाजार उठला , मिसळीच्या रस्श्याने खालून वरून धूर आला तुमचा
तिकडे तुम्चाला पाल्या पाचोळ्या प्रमाणे उडविले गेले
तुमची शब्द्बंबाळ वक्त्यव्ये ज्याला काडीचाही अर्थ नसतो … फुल पाचार मारली तुमची तिकडे , तरी तुमच आपल मीच लई शाणा मीच महान सुरूच होतं

आता तुम्हाला वाटले मायबोलीवर जिलब्या ताक्याव्यात , पण इकडेही तेच होणार असे दिसते
तुमची लेवल आता तरी ओळखा , एखाद्या मानसोपचार तज्ञाला दाखवून आणा

श्री कैलासजी,

विथ ड्यू रिस्पेक्ट, मी इतक्या उहापोहात शिरत नाही. आपण आहोत, आयुष्य आहे आणि ते मजेत जगायचंय, स्वच्छंद जगायचंय असं मला वाटतं. देह आहे आणि तो सार्थक आहे, जगण्यासाठी देह आणि मन ही दोनच साधनं आहेत. स्वतःच विदेहत्त्व जाणलं की त्यांची काहीएक अडचण राहात नाही.

मृत्यू शरीराला आहे, आपल्याला नाही कारण आपण देह-मनाचे जाणते आहोत; देहधारी व्यक्ती नाही हे माझ्या आध्यात्मिक आकलनाचं सार आणि अनुभव आहे.

निर्वाण, महानिर्वाण किंवा महापरिनिर्वाण इतक्या भव्य कल्पनात निदान मला तरी स्वारस्य नाही कारण मृत्यूच नाही म्हटल्यावर मृत्यूपश्चात गोष्टींचा वेध घेण्यात (तो ही तर्कानं किंवा ग्रंथात दिला आहे म्हणून) काही हाशिल नाही.

अर्थात, स्वतःचं विदेहत्त्व जाणणं आगत्याचं आहे आणि त्याच्या सर्व प्रणाली मी यथावकाश मांडीन. (अर्थात हा लेख त्याच विषयाचा एक भाग आहे). ज्यांचा तो अनुभव होईल त्यांना माझं म्हणणं पटेल.

तर असो, विपश्यना ही ध्यानप्रणाली बुद्धाची मानली गेली आहे. आणि ती त्याची असली काय किंवा नसली काय, ती परफेक्ट आहे हे मी निर्विवादपणे सांगू शकतो. इतकंच नाही तर जो कुणी ही ध्यानप्रक्रिया करून पाहिल त्याचा तो अनुभव होईल याची ग्वाही देतो.

तस्मात, चर्चा ध्यानप्रणालीवर व्हावी कारण ती निर्वैयक्ति आहे हा एक भाग. आणि ध्यानप्रक्रियेतून येणारं रिलॅक्सेशन हा प्रत्यक्ष पुरावा आहे हा दुसरा भाग.

आपण पुढे म्हटलंय :

>बुद्धाची शिकवण आणि गोएंका गुरुजींची विपश्यना आदि बाबींची सांगड आपल्या सारख्यांकडून घातली जाणे हे एका विशिष्ट योजने अंतर्गत केले जात आहे की काय??? अशी शंका मनात आणते.

माझ्या मते स्वतःच घर ही विपश्यनेसाठी सर्वोत्तम जागा आहे. आणि वर एका प्रतिसादात ते मी पूर्वीच नमूद केलंय.

अरेरे..

@ सती-बन्या

आपल्या अत्यंत निर्बुद्ध आणि व्यक्तिगत प्रतिसादाबद्दल प्रशासकीय धोरण काय आहे याची कल्पना नसल्यानं सध्या दुर्लक्षित केले आहेत.

बुद्धाने विपश्यना सांगितली नाही.>>>हे कस काय बुवा?

महासतिपट्ठान्सुतवगैरे ग्रन्थ बुद्धा शिकवणुकीचेच भाग आहेत ना?

खडकसिंग
अमेरिकेतले एक योगी आहेत. ते म्हणे अदृश्य व्हायला शिकवतात, उडायला शिकवतात. महेश योगी का काय नाव आहे त्यांचं. अट एकच आहे, त्यांच्या अदृश्य खोलीत बसून जगाच्या दृष्टीने ग्रॅण्डमस्ती असेल ते तिथं राजरोस बडबडायचं.. खखोम्योजा.

@ विस्मया आणि विदे

>श्वासाव्यतिरिक्त चालणे, पळणे, अशा अनेक लयीत होणा-या क्रियांमधूनही ध्यान लागू शकते. कामात असतानाही मन एकाग्र झाल्यास ध्यान लागू शकते असं ओशोंचं म्हणणं आहे. जे पटतं. अर्थात श्वासासाठी कमीत कमी उर्जा लागत असल्याने त्यावर लक्ष केंद्रीत करणे सोपे आहे .

= एक साधी गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही कधी योगा केला असेल (क्लासमधे नाही, व्यक्तीगत) तर कोणत्याही आसनाच्या फायनल स्टेजला एक रिलॅक्सेशन येतं. ते आपोआप होतं. तुम्हाला त्या अवस्थेत दीर्घ काळ राहावंस वाटतं. (अदरवाईज, आसनं शिकतांना मात्र कधी एकदा यातून सुटका होते असं वाटतं). या रिलॅक्सेशनची दोन कारणं आहेत : एक, आपल्याला आसनात असलेल्या देहाची संपूर्ण जाणीव झालेली असते. याला हॉवरिंग द बॉडी म्हटलंय. थोडक्यात आपण देहापेक्षा वेगळे आहोत या मूळ स्थितीला जाणीव आलेली असते. आणि दोन, ती ध्यानमग्न अवस्था असते कारण जाणीव पुन्हा स्वतःप्रत आलेली असते.

जाणीवेचा रोख, जो शरीराकडे होता, परत स्वतःकडे आलेला असतो. यू आर कनेक्टेड टू योरसेल्फ.

>एक प्रश्न :- बहुदा ओशोंच्या पुस्तकात वाचलं होतं की जगप्रसिद्ध कलाकारांना अशी स्थिती कधीतरी प्राप्त झाली होती, त्या अनुभती चा पुन्हा अनुहव घेण्यासाठी ते अक्षरशः वेडे झाले तर कित्येकांनी आत्महता केल्या. असं झालं असावं का? दुर्दैवाने त्यांना ही ध्यान पद्धती कळली नसावी का?

= अशाप्रकारे जाणीवेचा रोख केव्हाही जाणत्याकडे वळू शकतो. कलाकाराच्या बाबतीत, मन पूर्णपणे एकाग्र झाल्यानं जाणीवेत जगाचा (किंवा इतर सर्व विवंचनांचा) विसर पडतो आणि तिचा सर्व रोख आविष्कारावर लागतो. अशा उत्कट क्षणी जाणीव फिरुन स्वतःप्रत येते आणि कलाकार ध्यानमग्न होतो.

वेड लागणं किंवा आत्महत्त्या करणं या मनाच्या विक्षिप्त अवस्था आहेत, त्यांचा ध्यानाशी काहीएक संबंध नाही.

@ विस्मया >एकाग्रतेचं , ध्यानाचं उद्दीष्ट वेगवेगळं असू शकेल.

= ध्यान म्हणजे, जाणीवेचा रोख स्वतःकडे वळलेला असतांना आलेल्या रिलॅक्सेशनमधनं प्रत्येक क्रियेचा आनंद घेणं, जगणं!

@मंदार कात्रे

अडीच हजार वर्षांपूर्वी बुद्धानं जीवनाचं विशिष्ट तत्वज्ञान माणसाला दिलं. वेदपरंपरेतून निर्माण झालेली धार्मिकता, कथा-पुराणांचं स्तोम, कर्मकांड यांची या काळात बजबजपुरी माजली होती. खरं हिंदू तत्वज्ञान बाजूला पडलं होतं आणि यज्ञयागाला, महत्त्व आलं होतं. बुद्धानं स्वतः राजस्वी जीवनाचा त्याग करून कर्मकांड, तंत्र-मंत्र विरहीत असं साधं सरळ सोपं तत्वज्ञान मांडलं. आज अडीच हजार वर्षांनंतर सुद्धा हे सारं तत्वज्ञान, यात सांगितलेला ध्यान धारणेचा मार्ग, यात सांगितलेली विचार करण्याची पद्धत माणसाला मनःस्वास्थ्य मिळवून देऊ शकतात.

आता प्रश्न असा आहे की जिथं स्वतः गौतम बद्धासारख्या तपस्व्याला सुद्धा हे तत्वज्ञान समजून घेण्यासाठी, बोधी प्राप्त करण्यासाठी, सारं आयुष्य वेचावं लागलं, ज्यानं स्वतःच शिकवणूकीतून असं सांगितलं की हे संपूर्ण तत्वज्ञान आत्मसात करण्यासाठी तुम्हाला हा जन्म कदाचित अपुरा पडेल आणि तुम्हाला अजून एक जन्म घ्यावा लागेल, तिथं दहा दिवसात धम्म म्हणजे काय ते संपूर्ण शिकवून खात्रीनं मनःशांती मिळवून देणार्या मार्गावर नेऊन सोडण्याची शाश्वती कुणी देत असेल तर यावर कितपत विश्वास ठेवावा? किंवा मनःशांतीचा मार्ग दहा दिवसात मिळतही असेल - कदाचित - पण म्हणून हे म्हणजेच धम्म किंवा बुद्धाचं सारं तत्वज्ञान आहे का?

विपश्यना या पाली शब्दाचा अर्थ अंतर्मुख होऊन स्वतःकडे बघणं, मनाच्या जडणघडणीचं निरिक्षण करणं असा आहे. बुद्ध तत्वज्ञान समृद्ध, अथांग आणि चहू बाजूंनी फुललेलं आहे आणि विपश्यना हा या तत्वज्ञानातला एक लहानसा भाग आहे. पाली भाषेत विपश्यना ध्यानतंत्राचा उल्लेख 'विपश्यना भावना' असा केलेला आढळतो. आधी सांगितल्याप्रमाणे विपश्यना म्हणजे अंतर्मुखता आणि भावना म्हणजे अनुभव घेणे किंवा वाढीस लावणे. म्हणजेच अंतर्मुख होऊन स्वतःचं निरिक्षण करण्याची सवय लावून घेणे. आता पारंपारिक रित्या विचार करता विपश्यना भावनेच्या निदान दोन तरी पद्धती अस्तित्वात आहेत. एक थेरवाद विचारसरणीची आणि दुसरी महायान विचारसरणीची. पहिली म्हणजे समथा-पुबनगमा-विपश्यना. ही श्री सयाग्यी उ बा-खीन यांची परंपरा. यात प्रथम श्वासोश्वासावर आणि नंतर शरीराच्या प्रत्येक भागावरून केंद्रीत लक्ष्याचा झोत फिरवण्यावर भर दिलेला आहे. दुसरी पद्धत महायान विचार सरणीतली. यात साधकाची अंतर्मुखता ही शुद्ध किंवा दुसऱ्या कशाचाही (उदा. - समथा) लवलेशही नसलेली अंतर्मुखता आहे. अशा साधकाला 'सुखा-विपसका' म्हटलंय.

वर म्हटल्याप्रमाणं बुद्ध तत्वज्ञान स्वतःच्या पद्धतीनं मांडणारे थेरवाद आणि महायान असे दोन भिन्न विचार प्रवाह (स्कूल ऑफ थॉटस) आहेत. किंवा महायान म्हणजे उत्तरेकडे वाढलेला आणि थेरवाद म्हणजे दक्षिणेकडचा अशीही या विचारांची विभागणी करता येते. महायान विचारप्रणाली म्हणजे गौतम बुद्धांनंतर काही शतकांनी निर्माण झालेलं बुद्ध तत्वज्ञान. म्हणजे मूळ पाली सूत्रांचा या विचार प्रवाहाच्या पंडितांनी त्यांच्या दृष्टिकोनातून लावलेला अर्थ आणि त्यावर आधारलेलं हे तत्वज्ञान.

हे प्रत्यक्षात बुद्धाने सांगितलेले नाही.

. खरं हिंदू तत्वज्ञान बाजूला पडलं होतं

?????? ? ??????

बुद्धापुर्वी या तत्त्वज्ञानाला हिंदू तत्त्वज्ञान असे म्हणत होते का? की वैदिक?

एक जन्म पुरणार नाही अजून जन्म घ्यावा लागेल, ही फक्तं बोलायची एक पद्धत म्हणून म्हणताय ना?
पुनर्जन्म न मानणार्या बुद्धाचे तत्त्वज्ञान समजायला अजुन एक जन्म म्हणजे गंमत आहे.
Wink

पुनर्जन्म न मानणार्या बुद्धाचे तत्त्वज्ञान समजायला अजुन एक जन्म म्हणजे गंमत आहे.>>>>>

Biggrin

आयला खरंच की.

@ कैलासजी,

तुमचे दीर्घ प्रतिसाद पाहून मला ओशोंचा एक ज्योक आठवतो. ते म्हणाले की एमेच्या क्लासवर जर कबीर स्वतः येऊन उभा राहिला आणि त्याचे दोहे शिकवतो म्हणाला तर हे अ‍ॅकॅडेमिशियन्स त्याला विचारतील, `तुम्ही कसे शिकवणार? तुमच्याकडे डिग्री कुठेय?'

आहो, साधना निर्वैयक्तिक असते. ते गुरुत्वाकर्षणासारखं आहे, वस्तू वरुन सोडल्यावर खालीच पडणार भले शोध लावलेल्या शास्त्रज्ञाचं नांव काहीही असू दे.

श्वासाचा आणि मानसिकप्रक्रियेचा घनिष्ठ संबंध आहे त्यामुळे ती साधना उच्च कोटीतला शोध आहे आणि करुन पाहणार्‍याला हमखास अनुभव येईल. त्यासाठी बुद्धाचं संपूर्ण तत्वज्ञान समजण्याची किंवा जन्म घालवण्याची गरज नाही.

तुम्ही निदान इतक्याला तरी राजी आहातः

>विपश्यना या पाली शब्दाचा अर्थ अंतर्मुख होऊन स्वतःकडे बघणं, मनाच्या जडणघडणीचं निरिक्षण करणं असा आहे.

तर तुम्ही कधी ही साधना केलीये का ते सांगा आणि असेल तर तुमचा अनुभव लिहा. नुसता तात्विक उहापोह जीवनात काहीही बदल घडवू शकत नाही.

______________________________

हे बन्या की कोण सदस्य फारच बिथरलेले दिसतात. एकतर त्यांना विषयातलं गम्य नाही पण निष्कारण बाष्कळपणा चालू आहे.

संजय क्षीरसागर,

अहो तुम्ही काय विपश्यना करायची ती करा. माझा मुळीच आक्षेप नाही.

माझा आक्षेप आहे '' विपश्यना बुद्धाने सांगीतली'' ह्या चुकीच्या वक्तव्याला.

बाकी तुम्हाला काही सांगण्यात पॉइंट नाहीच आहे.

.

कैलासजी,

माझा इंटरेस्ट विपश्यनेत आहे आणि तुमचा आक्षेप ती बुद्धानं सांगितली नाही असा आहे.

तुम्ही ग्रंथांवर विसंबून आहात आणि असा दाखला दिला आहे :

>शरीर शिल्लक आहे म्हणजे उपाधी शिल्लक आहे,.....मृत्यू येऊन शरीर नष्ट झाले म्हणजे उपाधी नाहीशी झाली, म्हणजे ते निरूपधिशेष निर्वाण झाले व हेच संपूर्ण निर्वाण होय.

= मृत्यू पश्चात काय होईल हा निव्वळ तर्क आहे, ग्रंथाव्यतिरिक्त तुमच्याकडे त्याला काहीएक सपोर्ट नाही.

माझ्या दृष्टीनं मृत्योत्तर जीवनापेक्षा सध्याचं जीवन महत्त्वाचंय. आणि ते कसं सार्थक आणि आनंदाच होईल पाहायचंय .

सम्यक जगण्यात सम्यक न्यास (सम अवस्थेत चाललेला श्वास) ही सुरुवात आहे (किंबहुना तिच प्रायमरी गोष्ट आहे) आणि विपश्यना त्याला सहाय्यभूत आहे. पण तुम्हाला साधनेत रस नाही.

या ही पुढे जाऊन विपश्यना साधकाला वर्तमानात आणते आणि बुद्धाच्या क्षणवादाचा तो महत्तम पैलू आहे.

तुम्हाला तात्विक उहापोहात रस आहे आणि मला बुद्ध म्हणतो तसं क्षणस्थ जगण्यात.... त्यामुळे हे असं आहे.

क्षीरसागर साहेब मुळात खटकणारी बाब म्हणजे ज्या बाबी समजण्यात बुद्धाने अख्खा जन्म घालवला त्या तुम्ही फक्त एंजॉय करायच्या गोष्टी म्हणून पाहत आहात ....हे बरोबर नाही

तुम्हला एक विचार साण्गतो बघा पटतोय का

मुळात "मी आहे " ही जीवाला होणारी सर्वात सूक्ष्म जाणीव होय !!! आता ही जाणीव मरणानंतरही सुरूच राहते का ??श्वासा पेक्षाही अविरत व नित्य अशी ही मी आहे ही जाणिव संपली (जी श्वासासोबत संपते का हाही प्रश्न आहे ) ...की एक निर्विकार व ईश्वर (नश्वर नाही असे ते ) अवस्था प्राप्त होते तीच मिळवणे हा पहिला टप्पा आहे ज्ञान प्राप्तीचा !!! त्यच्या पुढेही काही टप्पे आहेत

हे करत असताना प्रश्नांची मालिका तयार होते एक एक उत्तर हज्जारदा जोखून पहावे लागते मगच आपले अंतर्मन /आत्मा वगैरे म्हणाल ते ...आपल्याला एक उत्तर देते ...हे ज्ञान बाहेरून कुठूनही येत नाही प्रत्येकाच्या आतच ते असते ...(नवा एक कुणीतरी बहुधा तुम्हाला हेच विचारत आहेत की कुणी नसते = काहीच नसते का म्हणून )

असो

...इथवर तो आतला प्रकाश कसा जागवायचा हे मी सांगीतले

आता त्यानंतरचे टप्पे तुमचे तुम्ही शोधा !!!

पुढे नाही मला सांगायचे
कशाला फारसे सांगू तुला :)........

माझा इंटरेस्ट विपश्यनेत आहे आणि तुमचा आक्षेप ती बुद्धानं सांगितली नाही असा आहे.

बरोबर

तुम्ही ग्रंथांवर विसंबून आहात आणि असा दाखला दिला आहे :

तुम्हाला बुद्धाने स्वतः येवून सांगितले आहे काय?

>शरीर शिल्लक आहे म्हणजे उपाधी शिल्लक आहे,.....मृत्यू येऊन शरीर नष्ट झाले म्हणजे उपाधी नाहीशी झाली, म्हणजे ते निरूपधिशेष निर्वाण झाले व हेच संपूर्ण निर्वाण होय.

हे मला का सांगताय?

= मृत्यू पश्चात काय होईल हा निव्वळ तर्क आहे, ग्रंथाव्यतिरिक्त तुमच्याकडे त्याला काहीएक सपोर्ट नाही.

मृत्यु पश्चात काय होईल हा तर्क बुद्धाने किंवा मी कधीच मांडला नाही,त्यावर उहापोह का करत आहात?

माझ्या दृष्टीनं मृत्योत्तर जीवनापेक्षा सध्याचं जीवन महत्त्वाचंय. आणि ते कसं सार्थक आणि आनंदाच होईल पाहायचंय .

सम्यक जगण्यात सम्यक न्यास (सम अवस्थेत चाललेला श्वास) ही सुरुवात आहे (किंबहुना तिच प्रायमरी गोष्ट आहे) आणि विपश्यना त्याला सहाय्यभूत आहे. पण तुम्हाला साधनेत रस नाही.

मला कशात रस आहे /नाही हा या लेखाचा व माझ्या चर्चेचा मुद्दाच नाही.

या ही पुढे जाऊन विपश्यना साधकाला वर्तमानात आणते आणि बुद्धाच्या क्षणवादाचा तो महत्तम पैलू आहे.

तुम्हाला तात्विक उहापोहात रस आहे आणि मला बुद्ध म्हणतो तसं क्षणस्थ जगण्यात.... त्यामुळे हे असं आहे.

असं???? म्हणजे कसं?

वैभवश्री,

>क्षीरसागर साहेब मुळात खटकणारी बाब म्हणजे ज्या बाबी समजण्यात बुद्धाने अख्खा जन्म घालवला त्या तुम्ही फक्त एंजॉय करायच्या गोष्टी म्हणून पाहत आहात ....हे बरोबर नाही

= अध्यात्मचं इप्सित आनंद आहे. जर जगायला उपयोगी होत नसेल तर अध्यात्म व्यर्थ आहे. एखाद्यानं सत्य गवसण्यासाठी आयुष्य वेचलं असेल तर त्यानं फायनली काय सांगितलंय ती आपली सुरुवात होऊ शकते. दिवा लागला की झालं, अंधार दूर करायला प्रत्येकानं एडिसनसारखे प्रयोग करणं कालापव्यय आहे.

>मुळात "मी आहे " ही जीवाला होणारी सर्वात सूक्ष्म जाणीव होय ......

येस. ती जाणीव प्राप्त करून सघन करण्याचा एक मार्ग विपश्यना आहे.

>त्यच्या पुढेही काही टप्पे आहेत ....

पुढचा टप्पा `मी आहे' ही केंद्रिभूत जाणीव आकाशरुप होणं आहे. त्याचं `एक्सप्लोजन ऑफ सायलेंस' असं अत्यंत सुरेख वर्णन आहे. बुद्ध त्याला शून्य म्हणतो. तो आनंद आहे.

>....कशाला फारसे सांगू तुला

मीच सगळं सांगून टाकलंय!

कैलासजी,

अध्यात्माबाबत आपले दृढ गैरसमज प्रतिसादात दिसतात. न रागावता हा प्रतिसाद वाचलात तर उपयोगी होईल.

सत्य ही कायम स्थिती आहे. बुद्ध काय इतर कुणीही ती स्वतःबरोबर घेऊन जात नाही. त्या स्थितीप्रत आलेला स्वतःचं वक्तव्य देतो आणि ते पुढे युगानुयुगं सत्य शोधणार्‍याला उपयोगी ठरतं.

सत्य समजण्यासाठी बुद्ध भेटण्याची गरज नाही. स्वतःची स्वतःशी भेट झाली की संपलं!

>तुम्हाला बुद्धाने स्वतः येवून सांगितले आहे काय?

= ज्योक मारण्याचा नादात तुमचं अनाकलन उघड झालंय.

पुढे तुम्ही (>) ही खूण म्हणजे तुमचं वक्तव्य आणि त्याला (=) हे माझं उत्तर यात गोंधळ केला आहे.

उदा. >हे मला का सांगताय?

= आयला, एक नंबरच्या पानावर ते तुम्हीच म्हटलंय (डॉ.कैलास गायकवाड | 15 September, 2013 - 01:18) !

आणि त्याला माझं हे उत्तर आहे := मृत्यू पश्चात काय होईल हा निव्वळ तर्क आहे, ग्रंथाव्यतिरिक्त तुमच्याकडे त्याला काहीएक सपोर्ट नाही.

आता याउप्पर तुम्ही म्हणतायं:

>मृत्यु पश्चात काय होईल हा तर्क बुद्धाने किंवा मी कधीच मांडला नाही, त्यावर उहापोह का करत आहात?

= तो तुम्ही केलायं (निर्वाण आणि कायकाय) आणि त्याला मी उत्तर दिलंय.

>मला कशात रस आहे /नाही हा या लेखाचा व माझ्या चर्चेचा मुद्दाच नाही.

= आता हा पुन्हा नवा ज्योक. आहो तुम्ही इथे दिलेल्या प्रतिसादात तुमचं हे पहिलंच वाक्य आहे!

मी म्हणतोयं, माझा इंटरेस्ट विपश्यनेत आहे आणि तुमचा आक्षेप ती बुद्धानं सांगितली नाही असा आहे. आणि तुम्ही म्हटलंय

= बरोबर

Happy

हा बाफ विपश्यना आणि अध्यात्म एव्हढ्यापुरताच मर्यादीत आहे असं लेखात कुठेच जाणवत नाही. अशी तळटीप जरी दिली असती तर अनेक लोकांचा वेळ वाचला असता. तसंच लेखही तेव्हढ्यापुरताच ठेवायला हवा होता.

तिसरा प्रश्न : ज्ञान होण्यासाठी त्यानं कोणती प्रक्रिया सांगीतलीये? हा प्रश्न उपस्थित करून त्याचा उहापोह केल्यावर पत्येकजण आपापला दृष्टीकोण मांडणारच ना. तसं केलं कि लेख विपश्यनेवर आहे, लेखात तीन मुद्दे आलेत असे प्रतिसाद वारंवार द्यायही गरज पडली नसती. तुमचं चालू द्या. पुढे केव्हां या विषय्वार लिहावंसं वाटेल तेव्हां दुसरा बाफ कुणाला तरी सुरू करायला सांगता येईल.

विपश्यना म्हणजे रस्ता आणि निर्वाण म्हणजे ऊद्दीस्ट किंवा पोहोचण्याच ठिकाण
काय विपश्यना निर्वाण प्रात्प करुन देऊ शकते काय?

>विपश्यना म्हणजे रस्ता आणि निर्वाण म्हणजे ऊद्दीस्ट किंवा पोहोचण्याच ठिकाण
काय विपश्यना निर्वाण प्रात्प करुन देऊ शकते काय?

= येस. संपूर्ण निश्चिंतता हे अध्यात्माचं ध्येय आहे. विपश्यना हा ती साधण्याचा एक मार्ग आहे. निर्वाण म्हणजे मृत्यू (त्याला अजून आवकाश आहे). पण मृत्यूतही (आप्तांच्या किंवा स्वतःच्या) चित्तदशा स्थिर राहिल याचं आश्वासन अध्यात्म देतं. तुम्ही सध्या लेखात सांगितलेली प्रक्रिया करुन पाहा. घरच्या घरी, बसल्या जागी आणि मोफत आहे.

>हे सगळं सोप्या मराठीत कुनी सारांश सांगेल काय?

= सगळं अत्यंत सोप्या मराठीतच आहे.

>....लेखात तीन मुद्दे आलेत असे प्रतिसाद वारंवार द्यायही गरज पडली नसती.

= लेख अत्यंत सरळपणे विपश्यना आणि बुद्ध-चित्तदशा यावर आहे. तुमच्या प्रश्नांनाही यथोचित उत्तरं दिली आहेत. आता प्रक्रिया करुन पाहायची की कुणाच्या नव्या लेखाची वाट पाहायची हे तुम्ही ठरवायचंय.

Pages