स्त्रिया आणि खटकणार्‍या/ जाचक प्रथा

Submitted by डेलिया on 24 March, 2010 - 20:37

या विषयावर अतिशय समतोल आणि सखोल विचारांचा लेख लोकसत्ता मधे वाचनास आला त्याचीच लिन्क -http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=593...

सौभाग्यचिन्हे या बीबी वरुन मला हा विषय सुचला. तो बीबी आता फक्त 'संयुक्ता' पुरता मर्यादित केलेला दिसतोय म्हणुन आणि या विषयाची व्याप्ती त्याच्या पेक्शा मोठी वाटत असल्याने नवीन बीबी उघडावा असे वाटले.

आपल्या समाजात बायकांच्या शारीरिक स्थिती वरुन ( उदा. - पाळी चालु असणे ) किंवा वैवाहिक स्थिती वरुन ( कु. , विवाहित , विधवा ई. ) अनेक प्रथा आहेत. यातल्या काही प्रथा तर स्त्रीसाठी अतिशय अपमानास्पद अशाही आहेत. असे असुनही त्यातल्या काही प्रथा आजही अनेक उच्चशिक्षित स्त्रियांकडुन देखिल पाळल्या जातात. काही स्त्रिया त्या प्रथा मनापासुन पाळतात तर काही जणी घरच्यांच्या / समाजाच्या दबावामुळे पाळतात.

इथे मला हे जाणुन घ्यायचेय की तुम्हाला अशा कोण्त्या प्रथा खटकतात? त्या नाहीशा करण्यासाठी तुमच्या परीने तुम्हि काय प्रयत्न करता ? तसेच तुमच्या पुढच्या पिढीवर या प्रथा लादल्या जाउ नयेत म्हणुन तुम्ही काय करता ? तसेच काही प्रथा खटकुन देखिल त्या तुम्हि पाळता का आणि कशामुळे ?

याचे उत्तर देउन माझ्यापासुनच मी सुरुवात करते.
१. पाळी ( menstrual periods ) सुरु असताना बाजुला बसणे ही जरी प्रथा अता बहुतेक सुशिक्षित घरातुन बंद झालेली असली तरी अजुनही पाळी सुरु असताना देवघरात जाणे , देवाची पुजा करणे ई. सारख्या गोष्टींना मनाई असते. पाळी चालु असणार्‍या स्त्री चा देवाला 'विटाळ' होतो असे म्हणले जाते. :
मला स्वताला या प्रथेत कोणतेही तथ्य वाट्त नाही. तसेच 'पाळी चालु असणार्‍या स्त्री चा विटाळ होतो' असे म्हणणे ही अतिशय अपमानास्पद वाटते. मी स्वता हे अजीबात पाळत नाही तसेच माझ्या मुलीला पण असे काहीही मी सांगणार नाही. ईतर कोणी तिला काही शिकवलेच तर ते का योग्य वाटत नाही हे तिला सांगेन.
२. सौभाग्यचिन्हे ( मंगळसुत्र ) ही बायकांची वैवाहिक स्थिती दर्शवितात. त्याच्या अनुषंगाने बायका - बायकात त्यांच्या वैवाहिक स्थिती वरुन भेद भाव केला जातो. : हा भेद भाव दुर व्हावा आणि सर्व बायकाना समाजात समान वागणुक मिळावी असे मला मनापासुन वाटते. रोजच्या आयुष्यात मंगळ्सुत्र वापरत नसले तरी लग्न , मुंजीसारख्या कार्यक्रमांना जाताना घालते. पटत नसले तरी नातेवाइकांच्या आणि घरातल्या मोठ्याच्या टीकेला सामोरे जावे लागु नये आणि उगीच वाद नकोत म्हणुन.

गुलमोहर: 

हो ना, अन जीन्स्वर अमकेच घालावे तमके घालू नये हे तरी नियम का पाळावेत? कुणी ठरवले हे नियम? Wink
मी तर बोवा गेल्याच्या गेल्या शतकातल्यासारख धोतरावर ब्लेझर घालुन वावरणारे! Proud

जीन्स पँट आणि टी-शर्ट ही पाश्चिमात्य पद्धत आहे. त्यात मुळतः तो पुरुषांचा ड्रेस आहे म्हणून बहुतेक तसे नियम आले असतील.

ब्राम्हण समाजात असे बरेच नियम आहेत जे पुरुषांनी पाळायला हवेत..जसं जानव्याच्या बाबतीत लिंबुदा म्हणत होते.
कुठल्याही मुंज झालेल्या मुलाने जर जानवं घातलं नसेल किंवा तो सगळे नियम पाळत नसेल तर मी "इइइइइ" या
नजरेनेच बघते..मग हे जानवं घालणं, संध्यावंदना करणं हे त्यांच्यासाठी जाचाचंच ठरावं नाही का?

काही प्रथा जाचक आहेत हे मान्य आहे पण समाजाची त्या पद्धतींकडे पाहण्याचा द्रुष्टिकोण जो पर्यंत बदलत नाही तो पर्यंत त्या पाळ्याव्याच लागतात...

जे कोणी बाहेरगावी जाऊन स्थाईत झाले आहेत त्यांना हे पटलं.. हे नाही हे सांगण सोपं जात पण तस भारतात असताना आमलात आणणे अवघड आहे.. (तुमच्या आजुबाजुच्यांना न आवडणारे)

काही गोष्टि भोवतालचा समाज कसा आहे ..त्याची विचार करण्याची पद्धत कशी आहे यावर अवलंबून असतात.. तुम्हाला कोणि त्याची सक्ति करत नाही पण त्यांची तशी अपेक्षा असते...

भारता बाबत..तुम्ही शिकलेल्यांना सुधारु शकता अडाण्यांना सुधारणे अवघड ...

सौभाग्य अलंकार घालणे न घालणे हे ज्याच्या त्याच्यावर आणि त्याच्या सभोवतालच्या माणसांच्या द्रुष्टिकोणावर अवलंबुन आहे... तुम्ही लग्न होउनही ते न घालालही पण त्याने खुप जण नाखुश होतिल आणि जन्मभर ती माणसे तुमच्याशी वेगळे वागतिल...

काही गोष्टि दुस-यांना आवडतात म्हणुनही कराव्या लागतात..

काही प्रथा जाचक आहेत हे मान्य आहे पण समाजाची त्या पद्धतींकडे पाहण्याचा द्रुष्टिकोण जो पर्यंत बदलत नाही तो पर्यंत त्या पाळ्याव्याच लागतात...

जे कोणी बाहेरगावी जाऊन स्थाईत झाले आहेत त्यांना हे पटलं.. हे नाही हे सांगण सोपं जात पण तस भारतात असताना आमलात आणणे अवघड आहे.. (तुमच्या आजुबाजुच्यांना न आवडणारे)

काही गोष्टि भोवतालचा समाज कसा आहे ..त्याची विचार करण्याची पद्धत कशी आहे यावर अवलंबून असतात.. तुम्हाला कोणि त्याची सक्ति करत नाही पण त्यांची तशी अपेक्षा असते...

भारता बाबत..तुम्ही शिकलेल्यांना सुधारु शकता अडाण्यांना सुधारणे अवघड ...

सौभाग्य अलंकार घालणे न घालणे हे ज्याच्या त्याच्यावर आणि त्याच्या सभोवतालच्या माणसांच्या द्रुष्टिकोणावर अवलंबुन आहे... तुम्ही लग्न होउनही ते न घालालही पण त्याने खुप जण नाखुश होतिल आणि जन्मभर ती माणसे तुमच्याशी वेगळे वागतिल...

काही गोष्टि दुस-यांना आवडतात म्हणुनही कराव्या लागतात..

>>>> मग हे जानवं घालणं, संध्यावंदना करणं हे त्यांच्यासाठी जाचाचंच ठरावं नाही का? <<<<
अगदी अगदी मुग्धा, व्यक्तिस्वातन्त्र्याच्या जमान्यात हेच काय, काहीही जाचक वाटू शकते! Proud
अन खर तर ह्या बाबी (जानव, मुन्ज वगैरे) केवळ ब्राह्मणान्नाच नव्हे तर इतर समाजालाही लागू होत्या! क्षत्रियान्चि मुन्ज व्हायचीच व्हायची, आजही सोनार वगैरे जातीत काही प्रथान्मधे हे रुप दिसुन येते. पण कालौघात, व "जाचक वाटण्याच्या" सुधारीत विचारसरणीत (ही विचारसरणी म्हणजे काही विसाव्या शतकाचीच देणगी आहे असे नाही) बहुसन्ख्य ब्राह्मणेतरान्नी मुन्ज व अन्य बाबी सोडून दिल्या, येऊन जाऊन लग्न विधी व अन्त्यविधी तेव्हडा शिल्लक आहे या ना त्या रुपात!
वीसाव्या शतकात शहरी ब्राह्मणान्नी देखिल सगळे सोडून दिले!
(अन ब्राह्मण्/ब्राह्मणेतरान्च्या या "सोडून देण्यात" कुठेही स्त्री-पुरुष भेदभाव दिसुन आला नाही"हे विशेष! :डोमा:)

<<<पूर्वी स्त्रियांना या ४ दिवसांत हक्काचा आराम मिळावा असे त्याचे कारण होते असे सांगतात<<
पण काही ठिकाणी यातुनही सोयिस्कर मार्ग काढतात. माझ्या बहिणीच्या सासरी विटाळशी बाईला फक्त स्वयंपाकाला (फक्त किचन मधे तिला एन्ट्री नाही) हात लाउ देत नाही. बाकी इतर कामे...धुणी, भांडी सारखी अंगमेहनतीची कामे तिने करावीत कारण सुनेनं आराम केला तर चालणार कसं यांना!

विशेष म्हणजे तिने धुतलेले भांडे हे किचनमधे वापरतात...तिने धुतलेले कपडे यांना चालतात.
याशिवाय, घरच्या सुनेने मोठ्या माणसांसमोर कधी हॉलमधे यायचे नाही. दारातुनच बोलायचे, हॉलमधे सास-यांच्या बरोबरीने म्हणजे सोफ्यावर किंवा त्यांच्यासमोर बसायचे नाही. जमिनीवर बसायचे. ते ही मांडी वाळुन बसले असं नाही. मोठ्याने हसा-बोलायचे नाही. सुनेच्या माहेरहून फोन आला तर तिच्या माहेरच्यांनी आधी तिच्या सासरकडच्या मंडळींची खबर घ्यायची मगच मुलीशी बोलायचे. (नाहीतर फक्त मुलीलाच ओळखतात....आम्ही कोणी नाही का त्यांचे ?? वै.वै.) असे कितीतरी प्रकार आम्ही बघितलेत.

माझ्या माहेरी आई म्हणायची, उडदाचे पापड किंवा तांदुळाच्या चकल्या बनवतांना विटाळशी बाईची सावली जरी पडली तरी पापड/ चकल्या लाल होतात असं! मी तिला एकदा सप्रमाण दाखवुन दिले होते की पापडखार किंवा तत्सम काही पदार्थ कमी पडल्याने असं होतं ! तिथे आजुबाजुला विटाळशी बाई असो वा नसो! Happy

>>>> बाकी इतर कामे...धुणी, भांडी सारखी अंगमेहनतीची कामे तिने करावीतच कारण सुनेनं आराम केला तर चालणार कसं यांना! <<<
हे अस व्हायच (अजुनही होत असेल्कदाचित) हे मान्य, पण हा तर टिपीकल सासु-सुनेचा सन्घर्ष आहे! Happy

लिंबुदा तुमच्याकडुन मला खरंतर समाजाने पुरुषांवर लादलेल्या नियमांची यादीच हवी होती Proud

मृदुलाने वर लिहील्याप्रमाणे पाळी वगैरे चा गाजावाजा नं करता स्त्रीला तिची डिग्निटी मेंटेन करता यावी याकरता सगळ्या स्त्रियांनी प्रयत्न करायला हवे..

मंगळ्सूत्र घालणे याला आपण जाचक प्रथा म्हणुच शकत नाही..तरी ज्याचा त्याचा प्रश्न ह्या सदरात ह्या प्रथेचा समावेष होतो..

घरच्या सुनेने मोठ्या माणसांसमोर कधी हॉलमधे यायचे नाही. दारातुनच बोलायचे, हॉलमधे सास-यांच्या बरोबरीने म्हणजे सोफ्यावर किंवा त्यांच्यासमोर बसायचे नाही. जमिनीवर बसायचे. ते ही मांडी वाळुन बसले असं नाही. मोठ्याने हसा-बोलायचे नाही.>>> हे सगळं माझ्या सासरी मी करायचे अजुनही करते...त्यात जाच तो काय?

लोणच्या च्या बरणीला जर विटाळशी बाई ने हात लावला तर ते नक्की खराब होते हा माझा अनुभव आहे..

>>>>> समाजाने पुरुषांवर लादलेल्या नियमांची यादीच हवी होती <<<<
यादी तयार आहे, पण दिली तशी यादी तर बाकि समस्त पुरुषवर्ग मला एकमताने बदकुन काढेल, त्याच काय? Proud त्यान्च म्हणण अस असेल की "मान सान्गावा जनात अन अपमान ठेवावा मनात" हे शिन्च्या लिम्ब्या तु पुरुषासारखा पुरुष असून विसरतोस कसा काय? कस्ल रडगाण लावतोस? Biggrin
आता माझ्यात नाही बोवा शामत समस्त पुरुषवर्गाषी याबाबतीत पन्गा घ्यायचि Wink

लोणच्या च्या बरणीला जर विटाळशी बाई ने हात लावला तर ते नक्की खराब होते हा माझा अनुभव आहे..>>>> Uhoh
काय कारण बरं? मी आजवर १०००+ वेळा हात लावलाय पण मला असा अनुभव अजिबात आलेला नाही.

लोणच्या च्या बरणीला जर विटाळशी बाई ने हात लावला तर ते नक्की खराब होते हा माझा अनुभव आहे..>>>>> फक्त लोणच्याची बरणीच कि तयार लोणच्याची पाकिटं पण ह्यात येतात.?कारण लोणच्याच्या पाकिटाला हात लावल्याने मला तरी काहि अनुभव आला नाहि. मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.अगदी मुत्र आणि मलविसर्जनासारखीच. ह्या सगळ्यात शरीरातीलच काहि अनावश्यक घटक बाहेर टाकले जातात्.जर पाळित बाई विटाळशी (हे ऐकायलाच भयंकर आहे)होते तर जुलाब होणारा प्रत्येक मनुष्य विटाळशी हवा.:)

>>>>> होते तर जुलाब होणारा प्रत्येक मनुष्य विटाळशी हवा.<<<
जुलाब होणाराच काय, साधा परसाकडे जाऊन आला तरी हातपाय धुतल्याशिवाय बाकी कुठे प्रवेश निषिद्ध असे मानण्याचे आम्ही तरी शिकलो, अन पाय कसे धुवायचे, तर टाचा-खोटेसहित!
न्हाव्याकडे हजामत करुन आलो की आई आधी न्हाणीघरात पिटाळायची व आन्घोळ झाल्याखेरीज घरात पाऊल ठेवू द्यायचि नाही! (ती लिम्बी पण अशीच मागास, ती पण असलेच काही जाचक नियम लावत अस्ते मला Proud )

पाळित देवांना का स्पर्श करायचा नसतो?
आणि सर्व बायकांसाठी व सर्व देवांसाठी हा नियम सारखा हवा ना? म्हणजे ख्रिश्चन आणि मुसलमान स्त्रीयांसाठी पण हेच नियम असतात का?

लोणच्या च्या बरणीला जर विटाळशी बाई ने हात लावला तर ते नक्की खराब होते हा माझा अनुभव आहे..>>>> घ्या आता !..
सिरीयस बाफ वर विनोदाचा शिडकावा केल्याबद्दल धन्यवाद !! उपहास वगैरे असेल तर जागा चुकली आहे.

पूर्वीच्या काळी मोठ्या बरण्यांत लोणचे वर्षा दोन वर्षाकरता टिकवून ठेवले जायचे. त्या लोणच्यांची गोष्ट करतेय मी...कारण त्या लोणच्यांना टिकवुन ठेवण्याकरता घरगुती पदार्थ वापरण्यात येत असत. घरातल्या बायका त्या लोणच्याबद्दल कदाचित पसेसिव्ह असतील असं मला वाटायचं..पण मला अनुभव आला तेव्हापासुन मी हात लावणं टाळते..
लोणचं बाकी कुठल्याही कारणामुळे पण खराब होऊ शकतं..हे मला मान्य आहे याची कृपया नोंद घ्यावी Happy

>>>>> ख्रिश्चन आणि मुसलमान स्त्रीयांसाठी पण हेच नियम असतात का? <<<<
माझ्या माहितीतल्या मुसलमानात तरी पाळतात! वेगळ्या तर्‍हेने, पण पाळतात, शिवाय त्यान्ना मशिद्/दर्गा अशा विशिष्ट बर्‍याच ठिकाणी एरवीही जायचि परवानगी नस्ते!
ख्रिश्चनान्चे माहित नाही, पोपना विचारुन सान्गतो Happy
बायदिवे, मला सहज आठवण झाली, आमचे पिताश्री आन्घोळ करुन बाहेर पडले बाथरुममधुन अन चूकुन आम्ही जर मधे उभारलो अस्लो, तर आम्हाला वाटेतून हाकलायचेच, शिवाय आई अन ते मिळून बजावुन सान्गायचे की "शिवू नकोस" ! भलतेच जाचक नियम, नाही? Rofl
वयाच्या बाराव्व्या वर्षापासून शन्कराचार्यान्च्या मठात सलग आठ वर्षे राहून वेदविद्या नामक ढोन्ग शिकल्याचा हा परिणाम, दुसरे काय? नाही का? Proud

मुसलमान लोक तर अती मागास आहेत या बाबतीत
स्त्रियांना तर प्रवेशच नसतो मशिदीत Uhoh
पाळीच्या दिवसात नमाज पढता येतो का हे मात्र माहीत नाही..
माझं एवढं पोट दुखतं की मी चार दिवस घरकामांपासुन (देव पुजा, लोणच्याला हात लावणं) ह्या सगळया गोष्टीपासुन सन्यास घेत असते Happy

मुग्धा, तुझा अनुभव निदान शिवण्यापुरता तरी आहे, आमच्यात तर "नजरेसही" पडू नये याची काळजी आईच्या राज्यात घेतली जायची!
बर्‍याचदा ती मागास लिम्बी देखिल असेच काहीतरी बडबडत अस्ते, मला नाही कळत ते! Lol

मुळात स्त्रियांना असणारा जाच फक्तं विटाळाचे चार दिवस, किंवा सौभाग्यचिन्ह घालायला लागणे या गोष्टीं पुरता मर्यादित नसावा..
आजची स्त्री सशक्त आहे, सुशिक्षित आहे. आपल्याला निदान मला हे आवडतं ते आवडत नाही हे सांगायचा अधिकार तरी आहे...काही ठिकाणी तर ते ही बघायला मिळत नाही.. एखाद्याच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर होणारा हल्ला हा खरा जाच आहे.
या सौभाग्यचिन्हे घालावीत की नाही, पाळीच्या दिवसात बाजुला बसावे की नाही या गोष्टी डिस्कस केल्याने स्त्रियांना असणार्या खर्या जाचापासुन त्यांची मुक्तता होणार नाहिए..त्यांना समाजात स्थान मिळावे याकरता खुप काही केल्या जाउ शकते..
विधवा बायकांनाही आजकाल बर्याच प्रमाणात लोक रिस्पेक्ट देतात..असं नसतं तर सोनिया गांधी सारखी स्त्री भारताच्या राजकारणात एवढा महत्वाचा रोल निभावुच शकली नसती..

मुसलमान लोक तर अती मागास आहेत या बाबतीत
स्त्रियांना तर प्रवेशच नसतो मशिदीत >>>>>>>>> माझा प्रश्ण फक्त पाळि बद्दल आहे गं.म्हणजे पाळीत त्यांना अश्या काहि गोष्टी निषिद्ध आहेत का ज्या त्या ईतर वेळी करु शकतात.
माझं एवढं पोट दुखतं की मी चार दिवस घरकामांपासुन (देव पुजा, लोणच्याला हात लावणं) ह्या सगळया गोष्टीपासुन सन्यास घेत असते >>>>>>>> मुग्धा,तु जेवताना पण आरामात लोणच्याच्या बरणीला हात लाऊ शकतेस Light 1 त्यात तर काहिच शारीरिक कष्ट नाहित(जर फक्त तेच कारण असेल तर ) Happy
ख्रिश्चनान्चे माहित नाही, पोपना विचारुन सान्गतो >>>>>>>>>> आता तुम्हि जबाबदारी घेतलीच आहेत तर नक्कि विचारुन सांगा.मी वाट पाहतेय.

लोणचं बाकी कुठल्याही कारणामुळे पण खराब होऊ शकतं..हे मला मान्य आहे याची कृपया नोंद घ्यावी>>> हे तर सगळ्यांना माहितेय पण मग विटाळशी बाईचा नी लोणचं खराब होण्याचा संबंध का जोडला?
पूर्वी घरातली एखादी बाई (अविटाळशी) लोणच्याच्या बरणीत ओलासर चमचा घालत असेल, त्याने लोणच्याला बुरशी आल्यावर विटाळशी बाईवर ढकलत असेल, हेच कारण असावं त्यामागचं.

>>घरच्या सुनेने मोठ्या माणसांसमोर कधी हॉलमधे यायचे नाही. दारातुनच बोलायचे, हॉलमधे सास-यांच्या बरोबरीने म्हणजे सोफ्यावर किंवा त्यांच्यासमोर बसायचे नाही. जमिनीवर बसायचे. ते ही मांडी वाळुन बसले असं नाही. मोठ्याने हसा-बोलायचे नाही.>>> हे सगळं माझ्या सासरी मी करायचे अजुनही करते...त्यात जाच तो काय?<<
नॉर्मल माणसासारखं व्यक्त न होता येणं यात जाच वाटतो माणसांना. ज्यांना आपली ओळख एक माणूस असण्यापेक्षा केवळ अमुकतमुकची सून म्हणूनच अपेक्षित असते त्यांना कदाचित नसेल वाटत.

>>मंगळ्सूत्र घालणे याला आपण जाचक प्रथा म्हणुच शकत नाही..तरी ज्याचा त्याचा प्रश्न ह्या सदरात ह्या प्रथेचा समावेष होतो..<<
एखादी गोष्ट करणे किंवा न करणे ह्याचे बंधन/ दडपण असणे याला आमच्यात तरी जाचक म्हणतात. विशेषतः असे कुठलेही चिन्ह महान पति परमेश्वराला गरजेचे नसताना तर नक्कीच...

>>लोणच्या च्या बरणीला जर विटाळशी बाई ने हात लावला तर ते नक्की खराब होते हा माझा अनुभव आहे..<<
हे काहीही आहे. भलतंच विनोदी.... Rofl
माझी ८७ वर्षाची आजी पण हसेल या विनोदावर..
ओले हात, ओला चमचा लागला तरी लोणची खराब होतात.

खरंच विनोदाचा उत्तम शिडकावा....

नाही, अजिबात नाहीये इररिलेव्हंट. उलट चर्चा करुन कुणाच्या अंधश्रद्धा घालवू शकलो तर फायदाच होईल. Wink

>>एखाद्याच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर होणारा हल्ला हा खरा जाच आहे.<<
पाळीच्या काळातली वागणूक, अशीच मांडी घालून बसायचे, मोठ्यांसमोर हसायचे नाही आणि अजून सुनेला शोपीस कम मोलकरीण बनवणार्‍या सगळ्या नियमांच्यात हाच व्यक्तिस्वातंत्र्यावर होणारा हल्ला दिसत नाही का?

>>या सौभाग्यचिन्हे घालावीत की नाही, पाळीच्या दिवसात बाजुला बसावे की नाही या गोष्टी डिस्कस केल्याने स्त्रियांना असणार्या खर्या जाचापासुन त्यांची मुक्तता होणार नाहिए..त्यांना समाजात स्थान मिळावे याकरता खुप काही केल्या जाउ शकते..<<
अहो बाई मी सौभाग्यचिन्हे न घातल्याने, पाळीच्या दिवसात बाजूला न बसल्याने मला जर कोण घरातलं कुरकुरून दाखवणार असेल तर त्या कटकटीने माझ्या इतर कामावर परिणाम होऊ शकतोच की. मग तो जाच नाही का? आणि त्याबद्दल बोलायचे नाही का? इतक्या सूक्ष्म पातळीवर खच्चीकरणाला सुरूवात होते. त्याला जाच म्हणायचं नाही का?
केवळ मारहाण केली म्हणजेच जाच की काय?

नशीब माझं लोणच्याला हात लावू नको असा जाच करणारी सासू मिळाली नाही मला.

मुग्धा, सांगायला खेद आणि आनंद एकाच वेळी वाटतोय की तुमच्या बर्‍याचशा पोस्ट मजेशीर आहेत.त्यामुळे लिहित रहा. बीबीचा ताण हलका व्हायला मदतच होईल.
>>>विधवा बायकांनाही आजकाल बर्याच प्रमाणात लोक रिस्पेक्ट देतात..असं नसतं तर सोनिया गांधी सारखी स्त्री भारताच्या राजकारणात एवढा महत्वाचा रोल निभावुच शकली नसती..>>>> Rofl

तुमच्या बर्‍याचशा पोस्ट मजेशीर आहेत.त्यामुळे लिहित रहा. बीबीचा ताण हलका व्हायला मदतच होईल.<<
सायो अगदी अगदी!!
डिजे आणि मै कुठेत?

Pages