न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

Submitted by अनिलभाई on 1 December, 2009 - 13:07

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.
२५. नवरा/सासु/सासरा/आई/वडील्/बहीण/भाऊ/नणंद/दिर परगावी जाणार आहे.
२६. त्या(च) दिवशी महत्वाचे रिलीज आहे/ऑफिसमधे काम आहे.

ए.वे.ए.ठी चा पत्ता.
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : २३ जानेवारी २०१० सकाळी ११.३०

वृत्तांत ह्या पानापासुन पुढे. http://www.maayboli.com/node/12363?page=20
विनय देसाई ह्याचा वृत्तांत. आता गाजले की बारा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या ए.वे.ए.ठी. ला मोठ्यांबरोबर लहान मुलाना पर्फोर्मन्सची संधी दिली जाईल. तेव्हा तुमच्या लहान मुलाना काही पर्फोर्मन्स ध्यायचा असेल तर मला कळवा. Happy

आणि मोठ्यांना पण विचारून घ्या... म्हणजे तयारी (ऐकण्याची/पाहण्याची) करता येईल..
ते पण भाईंना कळवा... (उ उ वि चा प्रयोग होणार नाही. इच्छुकांनी नोंद घ्यावी..)

विनय

ज्यांनी अजून मेन्यू गुलदस्त्यात ठेवलेत त्यांनी जरा नक्की करा.
मैत्रेयी, सगळ्यांना हँडल कर (वेळ आहे ना तुझ्याकडे Wink )

आमची रीलीजची बदकं ओळीत लागायला लागली. तुमची गटगची लागलीत की नाही अजून ? स्नो बूट घालुन जा बर्का Proud

सिंड्रेला, मग तुम्ही येणार का? माझे कागद तुमच्याकडे आहेत, त्यांचे काम झाले का?
तसेच पुस्तकांची अदलाबदल पण करायची का या वेळी? मी घेऊन येईन काही मराठी पुस्तके.

झक्की, कसली कागदपत्रे? काय पुस्तक वगैरे लिहिताय की काय?
आणि टाईप करायला सिंड्रेलाला देऊ नका. शुद्धलेखनाच्या चुका खूप करते ती.. Proud

फचिन वरच्या यादीत तुझ्यानावापुढे शाकाहारी/ मांसाहारी काय ते लिही अणि काय आणणार ते पण लिही.

०१)अनिलभाई --??
०२)फचिन- ???
०३)स्वाती_आंबोळे - छोले किंवा पांढर्‍या वाटाण्यांची उसळ
०४)परदेसाई (पापलेट आमटी), टेबल क्लॉथ्स
०५)झक्की - रंपा, पेपर प्रॉडक्ट्स : प्लेट्स, नॅप्किन्स, बाउल्स, चमचे, ग्लासेस
०६)मैत्रेयी - २ मोठे, २ लहान - व्हेज भाजी-पनीर बटर मसाला, आणि स्टोव्ह, पातेली वगैरे Happy
०७)वैद्यबुवा - २ मोठे, १ लहान, नॉन व्हेज करी (चिकन), पोळ्या, लाडु
०८)अमृता - २ मोठे, १ लहान (दही वडे), २ शाकाहारी, १ दोन्ही
०९)सायो- १ - शाकाहारी- मसालेभात आणि रायता/कोशिंबीर.
१०)चमन - राजमलाई
११)रूनी पॉटर - २ मोठे (१ शाकाहारी, १ मिश्रहारी) - ग्लु वाईन + गोड पदार्थ
१२) विकु-- ???
१३) स्वाती - २ मोठे (२ मिश्रहारी ) - चिकन अ‍ॅपटायजर
१४) अर्चना दिक्षीत (अ‍ॅना) -- ????
१५) सागर + १ --????

आतापर्यंत येणारे एकुण मोठे - २२, लहान ४
(शाकाहारी ४)

अरे ते पाणी, सोडा, ज्यूस कोण आणत आहे ? इथे लिस्ट अपडेट करा लवकर. आणि ज्यांच्यापुढे ?? अहे त्यांनीपण कन्फर्म करा .
पत्ता दिलाच आहे वर. आत्ताच बघून घ्या नीट येतोय ना गुगल /जीपिएस वर वगैरे.

गार्बेज बॅग्ज कोण आणतंय? तसंच काही उरल्यास झिपलॉक कोण आणेल? की प्रत्येकाने ५,७ झिपलॉक घेऊन याव्यात आपल्याबरोबर?

झिपलॉक आणेन मी. गार्बेज बॅग्स आहेत तिथे हॉलवर, क्लिनिंग सप्लाइज मधे.
बाकी आपापला पदार्थ गरम करायला काय लागणार त्याचा विचार करून ठेवा. ट्रे /ट्रे वार्मर्स ज्याला लागतील त्याने आणा. तिथल्या माय्क्रोवेव मधे करणार असलात तर योग्य भांडे आणा. ओव्हन हवा असेल तर माझ्या घरी जाता येईलच. पण आधी काय ते कळवले तर बरं.

माझ्या राईसकुकरमध्ये मसालेभात घालून आणेन. तो प्लग ईन केला की गरम होत राहील.
कढी आणणार असेन तर एअर टाईट डब्यातून आणेन. तू पातेलं आणणार आहेस तर त्यात गरम करता येईल. (पातेलंही आणू शकेन हवं असल्यास), रायता/कोशिंबीर आणली तर गरम करायचा प्रश्नच नाही.

Pages