न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०
ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.
१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.
२५. नवरा/सासु/सासरा/आई/वडील्/बहीण/भाऊ/नणंद/दिर परगावी जाणार आहे.
२६. त्या(च) दिवशी महत्वाचे रिलीज आहे/ऑफिसमधे काम आहे.
ए.वे.ए.ठी चा पत्ता.
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६
भेटायची वेळ : २३ जानेवारी २०१० सकाळी ११.३०
वृत्तांत ह्या पानापासुन पुढे. http://www.maayboli.com/node/12363?page=20
विनय देसाई ह्याचा वृत्तांत. आता गाजले की बारा
धन्यवाद...मी आणी माझी एक
धन्यवाद...मी आणी माझी एक मैत्रीण आणी २ छोट्या मुली (५ आणी ३ वर्शाच्या) येऊ.
विनय तुझ्या घरच्या जवळच आहे का ही जागा? मी काय आणु बनवुन?
व्हेजी अॅपेटायझर ?????
व्हेजी अॅपेटायझर ????? वरच्या यादीत ते नाहीये
०१)अनिलभाई -- २ किंवा ३
०१)अनिलभाई -- २ किंवा ३ समोसा
०२)फचिन- १ शाकाहारी - ज्यूस, सोडा, पाणी, झिप लॉक...
०३)स्वाती_आंबोळे - छोले किंवा पांढर्या वाटाण्यांची उसळ
०४)परदेसाई (पापलेट आमटी), टेबल क्लॉथ्स
०५)झक्की - रंपा, पेपर प्रॉडक्ट्स : प्लेट्स, नॅप्किन्स, बाउल्स, चमचे, ग्लासेस
०६)मैत्रेयी - २ मोठे, २ लहान - व्हेज भाजी-पनीर बटर मसाला, आणि स्टोव्ह, पातेली वगैरे
०७)वैद्यबुवा - २ मोठे, १ लहान, नॉन व्हेज करी (चिकन), पोळ्या, लाडु
०८)अमृता - २ मोठे, १ लहान (दही वडे), २ शाकाहारी, १ दोन्ही
०९)सायो- १ - शाकाहारी- मसालेभात आणि रायता/कोशिंबीर.
१०)चमन - राजमलाई
११)रूनी पॉटर - २ मोठे (१ शाकाहारी, १ मिश्रहारी) - ग्लु वाईन + गोड पदार्थ
१२) विकु-- ???
१३) स्वाती - २ मोठे (२ मिश्रहारी ) - चिकन अॅपटायजर
१४) अर्चना दिक्षीत (अॅना) -- ????
१५) सागर + १ (२ मिश्रहारी ) --चिज आणि खारवलेली बिस्किटे
१६) २ कारट्या + २ मुली --
भाई दोनचे समोसे आणणार का? पण
भाई दोनचे समोसे आणणार का? पण का?
कदाचित ३..
कदाचित ३..
प्रश्नपत्रिका बरोबर
प्रश्नपत्रिका बरोबर सोडवणार्या पहिल्या ३ विजेत्यांना यावेळी समोसे का....मायबो लिकर वरून सरळ समोश्यावर उडी. रेसिशन रिसेश्न म्हणतात ते हेच बहुदा.
विनय तुझ्या घरच्या जवळच आहे
विनय तुझ्या घरच्या जवळच आहे का ही जागा? मी काय आणु बनवुन? <<<
कार्टी... तुझे स्वागत (रोमातून इथपर्यंत यायला फार नाही पण १० वर्ष लागली
)
अगदी जवळच आहे. ये केव्हाही...
विनय
तर आणखी कोण काय काय
तर आणखी कोण काय काय पर्फोर्मन्स देणार आहेत ते लवकर कळवा.
आणखी म्हणजे? कुठले
आणखी म्हणजे? कुठले ठरलेत?
परफॉर्मन्स ऐवजी गेम्स खेळायचे का? बुवा वि. बाया अंताक्षरी (किंवा बारात राहणारे बाराकर वि. बाकीचे बाराकर :P), डम्ब शरेड्स - असले?
एवढ प्रचंड खाण खाउन वेळ उरणार
एवढ प्रचंड खाण खाउन वेळ उरणार आहे का ह्या सगळ्याला
वर झक्की उपास करतायत म्हणे.
आता दोनतीन तास खातच बसणार
आता दोनतीन तास खातच बसणार आहेत का लोक? बर पण तरी मधे मधे गेम्स ला हरकत नसावी , परत भूक तरी लागेल उरलेलं सम्पवायला
खाणं आणताना काहीतरी प्रमाण
खाणं आणताना काहीतरी प्रमाण ठरवावं लागेल. प्रत्येकाने २५ लोकांसाठी खाणं आणलं तर खूप उरणार आहे. तेव्हा १० लोकांना पुरेल असं आणल्यास चांगलं. सगळ्याची चव घेता घेता पोट भरेलच....
विनय
पर्फोर्मन्स म्हणजे... नाच..
पर्फोर्मन्स म्हणजे... नाच.. गाणी... उ उ वि.. वगैरे..
गेम्स चालतील. तु तयारी कर ग.
आयला म्हणजे लवकर यायला लागेल
आयला म्हणजे लवकर यायला लागेल ना, पापलेट पहिजे असेल तर.
पापलेट/चीकन २५ लोकांचे हवेत.
पापलेट/चीकन २५ लोकांचे हवेत.
अबे सगळेच पदार्थ २५ लोकांना
अबे सगळेच पदार्थ २५ लोकांना पुरतील येवढे केले तर कसं व्हायचं? मी पातेलं भर (साधारण पाव्णे दोन किलो चिकन) करुन आणणार आहे. कोणाला आवडलं तर ठीक नाहितर अख्खं पातेलं तसच घरी घेऊन जायची तयारी आहे
'शब्दवेध' (What's the good
'शब्दवेध' (What's the good word) सारखं काही खेळायला आवडेल का? मी शब्द काढून आणेन.
विनय, चांगली सूचना. (पोटसूचना : रिकामे डबे आणा सगळ्यांनी लेफ्टओव्हर्स न्यायला. :P)
विनय, मी येइ पर्यंत पापलेट
विनय, मी येइ पर्यंत पापलेट संपल तर थेट तुमच्या घरी येइन
आम्ही लांबुन येणार आहोत त्यामुळे आमचा पेशल विचार व्हावा हे जाहिर आवहन आहे.
आख्खं पातेलं मिळेल ना परत,
आख्खं पातेलं मिळेल ना परत, आम्ही फक्त त्यातला रस्सा घेऊ
इकडे झिपलॉकचे बॉक्सेस वगैरे जय्यत तयारी आहे. विनयकडच्या ए वे ए ठि नंतर २ दिवस स्वयपाक केला नव्हता लोकांनी (मी पण) 
मला वाटतं एवढं खाल्ल्यावर
मला वाटतं एवढं खाल्ल्यावर बसके खेळ खेळण्याऐवजी कॅलरी बर्न करणार्या खेळांचा विचार व्हावा. ;).
स्वाती , टिव्हीवरच्या 'वॉटस द गुड वर्ड' मध्ये काय असायचं ग? आठवत नाहीये आत्ता. सबीना मर्चंट होस्ट होती का?
मग तुझ्यासाठी कुस्ती, कबड्डी,
मग तुझ्यासाठी कुस्ती, कबड्डी, खो-खो ठेऊ..
लगोरी, खप्पर( ह्याला नक्की
>> एवढं खाल्ल्यावर बसके खेळ
>> एवढं खाल्ल्यावर बसके खेळ खेळण्याऐवजी कॅलरी बर्न करणार्या खेळांचा विचार व्हावा.
म्हणजे तिथे बसून ग्रूप थिंकिंग करायचंय का?
अगं What's the good word
अगं What's the good word म्हणजे जोड्या करायच्या आणि जोडीतल्या एकाने ३ क्लू देऊन दुसर्याने शब्द ओळखायचा. नाही ओळखला तर तो पुढल्या जोडीकडे पास होतो. कितव्या क्लूला ओळखला यावरून मार्क द्यायचे.
खप्पर म्हणजे काय? लपाछपीचाच प्रकार का? करवंटी उपडी घालून खेळतात ते? आम्ही 'डबा ऐसपैस' म्हणायचो. का ते माहीत नाही.
की खळी आखून ठिक्कर टाकून खेळतात ते? त्याला आम्ही ठिक्करपाणी म्हणायचो.
स्वाती ह्यात मराठी शब्द हवेत
स्वाती ह्यात मराठी शब्द हवेत बर्का..
हो हो - मराठीच. (पण
हो हो - मराठीच.
(पण 'शब्दवेध' म्हटलं तर झक्कींनासुद्धा कळलं नाही - बाकीच्यांचं जाऊच दे! :P)
आम्ही पण डबा ऐसपैस म्हणायचो,
आम्ही पण डबा ऐसपैस म्हणायचो, आम्ही रिकामा एखादा ड्बा ठेवायचो उडवायला..
आणि साखळी, विषामृत पण होउन जाउ द्या
स्वाती, हो, हो, जमिनीवर चौकोन
स्वाती, हो, हो, जमिनीवर चौकोन आखून खप्पर त्या घरात पडली पाहिजे. मग लंगडी घालत खेळायचं असा काहीसा तो खेळ होता खरा. आमचा हमखास दुपारचा ठरलेला खेळ. डबा ऐसपैस आम्ही पण म्हणायचो. लपाछपी प्रकरण फार काँप्लिकेटेड होईल;)
गॉसिपिंग तर आहेच पण त्याने फक्त मेंदू बर्न होईल
विष अमृत? साखळी? अरे ए वे ए
विष अमृत? साखळी? अरे ए वे ए ठी धडपडायचं आहे का?
बायांनो... आपण जानेवारीतल्या
बायांनो... आपण जानेवारीतल्या एका बर्फाळ दिवशी भेटत आहोत. ठेवायची झाली तर क्रिकेटची टेस्टमॅच ठेवायला हरकत नाही माझी. हालात खेळता येतील असे खेळ ठेवलेत तर बरे...
(म्हणजे हालत खराब व्हायला नको)...
Pages