न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

Submitted by अनिलभाई on 1 December, 2009 - 13:07

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.
२५. नवरा/सासु/सासरा/आई/वडील्/बहीण/भाऊ/नणंद/दिर परगावी जाणार आहे.
२६. त्या(च) दिवशी महत्वाचे रिलीज आहे/ऑफिसमधे काम आहे.

ए.वे.ए.ठी चा पत्ता.
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : २३ जानेवारी २०१० सकाळी ११.३०

वृत्तांत ह्या पानापासुन पुढे. http://www.maayboli.com/node/12363?page=20
विनय देसाई ह्याचा वृत्तांत. आता गाजले की बारा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चला सोय झाली . आता कोण कोण काय काय करणार आहे..

. म्हणजे गाणे म्हणून बोर करीन.
. जांभई येईपर्यंत गोष्ट सांगेन.
. प्रश्नपत्रिका देऊन सोडवायला लावीन.

इत्यादी आपापल्या नावापुढे टाका....

मैत्रेयी, मी पण आधी तोच विचार केला होता चिकनचे अपेटायजर आणायचा पण कबाब किंवा तंदुरी गार कसे लागतील याचा विचार करुन ते रद्द केले. (त्या हॉल मध्ये ओवन नसेल हे गृहीत धरुन). तर आता मी काय करावे (परत गोंधळ)

गरम करायला पर्याय म्हणजे
१)तिथे मायक्रोवेव्ह आहे.
२)टी कँडल चे ट्रे वार्मर वापरून काही वार्म करायचे तर करता येईल. कबाब होतात त्यात नीट गरम.(अ‍ॅल्युमिनियम ट्रे अन ते वार्मर्स आणावे लागतील )
३) माझं घर अगदी जवळ आहे, तिथे ओव्हन आहे Happy
बघा कुणाला काय सोयीचं वाटतंय त्याप्रमाणे ठरवा.

इतके यम्मी पदार्थ वाचुन कधी एकदा २३ तारीख येत्ये अस झालय..

हे देवा म्हाराजा.. गेल्या वक्ता सारख अचानक काही अडचन आनु मग रे बाबा... Wink

शेअर करु ग्लुवाईन आणि कढी
तुम्ही दोघीच सगळी ग्लूवाइन नि कढी पिणार? नि हेच का मुलांना शिकवणार?

बाकी खरे तर मुलांना हेच शिकवायला पाहिजे, कारण मोठेपणी ते जर सि ई ओ किंवा राजकारणी झाले तर सगळा पैसा आपआपसात वाटून घ्यायचा नि इतरांना काही नाही, असे करणे चांगले जमेल त्यांना.

०१)अनिलभाई
०२)फचिन
०३)स्वाती_आंबोळे - छोले किंवा पांढर्‍या वाटाण्यांची उसळ
०४)परदेसाई (पापलेट आमटी)
०५)झक्की - रंपा
०६)मैत्रेयी - २ मोठे, २ लहान - व्हेज भाजी-पनीर बटर मसाला.
०७)वैद्यबुवा - २ मोठे, १ लहान, नॉन व्हेज करी (चिकन), पोळ्या, लाडु
०८)अमृता - २ मोठे, १ लहान (दही वडे), २ शाकाहारी, १ दोन्ही
०९)सायो- १ - शाकाहारी- मसालेभात आणि रायता/कोशिंबीर.
१०)चमन - राजमलाई
११)रूनी पॉटर - २ मोठे (१ शाकाहारी, १ मिश्रहारी) - ग्लु वाईन + गोड पदार्थ
१२) विकु
१३) स्वाती + १
१४) अर्चना दिक्षीत (अ‍ॅना)
१५) सागर + १

आतापर्यंत येणारे एकुण मोठे - २२, लहान ४
(शाकाहारी ४)

राहिलेल्या गोष्टी : त्या कोण आणणार तेही लिहा :

 • ** अ‍ॅपटायजर्स - व्हेज /नॉन व्हेज . (स्वातीने काही ठरवलं का शेवटी ?)
 • ** पाणी, सोडा, ज्यूस ?
 • ** पेपर प्लेट्स, चमचे, ग्लास , बाउल्स
 • ** पेपर नॅपकिन्स, पार्टी टेबलक्लॉथ्स -(४-५)
 • ट्रॅश बॅग्ज तिथे हॉल मधे असतील. भरलेल्या ट्रॅश बॅग्ज कुठेतरी डिसपोज करणे हे एक काम असते मात्र नंतर . आठवतंय का सायो Happy

  त्या ए वे ए ठी च्या कचर्‍यानी ही इतिहास घडवला! प्लेन्सबोरोत जन्म घेऊन लिवींगस्टनात मोक्ष मिळाला त्याला.

  पेपर प्लेट्स, चमचे, ग्लास , बाउल्स , पेपर नॅपकिन्स,हे मी घेऊन येऊ शकेन. पार्टी टेबलक्लॉथ म्हणजे काय? आमच्याकडे होते तसे प्लास्टिकचे चालतील का? प्लेन असतात, डिझाईन नसते.

  बरं आणीन. पण माझ्या साठी चांदीचे ताट, वाटी, तांब्या कोण आणणार आहे? शुद्ध चांदीचे हवे, मिसळ नको. माझे सोन्याचे पळी भांडे मी घेऊनच येईन. बसायला चंदनाचा चौरंग, त्यावर मृगाजिन. वाढणार्‍यांनी नऊवारी शालू नेसून, नाकात नथ घालून वाढावे. इतरहि दागिने जसे बाजूबंद, वाक्या, हिर्‍याच्या कुड्या, तन्मणि, हिरे, मोति असलेल्या बांगड्या वगैरे असेलच! श्रीखंडात भरपूर वेल्दोडा, जायफळ व केशर असेलच, शक्यतो नागपूरच्या लोकांना करायला सांगा. विशिष्ठ शहरातले लोक त्यात कंजुषी करतात!

  दक्षिणेस सहस्र सुवर्णमुद्रा पुरेत. गाई नकोत. तसेच तांदूळ इ. पण नको. त्रयोदशगुणि विडा करायला विसरू नका. वस्त्रे दिली नाहीत तरी चालेल, त्या ऐवजी तुम्हाला वाटल्यास आणखी सहस्त्र सुवर्णमुद्रा द्याव्यात. भोजनानंतर नृत्यगायन झाल्यावर वामकुक्षीक्ची सोय होईलच अशी आशा आहे. सुवर्णाच्या पलंगावर रेशमी चादरी व लोकरी पांघरूण घ्यायची सवय आहे मला, नाहीतर नीट झोप लागत नाही!

  आता यातले काहीच जमले नाही तर येईन बापडा, नि भागवून घेईन तुम्ही काय कराल तसे. शेवटी मी भावाचा भुकेला! माझी टिंगल करू नका म्हणजे झाले.

  Light 1

  चांदिच्या ताटात चिकन नी पापलेट आमटी आणि सोन्याच्या भांड्यात ताका ऐवजी ग्लु वाईन शोभणार नाही हो झक्की नाहितर हे सगळ नक्कि केल असत आम्ही Proud

  पण माझ्या साठी चांदीचे ताट <<< साठी केव्हाच झाली आता सत्तरीला सोन्याचे मागा.... Happy

  टेबलक्लॉथ मी आणतोय.. आधीच म्हटले होते.. .:D

  (आणि जन्माने विशिष्ट शहरातला असलो तरी वॄत्तीने नाही )

  अरे देवा. आता मी का परदेसाइ या संभ्रमात राहून अखेर टेबलक्लॉथशिवाय जेवण होणार की काय?
  २२ जानेवारी सकाळी १० वाजेस्तवर कोण काय आणणार याची यादी पक्की करण्याचे काम कोण करायला तयार आहे? मी करणार होतो, पण मला अर्धे पदार्थ काय असतात हे नक्की माहित नाही. उगाच शेपू चिकन, पापलेट भात असले काहीतरि लिहीन, नि मग लोकांची तारांबळ होईल, ते पदार्थ करायला.

  मी चिकनचे अ‍ॅपटायजर आणते. गरम करायचे बघते कसे ते. कोळंबीचा पदार्थ रद्द. अमृता तु माझ्या घरी ये. आपण बरेच पदार्थ करु कोळंबीचे.

  ०१)अनिलभाई
  ०२)फचिन
  ०३)स्वाती_आंबोळे - छोले किंवा पांढर्‍या वाटाण्यांची उसळ
  ०४)परदेसाई (पापलेट आमटी)
  ०५)झक्की - रंपा
  ०६)मैत्रेयी - २ मोठे, २ लहान - व्हेज भाजी-पनीर बटर मसाला.
  ०७)वैद्यबुवा - २ मोठे, १ लहान, नॉन व्हेज करी (चिकन), पोळ्या, लाडु
  ०८)अमृता - २ मोठे, १ लहान (दही वडे), २ शाकाहारी, १ दोन्ही
  ०९)सायो- १ - शाकाहारी- मसालेभात आणि रायता/कोशिंबीर.
  १०)चमन - राजमलाई
  ११)रूनी पॉटर - २ मोठे (१ शाकाहारी, १ मिश्रहारी) - ग्लु वाईन + गोड पदार्थ
  १२) विकु
  १३) स्वाती - २ मोठे (२ मिश्रहारी ) - चिकन अ‍ॅपटायजर
  १४) अर्चना दिक्षीत (अ‍ॅना)
  १५) सागर + १

  आतापर्यंत येणारे एकुण मोठे - २२, लहान ४
  (शाकाहारी ४)

  आत्ता मी लंचटाईममध्ये बसून २०१ पोष्टी वाचून काढल्या... काय ती उ आणि पां चर्चा!

  झक्की तुमची चांदीच्या ताटाची पोष्ट लई भारी... Lol

  भोजनानंतर नृत्यगायन झाल्यावर वामकुक्षीक्ची सोय होईलच अशी आशा आहे.
  >>
  Lol झक्की तुम्ही हाताला गजरा बांधून, फुलांचा वास घेत, मस्त लोडाला टेकून नृत्य बघत बसला आहात असं मी इमॅजिन केलं..

  मी काय आणू ते सांगा रे..

  बर्फात घसरून पडण्याचे, चालण्याचे प्रात्यक्षीक देणारे ते देतांना ही गाणी बॅकग्राउंडला वाजवली जातील Happy

  Pages