रार यांच्या पिया बीनावर झालेली चर्चा भरकटत असल्याचा अनेकांना खेद झाल्याने नविन धागा चालु केला आहे. 
प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 16:22
रार,
बरेच दिवसांनी लिखाण पाहून बरे वाटले.
खर तर अशी अनेक उदा. आहेत जिथे रचना विसंगती म्हणता येईल पण शेवटी तुला हे माहित आहेच की संगीत -त्यातही एखाद्या दृष्यासाठी चित्रपटात दिलेले, पार्श्वसंगीत अन वाद्यांसकट- हे subjective आहे.
पिया बिना बासिया बाजे ना यातला जो जोगिया, उदास, बेचैन, मूड आहे त्याला बासरी हे वाद्य खूप सशक्तपणे अधोरेखित करतं असं मला वाटतं. किंबहुना त्या काळात बासरी, सॅक्सोफोन, सरोद, सतार, ऑर्गन ही प्रामुख्याने वापरली जाणारी वाद्ये असल्याने याही गाण्यात बासरीचा वापर तितका खटकत नाही.
त्यामूळे निव्वळ शब्द अन त्यामागून काय वाद्य वाजले पेक्षा त्या एकंदर रचनेचा दृक्-श्राव्य परिणाम हा बासरी (सारख्या) वाद्याने, अन रचलेल्या सुरावटीने तितका आपल्या पर्यंत पोचत असेल तर मला वाटतं technically विसंगत असूनही आपल्याला ते आवडते.
असो.
मला वाटतं हिंदी मधेही बंसिया हा शब्द योग्य आहे. वर कुणितरी लिहील्याप्रमाणे बंसुरिया वरून बांसिया शब्द आला असावा पण "बसिया" शब्दाशी एकंदर ईथे जवळचा संबंध दिसत नाही कारण नंतर "बाजे ना" आल्याने, बासरीबद्दलच उल्लेख आहे. "
गीतात तो शब्द बंसिया (जे हिंदी व्याकरणातही योग्य आहे) असा असेल तर लताच्या गाण्यात मात्र बासिया असे ऐकू येते. गीतात शब्द बंसिया असला तरी गाताना तो बासिया म्हणायचा असा काही हिंदी व्याकरणिक नियम आहे का हे तपासून पहायला हवे. बर्मन दादा व लतादीदी दोघेही अशी चूक करतील असे वाटत नाही. तेव्हा नक्क्की काय ते लतादीदींनाच विचारावे लागेल (दोन्ही बर्मन हयात नाहीत!)
बंसिया या शब्दाजागी बासुरिया असे गीतात म्हटले तरी तालात अडचण येणार नाही पण ऐकताना थोडे खटकेल, कारण गीतातील ईतर शब्दांपेक्षा हा शब्द त्या जागी थोडा पटकन म्हणावा लागेल. मला याचे ताल, मात्रा, विभाग सहीत स्पष्टीकरण देता येईल पण माझ्या मते ते अनावश्यक आहे. एरवी या गीतातील बहुतांशी शब्द दोन वा तीन अक्षरी आहेत.
याऊलट "मेरा कुछ सामान" मधे पंचमदांनी निव्वळ बासरी न वापरता अधुनिक जवळ जवळ सर्व वाद्यांचा (तरिही प्रामुख्याने सरोद, बेस गिटार, क्सायलोफोन, सतार) चा वापर करून त्या गाण्याचा अस्वस्थ करून सोडणारा मूड ज्या प्रकारे संगीतातून प्रकट केला आहे त्याला तोड नाही. किंबहुना गुलजारच्या नेहेमीच्या वापरातील शब्द जे अन्यथा गीतात तसेच वापरायचे तर संगीतकाराचा गोंधळ उडू शकतो असे शब्द पंचमदांनी न बदलता देखिल तसेच ठेवून कुठेही गाण्याचा तोल वा मूड सुटू दिलेला नाही निव्वळ या एकाच बाबतीतही ते ईतरांपेक्षा महान ठरतात.
आणि जुन्या कॅसेट तंत्राचे म्हणशील तर ते बहुतांशी analogue monotonic कींव्व mono sterio असल्याने त्याचे अलिकडे mp3 digital sterio reproduction करताना मूळ आवाजातील मार्दव, माधुर्य, बरेच वेळा compromise केले जाते. याचे मुख्ख्य कारण म्हणजे frequency mapping. हा एक अतिशय रंजक विषय आहे आणि नेट्जालावर याविषयी माहिती उपलब्ध आहे.
असेच एक आवर्जून audio cassette वर ऐकायचे गाणे म्हणजे "रैना बिती जाये.."
प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 16:31
तेरे बिना झिंदगी से शिकवा या गाण्यात पहिल्या कड्व्यानंतर जे संवाद आहेत संजीव कुमार व सेन बाईंच्या तोंडी ते मात्र नंतर मुद्दामून गाण्यात घात्ले असावेत अशी नेहेमी शंका येते.
कुणाला काही कल्पना/माहिती?
याचे कारणः
१. एकतर ते संवाद संपल्यावर पुन्हा म्युझिक चालू होते ते खूप abrupt वाटते, अगदी आयत्या वेळी एखादी special bogie शेवटी गाडीला जोडली जावी तसाच हिसका बसतो..
२. त्या संवादात "ये जो चांद है ईसे रात मे देखना... "वगैरे उल्लेख झाल्यावर मग तिसरे कडवे "तुम जो केहेदो तो आज की रात चांद डूबेगा नही..." येते. ते justify करायला हे संवाद लिहील्यागत वाटतात.
सर्वात मह्त्वाचे, कुणीतरी संवादातील ही ओळ डीकोड करा रे. अजूनही नक्की कळलेले नाही..
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे xxxxxxxxx...
काय आहे नक्की ते वाक्य?
प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 22:56
ये अरबी मे आयतें (कुराणातील ओळी) हैं - इन्हें दिन में देखना - साफ नजर आतीं हैं..
प्रतिसाद mansmi18 | 3 November, 2009 - 19:39
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे xxxxxxxxx...
---------------------------------------------------------
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे "आयते" लिखी है..
प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 22:31
स्वाती,
अगदी बरोबर... तेच ऐकू यायचे.. धन्यवाद!
थोडक्यात, त्या एकमेकात गुंफलेल्या वेली म्हणजे जणू अरबीतील आयते आहेत अशी कल्पना आहे तर. छान! शेवटी गुलजारच
प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 22:50
कल्पना नाहीये योग. माझ्या आठवणीप्रमाणे कुठल्यातरी पडझड झालेल्या वास्तूच्या (खंडहर) भिंतींवर वेलबुट्ट्यांसारख्या दिसणार्या आकृत्या या खरंतर आयता आहेत असं तो सांगतो आहे. (ताजमहालाच्या भिंतींवरही आहेत अशा आयता.)
खालच्या फोटोत लाल लंबवर्तुळात दिसतायत तशा.
(फोटोचा प्रताधिकार माझाच )
प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 22:55
खरच की. बरोबर आहे तुझं.. फोटो पाहून ट्यूब पेटली.
(संवादात तो म्हणतो देखिल, "इन्हे दिन मे देखना साफ नजर आयेगी..").
पण एकंदरीत संवादाबद्दल काय वाटतं? नंतर घुसडल्या सारखा?
प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 23:19
संवाद त्या प्रसंगासाठी (ते नऊ वर्षांनी इतके निवांत भेटतायत) घुसडला आहे हे खरंच, आणि ते एकवेळ क्षम्य आहे, पण त्यात त्याने 'रोज निकलता है, पर बीचमें अमावस आ जाती है.. वैसे तो अमावस पंद्रह दिन की (??!!) होती है, मगर इस बार बहुत लंबी रही' असं म्हणायचं आणि त्यावर तिने 'नौ बरस लंबी थी ना?' असं विचारायचं हे प्रेक्षकांना जरा फारच स्पूनफीडिंग झालं. गुलजारने हे करायची गरज नव्हती असं वाटतं.
पण त्या गाण्यांसाठी ये भी मंजूर है!
ता. क. : रार, तुझी मूळ चर्चा भरकटवण्यात हातभार लावल्याबद्दल क्षमस्व.
प्रतिसाद shonoo | 3 November, 2009 - 23:24
पण ते म्हणताना तिचा आवाज काय मस्त कापलाय! नऊ वर्षांचा विरह, आठवणी, व्याकुळता सगळं त्या एका वाक्यात आहे. मला तो डायलॉग फार आवडतो..
प्रतिसाद ashwini | 4 November, 2009 - 01:56
मला पण खूप आवडतो. कॉलेजमध्ये असताना एका नाटकात तो आम्ही घेतला होता. त्या संवादासाठी व्हीडीओ आणून आँधी पाहीला होता आणि पुन्हा पुन्हा तेव्हढा भाग पाहून मी तो कापरा आवाज आणण्याचा प्रयत्न केला होता. आँधीतली सगळीच गाणी अप्रतिम होती! अजूनही ते गाणं आणि त्यातला तो संवाद लागला की कॉलेजचे दिवस आठवतात.
cinderella | 4 November, 2009 - 02:09
सलाम किजिए गाणं सोडल्यास सगळी गाणी मस्त आहेत
प्रतिसाद deepanjali | 4 November, 2009 - 02:45
याचे कारणः
१. एकतर ते संवाद संपल्यावर पुन्हा म्युझिक चालू होते ते खूप abrupt वाटते, अगदी आयत्या वेळी एखादी special bogie शेवटी गाडीला जोडली जावी तसाच हिसका बसतो..
<<<<
उलट मला तर ज्या प्रकारे ते गाणं जातं तेच आवडतं !!
तो मधला किर्र रात्रीचा फीलसकट येणारा डॉयलॉग (आणि हे गाणं पण बरोबर रात्री बेला के फूल ला बरेचदा लागायचं:)) , त्या साठी अचानक गाणं थांबणं आणि नंतर अचानक सुरु होण हेच तर गाण्याची 'जान' वाटतं ( तस् पण पूर्णं गाणं हे बॅक्ग्राउंड ला आहे, फिल्मी स्टाइल संजीव कुमार्-सुचित्रा सेन गात नाहीत, त्यामुळे गाणं म्हणजे फक्त त्या दोघांच् मनोगत! )
तुम जो केहेदो तो आज की रात चांद डूबेगा नही..." येते. ते justify करायला हे संवाद लिहील्यागत वाटतात.
<<< Well, असेलही.
पण अगदीच डॉयलॉग संपल्यावर नाही येत ते कडवं.
त्या डॉयलॉग नंतर आधी " जी मे आता है तेरे दामन मे सर झुकाके हम रोते रहे रोते रहे, तेरे ही आंखोमे ऑसूआँकी नमी तो नही " हे येतं मग धृवपद आणि मग संजीव कुमार चं आय मीन किशोर कुमार चं कडवं आहे .
प्रतिसाद bee | 4 November, 2009 - 08:55
मला देखील दीपांजली सारखचं वाटतं. तो संवाद तर गाण्याचा खराखुरा प्राण आहे.
प्रतिसाद bee | 4 November, 2009 - 08:56
पण ती अभिनेत्री सेन ही मालासिन्हा सारखीच दिसते. मला अलिकडेच माहिती पडले की ती माला सिन्हा नाही तर सेन आहे
प्रतिसाद madhavm | 4 November, 2009 - 09:00
सिंड्रेलाला १०० मोदक. इतक फालतू गाण का घातलय तेच कळत नाही. त्यातली सगळी मस्त गाणी आर.डी. ने किशोरला दिली आहेत आणि हे मात्र रफीला.
प्रतिसाद yog | 4 November, 2009 - 10:14
DJ,
>तो मधला किर्र रात्रीचा फीलसकट येणारा डॉयलॉग (आणि हे गाणं पण बरोबर रात्री बेला के फूल ला बरेचदा लागायचं:)) , त्या साठी अचानक गाणं थांबणं आणि नंतर अचानक सुरु होण हेच तर गाण्याची 'जान' वाटतं
तसं असेलही... पण (मला) गाण्याची लय तुटल्या सारखी वाटते.
असो. रार, तुझ्या मूळ लेखाला चांगलच भरकटवलं.. दिलगीर!
या आयडीने राजकारणाच्या
या आयडीने राजकारणाच्या धाग्यांवर लिहावंसं वाटत नसेल, तर आणखी एक आयडी काढा की. एक्सेल शीटमध्ये एक row वाढवणं काही कठीण नाही.
चार चार आयडी चार वर्षे
चार चार आयडी चार वर्षे पाठलाग करून ट्रोलिंग करतात, ते उडत नाहीत आणि खटकतही नाहीत, ती उज्ज्वल परंपरा चालवायची का सर्वांनी ? छान सजेशन आहे. तुम्हीच का अॅप्रूव्ह करत नाहीत प्रतिसाद इतर विषयांवरचेही. तुम्हाला आवडतील तसेच लिहावे सर्वांनी. राजकारणापासून ते सगळीकडेच.
एक्सेल शीटचा अनुभव दांडगा असावा. आताही पुन्हा नवे आयडीज येऊन टोलिंग सुरू करतील. हे प्रिव्हिलेज बहुधा सर्वांना नसावे.
कणेकर लोकसत्तात लिहायचे
कणेकर लोकसत्तात लिहायचे तेव्हाचे त्यांचे सगळे लेख मी वाचलेत. त्यांच्या आवडत्या काळाबद्दल भरपुर लिहुन परत ते कार्यक्रमात बोलत राहणे याचा त्यांना खुप ताण आला असणार. मी कार्यक्रम पाहिले वा ऐकले नाहीत. चित्रपट/क्रिकेट सोडुन इतर जे लिहिले ते व्यक्तिगत होते आणि ते खुप नैराश्यवादी कडवट आहे. बायकोबद्दल तर खुपच. कदाचित बायकोला आधीच सांगितले असावे की पोटापाण्याचा उद्योग म्हणुन मी असे लिहितो, तु मनावर घेऊ नकोस.
मला असले कथन वाचवत किंवा ऐकवतही नाहीत. त्यामुळे कित्येक लेखांचा सुर पाहुन पुढचे वाचलेच नाही
आपले वडिल खुप ग्रेट होते आणि आपल्या वडलांची आपण खुप
निराशा केली हे शल्य त्यांच्या मनात होते हे सुरवातीच्या लेखांतुन दिसते. आणि बहुतेक ह्यामुळे स्वभाव कडवट, नैराश्यवादी होत गेला. त्याचे प्रतिबिंब लेखनात, कार्यक्रमात उतरत गेले हेमावैम.
असो. कोणे एके काळी मी त्यांची चाहती होते. चित्रपट व संबंधित व्यक्तींबद्दल माहिती मिळवायचे फार मर्यादित सोर्स तेव्हा होते आणि जुन्या काळाबद्दल मराठीत लिहिणारे फक्त कणेकर व इसाक मुजावर होते. बाकी मराठी पत्रकार लोक फक्त चालु काळाबद्दल लिहित.
एक मुद्दा मला मांडायचा आहे.
एक मुद्दा मला मांडायचा आहे.
त्यांचा कडवटपणा सोडला तर चित्रपटाबद्द्लचं त्यांचं निरीक्षण किंवा निरीक्षणशक्ती (जास्त योग्य होईल) हा त्यांचा युएसपी होईल. त्यांचा टोन कसा आहे हे सोडून देऊ. पण चित्रपटात घडणार्या गोष्टीला त्या वेळचे किंवा आजचे आपण इतके युज्ड टू झालेलो असतो कि त्यातला खटकणारा भाग कुणीतरी उलगडून दाखवतो तेव्हां आपल्या चेहर्यावर हसू उमटतं ते "कि आपण कसं काय मिस केली ही गोष्ट ?" म्हणूनच. मला तरी हे मनोरंजनमूल्य वाटतं. हा एक जॉन्रा आहे करमणुकीचा. कणेकरांनंतर द्वारकानाथ संझगिरींनीही प्रयत्न केलेत. पण ते लगेच राजकीय दाखले देतात.
कणेकरांना वाचताना त्यांचा टोन आड येत नाही. बघताना तो टोन बाजूला ठेवला तर खानदान कि इज्जत ही गोष्ट इतकी क्लिशे आहे हे कणेकरांनी सांगितल्यावर पटले म्हणून लोक हसले असणार. ते ही सिनेमे पाहणारे लोकच असतील ना ? पाहिल्याशिवाय तर हसू येणे शक्य नाही.
( एखादी गोष्ट अ ती झाली तर कंटाळा येणे स्वाभाविक आहे. पूर्ण अनुमोदन. पण ते सगळीकडेच नोंदवायला पण हरकत नसावी. सक्ती नाही).
रा भु, जे आपल्याला वाटते ते
रा भु, जे आपल्याला वाटते ते बिनधास्त लिहावे (इथल्या आयडींना व्यक्तिगत सोडुन). कोण काय बोलते ह्याची
कधी काही शोधत असताना जुने काहीतरी दिसते, त्यातलेही प्रतिसाद वाचते. मजा येते. कधीकधी विश्वास बसत नाही, आपणच हे लिहिले यावर. 
अजिबात चिंता करु नये. आपण लिहिलेले नंतर वाचताना खुप मजा येते. मला इथे २० वर्षे झाली. तेव्हाचे जुने लेख कोणी वर काढते, मी त्यावरचे माझे प्रतिसाद शोधुन वाचते
कणेकरांचे डोळे हे जुल्मी गडे
कणेकरांचे डोळे हे जुल्मी गडे हे लोकसत्तेतले सदर १९७० च्या दशकातले किंवा ८०च्या सुरुवातीचे असावे. मी तेव्हा वाचत असे आणि याचे पुस्तक गेल्या दशकात विकत घेतले आणि ते अजूनही आवडते. माझी फिल्लमबाजी पासून ते अधिकाधिक क्रूड होत गेले असावेत. क्रिकेटवरचं लेखनही वाचलं आहे.
त्यांच्याकडे चांगला मसाला कमी होता आणि कुठे कधी थांबावं हे त्यांच्या आवडत्या गायिकेप्रमाणे त्यांनाही कळलं नाही.
लेखनात जसजसा मी येऊ लागला तसे ते घसरत गेले. त्यांच्या आपत्यासाठी - बहुतेक मुलीसाठी लिहिलेला लेख हृद्य होता.
गेल्या दशकात एका वर्षी दोन दिवाळी अंकांत त्यांचे लेख वाचले. त्यात एक दोन परिच्छेद जसेच्या तसे होते.
हे मी याआधीही मायबोलीवर लिहिलं आहे. रवींद्र जैन - हेमलता यांच्यावर प्रेम नुसतं आंधळंच नाही, तर बहिरं असतं हा विनोद त्यांनी लताच्या तोंडी घातला होता. म्हणजे लता त्यांना असं म्हणाली, असं त्यांनी लिहिलं. हे खरं असेल, तर लताबद्दलचाही आदर कमीच होईल.
<पण ते सगळीकडेच नोंदवायला पण
<पण ते सगळीकडेच नोंदवायला पण हरकत नसावी> मी आधीच लिहिलंय. चित्रपट कसा वाटलावरही लिहिलं. तो विनोद टायमिंगमुळे सगळ्यांना आवडला होता. चांगला जमलाच होता. आताही लिहिताना फक्त तुमचा प्रतिसाद डोळ्यांसमोर नव्हता. एकामागोमाग एक त्या प्रतिसादांची रांग लागली होती.
हे इथे थांबवतोय.
आपल्याला वाटते ते बिनधास्त
आपल्याला वाटते ते बिनधास्त लिहावे (इथल्या आयडींना व्यक्तिगत सोडुन). कोण काय बोलते ह्याची अजिबात चिंता करु नये.
>>>>>
+७८६
मला पूर्ण कल्पना आहे कि तो
मला पूर्ण कल्पना आहे कि तो प्रतिसाद माझ्यासाठी नाही.
माझा आक्षेप याला आहे कि राजकीय धाग्यावर काहीही चालवून घेणारे आयडीज ( आणि त्यामुळे चित्रपटविषयक धाग्यावर मर्यादीत झालेले अन्य) मुद्दामून अशा धाग्यांवर टोमणे मारतात किंवा तिरकस प्रतिसाद देतात किंवा ड्युआयडीजवर घसरतात तेव्हां आपल्या बाजूने लिहीणार्या, तेच तेच लिहीणार्या आयडीजबाबत त्यांची सहनशक्ती जशी असते तशी इथे का नाही ? लिहू द्या कि.
कणेकरांचे डोळे हे जुल्मी गडे
कणेकरांचे डोळे हे जुल्मी गडे हे >>> एका ब्लॉगवर कणेकर, संझगिरी आणखीही काही अशा लेखकांचे लेख संग्रहीत करून ठेवलेले आहेत. सापडला तर लिंक देईन. (कॉपीराईट लागू होतं कि नाही कल्पना नाही). बहुतेक अक्षर वरून नाव आहे. कारण पुलंचे लेख संग्रहीत करून ठेवलेला ब्लॉग आता दिसत नाही. बहुतेक गुगलने काढून टाकला असावा.
राभु लिन्क मिळाली तर नक्की
राभु लिन्क मिळाली तर नक्की दे, वाचायला आवडेल.
<त्यामुळे चित्रपटविषयक
<त्यामुळे चित्रपटविषयक धाग्यावर मर्यादीत झालेले अन्य) > त्यामुळे हे नक्की का? राज कारण कित्ती घाण. त्यावर लिहिणारे वाईट्ट. असे किती मीम्स या माबो गणेशोत्सवात होते? हे लोक अधूनमधून राजकीय धाग्यांवर लिहितात आणि त्यांचे राजकीय कल माझ्याइतक्या स्पष्टपणे नसले तरी उघड आहेत.
चित्रपट कसा वाटलावर फक्त याबद्दलच आक्षेप आलेला नाही. तो धागा चित्रपट परीक्षण आणि चर्चेचा कमी आणि फुटकळ विनोदाचा आणि त्याला दाद देण्याचा जास्त असा झाला आहे. त्याबद्दलही मी लिहिलं आहे.
सरांप्रमाणे (म्हणजे सरांना करतो, तसं) मी तुम्हांलासुद्धा बहुतांशी इग्नोर करतो हे तुमच्या लक्षात आलं नसेल. तर आज सांगतो. कधी कधी ऑफ स्टंपबाहेरच्या चेंडूकडे बॅट जाते तशी काल आणि आज गेली. तुमचे भारतभूषणवरचे प्रतिसाद मी वाचलेच नाहीत. इतरांचे ओझरते पाहून त्यावर लिहिलं. एकाला फॅक्ट चेक केलं. इथे भारतभूषणवर विनोद करणार्यांनी माझी कमेंट इग्नोर केली किंवा मनाला लावून घेतली नाही, तसं करणं अजिबात कठीण नाही.
असो. या दळणाचा कंटाळा आला.
तुम्ही मला इग्नोर करता
तुम्ही मला इग्नोर करता याबद्दल मनापासून आभार. धोरणात बदल होऊ देऊ नका आणि माझ्या मागे ड्युआयडी लागणार नाहीत ही अपेक्षा.
गेल्या काही दिवसात तिरकस कमेण्ट्स इतक्या वाढल्या आहेत कि तुम्हाला हवे तसेच सर्वांनी लिहायचे आहे असा समज झाला. एका आयडीला धडक वरून तिरकसपणे ट्रोल केलं. त्याच सिनेमाचा सामाजिक आशय वेगळ्या धाग्यावर आला तर छान होईल म्हटलं तर अवांतर म्हणून ट्रोल केलं आणि आता इथेही. राजकारण किती घाण हे स्वतः ठरवत नाही आणि त्या धाग्यावरच्या ड्युआयडींच्या (सिलेक्टिव्ह) प्रतिसादाबद्दल अवाक्षरही काढत नाही , पण इतर ठिकाणी खटकले कि तिरकस प्रतिसादांचा मारा सुरू होतो, कुणाला ड्युआयडी आहेत असे बदनामीकारक वक्तव्य करायचे यातून बाहेर पडायचेच नसेल तर कोण रोखणार ?
फारेण्ड यांचे असहमतीचे प्रतिसाद कधीच तिरकस नसतात. असो. आता मात्र इग्नोर करेन आठवणीने.
रच्याकने - एखादा आयडी आपल्याला इग्नोर करतो हे तेव्हांच जाणवेल जेव्हां त्या आयडीची आपण पत्रास राखत असू. जो खिजगणतीतही नाही त्याने इग्नोर केलं काय न केलं काय..
सरांप्रमाणे (म्हणजे सरांना
सरांप्रमाणे (म्हणजे सरांना करतो, तसं) मी तुम्हांलासुद्धा बहुतांशी इग्नोर करतो हे तुमच्या लक्षात आलं नसेल. तर आज सांगतो.
>>>>>>>
एखाद्याला तुम्ही इग्नोर करत आहात हे तुम्हाला दहा ठिकाणी पुन्हा पुन्हा आणि अगदी त्याचा चर्चेत विषय नसतानाही त्याचे उदाहरण देऊन सांगावेसे वाटत असेल तर याचा अर्थात तुम्ही त्याला इग्नोर करत नसून तो तुमच्या विचारात सतत असतो
आणि हे असेच राहू द्या..
मला आवडते
फक्त जिथे तिथे गरज नसताना माझा विषय काढून जे अवांतर होईल त्याची जबाबदारी तुमचीच ती तेवढी घ्या
भरत, मला वाटतं की तुम्ही अशा
भरत, मला वाटतं की तुम्ही अशा प्रकारचे विनोद खूप वेळा आणि खूप काळ वाचल्या/ऐकल्यामुळे तुम्हाला आता त्यात तोचतोचपणा वाटत असेल किंवा कंटाळा येत असेल. किंवा अनेकदा काही विनोदांचे विषय हे बदलत्या जाणिवांमुळे आउटडेटेड होत जातात, उदा. बायकोला घाबरणाऱ्या नवऱ्याचे विनोद. पण त्या जाणिवा न बदललेले, पुरेसं exposure नसलेले किंवा पुरेसं वाचन/तात्विक बैठक नसलेले असेही अनेक जण असतात. त्यांना अजूनही तुमच्यासाठी जुने असलेले विनोद नवे असतात. त्यांना माफ करा, ते काही मुद्दामून तसं करत नाहीत. मला अजूनही फिल्लंबाजी आवडते. कदाचित आणखीन काही वर्षांनी नाही आवडणार. पूर्वी पुलंचे काहीही लिखाण आवडायचे... आता नाही. प्रत्येकाचा प्रगल्भतेचा प्रवास वेगवेगळ्या गतीने होत असतो. त्यात कुणाला कमी लेखण्यात काय हशील आहे?
एखाद्याला तुम्ही इग्नोर करत
एखाद्याला तुम्ही इग्नोर करत आहात हे तुम्हाला दहा ठिकाणी पुन्हा पुन्हा आणि अगदी त्याचा चर्चेत विषय नसतानाही त्याचे उदाहरण देऊन सांगावेसे वाटत असेल तर याचा अर्थात तुम्ही त्याला इग्नोर करत नसून तो तुमच्या विचारात सतत असतो >>>>>.

हपा, अगदी हेच मी
हपा, अगदी हेच मी ललिताप्रीतीच्या धाग्यावर भटकंतीच्या संदर्भात लिहिलंय. या सेम पिंचच्या निमित्ताने एक कप चहा प्या.
कधी कधी वाटतं की एकांगी टोकाच्या विचारांचे तेच तेच दळण दळणार्यांनी काही दिवस/महिने सोमिसुट्टीवर जायला हरकत नाही.
कणेकरांचा कणेकरी शैली बद्दल
कणेकरांचा कणेकरी शैली बद्दल एक कोट होता
की मीच ना तो शिंचा कणेकर, मग मी जे काही जसंही लिहीन तीच ना कणेकरी शैली
पण नंतर नंतर ते त्या लोकांनी डिफाइन केलेल्या शैलीच्या इमेजला शरण गेले अन् मारून मुटकून विनोद घुसडायला लागले असं वाटतं.
तसंच, त्यांच्या ठराविक चौकटीच्या बाहेरचं जे असेल त्याला सुरवातीलाच शिव्या घातल्यानी, नंतर जेव्हा तेच पॉप्युलर झालं, तेंव्हा त्याचं कौतुक करण्यात इगो किंवा शैलीचं ओझं आड येत असावं, अन् मग जुनाच कोळसा उगाळत रहावं लागलं असावं
गंमत म्हणजे काणेकरांचे आवडते हिरो देव आनंद, दिलीप कुमार, राजेश खन्ना अन् गोविंदा, सगळ्यांचंच असंच झालं. आपल्याच इमेज मधे अडकले अन् गंडले
मला कणेकरांचा विनोद आवडायचा.
मला कणेकरांचा विनोद आवडायचा. कदाचित माझं वाचन कमी आहे, त्यामुळे माझ्यासाठी ते विनोद हे नेहमीचे नव्हते. फक्त उपहास करताना एक संतुलन ठेवणं आवश्यक आहे, ते पुढे पुढे त्यांना जमलं नाही. पुढे अती झाल्यामुळे किंवा त्यांच्या वयोमानानुसार त्या उपहासातला विनोद कमी आणि खत्रुडपणा वाढत गेला. मग मजा येईनाशी झाली. त्यांची पुस्तकं वाचायला अजूनही चांगली वाटतात. >> हपा एकदम परफेक्ट लिहिलय. फक्त शेवटच्या वाक्याबाबत त्यांची सुरूवातीची पुस्तक असे मी माझ्यापुरते म्हणेन.
भरतला भा भू इत्यादीबद्दल लिहिलेल्या पोस्टला अनुमोदन. तेच तेच परत परत येत राहतेय. मात्र त्याच त्याच आयडी कडून असेल असे जरुरी नाही. म्हणून ओलांडून पुढे जात राहायचे.
Pages