स्त्रिया आणि खटकणार्‍या/ जाचक प्रथा

Submitted by डेलिया on 24 March, 2010 - 20:37

या विषयावर अतिशय समतोल आणि सखोल विचारांचा लेख लोकसत्ता मधे वाचनास आला त्याचीच लिन्क -http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=593...

सौभाग्यचिन्हे या बीबी वरुन मला हा विषय सुचला. तो बीबी आता फक्त 'संयुक्ता' पुरता मर्यादित केलेला दिसतोय म्हणुन आणि या विषयाची व्याप्ती त्याच्या पेक्शा मोठी वाटत असल्याने नवीन बीबी उघडावा असे वाटले.

आपल्या समाजात बायकांच्या शारीरिक स्थिती वरुन ( उदा. - पाळी चालु असणे ) किंवा वैवाहिक स्थिती वरुन ( कु. , विवाहित , विधवा ई. ) अनेक प्रथा आहेत. यातल्या काही प्रथा तर स्त्रीसाठी अतिशय अपमानास्पद अशाही आहेत. असे असुनही त्यातल्या काही प्रथा आजही अनेक उच्चशिक्षित स्त्रियांकडुन देखिल पाळल्या जातात. काही स्त्रिया त्या प्रथा मनापासुन पाळतात तर काही जणी घरच्यांच्या / समाजाच्या दबावामुळे पाळतात.

इथे मला हे जाणुन घ्यायचेय की तुम्हाला अशा कोण्त्या प्रथा खटकतात? त्या नाहीशा करण्यासाठी तुमच्या परीने तुम्हि काय प्रयत्न करता ? तसेच तुमच्या पुढच्या पिढीवर या प्रथा लादल्या जाउ नयेत म्हणुन तुम्ही काय करता ? तसेच काही प्रथा खटकुन देखिल त्या तुम्हि पाळता का आणि कशामुळे ?

याचे उत्तर देउन माझ्यापासुनच मी सुरुवात करते.
१. पाळी ( menstrual periods ) सुरु असताना बाजुला बसणे ही जरी प्रथा अता बहुतेक सुशिक्षित घरातुन बंद झालेली असली तरी अजुनही पाळी सुरु असताना देवघरात जाणे , देवाची पुजा करणे ई. सारख्या गोष्टींना मनाई असते. पाळी चालु असणार्‍या स्त्री चा देवाला 'विटाळ' होतो असे म्हणले जाते. :
मला स्वताला या प्रथेत कोणतेही तथ्य वाट्त नाही. तसेच 'पाळी चालु असणार्‍या स्त्री चा विटाळ होतो' असे म्हणणे ही अतिशय अपमानास्पद वाटते. मी स्वता हे अजीबात पाळत नाही तसेच माझ्या मुलीला पण असे काहीही मी सांगणार नाही. ईतर कोणी तिला काही शिकवलेच तर ते का योग्य वाटत नाही हे तिला सांगेन.
२. सौभाग्यचिन्हे ( मंगळसुत्र ) ही बायकांची वैवाहिक स्थिती दर्शवितात. त्याच्या अनुषंगाने बायका - बायकात त्यांच्या वैवाहिक स्थिती वरुन भेद भाव केला जातो. : हा भेद भाव दुर व्हावा आणि सर्व बायकाना समाजात समान वागणुक मिळावी असे मला मनापासुन वाटते. रोजच्या आयुष्यात मंगळ्सुत्र वापरत नसले तरी लग्न , मुंजीसारख्या कार्यक्रमांना जाताना घालते. पटत नसले तरी नातेवाइकांच्या आणि घरातल्या मोठ्याच्या टीकेला सामोरे जावे लागु नये आणि उगीच वाद नकोत म्हणुन.

गुलमोहर: 

दागिना म्हणून आवडत असेल तर गोष्ट वेगळी पण मुळात 'फक्त स्त्रीयांना' परम्परा/नियम म्हणून घालावं लागणे आणि वर त्याचा संबंध हे कसं स्त्रीयांच्या हिताचं आहे हे म्हणण चूक च आहे.<<
right on!!

>>मंगळसुत्र गळ्यात असेल तर पुरुषांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. >> असं काहीही नाहिये, खरंतर पुरूष दुसरंच काहीतरी पहात असतात आपल्याला वाटतं मंगळसूत्र पाहतायंत.. Proud
ज्यांना लागेल त्यांना Light 1

१. पुरुषांना कंबर नसते का?
२. असली तर ती दुखत नाही का?
३. बायकोने पायाची बोटं दाबून दिली की त्यांना आपोआप अ‍ॅक्यूपंक्चर ट्रीटमेंट मिळते?
४. लग्नाच्या आधी मुलीना कंबर नसते का?
५. असली तर ती दुखत नाही का?
६. लग्नाआधी मुलींना कंबरेचे काही आजार होऊ शकत नाहीत का?<<<<<<<<<<<<,

हे मात्र अगदीच पट्ल.सायंटेफिक भोंदुगिरी , खरच Sad

>>माझ्या लग्नात हा विधी झाला तेव्हा मला इतक ऑकवर्ड वाटलेल >>
तरिपण धुऊन घेतलेस ना झक्या? Angry
आम्ही माझ्या चुलत भावाची लग्न ठरल्या ठरल्या याद्या करण्याच्याही आधी चांगली
कानउघाडणी केली होती....

माझ्या काकूचा भाऊ आहे त्याला हे असलं काही पटत नाही व त्याची मतंही एकदम हटके आहेत. त्याची बायको एकदम साधी (खरंतर बावळट). त्याच्या लग्नात त्याने फक्त सख्ख्या बहिण-भावंडांना बोलावलेलं. बहीण-भाऊ म्हणजे फक्त बहीण-भाऊ त्यांचे नवरे-बायका व त्यांची मुलंही नाहीत. लग्न घरच्या घरीच. अर्थात हुंड्या-बिंड्याचा प्रश्नच नाही. लग्नात होणार्‍या बायकोला बाकीचे म्हणतात म्हणून एक साडी घेतलेली. लग्न झाल्यावर काही वर्षांनी ट्रेनमधून जाताना त्याच्या बायकोचं मंगळसूत्र मारलं. ही घाबरली, त्याला म्हणाली नवीन मंगळसूत्र करावं लागेल. तो म्हणाला घालू नकोस मंगळसूत्र, मी तुला सांगितलं नाहीये घालायला. Proud

आऊटडोअर्स Lol असे पुरूष विरळाच हो....
पण तिला बिचारीला आवडत असेल घालायला तर? त्याने निदान तसं तरी विचारायला हवं होतं...

घर स्वच्छ नसले, तर फक्त बायकांनाच जबाबदार धरल्या जाते, नवर्‍याचा कोणी याबाबतीत विचारही करत नाही. >>> अगदी अगदी. भाग्यश्री ची पहीली पोस्ट पुर्ण सहमत.
वर लिहीलेले सगळे बरोबरच आहे, शिवाय नातेसंबंध टिकवणे ही पण समाजाने स्त्री वर टाकलेली अजून एक जबाबदारी. लग्न्-कार्ये/ आहेर/ येणे-जाणे या सर्व गोष्टी स्त्री ने सांभाळाव्या अशी प्रथा आहे. कोणी पाहूणे येणार तेव्हा नवरा-बायको नोकरी करणार्‍या घरात देखील नवर्‍याने सुट्टी काढली असे क्वचित दिसते. तसेच बाहेरगावचे समारंभ पण बाईनेच हजर राहायचे. दोघे गेले नाहीत तरी बाईलाच 'अग, तू तरी यायला हवं होतंस' असे ऐकवले जाते. मला वाटते स्त्री-पुरुष दोघांवर नाती टिकवायची जबाब्दारी / प्रथा असावी.

आपण बोवा आमच्या पोरीन्च्या लग्नात वरपक्षाकडल्या झाडून सगळ्यान्चे हातपाय धुणारे! Proud
अहो, मूळ रिवाज असा की आलेला-निमन्त्रणामुळे आलेला (देवान्सहीत) अभ्यागत/अतिथी/पाहुणा यास पाद्ययो: पाद्यम समर्पयामी असे म्हणून ऋतुकाळाप्रमाणे थन्ड वा गरम पाणी देऊन पाय धुणे यात कमीपणा कसला? त्यानन्तर हात धुवायला मस्त गन्ध-सुवासिक द्रव्ये घालुन अर्घ्य देणे यात लाज कसली? देवाच्या षोडषोपचार पुजेतीलच हे विधी आहेत, जे अतिथीदेवोभव म्हणायच्या या सन्स्क्रुतीत पाहुण्यान्नाही लागू होतात! आता व्यावहारीक दृष्ट्या हे केवळ लग्नात शिल्लक राहिलेत त्याला कोण काय करणार?
आपण तर बोवा लिम्बीसहीत, हे मोठ्ठ घन्गाळ घेऊन, गरम पाण्याचा पाईप लावुन वरपक्षातील झाडून सगळ्यान्चे पाय धूणार! त्यात लाजायच काय?
हव तर अशिच सोय डीसी जीटीजीत देखिल करा अस सुचवाव काय? कुणाला सान्गू तिथे? Biggrin

>>वरपक्षातील झाडून सगळ्यान्चे पाय धूणार! >> नुसते पायंच काय? अख्खं त्या
सगळ्यांना धूऊन काढ, फक्त पोरिचे लग्न उन्हाळ्यात नको करू, कारण पाणिटंचाई/पाणिकपात असते... Lol

माझी आई गेल्यावर तिच्या सगळ्या अ‍ॅसेटस बाबांच्या नावावर करून घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी मला माझी हरकत नाही असे अ‍ॅफिडेव्हिट, मामलेदारापुढे जाऊन शपथेवर हरकत नाही असे सांगणे, कोर्टात जाऊन शपथेवर हरकत नाही असे सांगणे हे सगळे करावे लागलेले आहे.
विल बनवलेले नसेल तर मृत व्यक्तीचा मागे राह्यलेला जोडीदार आणि अपत्ये ह्या सगळ्यांचाच समान अधिकार असतो. विल हे केवळ स्वकमाईच्या संपत्तीबद्दल करता येते. वडिलोपार्जित मिळकतीत मागे राह्यलेला जोडीदार आणि अपत्ये (की केवळ अपत्ये?) यांचा वाटा असतोच.>> अनुमोदन. मी अजुनही अगदी मी जिथे नॉमिनी आहे तिथे पण हे सगळे सोपस्कार करत आहे. इट इज क्वाइट पेनफुल. माझ्या नवर्‍याचे एक बॅन्क लॉकर आहे ज्याला मला तो असताना अ‍ॅक्सेस नव्हता पण आता मला भाडे भरायचे नाही व तो लॉकर बंद करायचा आहे. तर बँकवाल्याने सासूचे एन ओ सी आणायला सांगितले आहे. सासरचे कोणीच इथे नाही. कोणीच काही रिकवर करायला मदत केली नाही. सासूने लगेच १४ व्या दिवशीच सांगितले कि मला तुझ्याजवळ राहता येणार नाही. त्यामुळे मला त्या सहीसाठी भागदौड करावी लागत आहे.

सौभाग्य चिन्हे समजून घातली तर त्यात काहीच वाइट नाही. आपली व एका पुरुषाची इमोशनल कमिट मेन्ट आहे त्याचे ते चिन्ह आहे.

पुरुषांची मानसिकता अशी असते की त्यांना प्रत्येक अवेलेबल स्त्री आजमावून पहायची असते ह्यात मंगळसूत्र घातलेली स्त्री आधिच दुसर्‍याने क्लेम केली आहे म्हणून तो तिथे प्रयत्न करणार नाही. आपले प्रयत्न दुसरीकडे नेइल. ( caveman/ neanderthal man tactics, these are my bitter but true observations not my opinions.) यात स्त्रीचे संरक्षण व्हावे हीच मूळ इच्छा आहे.

जोपर्यंत सौभाग्य आहे तोपर्यंत श्रिंगार करण्यात काय वाइट आहे? मग मनात असूनही त्या गोष्टी करता येत नाहीत. मंगळ सूत्र बघुनच मला रडू येत असे म्हणून शेवटी त्याचे घड्याळ व मंगळसूत्र माझ्या लॉकर मध्ये नेऊन टाकले. अर्थात मी तुमच्या मागील पिढीतील स्त्री आहे. स्त्रीवादी विचारसरणी असली तरीही काही असोसिएशन्स फार डीप रूटेड असतात.

मला असं वाटतं, जर एखादी गोष्ट आपल्याला compulsion म्हणुन करावी लागत असेल तर आपल्या मनात त्या गोष्टीविषयी तिटकारा निर्माण होतो. आणि ही सामान्य मानवी प्रवृत्ती आहे " no one likes to be controlled/dictated by others". बहुतेक स्त्रियांची मते त्यामुळेच सौभाग्यचिन्हांविषयी विरोधी झालेली दिसतात.
काही वेळा नवर्‍याला बरे वाटेल म्हणुन काही न पटणार्‍या/न आवडणार्‍या गोष्टी आपण करतोच की...( मी तरी करते). त्यावेळी अगदी स्त्री जातीवर अन्याय वगेरे असे काही विचार नसतात. संसार सुरळीत चालवा, एकमेकांबद्दलचे प्रेम्/आदर टिकुन रहावा म्हणुन काही गोष्टी नवरा-बायको दोघेही करत असतात.
माझा नवरा मला कधीही "कुंकू लावले नाहीस का?"...असले काही विचारत नाही. तुला जे comfortable असेल ते घाल असेच नेहमी सांगतो, पण म्हणुन मी लग्ना-कार्यात किंवा नातेवाईकांकडे जाताना Jeans घालत नाही.
निव्वळ विरोधासाठी " हे मी करणार नाही, घालणार नाही" असे म्हणणे मला योग्य वाटत नाही.

माझ्या ओळखीत १-२ मुली आत्ता नवीन लग्न झालेल्या आहेत (पुण्यात) १-२ वर्षात, त्या लग्नाआधीपेक्षा बाळबोध झाल्यात लग्नानंतर! सगळे दागिने, कुंकू...etc. etc... ( कदाचित अजुन त्या नव्या नवलाईत असतील...नवरा-सासु-सासरे यांना खुष ठेवण्याच्या प्रयत्नात..:-))

दक्षिणा अगं त्याने नवीन मंगळसूत्र केलं असेल तिच्याकरिता, फक्त तिने नवीन करण्याचं कारण सांगितलं असेल (म्हणजे गळ्यात मंगळसूत्र हवंच, लोक काय म्हणतील वै) त्यावरचं त्याचं हे उत्तर.

जोडवी वापरणं, न वापरणं ज्याच्या त्याच्या मर्जीवर अवलंबुन आहे. पण ज्या बोटांत जोडवी घालतात त्यांवर अ‍ॅक्युपंक्चरचे पॉईंट्स असतात. चांदीची जोडवी वापरल्याने ते पॉईंट्स सतत दाबले जाऊन कंबरेचा त्रास असेल तर फरक पडतो. तसंच प्रसुतीच्या काळातही जास्त त्रास होत नाही. ही मी शास्त्रीय कारणं सांगितली.>>>>>>

हे असं काही असेल असं मला तरी वाटत नाही . मला आवडतात म्हणून गेली ७ वर्ष मी जोडवी घालते आहे( कोणाचे ही बंधन नाही, आवड आहे म्हणून फक्त घालते) पण माझी कंबर दुखायचे काही थांबलेले नाही
नवर्‍याची पाठ/कंबर दुखते आहे बरेच वर्ष Happy त्याला सांगुन पाहते ह उपाय :ड
मला तर सगळी सौभाग्यचिन्ह दागिने म्हणुनच कधीतरी घालायला आवडतात.
स्वाती खरच उगाचच उडवलीस पोस्टः(

त्यानन्तर हात धुवायला मस्त गन्ध-सुवासिक द्रव्ये घालुन अर्घ्य देणे यात लाज कसली?>> सुवासिक द्रव्ये स्पॉन्सर्ड बाय मुलीची हैद्रा बादची मामी Happy

हा हा हा!!!

कालच या विषयावरती घरात दिवसभर वादावादी चालू होती. आज माबो उघडल्यावर हाच बीबी दिसला. Happy

मी स्वतः कसलेच दागिने घालत नाही. मला ते जाम अवघडल्यासारखं होतं. कानातले. बांगड्या इत्यादि इत्यादि लग्नाआधी पण घातले नाही. एखाद्या सणाला समारंभाला "नटायचं" म्हणूनच मी घालते. पण त्याचं लिमिट चार ते पाच तासापर्यंतच.

मी लग्नानंतर देखील कधी ते हातभर बांगड्या. कानातले, जोडवी इत्यादि घालत नाही. सासरी अर्थातच लोकाना त्रास होत असावा. Happy लग्नाच्या दुसर्‍या तिसर्‍या दिवशी फक्त दिवसभर साडी नेसले होते. त्यानंतर सरळ ड्रेसवर. मला दिवसभर साडी नेसायला आवडत नाही.. सो मी नेसणार नाही. आणि मी "नवी नवरी" असल्याने जर मी चोवीस तास साडी नेसणे गरजेचे आहे तर तोसुद्धा "नवा नवरा"च आहे की.. त्याला बसू देत चोवीस तास सोवळ्यावर नाहीतर धोतरावर!!!!

फार पूर्वीच्या काळी पुरूष देखील बायकाइतकेच दागिने घालायचे. फक्त त्यानी कधी स्वतःवर सक्ती ओढवून घेतली नाही Happy पूर्वीच्या काळी पुरूषानी तिलक लावल्याखेरीज बाहेर पडत नसत (चुभुदेघे) पण सध्या ही पद्धत कुठेच दिसत नाही!!!!

जोडवी अथवा कुंकू हे अ‍ॅज्युप्रेशरचे पॉइंट्स आहेत याला "अ‍ॅक्युपंक्चरवाले" सुद्धा दुजोरा देत नाहीत. त्याच्या मते हे पॉइंट्स दुखण्यवरून ठरत असतात. कुणाला याबद्दल जास्त माहिती असल्यास कृपया लिहा. उगाच इथे चुकीची माहिती पसरायला नको. Happy

सौभाग्यचिन्हे वापरणे हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा प्रश्न असला तरी त्याला एक "सामाजिक प्रथा" अथवा पद्धत याचे जे काही सध्या स्वरूप आलेले आहे ते मात्र फार वि़कृत आहे. मंगळसूत्र घालून जर स्त्रीला संरक्षित वाटते हे विधान फारच हास्यास्पद आहे. सध्या रत्नागिरीमधे बाईकवरून सुसाट येऊन स्त्रियाच्या गळ्यातले मंगळसूत्र खेचणारी टोळी आलेली आहे. ज्या स्त्रियाचे मंगळसूत्र यामधे गेलेले आहे त्याचे याबाबतीत मत विचारात घेतले पाहिजे Proud

(मला जीन्सवर मॅचिंग बांगड्या व कुंकू तसेच हाय हिल्स अथवा स्पोर्ट्स शूज वगैरे मधे जोडवी घालणार्‍याबद्दल अतीव आदर आहे)

>>पुरुषांची मानसिकता अशी असते की त्यांना प्रत्येक अवेलेबल स्त्री आजमावून पहायची असते ह्यात मंगळसूत्र घातलेली स्त्री आधिच दुसर्‍याने क्लेम केली आहे म्हणून तो तिथे प्रयत्न करणार नाही. >> हे किती चिड आणणारं आहे ना? Sad क्लेम?
म्हणजे जिथे स्त्रीने मंगळसूत्र घातले नसेल ती बाई available का?
बापाचा माल आहे का? Angry

(मला जीन्सवर मॅचिंग बांगड्या व कुंकू तसेच हाय हिल्स अथवा स्पोर्ट्स शूज वगैरे मधे जोडवी घालणार्‍याबद्दल अतीव आदर आहे)<<
Rofl
मला पण!!!
गरवारे कॉलेजच्या आर्टसच्या पोरी या जमातीत ही उदाहरणे घाउकरित्या दिसायची मी कॉलेजला जायचे तेव्हा.

जेंव्हा माझ्या भावाचे लग्न झाले तेंव्हा माझ्या आईची ही फार सक्ती असायची की वहिनींनी आल्यागेल्या पाहुण्यांसमोर डोक्यावरुन पदर घ्यावा. कधी वहिनी विसरलीच तर आई वहिनींवर रागवायची. यावर माझे बाबा, माझा भाऊ मात्र आईला समजवून सांगायचे. बहिणी देखील त्यांना त्यांच्या सासरी किती रिती-रिवाज पाळावे लागतात हे सर्व वहिनींना सांगायच्यात. यावरुन मला वाटते, पुरुषांपेक्षा स्त्रियाच स्त्रियांना सक्ती करतात. माझ्या बहिणीने एकदा सासरी स्लीव्जलेस ब्लाऊज शिवले होते. त्यावर तिच्या सासू-नंदेनी तिला खूप त्रास दिला होता हेही आता आठवते आहे Happy

>>>>> पूर्वीच्या काळी पुरूषानी तिलक लावल्याखेरीज बाहेर पडत नसत (चुभुदेघे) पण सध्या ही पद्धत कुठेच दिसत नाही!!!!
घरच्या देवान्ची पूजा करुन तिलक लावुन बाहेर पडणे, शिवाय "बोडक्या" डोक्याने कुठेही न जाणे (फक्त स्मशानात बोडक्या डोक्याने जातात) ही बन्धने होती/आहेत. इन्ग्रजी आमदानीतील प्रभावामुळे व धर्मच न मानण्याच्या समाजवादी/कम्युनिस्ट विचारान्मुळे कोण पाळत नाहीत तो भाग अलाहिदा! आमच्यासारखे पाळतात!
लग्न न झालेल्या पुरुषाने एकच जानवे घालायचे अस्ते तर लग्न झालेल्या पुरुषाने दोन जानवी घालायची अस्तात!

.

>>बहिणीने एकदा सासरी स्लीव्जलेस ब्लाऊज शिवले होते. त्यावर तिच्या सासू-नंदेनी तिला खूप त्रास दिला होता. >> हा निव्वळ जळकेपणा आहे. त्यांना घालायला मिळत नसेल म्हणून दिला असेल त्रास..

मला सगळी सौभाग्यचिन्हे घालायची खुप आवड आहे.

माझ्या गळ्यात नेहमी मंगळसुत्र असतं आणि ते मी कधीच काढत नाही....महाराष्ट्रात किंवा साउथ सोडुन बाकीच्या प्रदेशात काळे मणीयुक्त मंगळसुत्र घालायची पध्दत आहे.. इकडे एक जाडी भरडी सोन्याची चेन किंवा गोफ घालतात त्यामुळे मुलीचं लग्नं झालं आहे की नाही याचा मंगळसुत्राकडे पाहुन पत्ता लागत नाही ::फिदी:

आणि जोडवी तर आजकाल लग्नाआधी सुध्दा घालतात आवड म्हणुन त्यात नवल ते काय?

अता राहीले पैंजण..जे छुमछूम करतात म्हणुन मी घालत नाही..लग्नाआधी अँक्लेट म्हणुन आवडीने घालायचे..

टिकली लावणं हे प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे. कुणा कुणाला नाही सहन होत.. कोणाला सवय नसते...

जर लग्नाआधीही फिंगर रिंग (जोडवी), आणि अँकलेट (पैजण) म्हणुन घालता येतात तर विधवा बाईला का घालता येउ नये?

पाय धुणे या प्रकाराची मला प्रचंड चीड आहे..हा पण लिंबुदा सारखा व्याही जर पाय धुतोच असं म्हणाला तर नाही कोण म्हणणार? Proud

जोपर्यंत सौभाग्य आहे तोपर्यंत श्रिंगार करण्यात काय वाइट आहे? मग मनात असूनही त्या गोष्टी करता येत नाहीत.
<< मामी, I respect your personal views, emotions.
पण मुळात नवरा मिळाल्यावरच/ नवरा असे पर्यंत = स्त्री सौभाग्यवती असणे
हे शृंगार लग्न झालेल्या स्त्रीयांनी करण्याची सक्ती यालाच तर ऑब्जेक्शन आहे.

पुरुषांची मानसिकता अशी असते की त्यांना प्रत्येक अवेलेबल स्त्री आजमावून पहायची असते ह्यात मंगळसूत्र घातलेली स्त्री आधिच दुसर्‍याने क्लेम केली आहे म्हणून तो तिथे प्रयत्न करणार नाही. आपले प्रयत्न दुसरीकडे नेइल.
<< मंगळसूत्र = taken हे एक कारण आहेच पण या कारणात सुध्दा पुन्हा पुरुषाचा मालकी हक्क च आला.( मैत्रेयी ने स्वाती च्या बीबी वर याची तुलना कुत्र्याच्या गळ्यातल्या पट्ट्याशी केली होती:) )
मग (हिन्दू समाजात) पुरुषां साठी काही चिन्ह का नाहीत , ती सोयीस्कर पणे टाळली आहेत आणि वर स्त्रीयांना दिलेली चिन्हं कशी त्यांच्या हिताची आहेत हे नियम करून ठेवलेत त्याला ऑब्जेक्शन !
दागिना म्हणून, हौस म्हणून घालायची इच्छा असेल तर गोष्ट वेगळी. Happy

दक्षिणा, माझ्या सा.बा. नी आमच्या सापुला माझे पाय धुतले होते हो
:प्रचंड कौतुकाने निथळणारी बाहुली:
आणि ते पाय पुसण्यासाठी त्यांनी टॉवेल घेतला तर आमची आजी त्यांना म्हणाली, 'अहो, आपल्या पदराने तिचे पाय पुसा, पद्धतच आहे तशी' Proud

जिन्स लोवेस्ट वर /स्लिव्लेस टॉप आणी सोन्याच< भरगच्च मंगळसुत्र
किंवा केप्रिज वर छूमछूम ते पण चांगले वाजणारे.

इथे अमेरिकेत, फॉरमल्स वर बांगड्या/मोठ कुंकू असं बरच काही पाहायला मिळतं.

यावरुन मला वाटते, पुरुषांपेक्षा स्त्रियाच स्त्रियांना सक्ती करतात. >>>> हो क्का??? मग काय करावे आता?? सर्वच पुरूष इतके पुरोगामी असतात की काय??? हुंडा फक्त सासूच मागते ना? सासरे/दीर वगैरे लोक शान्त बसून असतात. हो ना?? आणि इतर सर्व जाचक प्रथा पण स्त्रियानीच चालू केल्या ना?? मंगलकार्यप्रसंगी विधवेला पुरूष मानाने बोलावतात आणि इतर स्त्रिया मात्र त्याना येऊ देत नाही असेच ना???

बी, कृपया तुमच्या स्वतःच्या घरातील उदाहरणावरून अख्ख्या समाजाचे स्वरूप ठरवण्याचा तुमचा बालिशपणा बंद करा. तुमच्या घरादाराच्या बाहेरदेखील एक समाज आहे आणि तो "पुरूषप्रधानच" आहे हे लक्षात घेऊन मग विधान करा.

हो दक्षिणा, नुसती चीड नाही राग संताप येतो. मेट्रो शहराच्या बाहेर पडून जर भारताच्या आतील भागात गेले ना तर ते एकच संरक्षण आहे बाइला. काही प्रमाणात. तरीही नाहीच. विवाहितेलाही अब्युज सहन करावाच लागत आहे. कुमारिका, विधवा यांच्या दुरवस्थेबद्दल बोलायलाच नको. अगदी बापाचाच माल अशीही परिस्थिती आहे.
अब्युज स्टॅटिटिक्स आर जस्ट टू स्केअरी.
मला न आवड्णार्‍या प्रथा:

१) मुलगी वयात आली की एक फंक्षन करतात व तिला साडी नेसवितात हे मला अतिशय बार्बरिक व फ्युडल वाट्ते. त्या मुलीच्या प्रायवसीचा काहीच विचार केला जात नाही. व तिला बुभुक्षित पुरुषांच्या नजरेत आणून दिले जाते.
२) बालविवाह.
३) सती - आता कालबाह्य. पण द वेरी आयडिया!
४) बुरखा पहनने. ४ बायका करण्याची परवानगी असणे.
५) चायनीज फुट बायंडिन्ग
६) महिलांची आफ्रिकेत केली जाणारी शस्त्रक्रीया.
७) नवरा गेल्यास दिराशी लग्न करून देणे - जेणेकरून प्रॉपर्टी घरातच राहील.
८) फीमेल इन्फंटीसाइड - काही राज्यात तरी ही प्रथाच आहे.

मागच्या वर्षी मी जपानमध्ये असताना तिथे एक मुलगी नवीन लग्न होऊन आली होती. पंजाब दी कुडी होती. खरंतर जपानमध्ये फक्त नवरा-बायको दोघंच असणार होती. पण नाही, तिथेही त्या हातभर पांढर्‍या-लाल बांगड्या व सिंदूर असायचाच Sad व सांगायची आमच्या लग्न झाल्यावर खूप मेकअप करून नटून थटून बसावं लागतं आजूबाजुची बरीच लोकं बघायला येतात तेव्हा. मी इथे मेकअप करत नाही म्हणून भारतातून सासू व आई ओरडतात म्हणे.

सौभाग्यचिन्ह किंवा कुठलाही दागिना प्रत्येकाने आपल्या आवडीने घालावा. लोक काय म्हणतात किंवा म्हणत नाही म्हणुन नाही. मला वाट्त घालावासा घातलं नाही वाटत नाही घातलं. त्याला जास्त मह्त्व देउ नये

Pages