रार यांच्या पिया बीनावर झालेली चर्चा भरकटत असल्याचा अनेकांना खेद झाल्याने नविन धागा चालु केला आहे. 
प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 16:22
रार,
बरेच दिवसांनी लिखाण पाहून बरे वाटले.
खर तर अशी अनेक उदा. आहेत जिथे रचना विसंगती म्हणता येईल पण शेवटी तुला हे माहित आहेच की संगीत -त्यातही एखाद्या दृष्यासाठी चित्रपटात दिलेले, पार्श्वसंगीत अन वाद्यांसकट- हे subjective आहे.
पिया बिना बासिया बाजे ना यातला जो जोगिया, उदास, बेचैन, मूड आहे त्याला बासरी हे वाद्य खूप सशक्तपणे अधोरेखित करतं असं मला वाटतं. किंबहुना त्या काळात बासरी, सॅक्सोफोन, सरोद, सतार, ऑर्गन ही प्रामुख्याने वापरली जाणारी वाद्ये असल्याने याही गाण्यात बासरीचा वापर तितका खटकत नाही.
त्यामूळे निव्वळ शब्द अन त्यामागून काय वाद्य वाजले पेक्षा त्या एकंदर रचनेचा दृक्-श्राव्य परिणाम हा बासरी (सारख्या) वाद्याने, अन रचलेल्या सुरावटीने तितका आपल्या पर्यंत पोचत असेल तर मला वाटतं technically विसंगत असूनही आपल्याला ते आवडते.
असो.
मला वाटतं हिंदी मधेही बंसिया हा शब्द योग्य आहे. वर कुणितरी लिहील्याप्रमाणे बंसुरिया वरून बांसिया शब्द आला असावा पण "बसिया" शब्दाशी एकंदर ईथे जवळचा संबंध दिसत नाही कारण नंतर "बाजे ना" आल्याने, बासरीबद्दलच उल्लेख आहे. "
गीतात तो शब्द बंसिया (जे हिंदी व्याकरणातही योग्य आहे) असा असेल तर लताच्या गाण्यात मात्र बासिया असे ऐकू येते. गीतात शब्द बंसिया असला तरी गाताना तो बासिया म्हणायचा असा काही हिंदी व्याकरणिक नियम आहे का हे तपासून पहायला हवे. बर्मन दादा व लतादीदी दोघेही अशी चूक करतील असे वाटत नाही. तेव्हा नक्क्की काय ते लतादीदींनाच विचारावे लागेल (दोन्ही बर्मन हयात नाहीत!)
बंसिया या शब्दाजागी बासुरिया असे गीतात म्हटले तरी तालात अडचण येणार नाही पण ऐकताना थोडे खटकेल, कारण गीतातील ईतर शब्दांपेक्षा हा शब्द त्या जागी थोडा पटकन म्हणावा लागेल. मला याचे ताल, मात्रा, विभाग सहीत स्पष्टीकरण देता येईल पण माझ्या मते ते अनावश्यक आहे. एरवी या गीतातील बहुतांशी शब्द दोन वा तीन अक्षरी आहेत.
याऊलट "मेरा कुछ सामान" मधे पंचमदांनी निव्वळ बासरी न वापरता अधुनिक जवळ जवळ सर्व वाद्यांचा (तरिही प्रामुख्याने सरोद, बेस गिटार, क्सायलोफोन, सतार) चा वापर करून त्या गाण्याचा अस्वस्थ करून सोडणारा मूड ज्या प्रकारे संगीतातून प्रकट केला आहे त्याला तोड नाही. किंबहुना गुलजारच्या नेहेमीच्या वापरातील शब्द जे अन्यथा गीतात तसेच वापरायचे तर संगीतकाराचा गोंधळ उडू शकतो असे शब्द पंचमदांनी न बदलता देखिल तसेच ठेवून कुठेही गाण्याचा तोल वा मूड सुटू दिलेला नाही निव्वळ या एकाच बाबतीतही ते ईतरांपेक्षा महान ठरतात.
आणि जुन्या कॅसेट तंत्राचे म्हणशील तर ते बहुतांशी analogue monotonic कींव्व mono sterio असल्याने त्याचे अलिकडे mp3 digital sterio reproduction करताना मूळ आवाजातील मार्दव, माधुर्य, बरेच वेळा compromise केले जाते. याचे मुख्ख्य कारण म्हणजे frequency mapping. हा एक अतिशय रंजक विषय आहे आणि नेट्जालावर याविषयी माहिती उपलब्ध आहे.
असेच एक आवर्जून audio cassette वर ऐकायचे गाणे म्हणजे "रैना बिती जाये.."
प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 16:31
तेरे बिना झिंदगी से शिकवा या गाण्यात पहिल्या कड्व्यानंतर जे संवाद आहेत संजीव कुमार व सेन बाईंच्या तोंडी ते मात्र नंतर मुद्दामून गाण्यात घात्ले असावेत अशी नेहेमी शंका येते.
कुणाला काही कल्पना/माहिती?
याचे कारणः
१. एकतर ते संवाद संपल्यावर पुन्हा म्युझिक चालू होते ते खूप abrupt वाटते, अगदी आयत्या वेळी एखादी special bogie शेवटी गाडीला जोडली जावी तसाच हिसका बसतो..
२. त्या संवादात "ये जो चांद है ईसे रात मे देखना... "वगैरे उल्लेख झाल्यावर मग तिसरे कडवे "तुम जो केहेदो तो आज की रात चांद डूबेगा नही..." येते. ते justify करायला हे संवाद लिहील्यागत वाटतात.
सर्वात मह्त्वाचे, कुणीतरी संवादातील ही ओळ डीकोड करा रे. अजूनही नक्की कळलेले नाही..
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे xxxxxxxxx...
काय आहे नक्की ते वाक्य?
प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 22:56
ये अरबी मे आयतें (कुराणातील ओळी) हैं - इन्हें दिन में देखना - साफ नजर आतीं हैं..
प्रतिसाद mansmi18 | 3 November, 2009 - 19:39
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे xxxxxxxxx...
---------------------------------------------------------
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे "आयते" लिखी है..
प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 22:31
स्वाती,
अगदी बरोबर... तेच ऐकू यायचे.. धन्यवाद!
थोडक्यात, त्या एकमेकात गुंफलेल्या वेली म्हणजे जणू अरबीतील आयते आहेत अशी कल्पना आहे तर. छान! शेवटी गुलजारच
प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 22:50
कल्पना नाहीये योग. माझ्या आठवणीप्रमाणे कुठल्यातरी पडझड झालेल्या वास्तूच्या (खंडहर) भिंतींवर वेलबुट्ट्यांसारख्या दिसणार्या आकृत्या या खरंतर आयता आहेत असं तो सांगतो आहे. (ताजमहालाच्या भिंतींवरही आहेत अशा आयता.)
खालच्या फोटोत लाल लंबवर्तुळात दिसतायत तशा.
(फोटोचा प्रताधिकार माझाच )
प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 22:55
खरच की. बरोबर आहे तुझं.. फोटो पाहून ट्यूब पेटली.
(संवादात तो म्हणतो देखिल, "इन्हे दिन मे देखना साफ नजर आयेगी..").
पण एकंदरीत संवादाबद्दल काय वाटतं? नंतर घुसडल्या सारखा?
प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 23:19
संवाद त्या प्रसंगासाठी (ते नऊ वर्षांनी इतके निवांत भेटतायत) घुसडला आहे हे खरंच, आणि ते एकवेळ क्षम्य आहे, पण त्यात त्याने 'रोज निकलता है, पर बीचमें अमावस आ जाती है.. वैसे तो अमावस पंद्रह दिन की (??!!) होती है, मगर इस बार बहुत लंबी रही' असं म्हणायचं आणि त्यावर तिने 'नौ बरस लंबी थी ना?' असं विचारायचं हे प्रेक्षकांना जरा फारच स्पूनफीडिंग झालं. गुलजारने हे करायची गरज नव्हती असं वाटतं.
पण त्या गाण्यांसाठी ये भी मंजूर है!
ता. क. : रार, तुझी मूळ चर्चा भरकटवण्यात हातभार लावल्याबद्दल क्षमस्व.
प्रतिसाद shonoo | 3 November, 2009 - 23:24
पण ते म्हणताना तिचा आवाज काय मस्त कापलाय! नऊ वर्षांचा विरह, आठवणी, व्याकुळता सगळं त्या एका वाक्यात आहे. मला तो डायलॉग फार आवडतो..
प्रतिसाद ashwini | 4 November, 2009 - 01:56
मला पण खूप आवडतो. कॉलेजमध्ये असताना एका नाटकात तो आम्ही घेतला होता. त्या संवादासाठी व्हीडीओ आणून आँधी पाहीला होता आणि पुन्हा पुन्हा तेव्हढा भाग पाहून मी तो कापरा आवाज आणण्याचा प्रयत्न केला होता. आँधीतली सगळीच गाणी अप्रतिम होती! अजूनही ते गाणं आणि त्यातला तो संवाद लागला की कॉलेजचे दिवस आठवतात.
cinderella | 4 November, 2009 - 02:09
सलाम किजिए गाणं सोडल्यास सगळी गाणी मस्त आहेत
प्रतिसाद deepanjali | 4 November, 2009 - 02:45
याचे कारणः
१. एकतर ते संवाद संपल्यावर पुन्हा म्युझिक चालू होते ते खूप abrupt वाटते, अगदी आयत्या वेळी एखादी special bogie शेवटी गाडीला जोडली जावी तसाच हिसका बसतो..
<<<<
उलट मला तर ज्या प्रकारे ते गाणं जातं तेच आवडतं !!
तो मधला किर्र रात्रीचा फीलसकट येणारा डॉयलॉग (आणि हे गाणं पण बरोबर रात्री बेला के फूल ला बरेचदा लागायचं:)) , त्या साठी अचानक गाणं थांबणं आणि नंतर अचानक सुरु होण हेच तर गाण्याची 'जान' वाटतं ( तस् पण पूर्णं गाणं हे बॅक्ग्राउंड ला आहे, फिल्मी स्टाइल संजीव कुमार्-सुचित्रा सेन गात नाहीत, त्यामुळे गाणं म्हणजे फक्त त्या दोघांच् मनोगत! )
तुम जो केहेदो तो आज की रात चांद डूबेगा नही..." येते. ते justify करायला हे संवाद लिहील्यागत वाटतात.
<<< Well, असेलही.
पण अगदीच डॉयलॉग संपल्यावर नाही येत ते कडवं.
त्या डॉयलॉग नंतर आधी " जी मे आता है तेरे दामन मे सर झुकाके हम रोते रहे रोते रहे, तेरे ही आंखोमे ऑसूआँकी नमी तो नही " हे येतं मग धृवपद आणि मग संजीव कुमार चं आय मीन किशोर कुमार चं कडवं आहे .
प्रतिसाद bee | 4 November, 2009 - 08:55
मला देखील दीपांजली सारखचं वाटतं. तो संवाद तर गाण्याचा खराखुरा प्राण आहे.
प्रतिसाद bee | 4 November, 2009 - 08:56
पण ती अभिनेत्री सेन ही मालासिन्हा सारखीच दिसते. मला अलिकडेच माहिती पडले की ती माला सिन्हा नाही तर सेन आहे
प्रतिसाद madhavm | 4 November, 2009 - 09:00
सिंड्रेलाला १०० मोदक. इतक फालतू गाण का घातलय तेच कळत नाही. त्यातली सगळी मस्त गाणी आर.डी. ने किशोरला दिली आहेत आणि हे मात्र रफीला.
प्रतिसाद yog | 4 November, 2009 - 10:14
DJ,
>तो मधला किर्र रात्रीचा फीलसकट येणारा डॉयलॉग (आणि हे गाणं पण बरोबर रात्री बेला के फूल ला बरेचदा लागायचं:)) , त्या साठी अचानक गाणं थांबणं आणि नंतर अचानक सुरु होण हेच तर गाण्याची 'जान' वाटतं
तसं असेलही... पण (मला) गाण्याची लय तुटल्या सारखी वाटते.
असो. रार, तुझ्या मूळ लेखाला चांगलच भरकटवलं.. दिलगीर!
तो हॅन्डसम होता हे मान्य आहे.
तो हॅन्डसम होता हे मान्य आहे. हरियाली और रास्ता मध्ये तो तसा दिसलाही आहे. विशेषतः हसताना तर तो फार छान दिसतो त्यात.
नंतर तो अर्धा चेहरा झाकून घ्यायला लागला. चेहरा झाकला नसेल तेव्हा तो आंबट दही खाऊन आल्यासारखे किंवा डोळ्यांना कांदा झोंबल्यासारखे भाव का दाखवायला लागला हा प्रश्न आहे.
मनोजकुमार हा त्या वेळच्या
मनोजकुमार हा त्या वेळच्या सर्व कुमारांमधे (दिलीप, प्रदीप, राजेंद्र) सर्वात जास्त देखणा होता हेमावैम. black and white चित्रपटांमधे तो खरंच खूप छान दिसायचा. वो कौन थी मधील हेलनबरोबरच्या गाण्यांमधे मस्त दिसलाय. पण नंतर त्याचा भारतकुमार झाला आणि चेहरा अर्धा झाकायचे खूळ त्याच्या डोक्यात शिरून त्याने वाट लावली
ट्य्लिप यांचा शम्मी
ट्युलिप यांचा शम्मी कपूरबद्दलचा उत्कट प्रतिसाद फारच आवडला.
दिनेश यांनी उल्लेख केलेले - 'रात भी है भिगी भिगी चांद भी है कुछ मध्धम मध्धम' - माझेही अत्यंत आवडते गाणे आहे.
--------------------
संपूर्ण धागाच खूप मनोरंजन मूल्य असलेला आहे.
पण मी म्हणते एवढी सुंदर साधना
पण मी म्हणते एवढी सुंदर साधना असताना मकुकडे बघायचंच कशाला? >>> अगदी अगदी. साधना आहाहा.
मनोज कुमार हॅण्डसम नक्कीच
मनोज कुमार हॅण्डसम नक्कीच होता. चेहर्यावर हात मोडमधला नव्हे. वरती काहींनी लिहीले आहे तसेच. तरूणपणीचा - त्याचा भारत होण्याआधीचा - तत्कालीन दिलीप व त्याच्या सर्व क्लोन्सपेक्षा हॅण्डसम होता. पण रोलमुळे तुमचे व्यक्तिमत्त्व आणखी उठून दिसले पाहिजे. त्याच्या रोल्समुळे उलटे झाले
माझा एक कलिग होता मनोज नावाचा
माझा एक कलिग होता मनोज नावाचा. त्याचे माझे जन्मसाल एकच होते. एकदा सहज बोलताना मी त्याला म्हटले माझ्या बाबांनी माझे नाव साधना नटीवरुन ठेवलेय कारण तेव्हा ती खुपच प्रसिद्ध होती. तो म्हणाला माझे नावही मनोजकुमारवरुन ठेवलेय
ट्युलिप यांचा शम्मी
ट्युलिप यांचा शम्मी कपूरबद्दलचा उत्कट प्रतिसाद फारच आवडला.
>>>> १००++. याला प्रतिसाद द्यायचे राहिले होते.
शम्मीच्या एल्विस + रॉक हडसन पर्सनॅलिटीमुळे त्याचे उत्कृष्ट लीप सिंकिंग झाकोळले गेले. अस्मानी आणि नंदिनीच्या शम्मी कपूर पोस्टला जोरदार अनुमोदन.
मनोज कुमार सारखे नट product
मनोज कुमार सारखे नट product of the times होते असे वाटते. आपण आज त्याची खिल्ली उडवत असू पण त्याकाळी तो प्रचंड लोकप्रिय होता.
( माझ्या आईच्या मैत्रीणी नवरा मिळाला नाही पण निदान जावई असावा तर मनोज कुमार/ विश्वजीत/ जॉय मुखर्जी सारखा असावा असे म्हणत)
अवांतर, नासी फडकेंचे एक पुस्तक इतक्यात वाचले. ते एकदा बदोद्याला गेले असताना एका व्याख्यानाला त्यांना यायला चार तास उशीर झाला तरीही लोक बसून होते, त्यावेळी मोबाईल/फोन वगैरेही नव्हते. चार तासांनी ते आले व त्यांनी व्याख्यान दिले. तिथल्या महिलांनी रागारागाने एक पत्र त्यांना लिहिले होते तेही तिथेच त्यांना दिले गेले. आपण आज खिल्ली उडवत असू पण एकेकाळी ते प्रचंड लोकप्रिय होते घे वास्तव आहे.
अवांतर झाले पण आपलीच मायबोली आहे
मनोज कुमार, भरत भूषण, प्रदीप
मनोज कुमार, भरत भूषण, प्रदीप कुमार हे ठोकळे होते असं मागची पिढी अजूनही म्हणते. पण त्या वेळी काही काही सिनेमे ठोकळे घेऊनही चालत असत. काही दिग्दर्शकाच्या नावावर, संगीतकाराच्या नावावर किंवा कथा चांगली म्हणून चालत होते. एव्हढंच कि माझी फिल्लमबाजी मुळे खिल्ली उडवायची कला विकसित झाली. तो पण मनोरंजनाचा प्रकार म्हणून बघितला तर मजा येते.
निर्दोष खिल्ली उडवायची तर पुलं च्या वाटेने जावं लागतं, ते येर्यागबाळ्याचे काम नोहे. त्यांच्या आवाजात पण मार्दव आहे.
काय फरक पडतो ते ठोकळे असले तर
काय फरक पडतो ते ठोकळे असले तर?? आणि आता तरी कितीसे नट अभिनयसम्राट आहेत? आणि ते ठोकळे कोणाच्या तुलनेत?? प्रत्येकाची तुलना अमिताभशीच करायची झाली तर हा त्या बिचार्या नटांवर अन्याय आहे.
आणि ठोकळे वाटले तरी त्यांनी त्यांचा काळ गाजवलेला आहे. देव आनंदच्या नावाशिवाय भारतीय चित्रपटइतिहास अधुरा राहिल पण तो काय् डोम्बल अभिनय करायचा? इतरांच्या दिग्दर्शनात तो थोडेफार चढौतार आवाजात आणायचा व दु:खाच्या प्रसंगात चेहरा जरासा कष्टी करायचा प्रयत्न करायचा पण स्वतःच दिग्दर्शकाची टोपी घातल्यावर त्याने तेवढेही कष्ट घेणे सोडुन दिले. त्याचे एका सुरात बोललेले संवाद ऐकायचे म्हणजे प्रेक्षकांना कष्ट. राजेश खन्नाचेही तसेच. त्याच्या त्या विशिष्ट लकबी केल्या की त्याच्या मते अभिनय केला. त्याचा अभिनय पाहणे म्हणजे शिक्षाच. पण देव आणि राजेशला अभिनयासाठी कोण बघत होते??
बॉलीवुडचा गेल्या १०० वर्षांचा इतिहास पाहिला तर सगळ्यांना मान्य होईल अशा उत्तम अभिनेत्यांची संख्या अगदी खेचुन खेचुन २५ पर्यंत जाईल. हा २५ आकडाही मी सेफ्टी म्हणुन लिहिलाय, मला स्वतःला फारतर सात आठ नावे चटकन आठवतील. त्यापुढे नावे आठवायचे म्हणजे मेंदुला ताण द्यावा लागेल
तेव्हा चित्रपट व नाटक ही करमणुकीची कायमस्वरुपी साधने होती, सर्कस वगैरे करमणुक सिजनल असायची. गाणी ऐकण्यासाठी रेडिओ हीच एकमेव सोय होती, नाहीतर कोपर्यावरचा इराणी. ग्रामोफोन प्रत्येकाला परवडत नसायचे.
त्यामुळे गाण्यांवर बर्यापैकी तोंड हलवता येणारे व संवाद नीट बोलु शकणारे देखणे लोक हिरो-हिरोइन म्हणुन पडद्यावर येत.
आणि एकाच चित्रगृहात सलग २५ आठवडे हाऊसफुल चित्रपट देत. एखादा चित्रपट गाजला की त्या नटाचे लगेच १० चित्रपट येत ज्यातले दोन तिन जरी सुपरहिट झाले तरी पुढच्या दहाची सोय होत असे. आज धडक२ मध्ये उत्तम काम करुनही सिद्धांत चतुर्वेदीला परत अशी संधी कधी मिळेल देव जाणे.
आणि आज सिद्धांतने धडक२ मध्ये जसा अभिनय केलाय तसा मनोजकुमारने हरियाली और रास्ता मध्ये केला असता तर त्याला पुढचे दहा चित्रपट नक्कीच मिळाले नसते. कालानुरुप अभिनयाचे तंत्र खुप बदललेले आहे.
आणि ठोकळे वाटले तरी गाण्याला लिपसिंक करणे व प्रसंगनुरुप चेहर्यावर भाव आणणे वाटते तितके सोपे नाही.
"मनोज कुमार सारखे नट product
"मनोज कुमार सारखे नट product of the times होते असे वाटते" - ह्यातला 'मनोज कुमार सारखे' हा भाग काढला तरी चालेल. कालातीत असं काहीच नसतं. काही गोष्टींचं शेल्फ लाईफ इतरांच्या तुलनेत जास्त कमी/जास्त असतं इतकंच. बर, सगळेच प्रेक्षक काही, 'जाऊ दे, नसेल येत ह्याला/हिला अभिनय, पण तेव्हढच निसर्गसौंदर्य पाहून येऊ, दिग्दर्शनातले बाअरकावे पाहून येऊ, किंवा गाणी ऐकून येऊ' म्हणून सिनेमे पहात नव्हते (आजही पहात नाहीत). तर ह्या कलाकारांचे जेन्युइन फॅन्स सुद्धा होतेच की. व्यक्ती तितक्या प्रकृती. एके काळी राज-दिलीप-देव ह्या त्रिकुटाने हिंदी सिनेमाच्या प्रेक्षकांना भुरळ घातली होती. तेव्हा ही बलराज सहानी पासून ते राजेंद्रकुमार, मनोज कुमार, भारतभुषण, प्रदिपकुमार ह्यांचे सिनेमे आले, चालले, लोकांना आवडले.
साधना छान लिहिलंस.
साधना छान लिहिलंस.
जुन्या अभिनेत्यांबद्दल
जुन्या अभिनेत्यांबद्दल कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. तसे वाटले असेल तर क्षमस्व.
त्यांची अमितभ बच्चनशी तुलना नाही करत. भारत भूषणचे सिनेमे पाहिलेले नसले तरी गाणी पाहिली आहेत. बैजू बावरा मधली गाणी विशेषतः . रफीचा आवाज केव्हढा आर्त आणि टीपेला लागलाय पण भाभू चा चेहरा जराही हलत नाही. त्याच्या चेहर्यावर संत तुकाराम चित्रपटातल्या प्रमाणे " ये बाळ, तू का मागे, घे हा ऊस" असे भाव आहेत.
तसेच भाव नवीन निश्चलच्या चेहर्यावर "तुम जो मिल गये हो" गाण्यात आहेत. हे गाणं तीन वेगवेगळ्या पट्टीत रफी म्हणतो. पण नवीन निश्चल तीनही वेळा निश्चलच. आवाज टिपेला गेल्यानंतर गळ्याच्या शिरा ताणलेल्या दिसाव्यात वगैरे त्याच्या गावीही नाही.
कुहू कुहू बोले कोयलिया या गाण्यात महिपालने तेच केलेले आहे. यांच्या अभिनयासाठी ते चाललेले नाहीत हेच आधीच्या पोस्टमधे म्हटलेय. गाणी, कथा आणि अन्य गोष्टी. सोहराब मोदींपासून नावावर चालवणारे दिग्दर्शक असायचे. स्वर्णसुंदरी जादुई कथा आणि संगीत यामुळे चालला. कलाकार दुय्यम असले तरी चालून जायचे याचे आणखी एक कारण वरच्या साधना यांच्या पोस्टमधे आहे. त्या वेळी लिमिटेड करमणूक असणे.
राभु, कुहु कुहु … मध्ये
राभु, कुहु कुहु … मध्ये दोघेही साउथी आहेत. महिपाल नाही. तो नागेश्वर राव आहे, तिकडचा देव, आपल्या नागार्जुनाचा बाबा आणि ती अंजली देवी.. यांचे खुप साउथी चित्रपट मी पाहिलेत, दु द च्या कृपेने. वयाच्या साठाव्या वर्षीही हा विग व गॉगल लाऊन २० वर्षांच्या हिरोईनींसोबत बागेत बागडलाय.
आणि भा भु बद्दल सहमत. बाकी गाण्यांमध्ये मी त्याला सोडुनच दिलेय पण एका गाण्यासाठी कधीही माफ करणार नाही.
त्याचे मधुबालासोबत दो घडी वो जो पास आ बैठे गाणे पाहा. सिच्युएशन अशी आहे की हिने दोन ओळी लिहुन त्याला द्यायच्या व त्याने त्या गाऊन हिला दोन ओळी लिहुन द्यायच्या ज्या हिने गायच्या (मी हाही चित्रपट पाहिलाय हे वेगळे साम्गायला नकोच
)
तर त्या दोन ओळी खरडुन कागद मधुबालेच्या हातात देताना याची अॅक्टिंग बघा. ती नानाविध विभ्रम करतेय, प्रेमळ कटाक्ष टाकतेय आणि हा???? एवढे प्रेम बरे नाही हा मनाशीच विचार करत कावराबावरा चेहरा करतोय अधुनमधुन
ती नानाविध विभ्रम करतेय,
ती नानाविध विभ्रम करतेय, प्रेमळ कटाक्ष टाकतेय आणि हा???? >>> गाणं बघायचीही गरज नाही. कल्पना करूनच हसायला आलं

एखाद्या गरीबाला पंचपक्वान्नं वाढावीत आणि त्याने शिळी भाकरी खावी तसे चेहर्यावर भाव आणावेत तशीच याची अॅक्टींग असणार. गाणं बघेन आज.
ती नानाविध विभ्रम करतेय,
ती नानाविध विभ्रम करतेय, प्रेमळ कटाक्ष टाकतेय आणि हा???? एवढे प्रेम बरे नाही हा मनाशीच विचार करत कावराबावरा चेहरा करतोय अधुनमधुन >>>
ना तो कारवां की तलाश है
ना तो कारवां की तलाश है
बहुतेक मी याबद्दल आधी कुठेतरी लिहिलंय. पुन्हा तेच लिहित असेन तर क्षमस्व.
या गाण्यात सुरुवातीला मन्ना डे ने ज्या उस्तादला आवाज दिलाय, त्याचे हावभाव ठिकठाक आहेत. त्यापेक्षा त्याच्या बाजूला बसलेला शागीर्द भाव खाऊन जातो. गाणं नीट बघा.
पुढे त्या कव्वाली संघर्षात महिला वर्गाचा पराभव होतो की काय असं वाटत असताना त्यांची बाजू उचलून धरायला भारत भूषण धावून येतो. त्याला मोहम्मद रफीने आवाज दिलाय. रफी एकेक वरचे वरचे स्वर लावत शिरा ताणेपर्यंत गातो. भा भू दगड तो दगडच. तिकडे मधुबाला घरी बसून तो कार्यक्रम ऐकत असते. रफीचा आवाज ऐकून ती चकित होते आणि धावत तिकडे येते. तिकडे भर गानसभेत ती चक्कर येऊन कोसळते असा सीन आहे. ते पाहताना माझी तरी अशी समजूत झाली की रफीचा आवाज जेव्हा तिला ऐकू येतो, तेव्हा इतका मधुर स्वर्गीय आवाज कुणाचा आहे या विचाराने ती मैफिलीच्या ठिकाणी आकृष्ट होते. सैरभैर होऊन त्या अप्रतिम आवाजाने भारलेल्या अवस्थेत ती तिथे येते आणि बघते तर काय! ज्या थोबड्याला हा आवाज दिला गेलाय, ते थोबाड भारत भूषण नावाच्या ठोकळ्याचं आहे. "आयरनीच्या देवा!" असं मनातल्या मनात पुटपुटत ती तो धक्का सहन न होऊन बेशुद्ध पडून कोसळते.
हेहे हपा…. मस्त कल्पनाविलास..
हेहे हपा…. मस्त कल्पनाविलास..
असे नाहीय पण.
असं नाहीये??? अरेरे!
असं नाहीये??? अरेरे!
तसे लिहायचा मोह नटाचे नाव
तसे लिहायचा मोह नटाचे नाव पाहुन संबंधितांना झाला असेलही पण फायनान्सरने आवरले असणार
आले आले, नेहमीचे ठरलेले विनोद
आले आले, नेहमीचे ठरलेले विनोद आले. बर्याच गॅपनंतर आले. दो घडी वो जो पास आ बैठे या गाण्यात भारतभूषण कवी आहे. त्याची कविता अडली आहे. दोन गुंडांपासून जीव वाचवत पळणारी मधुबाला तिथे येते आणि त्याच्या कवितेची सोडवणूक करते. तो कवितेत अडकला असल्याने तिच्याकडे पाहतही नाही. आणि म्हणूनच कदाचित तिचा जीव त्याच्यावर येतो.
दुसर्या एका धाग्यात निघालेल्या चर्चेवरून - चित्रपटगीत हे टीमवर्क आहे. गीतकार, संगीतकार, गायक, वाद्यवृंद मग त्याचं चित्रीकरण करणारे अभिनेते, दिग्दर्शक , नृत्यदिग्दर्शक हे आपापल्या परीने त्यात भर घालतात. यात बहुतेक वेळा चित्रपटाची कथा पुढे जाणे अपेक्षित असते. या गाण्याचं चित्रीकरण करताना त्या मंडळींना ते झेपेल का नाही, हा विचार संगीताची बाजू सांभाळणारी मंडळी करतीलच असं नाही.
भारतभूषणने गळ्याच्या शिरा ताणायची गरज त्याला, त्याच्या निर्माता दिग्दर्शकांना, प्रेक्षकांना वाटत नसेल. गाण्याचा आनंद घेण्यात त्यांना काही बाधा येत नसेल.
ओ पी नय्यर - आशा यांची दोन गाणी आहेत (भरपूर आहेत - या दोनबद्दल आता लिहितो.) मैं शायद तुम्हारे लिए अजनबी हूं आणि जाइए आप कहाँ जाएंगे. दोन्ही गाण्यात आलापी आहे, कठीण आहे. तिचं चित्रीकरण कसं केलं एवढ्यासाठी मी ती गाणी मुद्दाम पाहिली. जाइए आप मध्ये आशा पारेखच्या फॉल्स आयलॅशेसनी अधिक लक्ष वेधलं. शर्मिला चांगली अभिनेत्री असूनही मैं शायद मध्ये अवघडलेली वाटली. चित्रपटातला प्रसंग माहीत नाही.
शिरीष कणेकरांचे विनोद वाचायचो तेव्हा चांगले वाटायचे. त्यांनी स्टँड अप कॉमेडी सुरू केली होती. ते कार्यक्रम कधी जाऊन पाहिले नाहीत. पण इंटरनेट आल्यावर दिसले. तर लहान मुलाला जबरदस्तीने घास भरवावे, तशी त्यांची डायलॉग डिलिव्हरी वाटली. प्रेक्षकांना कळणार नाही म्हणून भरपूर हॅमरिंग केलेलं. अभिनयाच्या बाबतीत यालाच hamming म्हणत असावेत. आणि चित्रपट अभिनेत्यांवर लिहून या माणसाने करियर केलं.
भाभू हा माणूस गेल्या जन्मात
भाभू हा माणूस गेल्या जन्मात संत , पुण्यात्मा असावा. म्हणूनच त्याला नायिका म्हणून मधुबाला आणि चांगली गाणी मिळाली. मला तर आता तो इतका चांगला अभिनेता वाटू लागला आहे कि दिलीपकुमारला का अभिनयाची शाळा म्हणायचे हे समजेनासे झाले अहे. प्यासा मधे भाभू असता तरीही त्याचा इफेक्ट तोच असता. मुघल ए आझम मधे पृथ्वीराज कपूरच्या जागी भाभूलाच घ्यायला हवं होतं म्हणजे दिलीपकुमार फिका पडला असता. अभिनय काय असतो हे त्याला समजलं असतं.
पूर्वीचे प्रेक्षक कनवाळू होते किंवा धार्मिक. जेवायच्या वेळी दारात याचक आला तर मग ते कुत्रं का असेना त्याला घास भरवत होते. तसंच काही अभिनेत्यांचा सिनेमा ते चालवून घेत होते. आताचे लोक भयंकर पापी. विनोदाच्या नावाखाली नुसता छळ मांडलाय सर्वांचा. कुणीही उठतं आणि स्पूफवर आपलं पोट भरतं.
बाबू संपूर्णेशला तर फासावर लटकवलं पाहीजे. बिचार्या सर्वगुणसंपन्न दाक्षिणात्य सिनेमांचा केव्हढा अपमान केलाय.
दो घडी वो जो पास आ बैठे या
दो घडी वो जो पास आ बैठे या गाण्यात भारतभूषण कवी आहे. त्याची कविता अडली आहे. दोन गुंडांपासून जीव वाचवत पळणारी मधुबाला तिथे येते आणि त्याच्या कवितेची सोडवणूक करते. तो कवितेत अडकला असल्याने तिच्याकडे पाहतही नाही. आणि म्हणूनच कदाचित तिचा जीव त्याच्यावर येतो.>>>
सहमत आहे. त्या परिस्थितीत भा भू चे भाव योग्य आहेत. हे नुकत्याच भेट झालेल्या व्यक्तींमधील गीत आहे. प्रियकर आणि प्रेयसीमधील नाही. कुठल्यातरी एका वेबसाईटवर हिंदी गाण्यांची एक यादी होती, ज्यात context माहिती नसेल तर गैरसमज होऊ शकतो. त्यात हे गाणं आहे. अजून अशी काही गाणी म्हणजे 'मंझिल वही है प्यारकी' कठपुतली मधलं, 'नानी तेरी मोरनी को मोर ले गये', 'महलोंका राजा मिला'. अजूनही आहेत काही.
भा. भू. ने घूंघट चित्रपटात तसे बरे काम केले आहे. त्यात त्याला एकही गाणे नाही
टागोरांच्या नौकाडूबी कथेवर आधारित हा चित्रपट आहे.
“ चित्रपट अभिनेत्यांवर लिहून
“ चित्रपट अभिनेत्यांवर लिहून या माणसाने करियर केलं.” - जेव्हा माहितीपर लिहिलं, लिहिता-लिहिता सहज विनोद केले तेव्हा छान वाटलं. पण बळजबरीनं विनोदाचा अभिनिवेश म्हणून लिहिलं तेव्हा त्यातून आत्मप्रौढी जाणवली. ते विनोद सुद्धा कट्ट्यावरच्या कुचाळक्यांसारखे वाटले.
फारएण्ड ने पण लिहिले होते कि
फारएण्ड ने पण लिहिले होते कि कणेकरांचा विनोद निर्मळ नाही तेव्हां ते पटलं होतं. पण आता इथल्या चर्चेत त्यांचा संदर्भ कळला नाही. इथे जे विनोद होतात ते तसे आहेत का ? दिलीपकुमार हा ओव्हरहाईप्ड अभिनेता आहे (अन्यही काही अभिनेते) अशी मतं व्यक्त इथे कॅज्युअली होतातच की. खरं तर थेट्रीकल अभिनयातून बॉलीवूडची सोडवणूक करण्याचं श्रेय त्याच्या कडे जातं ( काही प्रमाणात अशोक कुमार सुद्धा). त्याच बरोबर लार्ज दॅन लाईफचा दोषही त्याच्या कडे जातो. त्याच्या काळात त्याच्यासारखा अभिनेता नव्हता हे खरंच आहे. रणधीर कपूरने एकदा सांगितलंय कि राज कपूरने स्वतः त्याला दिलीप कुमारचे काही सिनेमे पाहून अभिनय शिकायचा सल्ला दिला होता.
मग भारत भूषण, प्रदीपकुमार, मनोज कुमार यांच्या अॅक्टींग स्किल वर थोडे फार विनोद झाले तर का खटकतं हे कळलं नाही. त्यांचे सिनेमे चालले म्हणून ते ग्रेट अभिनेते ठरतात का ? समजत नाही. जे इथे त्यांच्या वर विनोद करतात त्यांच्या आ जूबाजूला जुने लोक नसतील का ? ते स्पेस मधून आलेत का ? मी स्वतः या अभिनेत्यांचे सिनेमे पाहिलेल्यांच्या तोंडून ठोकळा हा शब्द ऐकलेला आहे. म्हणजेच ते काही त्यांच्या अभिनयासाठी जात नव्हते. वर साधना यांची मस्त पोस्ट आहे.
राजकारणाच्या धाग्यावर नेत्यांबद्दल ज्या टिप्पण्या होतात त्या कदाचित निर्मळ असतील. त्यापासून शिकावे असा काही संदेश आहे का ?
राजकारणावर प्रत्येकाला आपापली मतं असतात. पण ती कुठे आणि कशी व्यक्त करावीत हा ज्याचा त्याचा कंफर्ट झोन असतो. गदारोळात नको वाटतं. तिथे काही जण व्यक्त न होणार्यांना टोमणे मारतात. तिथे व्यक्त व्हायचं नाही म्हणून चित्रपट हे एकच क्षेत्र उरले असल्याने इथे जास्त व्यक्त होता येतं. इतकंच आहे.
मला काणेकरांचा विनोद आवडायचा.
मला कणेकरांचा विनोद आवडायचा. कदाचित माझं वाचन कमी आहे, त्यामुळे माझ्यासाठी ते विनोद हे नेहमीचे नव्हते. फक्त उपहास करताना एक संतुलन ठेवणं आवश्यक आहे, ते पुढे पुढे त्यांना जमलं नाही. पुढे अती झाल्यामुळे किंवा त्यांच्या वयोमानानुसार त्या उपहासातला विनोद कमी आणि खत्रुडपणा वाढत गेला. मग मजा येईनाशी झाली. त्यांची पुस्तकं वाचायला अजूनही चांगली वाटतात.
कणेकर लेट एटिज मधे सॉलिड
कणेकर लेट एटिज मधे सॉलिड पॉप्युलर होते. क्रिकेट्/चित्रपटांवर लिहिण्याची त्यांची एक खास शैली होती. त्यावेळी स्टँडप हि करायचे क्रिकेटवर, आता नांव आठवत नाहि. तेंडल्या पाकिस्तानची पहिली टुर करुन आल्यावर कणेकरांनी त्याला शिवाजी मंदिरात स्टेजवर बोलावल्याचं आठवतंय. तेंव्हा तेंडल्याने अब्दुल कादिरचा किस्सा सांगितलेला. मला आवडायची त्यांची शैली. पुढे ती बर्याच जणांनी कॉपी केली.. संझगिरी पकडुन...
< थोडे फार विनोद झाले तर का
< थोडे फार विनोद झाले तर का खटकतं हे कळलं नाही.> याआधीही अन्यत्र - बहुतेक चित्रपट कसा वाटला वर लिहिलंय. हे विनोद फार प्रेडिक्टेबल , cliched आणि कंटाळवाणे झाले आहेत. म्हणजे यांतल्या कोणाच्या चित्रपटाचा , गाण्याचा उल्लेख आला आणि विनोद केला नाही , तर तो प्रतिसाद सेव्ह होत नाही की काय असं वाटू लागलंय.
म्हणाजे राजकारणाच्या धाग्यावर
म्हणाजे राजकारणाच्या धाग्यावर जसे नावीन्यपूर्ण आणि चैतन्यपूर्ण प्रतिसाद असतात तसा अदर्श घेणे गरजेचे आहे. लोकांनी असे धागे इग्नोर करू नयेत कारण त्यात खटकण्यासारखं आणि मुद्दामून तिथे जाऊन सांगण्यासारखं काही नसतं. प्रतिसाद सेव्ह करण्यापूर्वी काही जणांकडून सेन्सॉर करायची प्रथा सुरू व्हावी.
हपा, कणेकर मला आवडायचे.
हपा, कणेकर मला आवडायचे.
फारेण्डच्या प्रतिसादामुळे त्यांचा उद्धटपणा जाणवला.
Pages