स्त्रिया आणि खटकणार्‍या/ जाचक प्रथा

Submitted by डेलिया on 24 March, 2010 - 20:37

या विषयावर अतिशय समतोल आणि सखोल विचारांचा लेख लोकसत्ता मधे वाचनास आला त्याचीच लिन्क -http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=593...

सौभाग्यचिन्हे या बीबी वरुन मला हा विषय सुचला. तो बीबी आता फक्त 'संयुक्ता' पुरता मर्यादित केलेला दिसतोय म्हणुन आणि या विषयाची व्याप्ती त्याच्या पेक्शा मोठी वाटत असल्याने नवीन बीबी उघडावा असे वाटले.

आपल्या समाजात बायकांच्या शारीरिक स्थिती वरुन ( उदा. - पाळी चालु असणे ) किंवा वैवाहिक स्थिती वरुन ( कु. , विवाहित , विधवा ई. ) अनेक प्रथा आहेत. यातल्या काही प्रथा तर स्त्रीसाठी अतिशय अपमानास्पद अशाही आहेत. असे असुनही त्यातल्या काही प्रथा आजही अनेक उच्चशिक्षित स्त्रियांकडुन देखिल पाळल्या जातात. काही स्त्रिया त्या प्रथा मनापासुन पाळतात तर काही जणी घरच्यांच्या / समाजाच्या दबावामुळे पाळतात.

इथे मला हे जाणुन घ्यायचेय की तुम्हाला अशा कोण्त्या प्रथा खटकतात? त्या नाहीशा करण्यासाठी तुमच्या परीने तुम्हि काय प्रयत्न करता ? तसेच तुमच्या पुढच्या पिढीवर या प्रथा लादल्या जाउ नयेत म्हणुन तुम्ही काय करता ? तसेच काही प्रथा खटकुन देखिल त्या तुम्हि पाळता का आणि कशामुळे ?

याचे उत्तर देउन माझ्यापासुनच मी सुरुवात करते.
१. पाळी ( menstrual periods ) सुरु असताना बाजुला बसणे ही जरी प्रथा अता बहुतेक सुशिक्षित घरातुन बंद झालेली असली तरी अजुनही पाळी सुरु असताना देवघरात जाणे , देवाची पुजा करणे ई. सारख्या गोष्टींना मनाई असते. पाळी चालु असणार्‍या स्त्री चा देवाला 'विटाळ' होतो असे म्हणले जाते. :
मला स्वताला या प्रथेत कोणतेही तथ्य वाट्त नाही. तसेच 'पाळी चालु असणार्‍या स्त्री चा विटाळ होतो' असे म्हणणे ही अतिशय अपमानास्पद वाटते. मी स्वता हे अजीबात पाळत नाही तसेच माझ्या मुलीला पण असे काहीही मी सांगणार नाही. ईतर कोणी तिला काही शिकवलेच तर ते का योग्य वाटत नाही हे तिला सांगेन.
२. सौभाग्यचिन्हे ( मंगळसुत्र ) ही बायकांची वैवाहिक स्थिती दर्शवितात. त्याच्या अनुषंगाने बायका - बायकात त्यांच्या वैवाहिक स्थिती वरुन भेद भाव केला जातो. : हा भेद भाव दुर व्हावा आणि सर्व बायकाना समाजात समान वागणुक मिळावी असे मला मनापासुन वाटते. रोजच्या आयुष्यात मंगळ्सुत्र वापरत नसले तरी लग्न , मुंजीसारख्या कार्यक्रमांना जाताना घालते. पटत नसले तरी नातेवाइकांच्या आणि घरातल्या मोठ्याच्या टीकेला सामोरे जावे लागु नये आणि उगीच वाद नकोत म्हणुन.

गुलमोहर: 

सरकारने एखादा कायदा मॅटर्निटी लीवबाबत केलेला असणार. कंपनी किमान तेवढी सवलत द्यायला बांधील असणार..... त्याच्यापेक्षा जास्त सोयही एखादी कंपनी देऊ शकते..

जाच बराच वाचायचा रहिला आहे. Proud नंतर वाचेन सवडीने.

मूल दत्तक घेतले असेल तर मॅटर्निटी लीव्ह मिळू शकते का?>> नाही गं! का मिळेल?? लेबर पेन्स / अ‍ॅक्च्युअल डिलिव्हरी नाही होत ना मग? (हॅव टू चेक)

पण एम्प्लॉयर देऊ शकतो. कायद्याने बंधनकारक नसलं तरीही.

मॅटर्निटी लीव्ह मिळण्यासाठी स्त्रीच्या वैवाहिक स्थितीचा संबंध >> नाही येत!! कायद्यात असं काहीही म्हटलं नाहीये. बेनिफिट्ससाठी लग्न केलेल पाहिजे असं. हॅव टू चेक हिंदू मॅरेज / / अ‍ॅक्ट

मॅटर्निटी लीव्ह प्रमाणेच पॅटर्निटी लीव्हही मिळू शकते का >> कायद्यात तसं काही लिहिलेल ठावूक नाही. आमच्याकडे ७ दिवस मिळते जी कमी आहे Happy

नाही गं! का मिळेल?? लेबर पेन्स / अ‍ॅक्च्युअल डिलिव्हरी नाही होत ना मग? (हॅव टू चेक) <<
डिलिव्हरी झाली की संपलं? बाळ काय रेडिमेड चालतं बोलतं मिळतं की काय? इतकं छोटं बाळ तुमच्या घरी अ‍ॅडजस्ट होणं, तुम्ही त्याच्याशी अ‍ॅडजस्ट होणं, अंगावरचं नाही पण तरी त्याच्या फिडींगच्या वेळा, नॅपी चेंजिंग इत्यादी असतंच की. का आणल्या दिवशी जेमतेम ४ महिन्याचं पण नसलेलं सोनुलं डे केअर मधे?

>>आमच्याकडे ७ दिवस मिळते जी कमी आहे<<
जर बाप्ये लोक खरोखरच त्या लीव्हचा उपयोग बाळाच्या संगोपनासाठी करणार असतील तर निश्चितच कमी आहे. आयपीएल बघणे, एक नॅपी बदलण्याच्या जोरावर आर्डरी सोडणे अश्यासाठीच करणार असतील तर काय उपयोग.. Happy
पण पॅटर्निटी लीव्ह ही खरंच मिळायला हवी ७ दिवसांपेक्षा जास्त. विशेषतः बाळंतपणानंतर बायको आणि मूल घरी परत आल्यावर, जर का शहरात दोघेच रहात असतील आणि घरच्यांपैकी कोणीच मदतीला असणार नसतील तर हवीच हवी. आणि ती कश्यासाठी नक्की दिली जातेय याबद्दलही शिक्षण द्यायला हवं हपिसात.

माझा असा अनुभव आहे कि स्त्री म्हणून काहीही प्रकारचे सेल्फ एक्स्प्रेशन कार्यालयातील पुरुषांना
अनकंफर्टेबल करते. मला एका ठिकाणी असे चक्क सांगितले गेले होते कि म्याड्म तुम्ही इमोशनल होउ नका बरेका मीटिन्ग मध्ये नाहीतर पंचाइत होइल. हे म्हणजे माझा काहीच तसा विचार नव्हता व कार्यालयात फार मोठे अपमान वगैरे नीट सहन केल्याचा अनुभव असतानाही असे ऐकावे लागले. जेंडरलेस वातावरण कामाच्या ठिकाणी निर्माण केले गेले तर फार सुखदायक असेल. Now a days I stick to issues and let the facts and figures speak. No self expression. this is a hard lesson to learn.

सगळं काहि वाचलं नाही अजून, पण भरल्या घरात नविन सूनेला तिच्या मनासार्ख खायला न मिळ्ण हे किति त्रासाचं होतं माहिते का? सूनेने आल्या दिवसापासून घारातल्या लोकांचे खायचे प्यायचे सांबाळायचे, त्यांच्या आवडीनिब्वडी समजून घ्यायचा. एक पदार्थ असाच बनला पाहिजे, त्यात ते नाहि घालायच, हे घालायच वगेरे. तिला एखादा पदार्थ आवडत नसेल, तरि तू हे कसं नाही खात म्हणून हैराण कराय्चे. तिला एखादा पदार्थ आवडत असेल आनि त्या घरी तो बनत नसेल, तर ती कायमच त्या पदार्थासाठि बेचेन होणार. तिला तो ह्या घरि बनवायला मिळणारच नाहि. ती व्हेज असेल, तरि तिला नोनव्हेज करणे ह्यासाठि जबरदस्ति केलि जाते, तिला करताना उलटी होत अस्ली तरि, तिने केलेच पाह्यजे, कारण ती सून ना. ह्या घरात पैशाला वगेरे कमी नसते, पण सूनेने तिच्या मनाप्रमाणे स्वयपाक बनवणे मन्जूर नस्ते. भरल्या घरात सून पोट मारून, मन मारून जगते, उपाशी रहाते. कोणाच्या लक्षातपन येत नहि. हे फार त्रासाचे असते.

अनन्या,
ते सगळं परंपरा सांभाळणे, आपलं अस्तित्व विसरून जाणे, केवढा थोर तो त्याग, सासरच्यांचा आदर आणि मर्यादा इत्यादीमधे येतं गं. त्याबद्दल बोललीस तर आता तुलाही तथाकथित व्यक्तिस्वातंत्र्याचं बांडगूळ म्हणतील.

अनन्या अनुमोदन. माझ्या एका मैत्रीणीला रोज तांदळाची भाकरी लागायची. पण "ई आमच्याकडे कुणी नाही खात बाई" असे म्हणत तिच्यापुरत्या देखील दोन भाकर्‍या करून घेता यायच्या नाहीत.

नीरजा, Happy

ती व्हेज असेल, तरि तिला नोनव्हेज करणे ह्यासाठि जबरदस्ति केलि जाते, <<
सुदैवाने याबाबतीत मी सुखी आहे. मी व्हेज असण्याबद्दल माझ्यापेक्षा माझ्या साबुंना जाम कौतुक आहे. आणि एकदा मला माश्याच्या वासाने ढवळतं हे लक्षात आल्यावर साबा जेव्हा करायचं तेव्हा एकतर मला दार बंद करून रूममधे बस वास गेला की बोलावते म्हणायच्या किंवा मी कामासाठी बाहेर पडल्यावर करायच्या. Happy

तुम्ही लकी आहात नीधप. ज्यांना हे सहन होत नाहि त्यांची अवस्था खूप वाईट होते. तोन्ड दाबून बुक्य्क्याचा मार. नन्तर सवय होते, करावी लागते. साधं रोजचं जेवणखाण हेही त्रासाचं होऊ शकत ह्याच जास्त वाईट वाटतं. सूनेची आवड वेग्ली असू शकते, हे चांगल्या शिकलेल्या लोकांच्याही लक्षात येत नाहि. मला वाटलं मी जरा जास्त लिहलं. एकदा लिहाय्ला लागले आणि थांबता आलं नाही. सोरी.

नीधप, बरं आहे बाई तुझं. आता त्यांच्या नावडीच्या वासाचा एखादा पदार्थ करताना तूही त्यांना अशीच खोलीच बंद करतेस का ग? Proud

अनन्या, सॉरी काय त्यात. तू म्हणतेयस ते बरोबर आहे.
सुनेनं आपल्या आवडीचं करून खाणं ह्याला नखरे म्हणणारे कैक लोक पाह्यलेत मी.

आता त्यांच्या नावडीच्या वासाचा एखादा पदार्थ करताना तूही त्यांना अशीच खोलीच बंद करतेस का ग? <<
नाही मी स्वैपाकघरात फारशी शिरतंच नाही.. Happy

मला काय येतं आणि नाही येत याची गमतीतही उठाठेव तुम्ही करू नका टोणगा.
जीव गेला तरी तुम्हाला जेवायला बोलावणार नाहीये.

स्वतःला फोडणी म्हणजे काय ते पण कळत नसेल आणि बायांना स्वैपाकातलं किती येतं याची फालतू चौकशी. करायच्यात काय नसत्या उठाठेवी.. यांना कोणी बोलावलंय तरी का? स्वतःच्या घरापुरतं बघा ना काय ते.

नीधप ला फुल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल पाठिंबा....... टोणगा, तुमच्या घरातल्या बायकांना होणारा जाच लक्षात आला आमच्या

<<जीव गेला तरी तुम्हाला जेवायला बोलावणार नाहीये.>>
नक्कोच बोलवूस, नायतर न गेलेला जीव जेउन जाईल Wink

मला काय येतं आणि नाही येत याची गमतीतही उठाठेव तुम्ही करू नका टोणगा.

>>
ते जनरलाइज्ड स्टेटमेन्ट आहे. स्वतःवर ओढवून घ्यायची काही आवश्यकता नाही. लोक आपल्याकडे बघुनच कुजबुजतात अशी धारणा झालेल्या काही केसेस सायकॉलॉजीत असतात.

<<लोक आपल्याकडे बघुनच कुजबुजतात अशी धारणा झालेल्या काही केसेस सायकॉलॉजीत असतात.>>
बायकॉलॉजीतपण असतात ईंग्रजी टोणग्या Happy

Pages