स्त्रिया आणि खटकणार्‍या/ जाचक प्रथा

Submitted by डेलिया on 24 March, 2010 - 20:37

या विषयावर अतिशय समतोल आणि सखोल विचारांचा लेख लोकसत्ता मधे वाचनास आला त्याचीच लिन्क -http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=593...

सौभाग्यचिन्हे या बीबी वरुन मला हा विषय सुचला. तो बीबी आता फक्त 'संयुक्ता' पुरता मर्यादित केलेला दिसतोय म्हणुन आणि या विषयाची व्याप्ती त्याच्या पेक्शा मोठी वाटत असल्याने नवीन बीबी उघडावा असे वाटले.

आपल्या समाजात बायकांच्या शारीरिक स्थिती वरुन ( उदा. - पाळी चालु असणे ) किंवा वैवाहिक स्थिती वरुन ( कु. , विवाहित , विधवा ई. ) अनेक प्रथा आहेत. यातल्या काही प्रथा तर स्त्रीसाठी अतिशय अपमानास्पद अशाही आहेत. असे असुनही त्यातल्या काही प्रथा आजही अनेक उच्चशिक्षित स्त्रियांकडुन देखिल पाळल्या जातात. काही स्त्रिया त्या प्रथा मनापासुन पाळतात तर काही जणी घरच्यांच्या / समाजाच्या दबावामुळे पाळतात.

इथे मला हे जाणुन घ्यायचेय की तुम्हाला अशा कोण्त्या प्रथा खटकतात? त्या नाहीशा करण्यासाठी तुमच्या परीने तुम्हि काय प्रयत्न करता ? तसेच तुमच्या पुढच्या पिढीवर या प्रथा लादल्या जाउ नयेत म्हणुन तुम्ही काय करता ? तसेच काही प्रथा खटकुन देखिल त्या तुम्हि पाळता का आणि कशामुळे ?

याचे उत्तर देउन माझ्यापासुनच मी सुरुवात करते.
१. पाळी ( menstrual periods ) सुरु असताना बाजुला बसणे ही जरी प्रथा अता बहुतेक सुशिक्षित घरातुन बंद झालेली असली तरी अजुनही पाळी सुरु असताना देवघरात जाणे , देवाची पुजा करणे ई. सारख्या गोष्टींना मनाई असते. पाळी चालु असणार्‍या स्त्री चा देवाला 'विटाळ' होतो असे म्हणले जाते. :
मला स्वताला या प्रथेत कोणतेही तथ्य वाट्त नाही. तसेच 'पाळी चालु असणार्‍या स्त्री चा विटाळ होतो' असे म्हणणे ही अतिशय अपमानास्पद वाटते. मी स्वता हे अजीबात पाळत नाही तसेच माझ्या मुलीला पण असे काहीही मी सांगणार नाही. ईतर कोणी तिला काही शिकवलेच तर ते का योग्य वाटत नाही हे तिला सांगेन.
२. सौभाग्यचिन्हे ( मंगळसुत्र ) ही बायकांची वैवाहिक स्थिती दर्शवितात. त्याच्या अनुषंगाने बायका - बायकात त्यांच्या वैवाहिक स्थिती वरुन भेद भाव केला जातो. : हा भेद भाव दुर व्हावा आणि सर्व बायकाना समाजात समान वागणुक मिळावी असे मला मनापासुन वाटते. रोजच्या आयुष्यात मंगळ्सुत्र वापरत नसले तरी लग्न , मुंजीसारख्या कार्यक्रमांना जाताना घालते. पटत नसले तरी नातेवाइकांच्या आणि घरातल्या मोठ्याच्या टीकेला सामोरे जावे लागु नये आणि उगीच वाद नकोत म्हणुन.

गुलमोहर: 

Proud ... बरं मग त्या एका स्त्रीयेसाठी बीबी चालू ठेवावा म्हणताय?

मस्त चाललाय .. माझा एकाच म्हणणं आहे .. उगाच भांडणं करून विरोध करून घरातला स्वास्थ्य हरवण्यात काही अर्थ नाही .. मी माझ्या नवर्याला अहो जाहो करते.. अर्थातच साबा नि म्हटला म्हणून.
आता कोणी नसताना अरे तुरे आणि बाहेर अहो जाहो हे काही आपल्याला जमत नाही .. तुम्हाला वाटता न आदर वागिरे घ्या मग.. उगाच फालतू टेन्शन नाही लेणे का .. आता सवय झाली.. नवर्याला काय घेणा देणा नव्हता.. तो म्हटला तुम्ही ठरवा काय ते करायचा.. माझे सासरचे ३ पिढी मागचे .. त्यांच्या कडू काय अपेक्षा करणार कपाळ.. थोडा डोकं लावून वागा असा मला वाटता.. उगाच काय त्रागा करून घायचा.. उपास बीपास काही जमत नाही पण रूढी तर आहेच .. न बोलता विरोध होत असेल तर तो करावा.. वरती गोड स्मित ..हि idea मस्त..
सन सुद्दीला करता करता खावून टाकायचा हो.. .. काही तरी असा हि तळायचा जे नैवेद्य दाखवायचा नाही .. पण इथे जे पुरुष लोक आहेत न त्यांनी एकदा स्त्रीच जन्म घाय्वा.. मग कळेल.. विरोध वागिरे ठीक आहे पण मानसिक त्रास असतो.. करू का नको सामाजिक दडपण असता.. घरात तर असताच आणि त्यात स्त्रिया अशा वागतात . कारण त्यांनी बाकी बघितलाच नसता.. वैचारिक मर्यादा त्यांच्या तेवढ्याच असतात..

नानबा Proud

>>पण दोन सख्खे भाउ जर संपत्तीच्या वादवरुन एकमेकांच्या जीवावर उठले असतील तरीही लोकांना त्यात फारसे वावगे काही वाटत नाही. >> असं कसं मृदुला, त्यात ही "बायकांनी ह्यांचे कान भरले असतील, नाहीतर दोन भाऊ लग्नाआधीपर्यंत अगदी जीवाभावाने नांदले हो'... म्हणून सांगणारे कित्येक शेजारी मी पाहिलेत. Angry
बायका शहाण्या असतात, त्यांना व्यवहार चोख कळतो, त्याची थोडी शिकवण पुरूषांना केली तर लगेच कान भरले? Uhoh हे म्हणजे नेकी कर और दर्या मे डाल... हुर्रर्रर्र!!!!

नानबा - Lol Rofl

दक्षिणा , Happy
विशयान्तर करतोय ,
पण याबाबतीत मात्र MEDIA (आणी काही प्रमाणात स्त्रिया) जबाबदार आहेत अस माझ मत .
स्त्रियान्च्या म्हणून ज्या मालिका त्या डोक्यावर घेतात , त्यात black & white हे दोनच प्रकार असतात .
आणी त्या स्त्रियाच असतात .पुरुष जनरली NEUTRAL
एक तर फुल्ल व्हॅम्प ( त्या घराच वाटोळ करुन टाकीन ) नाहीतर एक्दम देवी ( चाहे कुछ भी हो वो मेरे अपने है )
चान्गल्याशी चान्गल आणी वाईटाशी वाईट वागणारी बाई नसते का कधी ?
आणी हे आत्ताच नाही , अगदी लहान असतानापासुन पाहतोय , ती आशा काळे इत्का अन्याय सहन करते विरोध न करता की शेवटी तिचाच राग यायला लागतो .
माझी बायको पण सद्ध्या झी वर कुठलीतरी सिरियल बघते . तिची मामी तिचा इत्का दुस्वास करते तरी तिच्यासाठी ही बाई स्वतः डान्स काय हरते , नवर्याला घटस्फोट काय देते आणी मग ती चान्गली ? भम्पक आहे ती . किति समजुन सान्गितल तरी पटत नाही बायकोला. ती म्हणे त्याग करतेय . डोम्बलाचा त्याग .

आता तर गोदभराई .

अन्याय सहन करणारी स्त्री ष्रेश्ठ अस अगदी माहेरची साडी पासुन केकता पर्यन्त सगळे ओरडतायत .
हे Slow Poisioning आहे आणी स्त्रिया स्वतःच ते करून घेतायत .

नवर्याला अहो जाहो केल्याने आदर प्रतित होतो हे कसे काय बुवा ??
(आमच्या ह्यांना व्यवहारतलं काही काही कळत नाही.. हे ना कुठे कसे बोलतील सांगता येत नाही .. etc etc हा असा आदर आहे का? ) (मी फक्त विचारतिये . मला माहिती नाही)

मग कुठल्याच पुरुषाला बाई बद्दल आदर नसतो काय?? मी तरी कुठल्याच पुरुशाला बायकोला अहो म्हणताना ऐकले नाही म्हणुन विचारते...

माझ्या द्रुष्टीने नवरा ही जगातली सगळ्यात जवळची व्यक्ती असते (म्हणजे असावी ) त्याला अहो म्हणुन क्षणार्धात परकं करुन टाकल्यासारखं वाटत नाही का???

>>स्त्रियान्च्या म्हणून ज्या मालिका त्या डोक्यावर घेतात , त्यात black & white हे दोनच प्रकार असतात . >> केदार, पण अशा मालिकाच काय पण चित्रपट ही फक्त मनोरंजनापुरते पहायचे असतात हे बघणार्‍यांना का नाही कळंत? पवित्र रिश्ता, ये रिश्ता क्या कहलाता है सारख्या सिरियल्स मी ही पाहते, पण रात गयी बात गयी सारखं पाहून तिथेच सोडून देणं इष्ट... सारखं डोक्यात घेऊन फिरायला आपलं घर आपला संसार म्हणजे काय मालिका आहे का?

माझ्या मते तरी जनरली ज्याच्याबद्दल भीतियुक्त आदर असतो तिथे अहो जाहो असते .
अहो बाबा , अहो आजोबा ,अहो सर ,अहो मॅडम
ज्याच्याबद्दल प्रेम्/माया असते (जिथे भीती नसते)तिथे अरे येत .
अग आई , अग ताई , अरे दादा , अग आजी , अगदी अरे देवा सुद्धा

क्रुपया बाबान्वर माया नसते असा याचा अर्थ कुणी काढू नये Happy

नानबा!! Happy

आजकाल्च्या हिन्दी (आणि मराठी ही) सिरिअल्स तर सगळ्यांसाठीच जाच आहेत Happy त्याची चर्चा कशाला या बीबीवर? (मला तर सगळ्याच खटकतात!)

बाकी केदार,
आपल्याकडे अजुनही black or white च पात्र दाखवल्या जातात आणि तेच खपतात, यावरुनच प्रेक्षकवर्गाची वैचारिक पातळी उन्चावण्याची गरज आहे, हे कळते. त्यात स्त्री-पुरुष दोन्ही आले. पण केकताला त्याचे काय? ती बिझिनेसवुमन आहे बाबा, समाजसुधारक नाही. त्यामुळे दुसरी अपेक्षा करणेच चुकीचे आहे. आणि just FYI, "बेटा" मधला अनिल कपूर ही असलाच वेडगळ होता Happy

दक्षिणा ,
तुझ म्हणन बरोबर आहे .
पण तू गोदभराईचे प्रोमोज पाहिलेस का ? मला तर इतका प्रचण्ड सन्ताप येतो .
पण आजच्या जगात सुद्धा अशी सिरिअल काढाविशी वाटते , लोक ती बघतिल याचा विश्वास असतो यातच सगळ आल ना ?

केदार, टिव्हीवर दाखवल्या जाणार्‍या समस्त मालिका या चिड आणणार्‍याच असतात. अगदी क्राईम पेट्रोल आणि इमोशनल अत्याचार वगैरे सुद्धा, त्यात दुमत नाही. गोदभराईचा प्रोमो पाहिलाय मी, मेडिया वाल्याना सुद्धा दुसरे विषय मिळत नाहीत. Sad

केदार,
यच्चयावत सगळ्या मालिकांकडे बघून एवढाच संताप होतो माझा.
>>पण आजच्या जगात सुद्धा अशी सिरिअल काढाविशी वाटते , लोक ती बघतिल याचा विश्वास असतो यातच सगळ आल ना ?<<
हे आपल्या सगळ्या समाजाचं दुर्दैव....

>>केदारला अनुमोदन. >> फक्त सिरियल साठीच ना गं मृदुला? >>
हो हो फक्त सिरियल साठीच Happy

आजकालच्या सुनांना (विशेषतः न कमवणारया पण उच्चशि़क्षित) अजुनही काही जाच सुरु आहेत:
१. माहेरच्या लोकांशी फोनवर न बोलु देणे किंवा त्या बोलत असताना कान देऊन ऐकणे.
२. त्यांना माहेरी जाऊ न देण्यासाठी कारणे शोधणे.
३. एखादीचा नवरा ५०००० रुपये महीना कमवत असताना ही तिला ५०० रुपये महीना देऊन घरकामाला बाई ठेवण्याचे स्वातंत्र्य नसणे.
४. नवर्याचे नातेवाईक वाटेल तेव्हा येऊन धडकणार आणि तिच्या नातेवाईकांना बोलावण्यासाठी तिला नवर्याशिवाय सासू-सासरे-नणंद इ.इ. लोकांच्या परवानगी ची गरज. (जरी ते सगळे वेगळे रहात असतील तरी)
५. जरी मोजक्याच कामासाठी बाई असेल तरी सासरची मंडळी असे दाखव्णार जणु काही "ही आमच्या मुलाचे/भावाचे किती पैसे उडवते!!"
६. सुनेला तिच्या आई-वडील्-भाऊ-बहीण यांच्यावरून काहीबाही बोलणे. विशेषतः ते कसे मूर्ख आणि आम्ही कसे शहाणे, त्यांनी तुम्च्या लग्नात कशी कन्जुषी केली, त्यांनी तुला कसे वळणच नाही लावले इ.इ.
७. बाकीच्या सुना नोकरी करून घराला हातभार लावतात, तू काहीच करत नाहीस ( जणु काय लग्न ठरवताना ह्यांना माहीतच नव्हते सुनेला नोकरी नाही ते..)
८.सून लहान गावातून आली असल्यास ती कशी गावंढ्ळ आहे हे येणार्या प्रत्येकासमोर बोलून तिचे मानसिक खच्चीकरण करणे.
९. मझ्या एका अमेरिकेत असणार्या इंजिनीअर मैत्रिणीस तर चक्क "तुला काय english बोलता येणार", "तू घरी असुन तुला "साधी" जिलेबी करता येत नाही?" असले अपमानास्पद बोलणारी सासू आहे. ही मुलगी BE झाल्यावर लगेच लग्न होऊन गेली. ती जिलेबी कधी शिकणार होती?

अजून बरेच आहेत. आठवतील तसे लिहीन.

वरच्या मुद्द्यात बोलणारे पुरुष असतील तर त्यांच्यापासून शिकून घ्यायला पाहिजे हे स्लेजिंग. Proud

नानबा, ते लेकी-बोले-स्टॅटिस्टिक्स महान आहे.. Lol

सुनेला लागले की नाही? Proud

ए फूल, (फ्लॉवर या अर्थी म्हणतोय Proud ), बीबी खटकणार्‍या/जाचक प्रथान्चा आहे, जसे की कुन्कू लावणे/पाळी पाळणे/साडीच नेसणे इत्यादी, सासवा करीत असलेल्या सूनान्चा छळवाद असा बीबी नाहीये! त्या मुद्द्यान्करता वेगळा बीबी उघडाल का प्लीज? Wink
बायदिवे, कुणाला "बगाडाची" प्रथा माहित आहे का इथे? त्या प्रथेत मात्र त्या घरातल्या नवविवाहित पुरुषाला हुकाला लटकवले जाते!
(पुरुषान्ना जाचणार्‍या प्रथा अशा बीबीची चूकुन माकुन मागणी कुणा पुरूषाकडून झाल्यास तिथे खपेल हे उदाहरण, नाही? Wink
झालच तर हे उदाहरण म्हणजे अंनिसवाल्यान्च्या हातात आयतेच कोलित! Proud )

अहो लिम्बुटिम्बु,
मला ही ते माहीत आहे हो. Happy
पण मी लिहिलेल्या मुद्द्यांचे सार हे की आजही सुनांना ( स्त्रियांना) असे वागवले जाते कि त्यांना जणु काही स्वतःचे काही मत्/इच्छा/आवडिनिवडी असूच शकत नाही. त्यांना अपमानास्पद वाटेल असे लोकांच्या आज ही मनात येत नाही. याचे कारण ह्या आपल्या समाजात ग्रुहीत धरल्या जाणार्या deep-rooted प्रथाच आहेत..
सूनान्चा छळवाद असा बीबी नाहीये! त्या मुद्द्यान्करता वेगळा बीबी उघडाल का प्लीज? >>>
तिथेही पुरुष मंडळी येउन सुनांचा नव्हे तर जावयाचा"च" छ्ळवाद कसा होतो हे prove करण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा नकोच Happy

सूनान्चा छळवाद असा बीबी नाहीये! त्या मुद्द्यान्करता वेगळा बीबी उघडाल का प्लीज? >>>
शिवाय तो विषय अनादि-अनंत असा आहे. माबो चा server त्याला support करु शकणार नाही बहुधा!! Happy

>>>> तिथेही पुरुष मंडळी येउन सुनांचा नव्हे तर जावयाचा"च" छ्ळवाद कसा होतो हे prove करण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा नकोच<<<<<
छे छे छे, हा तुम्ही अन्याव करताय! कशावरुन म्हणता तिकडे पण येतिल?
मायबोलीवरील सूज्ञ पुरुष आयड्यान्पैकी एकतरी आयडी इकडे फिरकली आहे का? दाखवुन द्या बर!
इथे माझ्यासारख्या ओवाळून टाकलेल्या ड्युप्लिकेट आयडी Proud अन केदार जाधवसारखे चूकार पुरुष सोडले तर येतोय कोणता पुरुष उघड उघड मत व्यक्त करायला? आले होते कोणी घरकामावर बोलायला?
नै हो नै, हे पुरुष की नाही? न बोलुन शहाणे अस्तात बरं! त्यान्च्या दिस्ण्यावर अन सूज्ञपणावर भाळू नका बरेऽऽऽ!
खर तर तुम्ही अजुन असा एक बीबी उघडला पाहिजे की "पुरुष आयड्या आपापली मते ठामपणे व स्पष्टपणे कधी उघड मान्डू लागणार? " Wink

पुरुष आयड्या आपापली मते ठामपणे व स्पष्टपणे कधी उघड मान्डू लागणार?>>>
अहो प्रत्य़क्षातले पुरुष जिथे अवघड प्रसंगी चुप बसणे हा मार्ग स्वीकारतात तिथे पुरुष आयड्या आपापली मते ठामपणे व स्पष्टपणे कधी"तरी" उघड मान्डण्याची अपेक्षा कराय्ला , समस्त स्त्रीवर्गाला काय तुम्ही अगदीच "ह्या" समजलात? हेहे.. जाउ द्या, विषयांतर होतेय..

>>>>>> अहो प्रत्य़क्षातले पुरुष जिथे अवघड प्रसंगी चुप बसणे हा मार्ग स्वीकारतात तिथे पुरुष आयड्या आपापली मते ठामपणे व स्पष्टपणे कधी"तरी" उघड मान्डण्याची अपेक्षा कराय्ला , समस्त स्त्रीवर्गाला काय तुम्ही अगदीच "ह्या" समजलात? हेहे.. जाउ द्या, विषयांतर होतेय..<<<<<
देअर यू आर! Proud
अन हे अवघड प्रसन्ग कुणासमोर येतात म्हणे? मोस्टली बायकोसमोरच ना?
अहो स्त्रीवर्ग अगदीच "ह्या" नस्तोच कधी अन नव्हताही, त्याशिवाय का हे सगळे पुरुष चुप्चाप्प बसलेत जसे एरवी बस्तात? Wink
अन तरी म्हणे जाच होतो! कैच्याकैच हं!
अस म्हण्तात की बायकान्नी पायाने मारलेल्या गाठी पुरुषान्ना हातानेदेखिल सोडवता येत नाहीत, अन मी कस हो समजेन की स्त्रीवर्ग म्हण्जे अगदी "ह्ह्या"? Lol

स्त्रियांबद्दल ह्या अजून काही जाचक प्रथा

१. बालविवाह : शहरात व खेड्यात अशिक्षित, आर्थिक दृष्ट्या कमकुवत वर्गात जास्त आढळतात. मुलगा व मुलगी दोघेही कायद्याने सज्ञ नसतात....शारीरिक, मानसिक दृष्ट्या सक्षम नसतात. अशाने लवकर मातृत्त्व लादले जाते. जन्माला येणारे मूल व आई दोघांनाही त्यात धोका असतो.
आमच्याकडेच आतापर्यंत अशा दोन-तीन मुली/ बायका कामाला होत्या - जवळच्या झोपडपट्टीत राहायच्या, गावाकडून आलेल्या, फारसे शिक्षण नाही, चौदा - पंधराव्या वर्षी लग्न - सोळा/ सतराव्या वर्षी मूल...विसाव्या वर्षी दोन/ तीन मुले.... स्वतः ह्या मुली काम करून पैसे कमावतात, पण तब्येती पहाव्या तर अ‍ॅनिमिक. तेच ते नेहमीचे शिळेपाके खाणे वगैरे वगैरे. कधी संपणार हे सारे?

२. हुन्डा, मानपान, देवघेव : कायद्याने हुन्ड्यावर बन्दी आणली तरी तो आजही वेगवेगळ्या रूपात चालू आहे. सुशिक्षित समाजातही तो दिसतो. पुणे-मुम्बई कडचा समाज सोडा, जरा इतर शहरे, तालुके येथे डोकावलेत तरी बास आहे. मुलीकडच्यांकडून आजही लग्नात किंवा लग्नानन्तर स्थावर/ जंगम मालमत्तेची अपेक्षा ठेवली जाते. त्यावरून लग्ने मोडतात, बायकोला माहेरी धाडले जाते, तिचा छळ होतो. ही आहे जाचक प्रथा. पण 'सुशिक्षितता' येऊनही, उच्चशिक्षित कुटुम्बांमध्येही असे लालसेपोटी जेव्हा प्रसंग घडताना दिसतात तेव्हा शिक्षणाचा व ह्या प्रथेचा काहीही संबंध नाही हे लक्षात येते. ह्या प्रथेमागे आहे फुकटच्या पैशाची हाव, लालसा. त्यात स्त्री हे केवळ एक माध्यम बनते. परंतु त्यात ती भरडली जाते म्हणून ही स्त्रीबाबत जाचक प्रथाच होय.

३. स्त्रीच्या इच्छेविरुध्द मातृत्व लादले जाणे : आधीची संतती मुलगी आहे व वंशाला दिवा हवा म्हणून स्त्रीवर तिच्या इच्छेविरुध्द, तिच्या प्रकृतीला झेपत नसतानाही मातृत्व लादले जाते. सासर, माहेरचे सर्वच ह्यात त्या बाजूने असतील तर प्रश्नच संपला! तिने मदत मागायची तरी कोणाकडे? दांपत्याच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करून त्यांनी कधी मूल होऊ द्यावे, मुलगाच हवा वगैरे आग्रह करणारे नातेवाईक दोन्ही बाजूंना आढळतात. माझ्या मते हा सर्वप्रथम त्या दांपत्याचा प्रश्न आहे व जी स्त्री ते मूल जन्माला घालणार आहे तिचा प्रश्न आहे. पण ह्यात स्त्रीला बोलण्याचा अधिकारच दिला जात नाही. मनाविरुध्द तिला दुसरा, तिसरा, चौथा चान्स घ्यायला लागतो. त्यात 'मुलगी' झाली तर स्त्रीवरच आगपाखड! विज्ञानाने सिध्द केले आहे की त्यात तिचा काहीच 'दोष' नाही.... दोष किंवा मुख्य भूमिका आहे ती पुंबीजाची! पण ह्याला डोळ्यांआड करून आजही स्त्रियांना जगणे मुश्किल केले जाते.

४. स्त्रीच्या मनाविरुध्द तिला स्त्रीभ्रूणहत्या करावयास लावणे: हा तर पूर्णतः व्यावसायिक खेळ झाला आहे. गर्भारपणात 'चेकिंग' किंवा 'सोनोग्राफी'च्या मिषाने स्त्रीची गर्भजलचाचणी केली जाते. जर स्त्रीभ्रूण असेल तर अनेकदा मातेच्या मर्जीविरुध्द, किंवा तिला कळू न देता तिचा गर्भपात केला जातो. डॉक्टर्स सकट अनेक जण ह्या रॅकेट मध्ये सामील असतात. घरातील लोकांना अशा गर्भपातांचे फारसे काही वाटत नाही. आणि अशा स्त्रिया मी आजही शहरांमध्ये, चांगल्या घरांमध्ये पाहते. त्यांना जरी कळले की काय चालले आहे तरी हताशपणे त्याला सामोरे जाणार्‍या, किंवा त्यांच्या आग्रहाला बळी पडणार्‍या....शिकलेल्या..... काय उपयोग?

"अहो" म्हणण्यात जाचक नेमक काय ते कळलच नाहीये मला अजुन>>>>>

लिम्बु, परत परत तेच वाक्य काय सांगायचं अरे.... यातला जाचक पार्ट हा आहे की त्याची सक्ती होते, स्त्रीच्या मनाविरुद्ध तिला अहो म्हणावं लागतं.

लिम्बु, परत परत तेच वाक्य काय सांगायचं <<
मंजिरी,
समजून घ्यायचंच नाही असं ठरवल्यावर कसं समजणार.
कुठल्याही प्रथेची, विवाहचिन्हांची, आदरार्थी वागण्याची सक्ती होते तेव्हा तो जाच असतो. मूळ प्रथा ही जाच असतेच असं नाही हे आपण साधारण ४००+ पोस्टस मधे सांगत आलोय. अजूनही समजत नाहीये याचा अर्थ पालथा घडा मोड ऑन आहे.
कितीही रक्त आटव उपयोग नाही...

अरूंधती,
दुर्दैव आपलं की हुंडा प्रथा योग्यच आहे असं जाहीरपणे सांगणारे गृहस्थ पण इथे माबोवर आहेत.

Pages