आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"
अमानवीय...?
Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
http://www.psychologytoday.co
http://www.psychologytoday.com/blog/quirks-memory/201210/why-deja-vu-can...
http://en.wikipedia.org/wiki/D%C3%A9j%C3%A0_vu
वरील दुव्यांवर देजावू व पुर्वसुचने बद्दल माहिती आहे. पुर्वसुचने बद्दल नेमके स्पष्टीकरण मला मिळणे नाही, परंतु मला असे वाटते कि हापण मेंदूचा म्हणजेच मनाचा एक खेळ आहे. मानस-शास्त्राच्या खोल अभ्यासातून याचे स्पष्टीकरण मिळू शकेल. यात अमानवी काहीही नाही असे माझे मत आहे.
रनथम्बोर यांचा अनुभव सर्वांना
रनथम्बोर यांचा अनुभव सर्वांना येतो. पण ती एक सर्वसामान्य गोष्ट आहे. आपण ज्या गोष्टींविषयी "सजग" असतो, आपला मेंदू त्या गोष्टी कडे आपले लक्ष वेधतो. इतर वेळी पण ती गोष्ट आपल्याला दिसते पण लक्षात येत नाही. मेंदूची उत्क्रांत झालेली आणखी एक विलक्षण ताकद कि जिणे मानवाला या निसर्गात टिकून राहायला मदत केली.
देजावू काय आहे?
देजावू काय आहे?
रिया. >>>>> अधिक माहिती
रिया. >>>>>
अधिक माहिती तुम्हाला http://en.wikipedia.org/wiki/D%C3%A9j%C3%A0_vu विकी काका देउ शकतील
ओह थॅंक्स मला इतके दिवस हे
ओह थॅंक्स

मला इतके दिवस हे संज्ञा माहीतच नव्हती
देजा वु बद्दल राजेश के
देजा वु बद्दल राजेश के म्हणाले तसेच मलाही वाटते. आपण अगदी जन्मापासून अनेक गोष्टी, घटना ऐकत असतो. लोकांचे अनुभव कानावर पडत असतात. दूरदर्शन मधून कुणाच्यातरी फोटो अल्बम मधून आपण बरंच काही पाहिलेले असते. आपण जे जे काही पहिले, ऐकले असते ते सगळं आपला मेंदू आपल्याही नकळत साठवत जातो. हे साठवतांना सगळं एकत्र साठवलं गेलेलं असतं कारण साठवतेवेळी आपण स्वतः कुठलीही वर्गवारी मेंदूला करून दिलेली नसते.
मग कधीतरी काहीतरी घटना घडतात तेव्हा आपला मेंदू स्वतःच आत्ता घडणाऱ्या घटना आणि पूर्वी कुठेतरी ऐकलेल्या, पाहिलेल्या घटना आणि साठवलेल्या घटना यांची सांगड घालतो आणि अशीच घटना आधी घड्लीये किंवा आता पुढे काय घडणार याचा सिक्वेन्स काय असायला पाहिजे ह्याचे संकेत आपल्याला पाठवत राहतो.
म्हणजे बघा एखादा व्यक्ती यापूर्वी कधीही 'उटी' ला गेला नसतो परंतु तो जेव्हा पहिल्यांदाच तिथे पाय ठेवतो त्याला आपण इथे येउन गेल्याचा किंवा तिथे दिसत असलेला निसर्ग किंवा इतर गोष्टी पूर्वी पहिल्या असल्याचा भास होतो … हे कसे ?? तर उटी ला प्रत्यक्ष आपण गेलेलो नसलो तरी शेजारी पाजारी, मित्रवर्ग किंवा नातेवाईक कधीतरी जाऊन आलेले असतात आपण त्यांचे फोटो पाहिलेले असतात त्यांनी केलेले रसभरीत वर्णन रस घेऊन ऐकलेले असते आणि आपल्या कल्पना शक्तीने तिथे रमलेलो पण असतो. टीव्ही मधून एखाद्या सिनेमातून आपण ते पाहिलेले असते. आपले डोळे आणि कान हे ऐकून आणि बघून विसरून जातात मात्र मेंदूने हे सर्व तुटक फुटक अवस्थेत साठवलेले असते. आणि म्हणून आत्ता आपण जे काही बघतोय किंवा ऐकतोय हे पूर्वी पाहिलंय किंवा अनुभवलंय अस वाटत राहतं कुठे, कसे, कुणासोबत याचे स्पष्ट संदर्भ सापडतात तेव्हा इश्यू होत नाही सहज साधारण गोष्ट म्हणून आपण विसरून जातो पण ज्याचे संदर्भ सापडत नाहीत ते चमत्कारिक वाटायला लागतात आणि मग आपण त्याचा संदर्भ पुनर्जन्म किंवा देजा वु सारख्या संवेदनांशी जोडतो……
उदाहरणच द्यायचे झाले तर बघा 'सडक अपघात' किंवा 'अचानक समोर साप किंवा जंगली प्राणी येणे' किंवा मग आणखी एखादी घटना आपल्या सोबत प्रत्यक्ष कधीही घडली नसली तरी आपण स्वतः त्याचा कधीही अनुभव घेतला नसला तरी पहिल्यांदा ती आपल्यासोबत घडेल तेव्हा अंगाला घाम फुटतो, डोळे विस्फारतात, घश्याला कोरड पडते, स्पंदन वाढतात, आवाज बंद होतो …. आपल्यासोबत घडली नाहीये आणि आपल्याला अनुभव च नाहीये तर अस सगळं होण्याचं कारण च नाही. पण इतरांच्या तोंडून ऐकलेले अनुभव, टीव्ही वगैरे वर पाहिलेल्या या घटना साधारण नाही तर अति भयंकर आहेत हे संदर्भ मेंदूने साठवलेले असतात. आणि प्रत्यक्ष आपल्यासोबत घडतं तेव्हा पूर्वीच्या ऐकलेल्या अन पाहिलेल्या गोष्टींचे सुत एकमेकांशी (आगाऊ पणे) जुळवून मेंदू आपल्याला संकेत पाठवतो (अती शहाणपणा करत
) आणि जे घडतंय ते अतिशय भयंकर आहे आणि आता पूर्वी काही लोकांची झाली तशीच गत आपलीही होणार आहे असे समजून आपल्याला घाम फुटतो.
हे सुद्धा एक प्रकारचे देजा वु च असते पण त्या त्या प्रसंगी आपल्याला ते लगेच रिअलाइज होत नाही. वर सांगितल्याप्रमाणे जिथे जिथे संदर्भ लगेच जुळत नाहीत तिथे आपल्याला चमत्कारिक काहीतरी जाणीव होते आणि तिथेच आपण रिअलाइज करतो अन्यथा नेहेमीच्या घटना म्हणून लेट गो करत राहतो.
@ मयी , तुम्ही खुप प्रभावी
@ मयी ,
तुम्ही खुप प्रभावी शब्दात माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद.
>>>>आणि प्रत्यक्ष आपल्यासोबत घडतं तेव्हा पूर्वीच्या ऐकलेल्या अन पाहिलेल्या गोष्टींचे सुत एकमेकांशी (आगाऊ पणे) जुळवून मेंदू आपल्याला संकेत पाठवतो (अती शहाणपणा करत फिदीफिदी )>>>>>
पण मेंदूच्या या आगावू पणा मुळेच मानवाला या निसर्गात टिकून राहायला मदत झाली आहे व होते आहे हे विसरता कामा नये .
मी अजून एका गोष्टीबद्दल फार पूर्वी ऐकल्याचे किंवा वाचल्याचे अंधुक स्मरते . काही छोटी मुले त्यांच्या गावापासून खूप दूर असलेल्या गावातील एखाद्या व्यक्तीबद्दल खडा-न-खडा माहिती सांगतात. ती मुले त्या गावी गेली नाहीत किंवा त्या व्यक्तीला पण ओळखत नाहीत असा दावा केला जातो. काही लोक या गोष्टीला पूर्व जन्म असे मानतात. माझा या गोष्टींवर विश्वास नाही. पण हे गौडबंगाल आहे तरी काय ? कोणाला अधिक माहिती आहे काय ??
@ मयी , तुम्ही खुप प्रभावी
@ मयी ,
तुम्ही खुप प्रभावी शब्दात माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद. + १०००००
इथे प्लिज अमानविय गोष्टी लिहा
इथे प्लिज अमानविय गोष्टी लिहा ना
देजावू साठी दुसरा बीबी काढा हवं तर
@ रिया , असं वाटतंय कि
@ रिया , असं वाटतंय कि तुम्हाला असे अनुभव वाचायला आवडतात .
हरकत नाही . मलाही आवडतात . 

जर तुम्हाला पुस्तक-वाचनाची आवड असेल तर तुम्हाला कदाचित नारायण धारप व रत्नाकर मतकरी यांची अश्या गूढ विषयांवरची पुस्तके वाचायला आवडतील .
रत्नाकर मतकरी यांची अश्या गूढ
रत्नाकर मतकरी यांची अश्या गूढ विषयांवरची पुस्तके वाचायला आवडतील .........खेकडा,रंगांधळा,ऐक टोल पडत आहेत,आतातरी इतकीच आठवताहेत.
सुहास शिरवळकरांची पुस्तकं
सुहास शिरवळकरांची पुस्तकं सुद्धा आहेत. मी असल्या पुस्तकांच्या वाट्याला जात नाही. घरात एकटी असताना रामसेंच्या पिक्चरमधले बॅकग्राउन्ड साऊन्ड्स आणि ह्या गोष्टी नेमक्या आठवतात
सहि गोश्ति आहेत .....मला
सहि गोश्ति आहेत .....मला सुध्हा माझे अप्लोद्ड्प्लोड कराय्ला आव्ड्तिल
मस्त धागा आहे हा बान्द
मस्त धागा आहे हा बान्द नाका कारु
Mee pc varun neet upload karu
Mee pc varun neet upload karu shakat nahi , mee majhya mob varun majhe khatarnaak anubhav upload Karin......
हा अगदी खराखूरा अनुभव आणि
हा अगदी खराखूरा अनुभव आणि भयानकही..............
माझे बालपण गावाकडे गेले,तिथे संध्या ७ नंतर सामसूम अगदी कुठेही (आमच्या पुर्ण गावामध्ये एकच टीव्ही होता आणि तो ही ग्रामपंचायतीचा ज्यावर फक्त सध्या ७ च्या बातम्या बघण्यासाठी सारा गाव गोळा व्हायचा.
असे असले तरी मी आणि माझे काही शूर मित्र (भूताखेताला न घाबरणारे) रात्री रानावनात भटकायचो, कधी काकड्या तर कधी कलिंगडे चोरुन खायचो ती एक वेगळीच मजा होती. एक दिवस आम्ही महाल्याच्या (महाले नावाच्या माणसाच्या शेतातल्या) काकड्या तोडून त्या पिशवीत भरल्या ते ठिकाण आमच्या घरापासून साधारण ३ ते ४ किमी असेल .आम्ही लहान असल्याने तेही खूप अंतर वाटायचे. मग काकड्या घेवून आम्ही भागीरथी नावाच्या ठिकाणी विहीरीवर आलो. तिथे विहीरीत पाय सोडून काठावर काकड्या खात बसलो. अर्धी काकडी खायची आणि कडू आहे म्हणून राहिलेली विहीरीत टाकून द्यायची हा उपक्रम चालला होता.
कोणाकडेही घड्याळ नव्हते त्यामुळे किती वाजले ते कळत नव्हते मात्र पौणिमेचा लख्ख चंद्र्प्रकाश दिसत होता.
अचानक विहीरीच्या पाण्यामधून बुडबुडयाचा आवाज येउ लागला पण अगदी सावकाश . प्रथम आम्हाला कदाचित साप किंवा बेडूक असावा असे वाटले पण...............................................................................
हळूहळू विहीरीच्या पाण्यावर एक मानवी आकृती तरंगताना दिसू लागली............................................
विहीरीत फारसा प्रकाश नसल्याने केवळ काळ्या रंगाची सवली तरंगत आहे असा भास होत होता . आम्ही चौघे काठावर , काकडी खाली फेकायची डेरिंग होईना कि विहीरीत सोडलेले पाय वर काढायला धजवेना माझा मित्र विनोद आणि संतोष दोघेही किंचाळले आणि घाबरुन ताडकन उठले. माझीही अवस्था फारशी वेगळी नव्हती पण यापुर्वी असा अनुभव इथे कधीही आला नव्हता म्हणून ती आकृती नेमके काय आहे हे पाहण्याचे दुर्बुधी झाली.
माझा तिसरा मित्र अशोक आणि मी आमच्याजवळ असलेली माचीसची काडी पेटवून खाली जाउ लागलो. गावच्या विहीरींना खाली उतरण्यासाठी पाय-या असल्या तरी त्यावर जेमतेम एक माणूस एका पायावर उभा राहू शकेल एवढीच जागा असते तर तो आणि मी एक एक पायरी खाली उतरु लागलो मी एक पायरी उतरलो कि तो माझ्या त्या पायरीवर येऊन थांबायचा .
हळूहळू विहीरीच्या मध्यावर पोहचलो. ती आकृती आहे तशीच होती आता तीचे हात आणि पाय स्पष्ट दिसू लागले .मग समोर जे चित्र दिसले त्यानंतर माझी बोबडी वळायला लागली , धाड धाड धाड धाड छाती वाजू लागली . मला काय करावे ते सुचेना मला वरती येण्यासाठीही पाय जड झाल्यासारखे वाटले कसेबसे अशोकचा हात पकडून वर आलो .
तर नेमके काय पाहिले विहीरीत.
सविस्तर वर्णन पुढील प्रतिसादात ..........................
किरण फालतुगिरी करु नकोस..
किरण फालतुगिरी करु नकोस.. :रागः
ऑ! अग लिहू दे की त्याला.
ऑ! अग लिहू दे की त्याला. नक्की काय अमानवीय पाहिले ते तरी कळेल.:फिदी:
नमस्कार
नमस्कार
॓
॓
॓
॓
॓
॓
॓
॓
.
.
.
.
तुम्ही इतरांच्या गोष्टी इथे
तुम्ही इतरांच्या गोष्टी इथे पोस्ट करताय का?
इथे केवळ ऐकिव गोष्टी अपेक्षित नाहीत.
वरील गोष्टीमधे सदु ची वाचा
वरील गोष्टीमधे सदु ची वाचा गेल्यावर त्याआधी त्याच्यासोबत घडलेल्या बारीक-सारीक गोष्टी कोणी सांगितल्या? का तेच अमानवीय आहे किश्श्यामधे?
हे दुसर्यांचे किस्से फक्त
हे दुसर्यांचे किस्से फक्त वातावरण भुतिया बनवून हां धागा वर काढायचा होता म्हणून पण आता मी माझे खरे अनुभव पोस्ट करणार ,,,,;-)
...
...
.....
.....
Pages