या विषयावर अतिशय समतोल आणि सखोल विचारांचा लेख लोकसत्ता मधे वाचनास आला त्याचीच लिन्क -http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=593...
सौभाग्यचिन्हे या बीबी वरुन मला हा विषय सुचला. तो बीबी आता फक्त 'संयुक्ता' पुरता मर्यादित केलेला दिसतोय म्हणुन आणि या विषयाची व्याप्ती त्याच्या पेक्शा मोठी वाटत असल्याने नवीन बीबी उघडावा असे वाटले.
आपल्या समाजात बायकांच्या शारीरिक स्थिती वरुन ( उदा. - पाळी चालु असणे ) किंवा वैवाहिक स्थिती वरुन ( कु. , विवाहित , विधवा ई. ) अनेक प्रथा आहेत. यातल्या काही प्रथा तर स्त्रीसाठी अतिशय अपमानास्पद अशाही आहेत. असे असुनही त्यातल्या काही प्रथा आजही अनेक उच्चशिक्षित स्त्रियांकडुन देखिल पाळल्या जातात. काही स्त्रिया त्या प्रथा मनापासुन पाळतात तर काही जणी घरच्यांच्या / समाजाच्या दबावामुळे पाळतात.
इथे मला हे जाणुन घ्यायचेय की तुम्हाला अशा कोण्त्या प्रथा खटकतात? त्या नाहीशा करण्यासाठी तुमच्या परीने तुम्हि काय प्रयत्न करता ? तसेच तुमच्या पुढच्या पिढीवर या प्रथा लादल्या जाउ नयेत म्हणुन तुम्ही काय करता ? तसेच काही प्रथा खटकुन देखिल त्या तुम्हि पाळता का आणि कशामुळे ?
याचे उत्तर देउन माझ्यापासुनच मी सुरुवात करते.
१. पाळी ( menstrual periods ) सुरु असताना बाजुला बसणे ही जरी प्रथा अता बहुतेक सुशिक्षित घरातुन बंद झालेली असली तरी अजुनही पाळी सुरु असताना देवघरात जाणे , देवाची पुजा करणे ई. सारख्या गोष्टींना मनाई असते. पाळी चालु असणार्या स्त्री चा देवाला 'विटाळ' होतो असे म्हणले जाते. :
मला स्वताला या प्रथेत कोणतेही तथ्य वाट्त नाही. तसेच 'पाळी चालु असणार्या स्त्री चा विटाळ होतो' असे म्हणणे ही अतिशय अपमानास्पद वाटते. मी स्वता हे अजीबात पाळत नाही तसेच माझ्या मुलीला पण असे काहीही मी सांगणार नाही. ईतर कोणी तिला काही शिकवलेच तर ते का योग्य वाटत नाही हे तिला सांगेन.
२. सौभाग्यचिन्हे ( मंगळसुत्र ) ही बायकांची वैवाहिक स्थिती दर्शवितात. त्याच्या अनुषंगाने बायका - बायकात त्यांच्या वैवाहिक स्थिती वरुन भेद भाव केला जातो. : हा भेद भाव दुर व्हावा आणि सर्व बायकाना समाजात समान वागणुक मिळावी असे मला मनापासुन वाटते. रोजच्या आयुष्यात मंगळ्सुत्र वापरत नसले तरी लग्न , मुंजीसारख्या कार्यक्रमांना जाताना घालते. पटत नसले तरी नातेवाइकांच्या आणि घरातल्या मोठ्याच्या टीकेला सामोरे जावे लागु नये आणि उगीच वाद नकोत म्हणुन.
'असं कसं होईल ? लग्न-संसार
'असं कसं होईल ? लग्न-संसार म्हणजे काय दशावतारी नाटक आहे ? दहा मिनिटेच नवरा विष्णू म्हणे!! नंतर श्रीराम लागू त्याला रिटायर करतात की काय? .. '
अर्थातच. जसं बायकोलाही आधी लक्ष्मी नि नंतर 'मायन्यात राणी नि मजकुरात धुणंपाणी' म्हणून रिटायर करतात ना, अगदी तस्संच..
लोणच्या च्या बरणीला जर
लोणच्या च्या बरणीला जर विटाळशी बाई ने हात लावला तर ते नक्की खराब होते हा माझा अनुभव आहे..
>> हे हे हे! आमच्या घरी आलं की लोणचं शहाणं होतं बहुतेक! ते नाही खराब होत!
आपण बोवा आमच्या पोरीन्च्या लग्नात वरपक्षाकडल्या झाडून सगळ्यान्चे हातपाय धुणारे
पूर्णपणे सहमत आहे..... यात काय वाईट आहे समजलेले नाही....
>> असा विचार करणारे लोक आहेत तोपर्यंत असे बाफ गाजतच रहातील!
मी मंगळसूत्र/कुंकु असले सोपस्कार करत नाही.. सासू सासरे कूल आहेत. आजे सासू सासर्यांकडे जातानाही म्हणतात की "येवढं काही नाही. आवडत नाही तर नको घालूस"
वाईला (माझं गाव) गेल्यावर मात्र लोक विचित्रपणे बघतात. एका शाळेतल्या मैत्रिणीची आई भेटलेली.
तिनं विचारलं "अग, तुझं तर लग्न झालेलं ना?'
मी: 'हो, झालय की'
त्या: 'मग तुझं मंगळसूत्र, कुंकु कुठय'
मी (हसू दाबत) : 'आमच्यात पद्धत नाही'
त्या इतक्या दचकल्या..(बहुतेक मी आंतरधर्मिय लग्न केलं असं वाटलं त्यांना ;))
मी आणि ताई घरी येऊन अक्षरश: ह. ह. ग. लो.
बर्याचदा वीकेंडला 'मी माझ्या माहेरी, नवरा त्याच्या माहेरी' असं करतो आम्ही. मग नवरा बरोबर नाही, मंगळसूत्र नाही बघून लोक चौकश्या करतात ('आला नाही का तो' वगैरे)
माझ्या मते हा त्यांच्या डोक्याला भुंगा झाला, मला काय त्रास.. नाचा!
'तेच तर. हा प्रश्न आमचा रहावा
'तेच तर. हा प्रश्न आमचा रहावा इतकंच. कोणी जोर जबरदस्तीनं हे घालायला लावू नय':
'मायन्यात राणी नि मजकुरात धुणंपाणी' >>
गुड वन मधुरिमा
'हा त्यांच्या डोक्याला भुंगा
'हा त्यांच्या डोक्याला भुंगा झाला, मला काय त्रास.. नाचा!'
खो खो हसले नानबा.
किती कालबाह्य आहे हे
किती कालबाह्य आहे हे डिस्कशन.
१. ज्या इथे लिहित आहेत त्या स्वतःला हवं तेच करतात. ज्यांच्यावर लादल जातय अस ह्यांना वाटतय त्या लादलं जाणार्यांना तसं वाटतय का?
२. हल्ली कितीजणींचे सासरचे लोक सुनेला जरा वचकूनच असतात.
३. हल्लीच्या किती सासवा, आया तरी कुंकू लावणं, मंगळ्सूत्र घालणं किंवा जोडवी घालणं करतात? हल्ली किती सासवा साड्या नेसतात?
४. हुंडाच्या विरोधी असलेल्या मुली हुंडा देवून लग्न का करतात? लग्नाशिवाय रहाण्याचा निर्णय का घेत नाहीत? पुष्कळजणी म्हणताना ऐकल्या आहेत की आईवडिल डोनेशन देऊन इंजिनिअरींग कॉलेजला पाठवतात तेंव्हा त्यांच फ्युचर सेट करायला. तसच हुंडा देऊन लग्न हे चांगल घर सेट करण्यासाठी. किती हस्यास्पद.
५. ज्याला बदल मनापासून हवा असतो तो स्वतःच्या बाबतीत घडवून आणतो किंवा आणू शकतो परंपरेच्या जोखडात अडकून रहात नाही.
६. संस्कृती ही वेळेनुसार बदलत असते काही बदल कायमचे असतात.
७. किती मराठी लग्नात हल्ली मेहुण्याचे जोडे लपवायचे आणि त्याची बक्षिसी घ्यायची पध्द्त सुरु झाली आहे. ती कशासाठी? गंमत म्हणून का मुलाकडून पैसे उकळण्यासाठी? अशाच काही पध्द्ती पडत जातात मग जाचक होत जातात. कोणाच्या लग्नात किती आणि काय दिलं घेतलं बघत.
८. पूर्वी श्रीफल आणि मुलगी देवून लग्न होत असे आता हौशिखातर वाटेल तसा खर्च होतो. ह्याला फक्त मुलाकडचेच नाहितर मुलिकडचेही तेवढेच जाबाबदार असतात.
अजून नंतर.
अहो ज्यांना हे आवडत नाही
अहो ज्यांना हे आवडत नाही त्यांनी अशा प्रकारे लग्नच कशाला करावं? आमचं लग्न वैदिक पदध्दतिने झालं, ज्यात असे काही विधी नव्हते
आमचही वैदिकच होत प्रीति पण हा
आमचही वैदिकच होत प्रीति पण हा विधी होता मात्र त्यात.
मधुरीमा, अगदी ग
नानबा, मी पण हसले जाम...
आर्च मस्त पोस्ट, पुर्ण
आर्च मस्त पोस्ट, पुर्ण अनुमोदन!!
नानबा, पण गावाकडे असं होऊ
नानबा,
पण गावाकडे असं होऊ शकतं, त्यांनी यापूर्वी कधीच असं पाहिलं ऐकलं नसेल. मी एकदा लहान असताना मोठ्या शहरात गेले तिथे एक विवाहित स्त्री आपल्या नवर्याला अरेतुरे करत होती आणि तिनेही मंगळसूत्र घातले नव्हते याचे मला तेव्हा कित्ती कित्ती आश्चर्य वाटले होते.
! ... हा केवळ एक आदर
! ... हा केवळ एक आदर दाखवण्याचा प्रकार आहे, >>
मग मुलाकडच्यांना मुलीच्या आईवडिलांचा आदर वाटत नाही का ? नसेल तर त्या घरची मुलगी सून म्हणून , तुमच्या ( होणार्या ) नातवंडांची आई म्हणून कशी चालते ?
अन वाटत असेल तर तो काय हुंड्याकरता , मानपानकरता दमदाटी करून व्यक्त करतात का मुलाकडचे ?
नानबा आज सगळीकडे फिस्सकन
नानबा आज सगळीकडे फिस्सकन हसवण्याचं ठरवलंयस काय....
मधुरिमा गुड पोस्ट गं....
नानबा लोणच्या च्या बरणीला जर
नानबा
लोणच्या च्या बरणीला जर विटाळशी बाई ने हात लावला तर ते नक्की खराब होते हा माझा अनुभव आहे..>>>> हे मात्र खरच अशक्य आहे. आज पण असा विचार करणारे आहेत तर
जुन्या हितगुजवर पण कोणीतरी
जुन्या हितगुजवर पण कोणीतरी दूध नासते दही खराब होते असे तारे तोडले होते.
अय्या... दूध पण नासते? पनीर
अय्या... दूध पण नासते?
पनीर "त्या" च दिवसांत बनवणार आता... हात लावा.. पनीर तयार
अय्या... दूध पण नासते? पनीर
अय्या... दूध पण नासते?
पनीर "त्या" च दिवसांत बनवणार आता... हात लावा.. पनीर तयार>>>>>>
अग मग सगळ्या स्त्रियांना चांगला जॉब की त्या दिवसात. जस्ट बसा आणी दुधाला हात लावा काहीतरीच
तुम्ही काय करता.. एरवी मी
तुम्ही काय करता..
एरवी मी अमुक तमुक ठिकाणी जॉब करते पण चार दिवस मात्र मी सोशल वर्क करायला जाते.
कसलं सोशल वर्क
एका डेरीत पनीर बनवायला जाते. बचतगटाची डेरी आहे तेवढीच त्यांना मदत...
नीधप
नीधप
कोणीतरी दूध नासते दही खराब
कोणीतरी दूध नासते दही खराब होते असे तारे <<खोखो>>
बाकी मला नाही वाटत एथे कीतीही उरस्फोड केली तरी या लोकांचे विचार बदलतील. लोणच्याचं वगैरे म्हणजे... मला कळत नाही काय लेव्हल ला जाऊन या लोकांना समजवायची गरज आहे.
अशा भंपक गोष्टी इतरांच्या गळी
अशा भंपक गोष्टी इतरांच्या गळी उतरवणारे लोक लय निर्ढावलेले असतात मात्र. त्यांना विचारून पहा हे असं का ? अगदी गंभीर पणे उत्तर येईल, शास्त्रीय परिभाषा वापरून. "त्या काळात जंतूंचा प्रदुर्भाव असल्याकारणाने दूध नासते" वगैरे.
(** हो हो, ते ग्रहण काळात "हवेत जंतू पसरतात" म्हणून अन्न फेकणारे ते हेच लोक. )
अशा भंपक गोष्टी इतरांच्या गळी
अशा भंपक गोष्टी इतरांच्या गळी उतरवणारे लोक लय निर्ढावलेले असतात मात्र. त्यांना विचारून पहा हे असं का ? अगदी गंभीर पणे उत्तर येईल, शास्त्रीय परिभाषा वापरून. "त्या काळात जंतूंचा प्रदुर्भाव असल्याकारणाने दूध नासते" वगैरे.
(** हो हो, ते ग्रहण काळात "हवेत जंतू पसरतात" म्हणून अन्न फेकणारे ते हेच लोक.
<< आणि दररोज भाजी भाकरी आपल्या चॉइस ची बनवता येते याला स्त्री स्वातंत्र्य /धन्यात मानणार्या याच त्या स्त्रिया :).
आणि दररोज भाजी भाकरी आपल्या
आणि दररोज भाजी भाकरी आपल्या चॉइस ची बनवता येते याला स्त्री स्वातंत्र्य /धन्यात मानणार्या याच त्या स्त्रिया .>>>>
डीजे, अग ते पण नाही नवर्याला आवडते त्याच भाज्या मी बनवते अस सांगणार्या आणी करणार्या पण याच स्त्रिया
रोजचा स्वयंपाक बाईनेच केला
रोजचा स्वयंपाक बाईनेच केला पाहिजे, मुलांचे डबे आईनेच भरले पाहिजेत, बाईच्या हाताला कशी चव असते, ती(च) घर कसे टापटिप ठेऊ शकते असे म्हणणारे हेच लोक.
मुलांना सांभाळण्या बद्दल पण
मुलांना सांभाळण्या बद्दल पण हेच ऐकु येत. आईच मुलाला नीट सांभाळु शकते वैगेरे. मला तरी हे पटत नाही. पण इतक लोक बोलतात ते खरे की काय याची शंका यायला लागली आहे.
स्टिल गोईंग स्ट्राँग?
स्टिल गोईंग स्ट्राँग? चालुद्या.
पाय धुण्याच कारण एक असू शकत
पाय धुण्याच कारण एक असू शकत की पूर्वी मुलीच्या दारात मांडव घालून लग्न होत असतं आणि नवर्याकडची वरात बैलगाडीतून, क्वचित तंगडतोड करत तिथे जात असे.. त्यामुळे दारच्या पाव्हण्याला जसे पाय धुवून या सांगतो तसे हे ओरीजिनली असावे, त्यात आदर कुठला? आता हॉलवर हा विधी एसी गाडीतून येणार्यांसाठी करणं हास्यास्पद आहे.
हे प्रथा नि जाच ह्याबद्दल म्हणायचं तर गरम पाण्यातल्या बेडकाची गोष्ट आहे ही. स्त्रियांना कळतच नाही की दुसराही ऑप्शन असू शकतो हे, इतकं ब्रेनवॉशिंग करत रहायचं.
पतिव्रता असणे (सामाजिक गरज म्हणून, वैयक्तिक परिस्थिती काही का असेना?), शालीन दिसणे, आई बाप सांगतील त्याच्याशीच लग्न करणे, "त्या" घरी आवडत नाही म्हणून नोकरी न करणे हेच योग्य आहे!
तीन चार मुलांना पाहून, परखून, त्यानंतर नकार देऊन पाचव्याच कोणाचे तरी विचार, लूक्स, ऐपत सगळे आवडले म्हणून लग्न करणे, स्वतःच्या आवडीचे शिक्षण घेणे आणि स्वतःहून ते चुलीत घालणे वा त्या क्षेत्रात झेंडा गाडणे, आवडतील तितके कपडे घालणे, म्हणजे मात्र शांतम् पापम्!
असच बिंबवत राहिलो की झालं, साई सुट्ट्यो! आपल्या लेकी सुनांनी, बायकोने सोज्वळ रहावं किंवा दिसाव, आपल्या अर्ध्या वचनात रहावं ह्यासाठी प्रयत्नशील असलेले पुरुष स्वतःच हे मान्य करतात की स्त्रीकडे अजूनही संकुचित वृत्तीने किंवा लालसेने पाहिलं जातच. आणि ह्याला पाठींबा देऊन आपापल्या मुलींवर बंधन घालणार्या आया त्यापुढच्या नेभळट! अरे, स्वतःच्या मूलीला आयुष्यभर कोणाला तरी घाबरूनच रहायला शिकवणार? तुम्ही तिच्या बाजूला उभं राहून तिला बळकट कसे करणार?
दुसर्या व्यक्तीकडे "उपभोग्य" म्हणून वापरणार्या प्रत्येकाचा (पुरुषमधला) गुलाबराव करायला हवा. मग कोणी कसे रहावे, वागावे ह्याचे नियम बनणार नाहीत.
जाईजुई
जाईजुई
जाजु, मस्त पोस्ट
जाजु, मस्त पोस्ट
कोणीतरी लिहिलंय जीन्सवर टिकली
कोणीतरी लिहिलंय जीन्सवर टिकली लावली की इतर मुली का हसतात ...
डीजे , एक फॅशन विषयक सल्ले देणारा बाफ उघड आता . फार गरज दिसतेय .
हळदी कुंकु आणी वाईन चा जुना
हळदी कुंकु आणी वाईन चा जुना बीबी आठवला.
अरे रात्री झोपलेच नाही काय
अरे रात्री झोपलेच नाही काय कोणी? विटाळशी = लोणचे रूल अफाट आहे. मी खूप विचार केला.
माझा ' स्त्रीला पुरुषाचा आधार लागतो जगण्यासाठी' या संकल्पनेलाच विरोध आहे. व त्या अनुषंगाने त्या संकल्पनेची सर्व मॅनिफेस्टेशन्स. त्यामुळे स्त्रीया उगीचच मनाने अधू होतात. आपण स्वतंत्रपणे जीवन उभारलेले आहे व त्यात फक्त प्रेम/ मैत्री/ सहजीवनाची गरज या साठी पुरुष आहे. अशी व्यवस्था का नाही आकाराला येत? यात पुरुषांवरही कमी ताण पडेल. स्त्री सक्षम असतेच पण अश्या सामाजिक संकल्पनांनी तिच्यावर उगीचच बंधने येतात. एका पुरुषासाठी त्याच्या सर्व फॅमिलीशी जुळवून घ्यायचे हे स्त्रीच्या द्रुष्टिकोनातून कितपत बरोबर/ फायद्याचे आहे? पुरुष खूप चांगले असतात पण त्यांनी माझ्या जीवनातील इतर प्रत्येक बाबीवर हक्क गाजवावा, माझ्या निर्णय क्षमते वर बंधने आणावीत माझ्या आर्थिक, भावनिक, शारीरिक एक्स्प्रेशन्स वर मर्यादा आणाव्यात हे मला जाचते. असल्या रिलेशनशिप मध्ये असण्यापेक्षा एकटे राहणे मला अतिशय पट्ते.
एखाद्या पुरुषाने फक्त स्त्रीवर प्रेम करतो म्हणून तिच्या सर्व जीवनाची जबाबदारी घ्यावी तिला साड्या/ कपडे दागिने घ्यावेत ह्या एक्स्पेक्टेशन्सचा मला त्रास होतो. हे सगळे ती स्वतः घेउ शकते ना. स्त्री पुरुष नात्याशी आर्थिक/ भावनिक सिक्युरिटी इश्यूज निगडित असावेत हे मला जाचते. ही मते पहिल्या पासूनच आहेत आज नीट मांड्ली. त्याचा विधवा वगैरे असण्याशी संबंध नाही. अगदी छान रिलेशनशिप असावी पण ती एका समान प्लॅट्फॉर्म वर.
रच्याकने काल ह्या बीबीचा परिणाम म्हणून की काय लाल भडक रंगाची गाडी बुक केली. खरे कुंकू तेच जे आपल्या निढ्ळाच्या घामाचे!
Pages