अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा सर्व घटनाक्रम मागील वर्षभरातील आहे.....
माझे एक जवळचे नातेवाईक कुटुंब आहे त्या कुटुंबातील पति पत्नीला एकंदर तीन मुले होती.त्यापैकी दुसर्या क्रमांकाच्या मुलाने सुमारे ६ वर्षांपूर्वी पुण्यालगत एक व्यवसाय सुरू केला. तीन वर्षांपूर्वी हा मुलगा त्याच्या नोकरासह मोटारसायकलने अहमदनगरकडे जात असताना त्याला एका सुमोने मागून धडक दिल्यामुळे त्याचे जागीच निधन झाले. मात्र त्याच्या मागे बसलेल्या नोकराला हनुवटीला लागलेल्या किंचित माराव्यक्तिरिक्त काहीच लागले नाही. त्या मुलाच्या पश्चात त्याचा धाकटा भाऊ हा व्यवसाय सांभाळू लागला. दरम्यान त्या नोकराने नोकरी सोडून त्याचप्रकारचा व्यवसाय या मुलाच्या दुकानाशेजारीच सुरू केला, आणि नष्टचक्र सुरू झाले. दिवसभरात काही हजार रुपयांची उलाढाल असलेल्या त्या दुकानात कित्येकदा अक्षरशः एकही रुपयाची आवक होईनाशी झाली. दुकान चालविणार्याचे लक्ष दुकानात लागेनासे झाले. विशेष म्हणजे ही मंदी अमावास्या, पौर्णिमा या तिथींच्या प्रकर्षाने जाणवत असे. हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर एक दिवस त्यांनी हा प्रकार माझ्या कानावर घातला.
आणि मग मी माझ्या या विषयातील एका माहीतगार मित्राच्या सांगण्याप्रमाणे दौंड येथील एका व्यक्तीकडे त्या मुलास घेऊन गेलो त्या माणसाने आम्ही तेथे गेल्यावर एकाग्रतेने शून्यात पाहण्यास स्रुरुवात केली, आणि पाच मिनिटांनी तुमच्या दुकानात यापूर्वी काम करणार्या नोकराने करणी केल्याने हे घडत असल्याचे सांगितले, एव्हढेच नव्हेतर ही करणी त्याने आपल्या घरातूनच केली असून त्याच्या घरात ७ चेडे पुजले जात आहेत अशी माहिती दिली, जी अगदी बरोबर होती. जेव्हा तो करणी करणारा या दुकानात नोकरी करत होता तेव्हा कधीतरी त्याच्या घरी जावे लागत असल्याने दुकान चालविणार्या मुलाने त्याच्या घाराच्या देव्हार्यात गोटे पुजले जात असल्याचे पाहिले होते. त्यानंतर त्या दौंडमधील माणसाने उपाययोजनाही केली त्याचा असर चार दिवस, होय मोजून चारच दिवस दिसला. पुन्हा परिस्थिती मुळपदावर आली. म्हणून द्सरा एक मात्रिक मोशीजवळून आणण्यात आला, त्याने दुकानात येऊन काही विधी केला.परंतू त्याचाही उपयोग झाला नाही. दरम्यान मी पूर्वी एकदा उत्तरभारतात गेलो असता माझी गाठ एका तंत्राचार्यांशी पडली होती त्यांनी त्यावेळी अशाप्रसंगी एक विशिष्ट विधी करून अशा ठिकाणी एका नारळाची प्रतिष्ठापना करण्याची प्रक्रिया समजावून सांगितली होती व करणीबाधेसारखा प्रकार असल्यास हा नारळ प्रयोग होताक्षणी तडकतो,आणि येणार्या संकटापासून संरक्षण असेही सांगितले होते ते मला आठवले. समस्या सोडविण्यासाठी नवीन मांत्रिकाचा शोध सुरू होताच, दरम्यानच्या काळात हा नारळाचा प्रयोग करून तर पाहू म्हणून आम्ही हा नारळ त्या दुकानात ठेवला. त्यानंतर अवघ्या चारच दिवसांनी आलेल्या अमावास्येच्या दिवशी हा ठेवलेला नारळ अक्षरशः स्फोट झाल्यासारखा फुटला. म्हणून पुन्हा तसाच नारळ ठेवला पुढील पर्णिमेला तो देखील तडकला. आता पाचावर धारण बसण्याची पाळी आली. नारळ फुटला की पुढील आठवडाभर धंदा पूर्णपणे बसून जात असे. असे सुमारे तीन महिने गेले अखेरीस तळेगाव येथील एका मांत्रिकाचा शोध लागला. त्यानेही दौंडवाल्या मांत्रिकाच्या म्हणण्याला पुष्टी दिली. व स्मशानात जाऊन काही विधी केले.आणि एक नारळ मंत्रून दुकानात ठेवण्यास दिला आणि हा नारळ किमान ६ महिने फुटणार नाही जर फुटला तर मात्र तो घेऊन ताबडतोब माझेकडे घेऊन या असे सांगितले. त्या प्रमाणे आम्ही केले धंध्याची गाडीही रुळावर आली आम्ही सुटकेचा नि:श्वास सोडला, आणि त्यानंतर आलेल्या पहिल्या पौर्णिमेला मांत्रिकाने दिलेला नारळ फुटला... त्याबरोबर धंद्याचेही पुरते वाटोळे झाले... दिवसच्या दिवस बसूनही एकही ग्राहन न येणे वगैरे घडू लागले हवालदील व्हायची पाळी आली. आम्ही तो फुटका नारळ घेऊन त्या मांत्रिकाकडे गेलो असता तो नारळ पाहून तो मात्रिक गंभीर झाला. म्हणाला समोरचा तगडा आहे. आता आमची पाचावर धारण बसली, करणार काय... तितक्यात किंक्रांत व त्या पाठोपाठ ग्रहण आले. असा कालावधी या करणी वगैरे प्रकारांसाठी फार अनुकुल असतो असे ऐकले होते. त्यामुळे काही दगाफटका व्हायला नको म्हणून पुन्हा त्या मात्रिकाकडे गेलो. (एव्हाना धंद्याऐवजी जिविताची काळजी वाटू लागली होती) तो ही गंभीर झाला कारण त्यालाही तीच भिती वाटत होती. अखेरीस थोडा विचार करून तो म्हणाला की माझ्याकडचा मुंजा चार दिवस मी तुमच्याकडे देतो तो चार दिवस तुमचे संरक्षण करील आणि त्याणे मुंजाची प्रतिमा आमच्याकडे दिली. चार दिवसानंतर ती प्रतिमा परत देण्यासाठी कधी येऊ असे विचारण्याकरिता त्या मांत्रिकाला फोन केला असता तो मात्रिकाच्या म्लाने घेतला...व म्हणाला तुम्ही आला होतात त्याच रात्री आई बाबा दवाखान्यातून मोटारसायकलने घरी येत असताना त्यांना गाडीने उडविले दोघेही आयसीयुमध्ये आहेत. आता काय करायचे.... मामला अधिक गंभीर होत चालला....
त्याच रात्री मी घरी असता ९ चे सुमारास मला द्कान चालविणार्या मुलाचा कॉल आला.... त्याने सांगितले... मरता मरता वाचलो. तो आणि त्याचा मित्र पुण्याजवळील पेट्रोलपंपावरून कारमध्ये पेट्रोल भरून बाहेर पडताच समोरून येणार्‍या बसने गाडीला जोरदार धडक दिली होती गाडीचे बरेच नुकसान झाले सुदैवाने दोघाना फारसे लागले नाही. आता जिवावर बेतू लागलेले पाहताच उत्तरभारतातील त्या तंत्राचार्यांशी संपर्क साधला व तिकडे जाऊन त्यांच्याकडून उपाययोजना करून घेतली, आता सर्व ठीक आहे कालच त्या मुलाची भेट झाली त्याने सर्व ठीक असल्याचे सांगितले. दोन महिन्यापूर्वी ठेवला नारळ आजही दुकानात तसाच आहे न फुटता.... आत्ता बोला

अनंत छंदी, छेडे (का चेडे) हा प्रकार ज्याम खत्तरनाक असतो असं ऐकून आहे. माझ्या माहितीतल्या एका साधूवर असाच प्रयोग झाला होता. केवळ साधनेच्या बळावर तो वाचला. विशेष म्हणजे स्वत:ची म्हणता येईल अशी फाटकी चड्डीही त्याच्याकडे नव्हती! अशा निरिच्छ,निष्कांचन लोकांचाही द्वेष करणारी माणसं या जगात आहेत. आता बोला!
आ.न.,
-गा.पै.

अशा निरिच्छ,निष्कांचन लोकांचाही द्वेष करणारी माणसं या जगात आहेत. आता बोला!
आ.न.,
-गा.पै.>>>. अहो आन्तरजालीय जगात तर अशी लोक ठायी ठायी सापडतील, नव्हे आहेतच.:खोखो:

गापै मी तुमची गम्मत नाही करत, पण खरच जी माणसे दुसर्‍यावर/ दुसर्‍याच्या चान्गल्यावर नेहेमी जळतात, त्या व्यक्तीला चार चौघात बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा दृष्य/ अदृष्य पणे त्या टिकाकार किन्वा निन्दा नालस्ती करणार्यान्ची पण आयुष्यात कधी न कधी तोन्डावर आपटण्याची वेळ येतेच. असे मानवीय किन्वा दैवी म्हणा हवे तर आम्ही प्रत्यक्ष अनूभवले आहेत.

माझ्या एका नातेवाईक स्त्रीने, जी तिच्या खाजगी जीवनात खूप यशस्वी आहे, सुसन्कृत आहे, तिच्या कुटुम्बाला सुद्धा त्रास झाल्यावर हे अनूभवले होते. पण ज्यानी त्रास ( मानसीक/ आर्थिक ) त्रास दिला ते असे खड्ड्यात गेले की परत वर यायला बराच काळ लागला. चार लोकात ज्यान्चे बदनामी केली त्यान्चीच पाया पडण्याची वेळ आली. आता बोला.

देव आहे.:स्मित:

अनन्त छन्दी हे चेडे प्रकरण ऐकुन माहीत आहे, तुमचे अनूभव भारी पण भयानक आहेत.

अनंत छंदी ने सांगितलेला अनुभव खूप गंभीर नि भयानक वाटतोय.. आमचे गावचे काका मागच्या वर्षी अशाच करणीने दगावले असे गावची मंडळी म्हणत होते.. एक नाही तर दोन -तीन ठिकाणी गावच्यांनी विचारपुस केली तेव्हा 'करणी केली होती' हेच उत्तर मिळाले.. माझा विश्वास नाही अश्या गोष्टींवर पण काकांचा अकस्मात मृत्यु जिव्हारी लागलाय..

@ Yo.Rocks एके काळी मीही तुमच्यासारखाच होतो असल्या कोणत्याही गोष्टींवर विश्वास नव्हता माझा, पण काही गोष्टी अशा घडल्या की विश्वास ठेवणे भाग पडले. Happy

चेडा हा प्रकार शालिग्राम नावाच्या दगडा मधे अतृप्त आत्मा कैद करुण त्याच्या पासून वेग वेगळी काम पूर्ण करून घेतात, त्याला हव ते नाही दिल तर तो सर्व काढून घेतो , (आजी बाईंचे ज्ञान )

चेडा काढायचा असल्यास ....

आमचेकडे जे.सी.बी. भाड्याने मिळेल . पाहिजे तितके खोदून काढून टाका ......................... Happy

www.esakal.com/esakal/20120621/4835795483013816852.htm

मुंबई मंत्रालयात आग लागली होती 2012 मधे त्या च्याशीनिगडित एक अमानवीय किस्सा जो मला मंत्रालयात काम करणार्या व्यक्ति ने सांगितला होता तो मी तुम्हाला सांगेन ,'

माझ्या मित्राचे वडील मुंबई मंत्रालयात काम करतात . ते ४ थ्या मजल्यावर कार्यरत असतात, एका संध्याकाळी त्यांना घरी जायला उशीर झाला , आणि त्यात ते फोर्ट वरून churchgate स्टेशन ला ट्रेन मधून घरी जाण्यासाठी आले पण ते स्वताचे पाकिट मंत्रालयातील चवथ्या मजल्यावरील स्वताच्या टेबल वर विसरून आले होते , त्यांना परत आता ऑफिस ला जाव लागणार होत आणि त्यात उशीर झाला होता ते परत टैक्सी पकडून मंत्रालयात आले होते खाली गेट जवल सिक्यूरिटी गार्ड ने त्यांना सांगितले साहेब मी बरोबर येउ का तुमच्या, पण त्यांनी सांगितले राहु दे मी जाउन लगेच येतो तरीही सिक्यूरिटी गार्ड्स नि त्यांना सांगितले साहेब काही प्रॉब्लम असेल तर हाक मारा .

हे काका जसे चवथ्या मजल्यावर पोहोचले त्यांनी पाहिले फ्लोर वरच्या लाइट्स बंद चालू होत होत्या , काका ऑफिस मधे गेले तर तिथले टाइप रायटर आपोआप चालू होते आणि फाइल्स हलत होत्या काका समजुन गेले इथे काहीतरी अमानवीय आहे ते आल्या पाउली परत पळत जाऊ लागले तर त्यांचे पाय जड़ झाल्या सारखे झाले त्यांनी सिक्यूरिटी गार्ड्स ना हाक मारण्याचा प्रयत्न केला पण आवाज बाहेर निघत नव्हता कसे तरी करत ते तिसर्या मजल्यावर आले आणि त्यांना हलक वाटू लागल , लगेच त्यानी तिथून पळ काढला , (त्यांचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती ) आणि गार्ड्स जवळ गेट पाशी आले त्यानी गार्ड्स ला घडलेली सर्व हकीकत सांगितली गार्ड्स ने त्यांना पाणी पाजले आणि टैक्सी मधे बसवून दिले .

त्या नंतर On 21 June 2012 ला चवथ्याच मजल्यावर आग लागली ............. :'(

looks like ithe baryach afavana ut yenarey Sad

ऒऒओssss मामी आता आपण आजुन येक विमान मुंबई विमानतलावारुण उडिवनार हाये . Happy

लैय झाले लोकांचे हनुभाव अन किस्शे आता आपण आपला पर्शनल एक्सपेरिएंस सांगणार हाय , आपल्या शिट बेल्ट ला गाठ मारून घ्या राव आपल यीमान लवकरच उडणार हाय ,

राम राम

Happy

आपल यीमान लवकरच उडणार हाय , >>>>>>>>>... यीमानातील किश्शे खरच असतील तर यीमान उडवा भौ.....उगाच टेपा लावत बसु नका.....

Tepa lavan ha tyancha janmasiddh hakk ahe he attaparyantlakshat nahi aal ka?

te mantralayatala kissa bissa mhanje farach kahin ahe.

te mantralayatala kissa bissa mhanje farach kahin ahe>>>>>>>>>>>>>>> एअर्पोर्ट , मंत्रालय मधे भुतं आहेत हे यांच्याकडुनच कळतय.....जिवंत माणसांच्या रुपातील भुतांबद्दल बोलत असतील......

chhe chhe! he bro itake hushshar tar watat nahiyet buva Wink

पूर्वीचे रस्ते साधे होते..
पूर्वीची माणसेही साधी होती..

आताचे रस्ते डांबरी आहेत..
आताची माणसेही डांबरट आहेत..!

Wink

ही एक सदर व्यक्ती इथे 'किस्से' का लिहितेय?

चांगल्या जेन्युईन धाग्याचं सीआयडी करून ठेवलंय! *रागानी डोळे फिरवणारी बाहुली*

ऊऊऊ भानुप्रिया मेमशाब ष्वोरी गल्ती हो गया अगली बार तुमकु पुचके अपना स्टोरी डालेगा

अबकी बार माफ़ करो
झगडा झगड़ी बंद करो

ओके शाबजी ⊙﹏⊙

आताचे रस्ते डांबरी आहेत..
आताची माणसेही डांबरट आहेत>>>>>>>>>>>.. म्हणून इथे तुम्ही डांबरट पणा करुन लोकांना वात का आणताय

चेडा हा प्रकार मी पहिल्यांदा ऐकतेय ..आतापर्यंत करणी आणी भागामती की भानामती हेच ऐकलं होतं....कोणाजवळ किस्से असतील तर शेयर करा......

अ‍ॅडमिन - हे सगळे घाग्याला भरकटवणारे कमेंटस प्लीज काढून टाका ना. >>>=++++++११११११११११

Pages