स्त्रिया आणि खटकणार्‍या/ जाचक प्रथा

Submitted by डेलिया on 24 March, 2010 - 20:37

या विषयावर अतिशय समतोल आणि सखोल विचारांचा लेख लोकसत्ता मधे वाचनास आला त्याचीच लिन्क -http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=593...

सौभाग्यचिन्हे या बीबी वरुन मला हा विषय सुचला. तो बीबी आता फक्त 'संयुक्ता' पुरता मर्यादित केलेला दिसतोय म्हणुन आणि या विषयाची व्याप्ती त्याच्या पेक्शा मोठी वाटत असल्याने नवीन बीबी उघडावा असे वाटले.

आपल्या समाजात बायकांच्या शारीरिक स्थिती वरुन ( उदा. - पाळी चालु असणे ) किंवा वैवाहिक स्थिती वरुन ( कु. , विवाहित , विधवा ई. ) अनेक प्रथा आहेत. यातल्या काही प्रथा तर स्त्रीसाठी अतिशय अपमानास्पद अशाही आहेत. असे असुनही त्यातल्या काही प्रथा आजही अनेक उच्चशिक्षित स्त्रियांकडुन देखिल पाळल्या जातात. काही स्त्रिया त्या प्रथा मनापासुन पाळतात तर काही जणी घरच्यांच्या / समाजाच्या दबावामुळे पाळतात.

इथे मला हे जाणुन घ्यायचेय की तुम्हाला अशा कोण्त्या प्रथा खटकतात? त्या नाहीशा करण्यासाठी तुमच्या परीने तुम्हि काय प्रयत्न करता ? तसेच तुमच्या पुढच्या पिढीवर या प्रथा लादल्या जाउ नयेत म्हणुन तुम्ही काय करता ? तसेच काही प्रथा खटकुन देखिल त्या तुम्हि पाळता का आणि कशामुळे ?

याचे उत्तर देउन माझ्यापासुनच मी सुरुवात करते.
१. पाळी ( menstrual periods ) सुरु असताना बाजुला बसणे ही जरी प्रथा अता बहुतेक सुशिक्षित घरातुन बंद झालेली असली तरी अजुनही पाळी सुरु असताना देवघरात जाणे , देवाची पुजा करणे ई. सारख्या गोष्टींना मनाई असते. पाळी चालु असणार्‍या स्त्री चा देवाला 'विटाळ' होतो असे म्हणले जाते. :
मला स्वताला या प्रथेत कोणतेही तथ्य वाट्त नाही. तसेच 'पाळी चालु असणार्‍या स्त्री चा विटाळ होतो' असे म्हणणे ही अतिशय अपमानास्पद वाटते. मी स्वता हे अजीबात पाळत नाही तसेच माझ्या मुलीला पण असे काहीही मी सांगणार नाही. ईतर कोणी तिला काही शिकवलेच तर ते का योग्य वाटत नाही हे तिला सांगेन.
२. सौभाग्यचिन्हे ( मंगळसुत्र ) ही बायकांची वैवाहिक स्थिती दर्शवितात. त्याच्या अनुषंगाने बायका - बायकात त्यांच्या वैवाहिक स्थिती वरुन भेद भाव केला जातो. : हा भेद भाव दुर व्हावा आणि सर्व बायकाना समाजात समान वागणुक मिळावी असे मला मनापासुन वाटते. रोजच्या आयुष्यात मंगळ्सुत्र वापरत नसले तरी लग्न , मुंजीसारख्या कार्यक्रमांना जाताना घालते. पटत नसले तरी नातेवाइकांच्या आणि घरातल्या मोठ्याच्या टीकेला सामोरे जावे लागु नये आणि उगीच वाद नकोत म्हणुन.

गुलमोहर: 

ज्युनिअर व्यक्तीने एलेवेटर ऑपरेट केला तर कुठे बिघडले? तो प्रोटोकॉल आहे.जाचक प्रथा अपमानास्पद असतील तर त्यांचा निषेध व्हावा. उद्या तो सिनीयर झाल्यावर त्याचे ते काम जाइलच ना. उद्या सगळे म्हणतील बॉस आम्हाला काम सांगतो ते जाचकच आहे. आता इथंही अति व्हायला लागलय

पश्चिमात्य देशात बॉसला एकेरीने बोलले जाते. भारतात ते नाही. त्याचाही जाच होणार का आता?

रैना, मंजिरी,
"जिथे काही उत्तर सापडत नाही तिथे टवाळी करून वेळ मारून नेण्याची खोड काही नविन नाहिये."
"मुद्दे एकदा मान्य करायचेच नाहीत म्हणल्यावर टिंगलीशिवाय उरतं काय?">>>
बरोबर आहे.. माझे अनेक "मित्र" हा विषय आला की " काही बोलू नकोस, तुझेच बरोबर" म्हणून ऐकून घ्यायचेही नाकारतात, वर अविर्भाव असा जसा लहान मुले रडू नयेत म्हणून उगाच आपण "बरं बरं तुला पाहीजे तर आणु तुला नवीन खेळणी, पण रडू नकोस" म्हणतो ना तसा.. Sad

पण तरी टिंगल/विषयांतर होऊ नये म्हणून काही isolated वैयक्तिक अनुभवांवर चर्चा करु नये, असे मला वाट्ते. याउपर अर्थातच तुमची इच्छा Happy

ज्युनिअर व्यक्तिनेच एलिवेटर ऑपरेट करावा असा नियम आहे का? का असावा ?
मर्यादा,संकेत, प्रथा, रुढी, नियम प्रत्येकाची चौकट वेगळी. प्रोटोकॉलच्या नावाखाली जेव्हा ज्युनियर व्यक्ति टार्गेट होते, एलिवेटरच्या बटणपट्टीच्या (स्त्रीपुरुषवयवंश काहीही न धरता)जवळ जी व्यक्ति असेल तिने तो ऑपरेट करावा सरळसरळ, ज्युनिअर व्यक्तिनेच काय म्हणुन ?. ज्या वेळेला ज्युनियर व्यक्तिचे काम निव्वळ वयामुळे दखलपात्र ठरवत नाही, ज्यावेळेला ज्युनिअर व्यक्ति स्त्री असेल आणि ती अगदी जरी कंट्रोलर असली तरी तिनेच कॉफी करुन आणावी अशी अलिखीत अपेक्षा असते त्याला भेदभाव म्हणतात.

जाच कोणाला कशाचा व्हावा हे तुम्ही आणि मी ठरवू शकतो का? गांधीजींना गुलामगिरीचा जाच का झाला-साधे ट्रेनमधुन तर उतरवले. जायचे दुस-या गाडीने. तेव्हाचा प्रोटोकॉल तसाच होता.
एखाद्या बॅरीने सावरकरांना घाण्याला जुंपावे यात जाच तो काय? तुरुंगाचा प्रोटोकॉल होता तो. बोलुनचालुन कैदी.

जाच हा निव्वळ शारिरीक असावा का? म्हणजे हुंडाबळी, बलात्कार, मारहाण - याला जाच म्हणायचे, पण सर्वात नंतर जेवायचे (हा प्रोटोकॉल आहे उदात्त भारतीय संस्कृतीचा) हा पुरेसा सिरियस जाच नाही - असं आहे का ते?

पश्चिमात्य देशात बॉसला एकेरीने बोलले जाते. भारतात ते नाही.त्याचाही जाच होणार का आता?>>>>>>

तो प्रश्न बॉस चा आहे Proud

लग्नाच्या संदर्भात जाचक प्रथा येतात त्या अपरिहार्य म्हणून. आणि अपमानास्पद लोजिकलेस असतात म्हणून निषेधार्ह आहेत.पण इन्स्टिट्यूशनल जॉब घेताना तुम्हाला येण्यापूर्वी सगळे माहीत असते/ असायला हवे. तुम्ही फारच सेन्टिमेन्टल असाल तर. . निवडीचे स्वातंत्र्य असते. सोडण्याचेही असते. पण हवे तेच स्वीकारू असे कसे चालेल. ? 'तोबर्‍याला पुढे अन लगामाला मागे ' असे. त्यात डिस्क्रिमिनेशन असेल तर कायदा आहेच की त्याला.... कुटुम्बसंस्थेतील जाचक प्रथांशी याची तुलना कशी होऊ शकते.

>>>> उद्या सगळे म्हणतील बॉस आम्हाला काम सांगतो ते जाचकच आहे. Lol
तरी बर, या स्त्रीव्यक्तिस्वातन्त्र्यवाद्यान्पैकी कुणी मिलिटरीशी सम्बन्धीत नाहीत! नैतर तिथले प्रोटोकॉल म्हणजे काय विचारता?
प्राचीला माहित अस्तिल बरेच, विचारले पाहिजे तिला Happy
आयला, लिफ्टच्या उदाहरणावरुन आठवले...... बोम्बलायला स्मशानात म्हण्जे वैकुण्ठात हो! तर तिकडे मुडदा जाळायला गेलो अस्ताना भटजी म्हणतो इकडून उजवीकडून वर्तुळात फिरा,
लगेच का? इकडूनच का जाऊ? देवाला प्रदक्शिणा घाल्तात तशी का नको घालू?
अन हे काय माझ्या अन्गावर पाण्याची धार कस्ली?? खान्द्यावरच्या मडक्याला भोक का पाडताय?
असच का करायच? तसच का नको? मज्री माझि!
असे म्हणायला लागले तर? (भटजी उठून निघुन जाईल अन भडाग्नी द्या म्हणून सान्गेल तो भाग निराळा! पण असच का नि तसच का नाही याला देखिल अन्त नाही!)

asleep_jumbo.gif

इन्स्टिट्युशनल जॉबच्या निवडस्वातंत्र्याबद्दलचे तुमचे म्हणणे पटते टोणग्या (तो आयडी बदला. असे कोणाला टोणग्या वगैरे म्हणायला चांगलं वाटत नाही हो). तरीही लग्नसंस्थेत / कुटुंबसंस्थेत सुद्धा तत्वतः निवडीचे स्वातंत्र्य असते. सोडण्याचेही असते. प्रत्यक्षात कितपत शक्य होते ते ज्याचे त्याने ठरवावे.
पूर्ण सिस्टिम आपण नाही बदलु शकत, पण एकेका विचाराने परिवर्तन येऊ शकते ना? पण हे फोटोप्रकरण जाचक नाहीच हे फारतर स्वतःसाठी म्हणु शकतो, इतरांसाठी नाही.

अरे तुम्ही कोणत्याही गोष्टी जाच म्हणून का पोस्टताय इथे?:अओ:
उगिच नार्‍याची शेंडी शंकर्‍याला.. Sad

लिफ्ट ऑपरेट करणं, कॉफी करणं हे पण नोकरीच्या अलिखित नियमांत येतं? Sad आमच्याकडे टॉपमोस्ट पर्सनसुद्धा लिफ्टच्या बटणांजवळ उभा असेल तर लिफ्ट ऑपरेट करतो. तो कधी कधी दार उघडं थांबवायचं असेल तर नेमकं उलटं बटण दाबून दार जोरात बंद करायचं बटण दाबतो ते सोडून द्या. कॉफी तर पँट्रीबॉयच आणून देतो सरसकट सर्वांना.

फक्त लग्नानंतर ऑफिस जॉईन केल्यावर पहिल्या शनिवारी सकाळी माहेरच्या सवयीप्रमाणे मस्त वर्तमानपत्र पसरुन वाचायला बसले तर "बाईने सकाळी सकाळी पेपर वाचू नये, कामं पडलेली असतात" हे ऐकल्यावर उडालेच होते. नवर्‍याने ऐकल्या न ऐकल्यासारखं केलं होतं. पण थोड्याच दिवसांत हा view बदलला Happy नवर्‍यानेच परस्पर कान टोचले असावेत.

अश्वे Happy

रैनाने तिचा जॉब सोडून अश्विनीच्या ऑर्गनायझेशनमध्ये का जाऊ नये?
चेअरमनने ऑपरेट केलेल्या लिफ्टने वर जाणं सुखदायकच...

हे माझ्या ऑरगनायझेनमध्ये होत नाही ( होपफुली) Wink
जपानातलं आहे गं ते उदाहरण अश्विनी- फायनँशियल कंट्रोलर स्त्रियांना मुद्दाम कॉफी करुन आणायला सांगणे वगैरे.
आणि टोणग्या अमेरिकन कंपन्यात अश्विनीने दिलेलेच उदाहरण संयुक्तिक ठरेल. चेअरमन जरी असला तरी तो स्वतः लिफ्टचे बटण दाबेल.

बाकी तू म्हणतेस ते खरं आहे केश्विनी. पेपर वाचणे, पुस्तकं विकत घेणे या गोष्टी स्त्रियांनी करु नयेत म्हणे Happy आमच्याकडे सुरवातीचे काही वर्ष "तिला एकटीला कामं करु दे, तू अजिबात करायची नाही"असे त्याचे स्वरुप होते, ते नव-याने परस्पर वाटेला लावले.

तरी बर, या स्त्रीव्यक्तिस्वातन्त्र्यवाद्यान्पैकी कुणी मिलिटरीशी सम्बन्धीत नाहीत! नैतर तिथले प्रोटोकॉल म्हणजे काय विचारता?>> आर्मी ऑफिसर्स ना स्त्रीदाक्षिण्य चांगले माहीत असते व ते लेडिजना फार नीट वागवतात.
जास्त अटेन्शन देतात. त्यांच्यासाठी खपतात. प्राची सांग कि ग.

जपानी हे भयंकर रुढीवादी असतात, आणि हाच आपल्याला जाचतो. एकच काम करणार्या स्त्री ला कमी अन पुरुषाला जास्त पगार देणारा देश आहे तो..मी ५ वर्षे जपानी क्लाएंट बरोबर काम केलेय, वात आणतात अक्षरशः., त्यात मात्र स्त्री-पुरुष भेद नाही Happy पण जाउ दे, आपण भारताविषयी च बोलुया सध्या...

आज प्रथमच प्रतिसाद देत आहे , चु.भु.दे.घे.

माझ्या लग्नात आम्हि ईतक सांगितल माझ्या सा.बा. ना कि तुम्हिच लावा कि मुलाच लग्न , तर म्हणे समाजात बर दिसत नाही ... तेव्हा पासुन माझ आणि सा.बा. च्या समाजाच बिनस्लय .... काय काय करु मि समाजाच्य नावान. ... लग्ना नंतर तर मला ईतक्या चालि रीति नव्यानि कळल्या कि मला तर मी दुसय्रा ग्रहा वरुन वगरे आलेय असच वटत ... आता ईतक्य डझनाच्या हिशेबात आज्या काकवा आत्या मावश्या आहेत माहेरी , कुणीच कस शिकवल नहि हीला ? हा प्रश्न तर मला सा.बा. अनि आजे सा.बा. च्या चेहर्या वर नेहमी दिसतो ... माला पण कळत नाही अस कस ते ... ईतक्या मोट्या प्रमाणात सगळ्या बिघडलेल्या बायका एकाच कुटुंबात कश्या काय आल्या देव जाणे ... असो आता मिच माहेरि जाउन रीति रिवाज क्लासेस उघडनारे ... नवीन येणार्या माझ्या वहीन्यान वळण नको का लावायला?

जपानी हे भयंकर रुढीवादी असतात, आणि हाच आपल्याला जाचतो. एकच काम करणार्या स्त्री ला कमी अन पुरुषाला जास्त पगार देणारा देश आहे तो.

>>
तरी आपण जातोच ना त्यांच्याकडे ? दुभत्या म्हशीच्या लाथा गोड प्रमाणे. असू द्या त्यांच्या पद्धती तशा करू सहन काही काळ असे कॉम्प्रोमाईज करीत. शेवटी ज्याच्या त्याच्या प्रायॉरिटीज असतात. इथे लिहिणे म्हणे 'केवळ वारा'

इथे मायबोलीवर काही जरी लिहिले, तरी त्याला argument म्हणून घ्यायची पद्धत आहे का?
मी फक्त FYI type लिहिलेल्या गोष्टींनाही quote करुन त्यावर argue करण्याची ही बहुधा ३री वेळ्..का मी नवीन असल्यामुळे मला target केल्या जतेय?
बाकी टोणगा,
तुम्ही उगाच non-issues वर argue करत असलात तरी सांगते, "शेवटी ज्याच्या त्याच्या प्रायॉरिटीज असतात" हे खरेच. पण म्हणून ती पद्ध्त चुक आहे, हे सांगायची कुणी बंदी केलिय का?
"गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करुन द्या, म्हणजे तो त्याविरुदध सन्घर्ष करुन उठेल" असे आंबेड्करांनी त्यासाठीच सांगीतले होते ना? आणि तो 'केवळ वारा' नव्हता, याला इतिहास साक्षी आहे.

आता कुणी "गुलाम", "गुलामगिरी", "मला target केल्या जतेय" असल्या शब्दांना/वाक्यांना out of context quote करुन वाद घातलाच तर तो त्याच्या आकलनशक्ती चा प्रश्न समजून मी तरी त्यावर उत्तर देणार नाही..

मायबोलीवर कोणाला आंबेडकर आठवावेत हे आश्चर्यच ! वा वा. त्या निमित्ताने विषय भारतावर आला हेही काही कमी नाही. मध्येच तो ऑर्गनायझेशनल बिहेवियरवर घसरतोय म्हण्जे तो व्यामिश्र आणि बहुआयामी झाला आहे .

तो त्याच्या आकलनशक्ती चा प्रश्न समजून मी तरी त्यावर उत्तर देणार नाही

म्हणजे इथे पूर्वी आ.बु.दो.स. अशी फ्रेज होती तसे असावे.

मी फक्त FYI type लिहिलेल्या गोष्टींनाही quote करुन त्यावर argue करण्याची ही बहुधा ३री वेळ्..का मी नवीन असल्यामुळे मला target केल्या जतेय? >>>> एक फूल, इथे एक एक मुद्याचे खंडन करायची सवय आहे. नविन असल्यामुळे 'मला टार्गेट करत आहेत' असे वाटते(च). काही अपवाद सोडल्यास इथे नवीन आलेल्या प्रत्येक आयडीकडून हे ऐकले आहे. तेच आयडी जुने झाले की नेमकी वाक्यं पकडून वाद घालताना दिसतात Wink

तो व्यामिश्र आणि बहुआयामी झाला आहे

>> तो तसा होण्यामध्ये तुझे स्वतःचे, अर्थात गाढवाच्या लाथांचे सर्वात जास्त योगदान आहे. ऑफिसमध्ये बॉस काम सांगतो म्हणून जाच होण्याचा विषय कुणी काढला? Angry हा बायकांच्या जाचाचा बीबी आहे. बायका बघून घेतील. बायल्याचोंबडा मेला !

श्री, पँट्रीची जबाबदारी हाच जॉब असेल तर तो जाच नाही. पण मॅनेजरने केवळ स्त्री आहे म्हणून चहा करुन आणावा हा जाच आहे.

माझ्या आधीच्या ऑफिसमधे बेबी शॉवर वगैरेला केक आणला की तो बायांनी कापून सगळ्यांना द्यायचा, सगळे निघून गेले की तिथला पसारा आवरायचा असा एक वाईट पायंडा पडला होता. मी एक-दोन वेळा ते काम करणार्‍या कलीगला मदत केली कारण ती एकटीच करत होती. तिसर्‍यांदा इतकी चीड आली. सरळ सगळ्यांना म्हंटलं की तुम्ही दूधपीती बाळं नाहीत की हातात केक द्यावा. ज्याने त्याने आपापला घ्यावा. आणि जाताना शक्य असेल तेवढा पसारा पण आवरा. तेव्हापासून आमचा ग्लोबल हेड सुद्धा नंतर सगळं आवरायला थांबायचा. हे असे बोलल्याबद्दल कोणी मला नोकरीवरुन काढले किंवा वाईट वागणूक दिली असे काही झाले नाही. नाहीतर मला अजूनच भांडावे लागले असते Proud

वे टु गो सिंडे.
हे एक कायम घडतं. तुम्हीच केक कापा, तुम्हीच सर्व करा. च्यामारी. मीही काही गेले काही वर्ष झाले मुद्दम होतय असं आढळलं की आवर्जून नाही म्हणते. Happy भारतात मात्र असं नाही म्हणणं ब-यापैकी स्फोटक ठरु शकतं. Happy
कामाच्या जागी घडणारे भेदभाव :- वानगीदाखल काही
- स्त्री म्हणुन एक फूल ने म्हणलं आहे त्याप्रमाणे एकाच कामासाठी सर्व पात्रता निकष सारखे असताना स्त्री आणि पुरुषाला वेगळा पगार असणे.
- स्त्रियांच्या वेषाबाबत विशेष टिप्प्णी करणे/ शेरेबाजी करणे
- सेक्शुअल हॅरासमेंट- यात मानसिक छळाचा ही समावेष आहे.
- अकाउंट अ‍ॅलोकेशन- मोठे/महत्वाचे अकाउंट, प्रोजेक्टस मुद्दाम स्त्रियांना न देणे
- गर्भारशी स्त्रियांची नोकरी त्यांच्या गैरहजेरीत मॅटरनिटी लीवमध्ये काढुन घेणे
- गर्भारशी स्त्रियांना महत्वाची कामं न देणे, सुट्टीवरुन परत आल्यानंतरही न देणे
- अंगावर पाजणा-या स्त्रियांना एखादी खोली उपलब्ध न करुन देणे
- स्त्रीपुरुषांसाठी वेगळी शौचालये न ठेवणे

सिंडरेला ती पोस्ट फक्त ५०० चा आकडा लवकरात लवकर गाठण्यासाठी आपलाही हातभार असावा म्हणुन होती Proud
रैना कामाच्या जागी घडणारे भेदभाव :- अंगावर पाजणा-या स्त्रियांना एखादी खोली उपलब्ध न करुन देणे हे कसं शक्य आहे , लहान बाळांना ऑफीसात घेऊन जाता येतं ?

Pages