अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वप्नवेडी, माझ्या नवर्‍याच ऑफीस त्याच बिल्डींगमध्ये आहे, काल विचारेन म्हटल त्याला, पण मी लवकर झोपुन गेल्यामुळे राहील विचारायच.

हे असं अचानक कोणीतरी समोर येणं, खिडकीत कोणीतरी दिसणं, बेडशेजारी कोणीतरी असल्याचे जाणवणे, कोणीतरी रोखून बघतंय हे कळणं फारच टरकवणारे आहे. ज्यांनी ज्यांनी हे सगळे अनुभव घेतलेत त्यांना दंडवत!>>>> अंजली यातला मला काहीच अनुभव नाहीये, पण एक दोनदा नवरा म्हणाला की मी झोपलेले असताना बेडच्या माझ्याबाजुकडे कोणीतरी स्त्री उभी राहुन मला रोखुन बघतेय अस दिसल. मी जेव्हा घरात वावरत असते तेव्हा बर्‍याचदा माझ्या मागे कोणीतरी उभ असल्याचही त्याने एकदा सांगितल होत मला.

अगोदर दिलेली लिंक याच धाग्यावर कुणीतरी.
मला नाही भितीदायक वाटली.>>> मला पण नाही वाटली भितीदायक.
उदयनने शेअर केली होती ही लिंक आबासाहेब

सही किस्से आहेत एकेकाचे.

ड्रीमगर्ल - तू जे लिहिलं आहेस ना ते मला अनेकांनी सांगितलय. तरीसुद्धा मला आलेले अनुभव वेगळे आहेत.

माझ्या घरामागे मुसलमानांची दफन्भूमी आहे. पण कधी मला काही भास किंवा काही त्रास झालेला नाही. ना माझ्या घरातल्या कोणाला. बिल्डींगमधे राहाणार्‍या कोणीही अजून तरी कोणतेही अमानवीय अनुभव आल्याचे सांगितले नाही. (मीसुद्धा कधी कोणाला विचारले नाही) पण आमच्या बिल्डींगचा वॉचमन सांगत होता की सगळ्या वॉचमनना वेगवेगळे भास होतात. असो. जर प्रार्थना आणि पूजा इत्यादी सगळ्यांनी ह्या गोष्टींना अटकाव होत असेल तर २००७ पासून माझ्या घरात पूजा इत्यादी गोष्टी झाल्या नाही आहेत.

होप त्या दफनभूमीतली भूतं हा धागा वाचत नसतील. नाही तर त्यांचा इगो दुखावला जाऊन मला काहीच अनुभव नाही आलेत हे वाचून मला अनुभव द्यायला येतील .. Wink

@ आबासाहेब....

लिंक भारी नाही हे पटत नाही ... actually अवार्ड विनिंग आहे आणि तुम्ही कशी पाहता त्यावर पण अवलंबून आहे...

एकट्याने / अंधारात / पूर्ण आवाजात ऐकल्यावर जास्त परिणामकारक वाटत असेल अस वाटत...
(मला तर भ्या वाटली बाबो )

@ वेल, <<<< होप त्या दफनभूमीतली भूतं हा धागा वाचत नसतील. नाही तर त्यांचा इगो दुखावला जाऊन मला काहीच अनुभव नाही आलेत हे वाचून मला अनुभव द्यायला येतील .. डोळा मारा >>>>> हाहाहा . मजेशीर. Happy

बाकी गण कसा ठरवायचा? म्हणजे देवगण, मनुष्यगण, ई.??

@ टीना, त्या लुनावाल्या गृहस्थांचा अनुभव मजेशीर (त्यांच्यासाठी नाही) होता. Happy जर ते अंतरजाल वापरत असतील तर एके दिवशी या धाग्यावर येवून त्यांचा अनुभव सांगतील अशी आशा करूया. तेंव्हा तुम्हाला त्यांचे भीती-निरसन करता येईल. Happy

बाकी गण कसा ठरवायचा? म्हणजे देवगण, मनुष्यगण, ई.?? >>> गण आपण ठरवायचा नसतो. आपल्या जन्माच्या वेळी, जन्मगावी आणि जन्मतारखेवरुन ते निश्चित होत. तुमची जन्मपत्रिका असेल तर त्यात बघा तुमचा गण

मानो या ना मानो

कुणीतरी अघोरी साधू बद्दल विचारल त्याचा एक किस्सा सांगतो

आमच्या मुंबई एअरपोर्ट बाहेर ४ नंबर गेट जवळ कार्गो वेयर हाउस आहे तिथे खुप कार्गो एजेंसी आहेत , माझ्या मित्राची एक कार्गो एजेंसी आहे , आम्ही दुपारी 2 वाजता 4मित्र त्याच्या एजेंसी मधे बसून गप्पा मारत होतो तेंव्हा एक अघोरी नागा साधू तिथे भिक्षा मागायला आला (जवलच बुध्ह स्मशानभूमी आहे) माझ्या मित्राला त्या साधुची मस्करी करायची लहर आली अणि जोरात हसून साधुला तो म्हटला " अरे बाबा पैसा नहीं है मेरे पास आगे जाओ" साधू ला काहीतरी खटाकल , त्या साधुने मित्राला काही पैश्याची नाणी देत हिंदी मधे म्हटला "ये ले बेटा पैसा और कभी झूट मत बोलना " आणि मित्राला मुठ झाकायला सांगीतली , त्याने झाकली अणि १० सेकंड नंतर उघडायला सांगितली . मुठ उघडल्यावर आम्ही मुठीत बघतोय तर मुठीत राख , पैसे गायब, त्याने परत मुठ बंद करायला सांगितली , अणि या वेळेला उघडली तर मुठीत पैसे , आम्ही थोड़े घाबरलो , मित्राने त्या अघोरी साधुची माफी मागितली अणि काहि रुपये देऊ केले पण त्याने पैसे न घेता एक डायलॉग मारला " पैसा तो राख जैसा है, आज तेरे पास है कल मेरे पास होगा इसका इस्तेमाल जरूरत मंद को करना " आणि निघून गेला ,

आता त्याने हात चलाखी केलि की त्याला काही काळिविद्या येत होती ते माहित नाही पण आम्ही थक्क झालो होतो,

वल्ले, अगं पूजा वै. सोपस्कार! मनाशी निगडीत असतात या गोष्टी! जसं अमानवीय अनुभवांवर माझ्या आईचा आणि नवर्‍याचा प्रचंड विश्वास आहे, मला मात्र हे भास वाटतात. मनाचे खेळ!
विश्वास असेल तर पूजा अर्चा करावी. त्यावर अमानवी अनुभव अवलंबून नसतात तर मनाला आधार वाटतो या सोपस्कारांनी. बाकी पूजा वै. करणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.

मयी हॉरीबल अनुभव. आजींसाठी वाईट वाटलं. हॉस्टेल्स आणि हॉस्पीटल्समध्ये असे अमानवी अनुभव बर्‍याचजणांना येतातच.

लहानपणी मी मामाच्या गावी जात असे सुट्टीत. तिथे सगळी भावंडे मिळून खूप धम्माल गंगा मस्ती करत असू. मामी, मावशी कधी कधी वैतागून म्हणत की यांना बाथरूममध्ये डांबून ठेवले पाहीजे.
एकदा आज्जी ओरडली होती त्यांना की मुलांना बाथरूममध्ये वै. डांबायचे नाही. त्यानंतर तिने कुठेतरी घडलेली गोष्ट सांगितलेली. एक मुलगा म्हणे खूप मस्ती करत असे. खूप चुणचुणीत होता पण मस्ती खूप. तर त्याच्या मस्तीला कंटाळून एकदा त्याच्या आईने त्याला बाथरूममध्ये बंद करून ठेवले. मुलगा रडला, खूप विनवण्या केल्या पण आईने दरवाजा उघडला नाही वर दिवाही बंद करून टाकला. नंतर बराच वेळ त्याचा आवाज आला नाही म्हणून दरवाजा उघडला तर मुलगा कोपर्‍यात एका ठिकाणी विस्फारलेल्या नजरेने बघत राहीलेला. सगळे घाबरले. त्याच्या आजीला शंका आली. संध्याकाळची करकरीत कातरवेळ! मुलाला नक्की बाधा झाली असणार. आंजारून गोंजारून खूप प्रयत्न केल्यावर मुलाने सांगितले बाथरूममध्ये हिरवी साडीवाली मोठं कुंकूवाली बाई होती. तिचा चेहरा जळालेला होता. ती मला जवळ बोलावत होती. मला ती तिच्यासोबत नेणारेय म्हणाली. त्यानंतर मुलगा बरेच दिवस आजारी होता. बर्‍याच प्रयत्नांनी तो बरा झाला पण या घटनेचा त्याच्या मनावर इतका खोलवर परीणाम झाला की एक हसता खेळता मुलगा बरेच दिवस कोपर्‍यात बसून एकटक बघत राही.

पुढे चौकशी केल्यावर समजले, पूर्वी त्या घरात एक मूलबाळ नसलेलं जोडपं राही. त्यातील बाई धार्मिक वृतीची होती. तिला मुलाबाळांची खूप आवड. तिचा नवरा खूप संशयी होता. त्याच्या संशयाला कंटाळून तिने बाथरूममध्ये पेटवून घेतले होते.

त्यानंतर कित्येक संध्याकाळी आम्ही हात पाय धुवायलाही बाथरूममध्ये जायला घाबरायचो.

माझ्या आजोबांची वाडी , नागू भागेली बघत असे. मुंबईचा माणूस कशाला गावी येईल या विचाराने /करणी म्हणा पण कोणीना़कोणीतरी दर अमावस्या-पौर्णिमेला वाडीत कोंबडे मारून तसेच गुलाल टाकलेला भात इ.पान ठेवायचे. गुलाल बाजूला करून बाकीचे नागू , खात असे.

http://www.maayboli.com/node/12295?page=54
16 April, 2014 - 13:53

(अचानक गोवा ट्रीप मारल्यामुळे माझी प्रतिक्रिया अर्धवट ठेवावी लागली आहे असो ...)

इथून पुढे , तर नक्की काय पाहिल विहीरीत आम्ही .....

चक्क एक प्रेत तरंगताना ,चेहरा काळा पडलेला ,हात पसरलेले चक्क चिखलाने माखलेले त्या वेळी वरती येण्यासाठी किती आटापिटा करावा लागला हे आमचे आम्हालाच माहित. कसेबसे तिथून पुढे गेलो आमच्या मनात अजूनही ते भूत होते कि खरेखुरे प्रेत हाच गोंधळ चालला होता. सहसा त्या विहीरीवर कोणी फिरकत नसे तिथे आमच्यासारखी उनाड पोरे फक्त दुपारचे पोहायला जायचो चक्क शाळा बुडवून पण त्या रात्रीनंतर तिथे मी सुद्धा कधीच फिरकलो नाही.मात्र रात्रभर विचारांचा काहुर झाल्यानंतर आम्हा दोघांना सकाळी पुन्हा त्या विहीरीवर जाउन खात्री कराविशी वाटली. सकाळी साधारण ६ वा आम्ही दोघे वाघासारखे त्या प्रेताला शिव्या घालत त्या विहीरीवर जाउन पोहचलो.

जरा निरखून पाहिल्यावर लक्षात आले कि तिथे एक काळ्या रंगाचा कुत्रा मरुन पडला आहे. ते पाहून आम्ही शॉक झालो कारण रात्रीचा नजारा काही भलताच होता.तेव्हा दिसलेले हात पाय कुठे गायब झाले.कि तो फक्त आमच्या मनाचा समज होता मग असे असेल तर सर्वांना सारखा समज कसा होउ शकेल असे अनेक प्रश्न अजून अनुत्तरित आहेत.

माझ्या घरी झोपण्याच्या खोलीत २ दा अनुभव आला. फार काही त्याकडे लक्श दिल नाही पण ... Happy
खोलीत एक टेबल लॅम्प आहे. त्याला डिमर स्विच आहे. मी, बायको आणि माझा मुलगा (तेव्हा १.३ वर्षाचा होता) गादीवर बसुन खेळत होतो. का कोण जाणे, पण माझ लक्ष अचानक दिव्याकडे गेल. आणि दिवा माझ्या डोळ्यादेखत २ दा डिम झाला. व्होल्टेज मुळे किंवा loose connection मुळे नक्किच अस झाल नाही. मग मी स्वत।च उठुन दिवा सगळ्यात कमी केला.
दुसर्यांही साधारण अशीच झोपायची वेळ. आम्ही खेळत बसलेलो. बाथरूम आणि खोलीचा दरवाजा थोडासा उघडा होता. बाहेरच्या खोलीतील दरवाजे बंद. आणि अचानक जोरात हवा येउन पोकळी व्हावी तसा आधि खोलिचा आणि मग बाथरूमचा दरवाजा बंद झाला. बर हवेची झुळुक येउन झाल म्हणाव तर तशी हवा आलेली जाणवली नाही आणि मुख्य म्हणजे हे दोन्ही दरवाजे समोरा समोरही नाहीत. खोलीच्या दरवज्याच्या बाजुला मोठ लाकडी कपाट आडव आहे आणि त्या पलिकडे बाथरूमच दार आहे. त्या क्षणी बायकोही म्हणाली कि काहीतरी गेल ना.... मी हसून टाळल काही बोलायच.

चालू निवडणुकी मुळे एक आमच्या गावचा किस्सा आठवला ,

आमच् गाव पुण्यातील जुन्नर तालुक्यातील आहे , आमच्या गावाशेजरिल दुसर्या गावात सरपंच पदा च्या निवडणुका चालू होत्या त्यात गावातील एका बड्या आसामीच्या विरुध्ह गावातील एक मध्यम वर्गीय कार्यकर्ती स्त्री उभी होती , तिने गावात केलेल्या चांगल्या कामामुळे ती निवडून आली अणि सरपंच झाली पण दोन दिवसानी तिची बॉडी गावापासून लांब असलेल्या विहिरीत तरंगताना सापडली े, त्या नंतर ५,६ दिवसांनी काहि लोकांना तीच भूत विहिरी पासून जवळ असलेल्या रोड वर रात्रीचे दिसू लागले ते लोकांकडून रात्रि लिफ्ट मागू लागल आम्हाला वाटल की उगाच कोणीतरी अफ़वा उठाव्तोय

एका रात्रि आम्ही आमच्या गावच्या वेशित बसून सर्व गावचे मित्र गप्पा मारत होतो थोडा वेळाने तिथे एक माणूस बाइक वरुण आला अणि वेशित आमच्या पुढे थांबला आणि त्याला काय झाल ते माहित नाही पण लगेच त्याने यु टर्न मारला आणि आला त्याच माळ रानाच्या रस्त्याने परत गेला , १५ मिनट नंतर तो परत वेशित आला आणि आमच्या पुढे थाम्बुन आम्हाला सांगू लागला "मी माळा वरुण एका बाई ला लिफ्ट दिली आणि इथे गावा पर्यन्त पोहोचायच्या आधी ती बाई कुठे तरी गायब झाली मला वाटल ती वाटेत पडली म्हणून मगाशी मी परत तुमच्या गावच्या वेशिपर्यंत आलो आणि return गेलो पण ती बाई काही सापडली नाही जरा तुम्ही चलता का माझ्या बरोबर तिला शोधायला "
आमच्यातल्या एकाने त्या बाई च वर्णन त्या माणसाला विचारल, तर त्याने सांगीतल "तिने पिवळी साड़ी घातली होती डोक्याला स्कार्फ बांधला होता आणि काळा चश्मा घातला होता" हे त्याने सांगितलेले वर्णन त्या मृत सरपंच बाई चे होते . जेंव्हा त्या माणसाला हे आमच्याकडून कलाले त्याची भीतीने गालन उडाली तो तिथेच बेशुध्ह पडला , मग त्याच्या मोबाइल वरुण त्याच्या घरच्यांना कॉल करुण बोलावल . ते त्याला घेउन गेले

आता ती बाई खरच भूत होती का ते माहीत नाही पण त्याने वर्णन सांगितले त्याच्या वरुण तर ती मृत सरपंच बाईच वाटत होती .े

bhalya ratri tine kala chashma ka bare ghatala asava?
hi aajakalchi bhut na... kahi fashion sense nahi bai yana

Wink Happy Happy

maybe आपण ज्या ड्रेस कोड मधे मरतो तोच आपला भूतयोनी मधला फाइनल ड्रेस कोड असतो , ती काळा काचेचा चश्मा घालून मेली असेल
Lols Happy

maratana chashma futala kasa nahi? ki to kala chashma futalela hota?

त्या सरपंचबाई बहुतेक थलैवाच्या फॅन असाव्यात; कायम काळा चष्मा डोळ्यावर... Happy

१००% खरी गोष्ट आहे .....

आमच्या छत्रपति शिवाजी मुंबई इंटरनेशनल एअरपोर्ट च्या आत विमाना च्या Take-off & Landing साठी दोन रनवे आहेत त्यांची नाव अशी आहेत, Runway14/32 ●Runway09/27

[ en.m.wikipedia.org/wiki/Chhatrapati_Shivaji_International_Airport ]

त्यातला रनवे 09/27 खुप लांब रनवे आहे . हा रनवे जिथून सुरु होतो त्याच्या बाजुलाच एअरपोर्ट मधील गाड्या जाण्यासाठी रहदरिचा रस्ता केला आहे त्या रस्त्याच्या बाजुलाच एक " कबर" आहे , ति एअरपोर्ट च्या आतली कबर जर काढली तर तो रस्ता सरळ बनेल , पण तो रस्ता कबरिच्या बाजूने वलसा घालून बनवला आहे,
एअरपोर्ट जेंव्हा सुरु झाले तेंव्हा त्याचे अधिकार हे AAI-एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ़ इंडिया कड़े होते , त्या नंतर ते MIAL- मुंबई इंटरनेशनल एअरपोर्ट लिमिटेड कड़े गेले , आणि आता 2009 पासून ते सर्व अधिकार GVK या साउथ अफ्रीकन कंपनी ने घेतले आहेत (हे सांगण्याचा उद्देश पुढे कलेलच )

AAI ने ती कबर हटावन्याचा प्रयत्न केला आणि दुसर्या दिवशी त्या कामगारा मधील तिघांना Heart Attack ने मृत्यु आला , AAI वाले जे समजायचे होते ते समजले त्यांनी त्या कबरिचा नाद सोडून दिला ,

मग MIAL वाले आले त्यांनी कबर तोडायचे काम L&T च्या कामगारांना कॉन्ट्रैक्ट वर ठेउन करायचे ठरवले त्यांनी काम सुरु करताच त्याच रात्रि 4 कामगार Heart Attack ने मेले आणि एकाला लखवा झाला , मग MIAL ने देखिल त्या कबरिचा नाद सोडला

मग 2009 ला GVK कंपनी आली त्यांना ह्या गोष्टी जुन्या MIAL & AAI च्या स्टाफ कडून कळाल्या त्यांनी कबरिचा नाद सोडला आणि त्या कबरिला छान शेड बांधून दिली आणि रस्ता त्या कबरीच्या बाजूने केला , आता कुणालाच त्या कबरिचा त्रास नाही उलाट तिथून जाताना येताना प्रत्येक जन त्या कबरिला नमस्कार करून जातो ,

आता ही कबर संताची की कुण्या माणसाची ते माहीत नाही मात्र तिच्या नादी कोणीच लागत नाही ,!

Happy

अभिजीत ब्रो तुम्हाला असे नाही वाटत का की तुम्ही एअरपोर्ट वगैरे विषयी जरा जास्तच माहिती देताय म्हणून?

अग माझा अर्धा दिवस तिथेच जातो आणि तिथे असे अमानवीय प्रकार घडतात , पण लोक आपल "हसू" होन्यपसुन टालन्या साठी जास्त शेयर करत नाही पण तुम्ही लोक मला आपल्या सारखेच वाटतात म्हानुन मी तुमच्या बरोबर शेयर करतो

किरण कुमार : जरा निरखून पाहिल्यावर लक्षात आले कि तिथे एक
काळ्या रंगाचा कुत्रा मरुन पडला आहे. ते पाहून आम्ही शॉक
झालो कारण रात्रीचा नजारा काही भलताच होता.तेव्हा दिसलेले
हात पाय कुठे गायब झाल>>>>>>>>>>>

मूवी मधे दाखवतात तसा तो इच्छाधारी नागा सारखा इच्छाधारी कुत्रा तर नव्हता ना ..... Happy Wink

इच्छाधारी कुत्रा कै च्या कै

मग इच्छाधारी नागासाठी पुंगी वाजवतात
तसे काय इच्छाधारी कुत्रा साठी भोंगा वाजवायचा का मग तो नाचेल. Happy

टीप : ही प्रतिक्रीया अमानविय नाही .

मामी | 25 April, 2014 - 06:04
मुंबई विमानतळावरून हल्ली जरा जास्तच विमानं उडायला लागलेली दिसताहेत. >>>> Rofl

Pages