आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"
अमानवीय...?
Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अगो, >> मग ज्या आत्म्याकडे ही
अगो,
>> मग ज्या आत्म्याकडे ही साधनं नाहीत त्याला दिसू कसे शकेल किंवा ऐकू कसे येऊ शकेल ?
पाहण्याची, ऐकण्याची इत्यादि इंद्रिये उत्तेजना (stimulus) मिळाल्याने कार्यरत होतात. जर उत्तेजना मिळाली नाही तर ते इंद्रिय काम करणार नाही. आता गंमत अशी आहे की, उत्तेजनेमुळे परिस्थितीतील बदल होतात. म्हणून इंद्रिये केवळ बदल टिपू शकतात. स्थिर वस्तू इंद्रियांना अगम्यच असणार आहे. ही स्थिर वस्तू म्हणजे आत्मा.
एक उदाहरण पाहूया. कारल्याची भाजी कडू असते हे चव घेतल्यावरच कळते. त्याअगोदर माहीत असणं असंभव. कारले आणि कडूपणा यांची स्मृती मेंदूत घट्ट बांधली गेली आहे, म्हणून कारल्याची भाजी ताटात दिसली की दूर ढकलावीशी वाटते. जर एखादे गोड कारले कोणी निर्माण केले आणि त्याची भाजी तुम्हाला खाऊ घातली तर तर मेंदूत पहिल्या स्मृतीसोबत दुसरी स्मृती नोंदवली जाईल. मग कारल्याची भाजी पाहताच गोड का कडू असा बुद्धीने विचार करून निर्णय घेतला जाईल. तुमचा मेंदू प्रस्तुत अनुभवाचा पूर्वकयास बांधायला शिकेल.
अनुभव घेऊन त्याचा अन्वयार्थ लावणे हे बुद्धीचे काम आहे. नेमके हेच कार्य अध्यात्मिक क्षेत्रात केले जाते. त्याला साधना म्हणतात. आत्म्याविषयी इतरांनी घेतलेले अनुभव वाचून, ऐकून, पाहून, स्वत:ला असे अनुभव यावेत यासाठी प्रयत्न करणे म्हणजे साधना.
आ.न.,
-गा.पै.
माझ्या पत्नीच्या काकाने
माझ्या पत्नीच्या काकाने सांगितलेला किस्सा:
काकांचे एक मित्र असेच एकटे रात्रिचे त्यांच्या कारने येत होते. सुनसान रस्त्यावर त्याना एक स्त्री उभि दिसली. त्यांची गाडी दिसताच तिने हात दाखवून गाडी थांबवली आणि पुढच्या गावापर्यन्त सोडण्याची विनंती केली.मित्र्राल वाटले काहि अडचण असेल म्हणून त्याने बसु दिले. जसे गाव जवळ आले तसे ती आपले कपडे फाडू लागली आणि काकांच्या मित्राल म्हणाली "जवळ असतील तेवढे पैसे काढा. नाहीतर ओरडून लोक जमा करील." काकांच्य मित्राने जवळचे सगळे पैसे देउन टाकले आणि या मानवीय संकटापासुन सुटका करून घेतली.
तात्पर्यः रात्रिचे एकट्याने सुनसान रस्त्याने जाण्याचे टाळावे. अमानवीय नाहितरि त्याहुन भयानक मानवीय संकट येउ शकते.
कर्णपिशाच्चाला खाली बसायचे
कर्णपिशाच्चाला खाली बसायचे वावडे असावे>>>

सगळे अमानवीय अनुभव संपले?
सगळे अमानवीय अनुभव संपले? भुतेखेते माणसाळली की काय?
एक घडलेला किस्सा मी इथे
एक घडलेला किस्सा मी इथे लिहितो,
आम्ही एकदा सिटी प्राईड चा रात्रीचा पिक्चर बघून घरी परतत होतो. पिक्चर संपवून गप्पा- खाणे वगैरे होईपर्यंतं झाले असतील साधारण १-१:३०. पटवर्धन बागेत राहणाऱ्या मित्रांना अच्छा-बाय करून आमचे दोन मित्र तसेच स्कूटी वरून पुढे निघाले.
दशभुजा च्या समोरच्या चौकातून MIT कडे जाताना फ्लाय ओव्हर च्या खालून ते निघत होते. त्यांना सिग्नलपाशी एक बाई टोपलीत केळी घेऊन विकताना दिसली. हिरवी साडी, कपाळावर मोठा टिळा आणि अम्बाड्या वर फुलं वगैरे- अशी ती रस्त्याच्या कडेला खाली बसली होती.
ह्याने त्या बाई पाशी गाडी थांबवली , त्या बाई ने दोघांच्या हातात एक एक केळं दिलं, आणि मन्या जो गाडी चालवत होता तो एका हातात केळं घेऊन तसाच गाडी चालवू लागला, मागचा मित्र अनिकेतही एका हातात केळं धरून तसाच बसला होता.
थोडं पुढे आल्यावर ह्यांच्या लक्षात आलं कि त्यांच्या हातात काहीच नाहीये आणि तरीही ते एक हात तसाच हवेत धरून निघालेत.
फ्लाय ओव्हर पासून हे दोघे एकमेकांशी एक अवाक्षरही बोलले नव्हते. मन्याची तर अशी तंतरली कि तो त्याच्या रूम वर न जाता अनिकेत च्याच घरी रहायला गेला त्या रात्री.
नंतर घरी पोहोचल्यावर त्यांनी घडलेल्या गोष्टीचा विचार केला,
एवढ्या रात्री ती एकटी बाई अशी केळी विकत का बसली होती?
आपण तिकडे का थांबलो? नुकताच जेवण झालं असताना आपण केळं खायला कशाला थांबू?
बरं थांबताना दोघांपैकी कोणी काहीच कस बोललं नाही?
ती पैशांबद्दल काहीच बोलली नाही?
केळी हातात धरली होती हे तर आठवतंय पण ती गेली कुठे??
...............उत्तरं दोघांकडेही नव्हती.
हा किस्सा ऐकल्यावर थ्रील म्हणून आम्ही सगळे मित्र अनेकदा रात्री बेरात्री मुद्दाम त्या रस्त्यावरून जायचो, पण आमच्या नशिबात "ती" केळी नव्हती बहुतेक. अनिकेत आणि मन्या सारखा आमचा मनुष्य गण नाही ना! (मन्याचा अजून एक किस्सा लिहीन इकडे..नंतर)
आयला....दादा कोंडकेंच्या
आयला....दादा कोंडकेंच्या पिक्चर मधला shot वाटतो....
.....देउन घेउन केळं काय? 
कंपनीच्या गेस्ट हाऊसमधे
कंपनीच्या गेस्ट हाऊसमधे कामाला असलेल्या नोकराला हडळीची बाधा झाली. तो रात्री खिडकीतुन
बाहेर बघत बसलेला तेंव्हा एका मुलीला रस्त्यावरुन त्याच्याकडे बघत जाताना पाहिले. त्या मुलीला म्हणे कोणीतरी मारुन मागच्या टेकडीवर टाकले होते.
तेंव्हापासुन तो नोकर मधुनच झटका आल्यासारखा वागायचा. बदललेल्या आवाजात बोलायचा. नंतर त्याला त्याच्या घरी परत पाठवले त्यानंतर परत कुणाला बाधा नाही झाली.
मला पण काही अनुभव आलेले
मला पण काही अनुभव आलेले आहेत.... वेळ मिळेल तसे पोस्ट करेन...
करा पोस्ट, वाट पहातोय!
करा पोस्ट, वाट पहातोय!
हा किस्सा मला माझ्या आजोबानी
हा किस्सा मला माझ्या आजोबानी सान्गितला. त्ते लहान असताना ते आनि त्यान्चे वडील अडीवरे गावातून राजापूरला बाजार करण्यास जात बैलगाडीतून. असेच एकदा जात असताना रात्रिचे, जात असताना, त्याना रस्ता सापडेना., सगळीकडे झाडे दिसायला लागली. मग शेवेटी दोन्ही जनावराना सोडून, हे दोघे त्यान्च्या मधे झोपले. उजाडल्यावर रस्ता दिसला आणि तो समोरच होता. मग गेले राजापूरला
अच्छा, चकवा लागला का?
अच्छा, चकवा लागला का? कोकणातील अनेक वयोवृद्ध लोक अशा आठवणी सांगतात!
अनंत छंदी, अहो, चकवा तर भर
अनंत छंदी,
अहो, चकवा तर भर शहरातही लागतो. माझ्या भावाला मुंबई विमानतळापाशी लागला होता. तो अॅक्टिव्हा चालवत होता आणि मी त्याच्या मागे होतो. आम्हाला दोन चकरा मारूनही बाहेर पडायचा मार्ग सापडेना. शेवटी तिसर्या चकरेत सापडला.भावाला सहार विमानतळाच्या रस्त्यांची पूर्ण माहीती आहे.
आ.न.,
-गा.पै.
अच्छा, चकवा लागला का?
अच्छा, चकवा लागला का? कोकणातील अनेक वयोवृद्ध लोक अशा आठवणी सांगतात>>>>> माझ्या आजोबांनाही लागला होता. सायकलवरून कामावर रात्रपाळीला जात होते आणि अगदी रोजचा मैदानातला रस्ता होता त्यांचा तरी त्या रात्री सायकलवरून कित्येक फेर्या मारल्या पण मैदानातून बाहेरच पडता येत नव्हते म्हणे... आजी सांगते.
माझ्या वडिलांनी स्वतः
माझ्या वडिलांनी स्वतः अनुभवलेला प्रसंगः
ते त्यांच्या लहानपणी पुण्यातल्या गोखले वाड्यात राहायचे तेव्हाची गोष्ट. त्यांच्या वाड्यात एक गुरूजी राहायचे. त्यांच्या गावातल्या घरी त्यांचे निधन झाल्यावर हे वाड्यातले घर तसे बंदच असायचे.
एकदा त्यांना कोणीतरी बाई बोलवायला आली पुजा सांगण्यासाठी तिने बाबांना गुरूजींचे घर विचारले. (तिला माहित नसावं त्यांच्या निधनाबद्द्ल आणि बाबा लहान असल्यामुळे त्यांनाही कोणी सांगितले नव्हते)
तर घर दाखवायला म्हणून बाबा तिच्याबरोबर गेले आणि खिडकीतून हाका मारायला लागले. ती बाई जरा घाबरलीच म्हणाली "तू कोणाला हाका मारतोयस....कोणीच तर दिसत नाहीये." बाबा म्हणाले "अहो ते काय समोरच्या कॉटवर गुरुजी पाठमोरे बसलेत पण ते ओ देत नाहीयेत. " झालं ती बाई थांबलीच नाही तिथे.
त्यांना बर्याचदा असे अमानवीय अनुभव आलेले आहेत. परत लिहिते. हे आयफोन वरून लिहिताना दमछाक होतेय.
अरेच्चा! हा धागा अजून चालू
अरेच्चा! हा धागा अजून चालू आहे?
>>विजय देशमुखांच्या महाराजांच्या मुलखात या पुस्तकातला प्रसंग दिवसाचा आहे
हेम, हा प्रसंग काय ते लिहाल का प्लीज?
ज्या ज्या लोकांनी नंतर अनुभव लिहितो म्हटलंय त्यांनी पटापट अनुभव टाका पाहू.
साधारण ९४-९५ ची गोष्टं असेल,
साधारण ९४-९५ ची गोष्टं असेल, आमचा चुलत भाऊ चैतन्य, नगर च्या जवळ राहत असलेल्या त्याच्या मामा कडे उन्हाळ्याच्या सुट्टीत गेला होता. त्या वेळी तो एरिया अजिबात डेव्हलप झालेला नव्हता [माझ्या मते अजूनही नाहीये म्हणा पण असो]. मामा एका प्रायव्हेट कंपनी मध्ये मेंटेनन्स डीपार्टमेंट मध्ये होते आणि मामी एका रुग्णालयात नर्स. त्या दोघांना एक मुलगा होता -प्रथमेश. चैतन्य तेव्हा आठवी नववी त असावा आणि तो पोऱ्या असेल पाचवीत वगैरे.
एके दिवशे संध्याकाळी मामींचा फोन आला, त्या कामावर होत्या, काही कारणास्तव हॉस्पिटल मधेच रात्रीची शिफ्टही करणार होत्या आणि दुसर्या दिवशी पहाटे परतणार होत्या. अचानक झालेल्या ह्या प्लान चेंज मुळे घरात रात्रीच्या जेवणाची सोय मामा ना करणं भाग होतं. साधारण साडे नउ वाजता ते पोरांना म्हणाले, जा रे जरा आपली सायकल घेऊन जा आणि पुढे कोपर्यावर जो बुर्जी पाव वाला बसतो तिकडून बुर्जी पाव घेऊन या. आज तेच खाऊ. झालं, पोरं खूष. सायकल काढून ते निघणार एव्हड्यात का कोणास ठाऊक मामा मधेच उठले आणि म्हणाले नको राहूदे मीच जातो, पोरांनो तुम्ही घरीच थांबा. पोरांचा हिरमोड झाला खरा पण मामांशी कोण वाद घालणार म्हणून दोघही मुकाट्याने घरी बसले. सायकल ने साधारण एक पाच सात मिनिटांचा खडबडीत रस्ता पार केला कि पुढे मेन रोड ला ती बुर्जी पावाची गाडी असायची.
मी येई पर्यन्तं घरातच राहा आणि कोणालाही दार उघडू नका वगैरे नेहमीचे सल्ले देऊन मामा बुर्जी आणायला निघाले. ते गेल्यावर साधारण ३५-४० मिनिटानंतर घराच्या दरवाज्यावर हलकीशी थाप वाजली...दोनदा धप sss धाप. चैतन्य त्यातल्या त्यात मोठा असल्याने दारा जवळ गेला. पण काहीच हालचाल ऐकू आली नाही. आणि दारही फक्त दोनदाच वाजलं होतं. वातावरणात एक वेगळीच भकास शांतता पसरली. असेल काहीतरी म्हणून तो स्वयपाक घरात तांब्या भांडं आणायला आत गेला. पुन्हा दोन तीन मिनिटांनी तसाच धपssss असा आवाज दारावर झाला.... ह्या वेळी थोडा जोरात! आता मात्र तो नक्कीच भास नाही हे यां दोघांनाही कळालं होतं. तशाच तंतरलेल्या अवस्थेत....."कोणे" असा नाजूक आवाज चैतन्य ने काढला. एरव्ही जिन्यावर पाउल ठेवलं तरी स्पष्टं आवाज ऐकू येतो आणि आत्ता काहीच हालचाल कशी जाणवत नाही. हातातला तांब्या तसाच सोडून दोघेही देव घरा जवळ बसले.
अजून पाचेक मिनिटांनी दार पुन्हा वाजलं पण ह्या वेळी......"अरे चैतन्य...पशा" बाहेरून मामाचा आवाज कानावर आला. चैतन्यने धावत जाऊन दार उघडलं. मामा आले. दोघांनाही हायसं वाटलं. मामांनी आल्यावर दाराची वरची कडी लावली, त्यांच्या कपाळावर घाम दिसतच होता. ताम्ब्यातलं पाणी घटा-घटा पिउन झाल्यावर मामा म्हणाले काय रे पोरांनो दार उघडायला एव्हडा वेळ का लागला? ...........तेव्हा दोघांनीही झाला प्रकार मामांना सांगितला.
दुसर्या दिवशी मामा-मामी चं बोलणं ह्या पोरांनी ऐकलं, कि ते त्या खडबडीत अंधार्या रस्त्या वरून सायकल ने येत असताना अचानक त्यांना 'ओढ' जाणवली....इतकी कि अगदी जवळ जवळ सायकल पूर्णं थांबे पर्यंतं. आणि त्यांना पशाचा म्हणजे त्यांच्या मुलाचा खूप लांबून 'बाबाss' असा आवाज ऐकू आल्या सारखा वाटला. क्षणभर त्यांनी पाय टेकवला पण नंतर सायकल कशीबशी जोssरात रेटत मारली घरा पर्यन्तं. घरी येउन त्यांना जेव्हा पोरांनी त्यांचा किस्सा सांगितला तेव्हा तर त्यांची दांडीच गुल झाली.
मामी म्हणाल्या 'तरी सांगत होते आज ग्रहणा नंतरची पहिली अमावास्या आहे रात्री बाहेर पडणं टाळा म्हणून! आणि रात्रीचं असं जेवण आणताना नेहमी मिरच्या ठेवायच्या पिशवीमध्ये'
पुढे वर्षं भरातच मामांनी ते घर सोडलं, त्यांची दुसरीकडे बदली झाली. पण बरंच झालं. ती वास्तू जरा भकासच होती. काही वास्तूंमध्ये आत शिरल्यावरच कळतं कि तिकडे निगेटीव्ह वेव्हज आहेत.
**********************
मिरच्यांच्या मागचं लॉजिक माहिती नाही.
काही वास्तूंमध्ये आत
काही वास्तूंमध्ये आत शिरल्यावरच कळतं कि तिकडे निगेटीव्ह वेव्हज आहेत>> हो हे मात्र अनुभवलंय.
निगेटीव वेव्हज
निगेटीव वेव्हज
काही वास्तूंमध्ये आत
काही वास्तूंमध्ये आत शिरल्यावरच कळतं कि तिकडे निगेटीव्ह वेव्हज आहेत.
>> अत्यंत खरं आहे, काही ठिकाणं पण अशीच भकास असतात. पुण्यात डुक्कर खिंड (वन्डर फन की होतं तो एरिया) मला भयंकर वाटतो.
अशा वास्तुंबद्दलही लिहा की
अशा वास्तुंबद्दलही लिहा की लोक्स.
मित्रहो, ही अगदी कालचीच गोष्ट
मित्रहो, ही अगदी कालचीच गोष्ट आहे, खरं तर कालच इथे लिहिणार होतो पण वेळ झाला नाही म्हणून आज लिहितोय.
माझा एक मित्र कालच सायंकाळी भेटला होता. हा तसा अगदी नास्तिक प्राणी, अगदी भुतेच काय देवही नाही असे मानणारा त्याला आलेल्या अनुभवाने तो अगदी गडबडून गेला होता.
त्याचे असे झाले त्याचा आणि माझा कॊमन मित्र असलेल्या एकाचे वडील नुकतेच वारले त्यांचे दहावे परवा होते. या दिवशी जमलेल्या लोकांपैकी एखाद्या व्यक्तीच्या अंगात त्या मृत व्यक्तीचा संचार होण्याचे प्रकार कोकणातील ग्रामीण भागात अनेकदा घडतात, पितर येणे म्हणतात त्याला.
तर त्या दहाव्याच्या कार्यक्रमाला हा मित्र गेला होता. त्या वेळी तेथे हजर असलेल्या एका स्त्रीच्या अंगात त्या दुसरया मित्राच्या मृत वडिलांचा संचार झाला. तिने (तिच्या अंगात संचार झालेल्या व्यक्तीने) उपस्थितांपैकी अनेकांशी वार्तालाप केला, शेवटी बाबुच्या सर्व मित्रांना बोलवा असे म्हटले.त्याप्रमाणे सर्व त्या स्त्री समोर गेले असता तिने प्रत्येकाचे नांव घेत , त्यांना ओळखत त्यांच्याशी बोलणे केले. या मित्राचा या गोष्टीवर विश्वास नसल्याने हा सर्वात शेवटी त्या स्त्री समोर गेला..
पुढील बोलणे त्याच्याच शब्दात ....
हे सगळे थोतांड आहे याचा विश्वास असल्याने मी सर्वात शेवटी त्या बाईसमोर उभा राहिलो.
या जोशीसाहेब असे म्हणत तिने मान वर करत माझ्याकडे पाहिले मात्र.... तिच्या नजरेतील ते ओळखीचे भाव पाहून मी अक्षरश: शहारलो...आता बाबूकडे लक्ष द्या... असे त्या स्त्रीने मला सांगितले....महत्वाचे म्हणजे ती स्त्री मला ओळखत नव्ह्ती...ती शुद्धीवर आल्यानंतर... सुमारे तासाभरानंतर मी पुन्हा त्या स्त्रीसमोर जाऊन उभा राहिलो तर त्या स्त्रीने मला ओळखले देखिल नाही....या प्रकारानंतर रात्री मला झोप आली नाही...कधी तुम्ही भेटताय आणि तुम्हाला हा प्रकार सांगतोय असे झाले होते.
तर असा हा प्रकार आहे, आता बोला.
मला काही माबोच्या धाग्यांवरही
मला काही माबोच्या धाग्यांवरही निगेटीव्ह वेव्हज जाणवतात....त्याचे काय करता येईल का....धागाकर्त्याच्या विपूत मिरच्या वगैरे टाकणे.....:)
स्वप्ना अगं या धाग्याचे नावच अमानवीय आहे....असा तसा नाही मरण पावणार तो
भुत बुट घालते का
भुत बुट घालते का
विजय देशमुखांच्या
विजय देशमुखांच्या 'महाराजांच्या मुलखात' या पुस्तकातला प्रसंग दिवसाचा आहे
हेम, हा प्रसंग काय ते लिहाल का प्लीज?
अर्थात पुस्तकातही ही गोष्ट सिरीयसली टाकली नाहीये. दिवेकर समंधाच्या गोष्टी सुरु असतांना एकाने ही गोष्ट सांगितली आहे.
आशूने बावडेकरांची जी गोष्ट लिहिली आहे तीच... त्याने कुठून ऐकलीय कोण जाणे! पुस्तकांत बावडेकरांच्याऐवजी आसरकर आडनांव आहे.
पुस्तकांत नविन आवृत्तीच्या पान क्र. ८८ वर ही गोष्ट आहे.
हेम्या लेका....मी पण त्याच
हेम्या लेका....मी पण त्याच पुस्तकात वाचलाय...पण खूप शतके झाली त्या गोष्टीला त्यामुळे नक्की नाव काय ते आठवत नव्हते
आणि मी लिहीलेय की बावडेकर (का बावकर)
बावकर का काही तरी...ते आसरकर होते होय...ठिकाय ना कर जोडावे असे कुणीतरी होते ना मग झाले तर
आणि ही घटना बहुदा गोनिदांच्या दहा दिवसात दहा किल्ले उपक्रमादरम्यान झाली होती का...नक्की काय लक्षात येत नाहीये
आजची सर्वात ह्हीट
आजची सर्वात ह्हीट स्टोरी,..... अफाझल गुरुचे भुत तिहार जेल मध्ये ...
कधी तो मांडी घालून बसलेला असतो... कधी निर्विकारपणे नुसताच फिरत राहतो... तर कधी डोक्याला मफलर गुंडाळलेला तो तिरकी मान करून एकटक बघत राहतो... तो यापैकी काहीच करत नसला तरी त्याची नुसती आठवणही काळजावर ओरखडा उठवते...
अफझल गुरूच्या भूताने तिहारच्या जेलमध्ये असा उच्छाद मांडलाय. तिहारमधील कैद्यांचे तरी असेच म्हणणे आहे. भारत सरकारसाठी थंड डोक्याचा क्रूरकर्मा अफझल मेला असला तरी तिहारमधील कैद्यांच्या मानेवर तो भूत बनून बसला आहे. तिहारच्या अंधार कोठड्यांमध्ये भटकणाऱ्या अफझलच्या दाढीधारी आत्म्याने तिथल्या कैद्यांची झोप उडवली आहे.
तिहारमधील कैद्यांच्या म्हणण्यानुसार, अफझलचा आत्मा बराक नंबर तीनच्या आसपास फिरतो आहे. काही कैद्यांच्या रात्रीच्या स्वप्नांचा ताबाच अफझलने घेतलाय. या कैद्यांनी जेलच्या व्यवस्थापनाकडे या भुताटकीची तक्रार केली असून अफझलच्या आत्म्याच्या शांतीसाठी होमहवन करण्याची मागणी केल्याचे सूत्रांकडून समजते.
अत्यंत कडक बंदोबस्तात ठेवण्यात आलेल्या अफझल गुरूला ९ फेब्रुवारीला गुप्तपणे फाशी देण्यात आली. जवळपास १२ वर्षे त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या कैद्यांनाही त्याच्या फाशीची कानोकान खबर नव्हती. अफझलला फासावर लटकवल्यानंतरच त्यांना त्याबाबत माहिती मिळाली. तेव्हापासून बराक नंबर तीनमधील कैद्यांचा धीरच खचला. सतत अफझलचा विचार आणि त्याच्याबाबतच्या चर्चेने सगळ्यांच्याच मनात भीतीने घर केले असून आता तर तिहारमध्ये अफझलच्या भूताचेच राज्य असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
स्त्रोतः http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/18792681.cms
ही २००५ मधली गोष्ट आहे.
ही २००५ मधली गोष्ट आहे. इंजिनीअरींग साठी पुण्याला (निगडी प्राधीकरण) मध्ये रहात होतो. इंजिनीअरींगचे शेवटचे वर्ष होतं, आणि पेईंग गेस्ट म्हणून जे घर मिळाले होतं ते जरा भारलेलं होतं. रोज रात्री २.३० वाजता पलंग एकदा थरथरायचा. पण नंतर त्या गोष्टीची इतकी सवय झाली की 'अलार्म' असावा ह्या पध्दतीने मी घ्यायला लागलो.
माझे घर कॉलेजला लागून असल्याने परिक्षेच्या वेळी बरीच मित्र मंडळी माझ्या रूमवर अभ्यास करायला असायची. सातवी सेमिस्टर होती, सगळे मरमरून अभ्यास करत होते. रात्री नेहमी प्रमाणे पलंग हालल्यावर (आता पर्यंत सगळ्यांना ह्याची सवय झाली होती) आम्ही ठरवले की भक्ती शक्ती समोरच्या जकात नाक्यावर बुर्जी पाव वगैरे खाऊन येऊ. आमच्यातला उज्वल नावाचा मित्र म्हणाला 'माझे नोटस काढून होतच आहेत, तुम्ही पुढे व्हा मी येतो मागून पळत'......
आम्ही जकात नाक्यावर बुर्जी पाव खाऊन, चहा सिगारेट मारून निघालो तरी उज्वल काही आला नाही. आम्ही त्याच्या नावाने शंक करत घरा जवळ पोहचतोच तर हा गेटच्या बाहेर झोपलेला/बेशुध्द दिसला. उठता उठेना, शेवटी काकूंना (घर मालकीण) ऊठवले आणि त्यांना सांगितले. त्या आम्हाला ओरडल्या की 'रात्रि गेटच्या बाहेर जायचे नाही सांगितले होते ना!!' आणि त्यांनी उज्वल वरून तांदूळ उतरवले तेव्हा त्याला शुध्द आली. त्याला विचारले काय झाले बाहेर बेशुध्द कसा पडलास??? तेव्हा त्याने घडलेली गोष्ट पुढील प्रमाणे सांगितली.....
"तुम्ही निघाल्यावर अगदी ३-४ मिनिटां मध्ये मी पण निघालो. गेट मधून बाहेर पडलो तेव्हा तुम्ही चालताना दिसत होतात. इतक्यात माझा हात कोणी तरी पकडला म्हणून पाहिले तर ती बिना मुंडक्याची बाई (ही बिना मुंडक्याची बाई फेमस होती, आणि बर्याच जणांनी पाहिलेली होती) मी ओरडण्याचा प्रयत्न केला ...... आणि आता शुध्दीवर आलो"
(क्रमश:)
बिना मुंडक्याची भूतं जवळजवळ
बिना मुंडक्याची भूतं जवळजवळ सर्व गावांत असावीत. माझ्या आईचे वडिल फॉरेस्ट खात्यात होते तेव्हा प्रत्येक आदिवासी पाड्यात बिनमुंडक्याचा ब्रिटिश अधिकारी घोड्यावरून रात्री फिरताना दिसे म्हणे. हा एकच होता का पेन्शनरांचा असतो तसा त्यांचा ग्रूप होता काही माहित नाही कारण चेहेराच नसल्याने कळणार कसं.
डोळे नसताना ह्यांना वाट कशी दिसायची हेही एक कोडंच आहे.
पण ह्या बीबीवर क्रमशः नको प्लीज. लवकर सांगा बघू पुढे काय झालं ते.
आमच्या मित्राच्या घरातसुद्धा
आमच्या मित्राच्या घरातसुद्धा दररोज रात्री ,पलंग, घर, भांडीकुंडी थरथरायचे.....पण नंतर लक्षात आलं.
दारु पिल्याने मित्र स्वतः थरथरायचा, पण त्याला वाटायचे आपण स्थिर असुन जग थरथरत आहे
पुर्वीच्या लोकांना पृथ्वी स्थीर असुन सुर्य त्याभोवती फिरतोय असे वाटायचे तसे...
@विशुभाऊ >> निगडी प्राधीकरण
@विशुभाऊ >> निगडी प्राधीकरण मधे कुठे?? PCCOE च्या जवळपास का??
Pages