अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिजीत ब्रो या कथा इथे लिहीन्याआधी my horror experience च्या group admin ची परवानगी घेतलीत का?
(या सर्व कथा फेसबुक वरील माय हॉरर एक्स्पेरिन्स या पेज वरील आहेत )

.

मी मुंबई एअरपोर्ट ला कामाला आहे .क्वालिटी डिपार्टमेंट मधे , ड्यूटी ऑफिसर आहे , मुंबई एअरपोर्ट ज्या ठिकाणी बांधले आहे तिथे आधी स्मशान कब्रिस्तान अणि मोठ जंगल होत, तिथे रेप,खून, अभ्रक टाकने असले प्रकार होत, ही जागा Haunted आहे ,
इंटरनेशनल एअरपोर्ट अणि डोमेस्टिक एअरपोर्ट च्या मधे ATC टावर आहे तिथे एक विहीर आहे जिचा वापर आज पाण्यासाठी सर्रास करत आहेत , या विहिरीत एका बाई ने आत्महत्या केलि होती , ती बर्याच लोकांना अमावस्या पोर्निमा अशा दिवशी विहिरीत उडी मारताना दिसते , माझ्या वडिलांनी मला मी जेंव्हा 2004 ला जॉब ला लागलो तेंव्हा ही गोष्ट सांगितली होती अणि त्यांना ति बाई कशी उडी मारताना दिसली त्यांनी त्यांची जीप त्या विहिरिला ठोकली त्याचे किस्से सांगितले पण मला वाटले की ते मला मी रात्रि एअरपोर्ट मधे वेहिकल चलाऊँ नए म्हणून घबरवतात आहेत म्हणून मी काही लक्ष दिले नाही, एकदा मी माझ्या फ्रेंड ला आणायला डोमेस्टिक ला निघालो 12km चा रस्ता आहे एअरपोर्ट च्या आतल्या बाजूने ,मी त्याला received करायला गेलो अणि हा दुसर्याच्या गाडीत बसून इंटरनेशनल ला आला मला कॉल करुण त्याने तस सांगितल मी परत एकटा return आलो , वाटेत ती विहीर लागली अणि रात्रीचे 1:30 वाजले होते माझया जीपची स्टेरिंग अपोआप लॉक झाली आणि विहिरी जवळ खेचू लागली मी जागीच ब्रेक दाबुन पळ काढत होतो तेवढ्यात "धप्प्प्प" फ़ुस्स्स असा पाण्याचा आवाज आला कुणीतरी पाण्यात पडल्याचा मी बाबांनी सांगितलेला त्यांचा किस्सा आठवू लागलो अणि तिथून पलुन गेलो थोडा वेळाने माझ्या 5,6 मित्रांना घेउन आलो अणि माझी गाड़ी घेउन गेलो मित्रांना झालेला किस्सा सांगितला पण त्यांना काहीच दिसल नाही म्हणून त्यांनी मला तुला भास् झाला अस सांगितल पण मलाच माहिती होत नक्की काय झाल.......

दोन महिन्यांनी माझ्या मित्रान्पैकी एका चा तिथेच विहिरिला जीप ठोकून एक्सीडेंट झाला तो एक महिना कामावर आला नाही जख्मी असल्या मुळे मग सगळ्यांचा विश्वास बसला या गोष्टीवर आता कोणीही इंटरनेशनल ते डोमेस्टिक एकटा जात नाही 2,3 जन बरोबर घेउनच जातात ,,, अजुनही बरेच अमानवीय किस्से आहेत एअरपोर्ट चे ते मी नक्की शेयर करीन,,,,,,,,,

अभिजित ब्रो>>
लै थापा मारतो ब्रो तु. मी तुझ्या दोन गोष्टी वाचल्या पुढच्या वाचाव्याशा नाही वाटल्या. एक तर जे लिहिलय ते पुर्ण खोटं आहे, कुठल्या तरी सुमार मासिकातल्या कथा वाटतायेत. असो.

लै थापा मारतो ब्रो तु. मी तुझ्या दोन गोष्टी वाचल्या पुढच्या वाचाव्याशा नाही वाटल्या. एक तर जे लिहिलय ते पुर्ण खोटं आहे, कुठल्या तरी सुमार मासिकातल्या कथा वाटतायेत. असो.>>>>>>>>.. हे खर आह्दे... ++११

अभिजित ब्रो
अशा एकापाठोपाठ धडाधड टाकू नका हो तुमच्या या अमानवीय कथा . वाचायला बोअर होतंय. जरा दमान
घ्या कि हो Happy

अभिजित ब्रो,

माझ्या माहितीप्रमाणे मायबोलीवर कुठलाही धागा बंद पडत नसतो. त्यामुळे तुमचे प्रयत्न अकारण आहेत. तसेच इतरांचे अनुभव सांगण्यासाठी हा धागा नाहीये, असं मला वाटतं.

तुमच्या काही गोष्टी पटतात, पण काही पटत नाहीत. कोकणाच्या नावाने काहीबाही ठोकून दिलेलं दिसतं. जंगलात जाऊन कोणी आंबे टोपलीत वेचतात का? चूभूदेघे. Happy तसेच राक्षस गणाच्या लोकांना भूत दिसत नाही. माझा राक्षस गणच आहे. मला आजवर एकही भूत दिसलेलं नाही. हां, चकवा जरूर लागलाय अनेकदा.

तेव्हा मायबोली प्रशासनास विचारून मगच इतरांचे अनुभव प्रकाशित करावे असं सुचवेन.

आ.न.,
-गा.पै.

अरे मित्रांनो अणि मैत्रिंनीनो आणि गा.पै माझी ही शेवटची मुंबई एअरपोर्ट ची गोष्ट सोडली तर बाकि सर्व गोष्टी या इथून तिथून तुमच्या Entertainment साठी लोड केल्या होत्या तरी इथुन पुढे मी मला आलेले अनुभवच तुम्हाला सेंड करीन

(पण हां एअरपोर्ट चा अनुभव खरा आहे ) हवे असेल तर whats app वर तुम्हाला ती विहीर ATC टावर चे फोटो नक्की पठविन कारण इथे ते फोटो कसे अपलोड करतात ते अजुन कळत नाही अणि जुन्या पोस्ट डिलीट कश्या करायच्या ते ही जरा सांगा

Thanks.Brgds
Abhijit

अरे मित्रांनो अणि मैत्रिंनीनो आणि गा.पै माझी ही शेवटची मुंबई एअरपोर्ट ची गोष्ट सोडली तर बाकि सर्व गोष्टी या इथून तिथून तुमच्या Entertainment साठी लोड केल्या होत्या तरी इथुन पुढे मी मला आलेले अनुभवच तुम्हाला सेंड करीन

(पण हां एअरपोर्ट चा अनुभव खरा आहे ) हवे असेल तर whats app वर तुम्हाला ती विहीर ATC टावर चे फोटो नक्की पठविन कारण इथे ते फोटो कसे अपलोड करतात ते अजुन कळत नाही अणि जुन्या पोस्ट डिलीट कश्या करायच्या ते ही जरा सांगा

Thanks.Brgds
Abhijit

इथुन पुढे मी मला आलेले अनुभवच तुम्हाला सेंड करीन >>>>>
अभिजित ब्रो , असे किती अनुभव तुम्हाला आले आहेत???? अश्या अनुभवांच्या बाबतीत तुम्ही खूपच सुदैवी दिसताय.
मला माझ्या आयुष्यात आजपर्यंत एकदाही अमानवी अनुभव आलेला नाही. या सगळ्या अमानवी शक्ती माझ्या वाटेला जात नाहीत याचे काय कारण असावे?
एकतर त्या मला घाबरत असाव्यात किंवा मला फारच क्षुद्र व्यक्ती समजून माझ्या वाटेला जात नसाव्यात. खूपच अळणी आहे माझे अनुभव-विश्व. Lol

<<मला माझ्या आयुष्यात आजपर्यंत एकदाही अमानवी अनुभव आलेला नाही. या सगळ्या अमानवी शक्ती माझ्या वाटेला जात नाहीत याचे काय कारण असावे?
एकतर त्या मला घाबरत असाव्यात किंवा मला फारच क्षुद्र व्यक्ती समजून माझ्या वाटेला जात नसाव्यात. खूपच अळणी आहे माझे अनुभव-विश्व.>> मीसुद्धा हेच म्हणेन.

:'(असत एखाद्याच नशिब जाऊ दे राजेश , देव करो अणि तुला भुत लवकर भेटो , Wink हीच कवटया महाकालाच्या उलट्या चरनी प्रार्थना

अभिजित ब्रो, हाहा, मी वाट पाहीन भुताची. Happy

तुमच्या एअरपोर्ट च्या अनुभवाबद्दल काही प्रश्न आहेत माझे. सहजच.
ATC टोवर ची विहीर रस्त्यापासून किती अंतर आत आहे? जेंव्हा तुमच्या गाडीचे स्तीआरिंग अडकले व गाडी विहिरीकडे खेचली जाऊ लागली तेंव्हा ती साधारण किती खेचली/ घसरली गेली???? त्यावेळी गाडी बंद पडली कि चालूच होती?

वेल : मीसुद्धा हेच म्हणेन.>>>>>>
घरा बाहेर पड़ा इथे तिथे कामा निमित्त फिरा घरी बसून अनुभव येत नसतात ,,,, Wink

अभिजित ब्रो,

मुंबई विमानतळाचं म्हणाल तर माझी सहमती आहे. इथे कारण दिलंय. मात्र बाकीच्या गोष्टी ऐकीव वाटतात. अशा गोष्टी इथे अभिप्रेत नसाव्यात. धागाकर्ते आशुचँप यांना विचारलेले बरे पडेल. Happy

आ.न.,
-गा.पै.

ATC ची विहीर 8मीटर दूर आहे रस्त्यापासून

माझी जीपचे स्टेरिंग विहिरी जवळ येताच विहिरीच्यादिशेने लॉक झाले अणि गाड़ी सुध्हा त्याच दिशेला चालू लागली मी ब्रेक लावून गाड़ी थाम्ब्वली आणि पळायला सज्ज झालो ,,,,

म्हणून तर मी सान्ग्तोय what's App ला मी फोटो अणि वि,क्लिप पाठवतो

अणि हे विषय खुप सेंसिटिव असतात त्या मुळे Govt. असे विषय पेपर न्यूज़ मधे Leak होउ देत नाही , म्हणून investigation च्या वेळी LACK OF CONCENTRATION WHILST DRIVING असा रिमार्क ड्राईवर ला देतात आणि त्याला फाइन मारून MATTER तिथेच बंद करतात,

सामी तू ही किस्से टाक ना ? किती दिवस फ़क्त इतरांचे किस्से वाचून कमेन्ट करत राहणार ? Wink Happy

Pages