हा धागा अशा लोकांकरता आहे ज्यांना भविष्य सांगण्याचे विविध प्रकार हे चूक आहेत आणि समाजाकरता हानिकारक आहेत याची जाणीव आहे (हे लोकच चूक आहेत का याबद्दलचा वाद इथे अपेक्षित नाही - त्या करता इतर जागा आहेत). अंधश्रद्धा इतरही अनेक प्रकारच्या असतात, आणि या ना त्या प्रकारे समाजाला हानिकारक असतात. अशा गोष्टिंचा विचार येथे केला जावा.
जन्म व मृत्यु या दोन बाबतीत मनुष्य जास्त आगतीक असतो. त्यामुळे त्या दोन गोष्टिंभोवती सर्वात जास्त वलये निर्माण केल्या जातात. आपण मृत्युपासुनच सुरुवात करु या. नंतर इतर गोष्टि येतीलच.
नरेंद्र दाभोलकर यांच्या भ्रम आणि निरास या पुस्तकाचे परिशिष्ट आहे नार्वेकर गुरुजींचे मृत्युपत्र. ते येथे दिले आहे. (धन्यवाद प्रकाश घाटपांडें). त्या अनुषंगाने संभाषण सुरु करु शकु.
https://docs.google.com/file/d/0B2X6bSru0D7IYmt3bjNTYU9ZbWs/edit
(२३ नव्हेंबर २००९ च्या पोस्ट वरुन):
अशाप्रकारे स्वतःशिवाय सर्व गोष्टींना माया ठरविल्यावर तुम्हि करत असलेल्या गोष्टींना खालील प्रकारांमध्ये विभागा (१) आवश्यक (२) अनावश्यक (उदा. एखादी सवय किंवा कृती) - पण घरच्यांना, कुटुंबियांना, देश- व पृथ्विवासियांना त्यामुळे त्रास होत नाही (३) अनावश्यक, आणि शक्य आहे की स्वत:ला थोडि त्रासदायक, पण इतरांना (आप्तांना, किंवा अनेक गरजुंना) उपयोगी आणि (४) अनावश्यक.
स्वत:च्या मनःशांतीकरता कुणी पुजा करत असेल, आणि ते आवश्यक आहे असे वाटत असेल, आणि त्यामुळे कुणाला त्रास होत नसेल तर ते आवश्यक मध्ये येईल. पण त्यामुळे दुसर्यांनी अशी पुजा करावी आणि तशी करु नये असे म्हंटल्यास ते अनावश्यक मध्ये जाईल. त्याचप्रमाणे पुजेकरता एका फुलाऐवजी १००० endangered फुलांचा हार लागतो असे म्हंटल्यास तेही अनवश्यक.
वरील विभागणी योग्य वाटते का? त्यामध्ये काही बदल करावे लागतील का? कसे? ही विभागणी स्थिरस्त्वार झाली की मग पुढे जाता येईल.
(सप्टेंबर २०१४ मध्ये पुढे आलेले काही वैयक्तिक लढे) :
विश्वास नसल्यामुळे मुलाची मुंज न करणं, मृत्युनंतरचे विधी न करणं, सत्यनारायण न करणं, दृष्ट काढण्याची जबरदस्ती न करु देणं, मासीक पाळी असल्यामुळे डिस्क्रिमिनेट न करु देणं (हे सर्व फार त्रोटक झालं - त्या लोकांच्या भावना पोचण्यासाठी त्यांच्याच पोस्ट वाचाव्या).
एखाद्या गोष्टीवर माझी श्रद्धा
एखाद्या गोष्टीवर माझी श्रद्धा आहे म्हणजे मला काहीतरी वाटते आहे या अर्थाने श्रध्दा आणि त्याच बरोबर अंधश्रध्दा म्हणजे आनंद, लोभ, प्रेम, मोह, माया, प्रीती, भक्ती यांसारख्या मानवी भाव-भावनाच ना? मानवी भावनांची मोजणी सध्याच्या शास्त्रानुसार करता येते का? म्हणजे त्याचे प्रमाण परिमाण आहे का? भावनेची लांबी, रुंदी, उंची, खोली, तीव्रता मोजता येते का? का ती व्यक्तीसापेक्षच असते?
व्यक्तिसापेक्ष असावी. पण,
व्यक्तिसापेक्ष असावी.
पण, श्रद्धा ठेवणे, 'फेथ' या शब्दांत ज्या व्यक्ती/कल्पनेवर श्रद्धा ठेवायची, तर तिच्याबद्दल कोणतीही शंका उपस्थित करणे अलाऊड नाही, अशा स्टेजला यावे लागते.
ज्याक्षणी प्रश्न विचारायची ही क्षमता, स्वायत्तता आपण स्वतःहून घालवून बसतो, 'सरेंडर' करतो, त्याक्षणी ती अंधश्रद्धा होते. ब्लाईंड फेथ होते.
हर्पेन यापैकी कुठल्याही
हर्पेन
यापैकी कुठल्याही गोष्टीची व्याख्या बनवणे जे संकटाला आमंत्रण आहे. तरतमभाव - सध्या यावरच भर द्यावा.
<<<<<<हीच गोष्ट राम कृष्ण
<<<<<<हीच गोष्ट राम कृष्ण ह्यांच्याबद्दलही खरी आहे. त्यांना आपन पाहिले नाही. अनादिन काळ उलटून गेला मानवजात त्यांची पुजा करते. पण बुद्धीला प्रमाण मानणार्या लोकांना राम कृष्ण ह्या व्यक्ती काल्पनिक वाटतात>>>>>>. राम कृष्ण ह्या व्यक्ती काल्पनिक होत्या कि नाहि माहित नाहि. पन त्यांच्या मंदिरात जाऊन त्यांना दान दक्षिणा देने त्यांना मला हे दे ते दे ,माझ्या साठि हे कर ते कर म्ह्नुन याचना करने पुजाकरने बरोबर आहे का?
जो स्वता राजा होता रामराजा तो तुमचि दान दक्षिणा घेइल कि पुजारि घेइल ज्यानि स्वता राज पाट सोडुन वनवास स्विकारला त्याला तुमच्या दान दक्षिणाचि काय गरज.
तुम्हि रामाला हात जोडून म्ह्नु शकता मला तुझ्या सारखे बनु दे.जे दोघे भाऊ राजपाट नको म्ह्नुन भांडले तसे गुन माझ्या मधे येउदेत
आजकालचे भाउ भाऊ रामाचि पुजा पन करतात आनि राज पाट साठि एकमेकांचा जिव पन घेतात.
आपन स्वता रामाला आपल्यात स्थापित करुन राम बनु शकतो.त्यासाठि रामाचि पुजा करायचि काय गरज
कष्टचे धन पुजार्याला देऊन त्याला एतखाऊ आपन बनवतो. म्हनुन अंधश्रद्धा पसरावायला त्याना भरपुर वेळ मिळतो.
सुबोध जावडेकरांच्या मेंदुच्या
सुबोध जावडेकरांच्या मेंदुच्या मनात या पुस्तकातील अंधश्रद्धा आणी मेंदुविज्ञान हे प्रकरण वाचा. याचा उल्लेख मी वर एका प्रतिसादात केला होता.
https://drive.google.com/file/d/0B2X6bSru0D7IelpEbU5RcTRGQTA/edit?usp=sh...
>>पण, श्रद्धा ठेवणे, 'फेथ' या शब्दांत ज्या व्यक्ती/कल्पनेवर श्रद्धा ठेवायची, तर तिच्याबद्दल कोणतीही शंका उपस्थित करणे अलाऊड नाही, अशा स्टेजला यावे लागते.
ज्याक्षणी प्रश्न विचारायची ही क्षमता, स्वायत्तता आपण स्वतःहून घालवून बसतो, 'सरेंडर' करतो, त्याक्षणी ती अंधश्रद्धा होते. ब्लाईंड फेथ होते.<<
इब्लिस च्या या मताशी सहमत आहेच. काही लोक अंधश्रद्धा मस्त एन्जॉय करतात ब्वॉ! ठार अश्रद्ध व नास्तिकांना ते एन्जॉय करता येत नाही. सुप्रसिद्ध साहित्यिक विजय तेंडुलकर एकदा म्हणाले होते ," माणुस अंधश्रद्ध असतो कारण अंधश्रद्ध असणे ही त्याची गरज असते." ( संदर्भ - तिमिरातून तेजाकडे पृष्ठ ३८४ ले. नरेंद्र दाभोलकर) मला वाटत होनी-अनहोनी ही अंधश्रद्धेने भरलेली सिरियल दुरदर्शनने त्यावेळी ( ९०-९१ च्या आसपास) दाखवली होती त्यावेळी अंनिसने निदर्शने केली होती.. हे शिरीयल /शिनेमेवाले असल्या गोष्टीतुन लई कमावतात.
असो हा विषय अनादि कालापासून आहे व अनंत काळापर्यंत तो चालत रहाणार आहे.कालानुरुप बदल फक्त होत राहतील.
<<<< भावनेची लांबी, रुंदी,
<<<< भावनेची लांबी, रुंदी, उंची, खोली, तीव्रता मोजता येते का? का ती व्यक्तीसापेक्षच असते? >>>>>
भावना निर्माण करणारे हार्मोन्स व न्युरोट्रान्समीटर्स यांची मात्रा मोजून भावना मोजणे शक्य होयील काय याबद्दल मला कुतूहल आहे. पण हा मुद्दा या धाग्यावर कदाचित अवांतर ठरेल. आक्षेप असल्यास क्षमस्व.
<<<< आपल्याकडील काही बखरी
<<<< आपल्याकडील काही बखरी आहेत ज्या मधे महाराजांना चेटूक येत होते, म्हणून ते औरंगजेबाच्या पहार्यातून निसटले, त्यांना काळी जादू येत होती असे उल्लेख आहेत. मोगल कालीन, ब्रिटिश आणि आपल्याकडील सभासदाची बखर यामूळे आपल्याला नीट ईतिहास ठावूक आहे. त्या बखरी नसत्या तर महाराजांना विष्णुचा कितवा तरी अवतार म्हणून मानले गेले असते कदाचित. >>>>>
अगदी योग्य.
अश्या ठिकाणी सत्य व असत्य यांचे मिश्रण झाल्यामुळे सर्व मिश्रानालाच एकतर असत्य किंवा चमत्कार म्हंटले जाते. दुर्दैवाने मग पुढच्या पिढ्यांना त्यातील सत्याच्या भागापासून वंचित राहावे लागते. कारण त्या मिश्रणातून सत्य शोधून काढणे कठीण होवून बसते.
PeTA activist Benazir goes
PeTA activist Benazir goes underground, logs out of FB & Twitter
एखादी व्यक्ती त्याच्या
एखादी व्यक्ती त्याच्या आयुष्यातल्या तरूणपणी कट्टर नास्तिक होती आणि मग म्हातारपणाकडे वाटचाल करता करता आस्तिक / सश्रद्ध झाली किंवा याउलट झाले अशी उदाहरणे नाहीत का कुणाच्याच बघण्यात ? त्यांना काय म्हणावे?
लोकशाही तत्वानुसार आपापली मते मांडणे याचे स्वातंत्र्य आपल्याला असते तसेच जनसमूहातल्या अधिकतर व्यक्ती एक सारख्या भावना दर्शवित असतील तर त्या मताधिक्याला शरण अगदी नाही तरी गेले तरी आदरही व्यक्त करायला हवा(च) का !
ठासून परस्परविरोधाने भरलेल्या दांभिक मानवी जीवनात पूर्णतः सश्रद्ध किंवा अंधश्रद्ध असे कोणी असू शकेल का?
मला स्वत:ला मी किती सश्रद्ध:/ अंधश्रद्ध आहे हे शास्त्रीय दृष्ट्या तपासून बघायचे आहे, अशी सोय आहे का कुठे?
एखादी व्यक्ती त्याच्या
एखादी व्यक्ती त्याच्या आयुष्यातल्या तरूणपणी कट्टर नास्तिक होती आणि मग म्हातारपणाकडे वाटचाल करता करता आस्तिक / सश्रद्ध झाली किंवा याउलट झाले अशी उदाहरणे नाहीत का कुणाच्याच बघण्यात ?>>>>>
मला वाटते अरविंद केजरीवाल हे नास्तिक होते.. निवडणुकीच्या दरम्याने ते आस्तिक झाले..आता राजीनाम्यानंतर त्यांचे करंट स्टेटस काय आहे कल्पना नाही.
ज्या व्यक्ती/कल्पनेवर आपन
ज्या व्यक्ती/कल्पनेवर आपन श्रद्धा ठेवायतो तस आपल वागन आसत का?
चार तास बसुन रामनाम जप करायचा रामभक्त म्हनुन घ्यायचे आनि भावालाच घाराबाहेर हकलुन द्यायचे
अश्या रामभक्तिचा ऊपयोग आहे का?
जे बुवा, बाबा, साधु, महाराज संसार धन दोवलत मिथ्या माया म्हनतात तेच महागडे कपडे घालतात महागड्या गाड्यात फिरतात आनि हे एकायला आपन तिकिट काढुन जातो .हा विरोधाभास नाहि का?
अश्या लोंकावर विश्वास ठेवने श्रध्दा कि अंधश्रध्दा?
Harpenji Atha deepa bhava
Harpenji
Atha deepa bhava
राजेशजी, तुमच्या ह्या
राजेशजी, तुमच्या ह्या उत्तरावर माझे उत्तर देत आहे "असेच काही नाही. जर शिवाजी महाराजांना एक मनुष्य म्हणूनच चित्रित करण्यात आले तर अविश्वास दाखविण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्या जोडीला अनेक शिवकालीन पुरावे (पत्रे, मुद्रा, त्यांचे काढलेले चित्र, ब्रिटीश वर्तमानपत्रात त्यांच्यावर लिहिलेला मजकूर, ई.) दाखवले जातीलच.
पण जर कोणी अवास्तव (विशेषतः पुराव्याविना ) चित्रण केले (त्यांना ८ हाथ होते; त्यांच्या एका दृष्टीक्षेपाने हजारो सैनिक मृत होत असत) तर मात्र ते लोक यावर विश्वास ठेवणार नाहीत."
राजेशजी, माझा एक मित्र शिवाजी महाराजांना भवानी देवीने तलवार दिली होती ह्यावर विश्वास ठेवत नाही. देव नाही म्हणून तलवार नाही. तो प्रसंग नाही आणि मग शिवाजी राजे वगैरे सर्व तद्दल खोटे आहे असे तो म्हणतो. हीच गत संत ज्ञानेश्वरांबद्दल सांगतो. रेड्याच्या तोंडून वेद पठण होणे, भिंत चालवून दाखवणे, १८ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणे हे सर्व त्याला तद्दल काल्पनिक वाटते. म्हणून ज्ञानेश्वर देखील झाले नाहीत.
म्हणून तुम्हाला मी म्हणतो, ५००० वर्ष हा काळ खूप मोठा आहे. जे शिवकालिन पुरावे तुम्ही म्हणता आहात ते एकतर तोवर टिकणार नाहीत आणि टिकलेच तर तत्कालिन समाज त्या पुराव्यांवर विश्वास ठेवणार नाही.
शेवटी तात्पर्य काय, की पृथ्वीचे वय आता साडे चार बिलियन आहे. ह्या साडे चार बिलियन वर्षात काय काय घडले हे तिलाच ठावूक झाले. अनेक पांडव गुंफा सापडल्या आहेत ह्यावर आजच्या पिढीचा विश्वास नाही. म्हणून राम नाही. कृष्ण नाही. कुठलाच देव बिव नाही. जे काही आहे ते फक्त विज्ञान आहे. कारण, विज्ञान दाखवून देते खरे काय आणि खोटे काय. जे विज्ञानाने सिद्ध केले नाही ते असूच शकत नाही.
मी इथे नासाने राम सेतूचे
मी इथे नासाने राम सेतूचे अवकाशातून जे चित्र पाठवले ते डकवतो आहे. नासाने राम सेतू होता असे सिद्ध केले मग राम होता हे मान्य करायला काय झालं? हा एक पुरावा पुरेसा नाही का??
<<<<अंधश्रध्दा म्हणजे आनंद,
<<<<अंधश्रध्दा म्हणजे आनंद, लोभ, प्रेम, मोह, माया, प्रीती, भक्ती यांसारख्या मानवी भाव-भावनाच ना? >>>
माझ्या मते याला अंधश्रध्दा म्हनता येनार नाहि.
बी हाच प्रॉब्लेम असतो
बी हाच प्रॉब्लेम असतो अंधश्रद्धेचा. चला एक ते स्ट्रक्चर समुद्रात आहे हे मान्य केले . तर त्याने नक्की काय सिद्ध होईल ? तो रामायणासंबंधातील तमाम आख्यायिका, सोम्या गोम्याने अॅड केलेल्या अचाट चमत्कारांचा पुरावा ठरतो का? तसेच शिवाजी राजे होऊन गेले हे मान्यच कारण ऐतिहासिक दस्तावेज (आत्ता तरी) अव्हेलेबल आहेत. पण त्याने देवी भवानीचे अस्तित्व कसे सिद्ध होईल ?? गोवर्धन पर्वत आताही अस्तित्वात असेल तर बालकृष्णाने तो उचलल्याचे सिद्ध होते का?
नासाने राम सेतू होता असे
नासाने राम सेतू होता असे सिद्ध केले
???
नासाने राम सेतू होता असे सिद्ध केले??

म्हणजे नक्की काय केले?
गूगलने पाठवलेला हिमालय पर्वताचा फोटो डकवतो खाली,
अन सांगतो, की गूगलने हिमालय पर्वत होता हे सिद्ध केले, म्हणून हिमालयाची कन्या पार्वती होती हे आपोआप सिद्ध होते.
तर, हे माझे म्हणणे बरोबर ठरेल काय?
बी, महाराष्ट्रातल्या डोंगर
बी, महाराष्ट्रातल्या डोंगर दर्यातल्या बहुतेक प्रत्येक गुहेला पांडवलेणी म्हणतात. लोकांचा विश्वास आहे की ती लेणी पांडवांनी खोदली. पुरातत्वशास्त्रज्ञांनी कित्येक लेणी बौद्ध, जैन धर्मीय साधकांनी कोरले असे संशोधनाअंतीसिद्ध केले आहे, या लेण्यांचे जन्मकाळ सिद्ध केले आहेत (उदा समजा की इस. १२५० वगैरे). आता बहुसंख्य लोकांचा विश्वास आहे म्हणुन सर्वांनीच असे मानायचे का की ही लेणी पांडवांनी खोदली आहेत? की जे विविध पुराव्यांनिशी (पडताळून पाहता येण्याजोग्या) सिद्ध झाले आहे ते प्रमाण मानायचे? उद्या समजा जी अभ्यासपद्धती/पुरावे या शास्त्रज्ञांनी वापरले ते अयोग्य ठरले तर बुद्धीप्रामाण्यवादी ते मान्य करून नवीन संशोधन आत्मसात करतील.
आता याचे तू दोन अर्थ लावू शकतोसः ही लेणी पांडवांनी खोदली नाहीत असे सिद्ध झाल्याने पांडव काल्पनिक आहेत हे सिद्ध होते.
ही लेणी पांडवांनी खोदली नाहीत ह्या सिद्धतेने पांडव खरे की काल्पनिक यातले काहीच सिद्ध होत नाही. तो स्वतंत्र विषय आहे.
आता हेच तू वरच्या शिवाजी महाराज व भवानी तलवारीशी जोडून बघ.
नासाने रामसेतू होता असे सिद्ध
नासाने रामसेतू होता असे सिद्ध केलेले नाहीये. लिंक;
http://www.financialexpress.com/news/nasa-debunks-ram-sethu-myth-/207424
रच्याकने, त्या फोटोत
रच्याकने, त्या फोटोत पाकिस्तानातलं गुजरात दिसतंय बर्का
> एखादी व्यक्ती त्याच्या
> एखादी व्यक्ती त्याच्या आयुष्यातल्या तरूणपणी कट्टर नास्तिक होती आणि मग म्हातारपणाकडे वाटचाल करता करता आस्तिक / सश्रद्ध झाली किंवा याउलट झाले अशी उदाहरणे नाहीत का कुणाच्याच बघण्यात ? त्यांना काय म्हणावे?
> लोकशाही तत्वानुसार आपापली मते मांडणे याचे स्वातंत्र्य आपल्याला असते तसेच जनसमूहातल्या अधिकतर व्यक्ती एक सारख्या भावना दर्शवित असतील तर त्या मताधिक्याला शरण अगदी नाही तरी गेले तरी आदरही व्यक्त करायला हवा(च) का !
> ठासून परस्परविरोधाने भरलेल्या दांभिक मानवी जीवनात पूर्णतः सश्रद्ध किंवा अंधश्रद्ध असे कोणी असू शकेल का?
> मला स्वत:ला मी किती सश्रद्ध:/ अंधश्रद्ध आहे हे शास्त्रीय दृष्ट्या तपासून बघायचे आहे, अशी सोय आहे का कुठे?
हर्पेन, हे प्रश्न महत्वाचे आहेत. यांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करीन.
पांडव गुंफा ह्या बौद्ध लेन्या
पांडव गुंफा ह्या बौद्ध लेन्या आहेत.बुद्धाच्या प्रतिमा दगडात कोरल्या होत्या म्ह्नुन त्याचि प्रतिमा कुनि विक्रुत करु शकले नाहि { हात पाय वाढ्वुन}ते माणसा सारखेच दिसतात.आडिच हजारवर्षे झालि बुद्धा ना होऊन आपल्या देषापेक्षा शेजारिल देशात त्याचि पाळेमुळे खुप खोलवर रुजलेलि आहेत.मोदिसाहेब आत्ताच जाऊन आले या देषां
मध्ये.शिवाजी महाराजांचा इतिहास हि असाच टिकनार आहे.कुनाचा मित्र म्ह्नाला म्ह्नुन इतिहास बदलनार नाहि किंवा प्रतिमा बदलनार नाहि
कल्पना करा Chhatrapati Shivaji Terminus च्या पुतळ्याला कुनि बदलन्याचा प्रयत्न केला तर काय होइल.
अशि शेकडो पुतळे आहेत भारतात. पुजा करन्यासाठि नव्हे तर प्रेरना घेन्यासाठि .
<रेड्याच्या तोंडून वेद पठण
<रेड्याच्या तोंडून वेद पठण होणे, भिंत चालवून दाखवणे, १८ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणे हे सर्व त्याला तद्दल काल्पनिक वाटते. म्हणून ज्ञानेश्वर देखील झाले नाहीत>
"म्हणून ज्ञानेश्वर देखील झाले नाहीत" हे वाक्यही मित्राचंच का?
गण्या - संकटाला आमंत्रण होईल
गण्या - संकटाला आमंत्रण होईल म्हणून व्याख्या बनवायच्याच नाही का? तरतमभाव म्हणजे नक्की काय?
अथ दीप भव म्हणजे नक्की काय भव?
आश्चिग - हवा तितका वेळ घ्या, मी वाट पाहीन.
बी जी, <<<<< राजेशजी, माझा एक
बी जी,
<<<<< राजेशजी, माझा एक मित्र शिवाजी महाराजांना भवानी देवीने तलवार दिली होती ह्यावर विश्वास ठेवत नाही. देव नाही म्हणून तलवार नाही. तो प्रसंग नाही आणि मग शिवाजी राजे वगैरे सर्व तद्दल खोटे आहे असे तो म्हणतो. हीच गत संत ज्ञानेश्वरांबद्दल सांगतो. रेड्याच्या तोंडून वेद पठण होणे, भिंत चालवून दाखवणे, १८ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणे हे सर्व त्याला तद्दल काल्पनिक वाटते. म्हणून ज्ञानेश्वर देखील झाले नाहीत. >>>>>>
गम्मत म्हणजे तुमच्या या आक्षेपाचे उत्तर मी तुमचा आक्षेप यायच्या अगोदरच दिले आहे. (निव्वळ योगायोग; चमत्कार नाही.
दुसर्या एका प्रतिसाद कर्त्याच्या प्रतिसादाला अनुमोदन देताना हे घडले. तुमचा प्रतिसाद यायच्या ७-८ प्रतिसाद अगोदर.
हरकत नाही, मी ते इथे पुन्हा कोपी-पेस्ट करतो.
"
<<<< आपल्याकडील काही बखरी आहेत ज्या मधे महाराजांना चेटूक येत होते, म्हणून ते औरंगजेबाच्या पहार्यातून निसटले, त्यांना काळी जादू येत होती असे उल्लेख आहेत. मोगल कालीन, ब्रिटिश आणि आपल्याकडील सभासदाची बखर यामूळे आपल्याला नीट ईतिहास ठावूक आहे. त्या बखरी नसत्या तर महाराजांना विष्णुचा कितवा तरी अवतार म्हणून मानले गेले असते कदाचित. >>>>>
अगदी योग्य.
अश्या ठिकाणी सत्य व असत्य यांचे मिश्रण झाल्यामुळे सर्व मिश्रानालाच एकतर असत्य किंवा चमत्कार म्हंटले जाते. दुर्दैवाने मग पुढच्या पिढ्यांना त्यातील सत्याच्या भागापासून वंचित राहावे लागते. कारण त्या मिश्रणातून सत्य शोधून काढणे कठीण होवून बसते.
"
सत्य व असत्याचे असे मिश्रण झाल्यानेच तुमच्या मित्राने सगळ्यालाच असत्य म्हणून ज्ञानेश्वरांचे अस्तित्व नाकारले.
> एखादी व्यक्ती त्याच्या
> एखादी व्यक्ती त्याच्या आयुष्यातल्या तरूणपणी कट्टर नास्तिक होती आणि मग म्हातारपणाकडे वाटचाल करता करता आस्तिक / सश्रद्ध झाली किंवा याउलट झाले अशी उदाहरणे नाहीत का कुणाच्याच बघण्यात ? त्यांना काय म्हणावे?
सश्रद्ध लोकांची मेजॉरीटी असल्यानी सश्रद्ध -> अश्रद्ध असा प्रवास व्हायचीच जास्त शक्यता. सश्रद्ध लोकांच्या घरातील वातावरणामुळे त्यांच्या मुलांना श्रद्धेचंच बाळकडू मिळतं. नंतर जग पाहून काहींच्या लक्षात येतं की सांता काही सगळ्यांना इतक्या कमी वेळात प्रेझेण्ट्स पोचवू शकत नाही. त्याचप्रमाणे भक्ती करणारे आणि न करणारे समप्रमाणात समाजाकडून त्रस्त असतात. रोज देवळात जाणारे कमी गुन्हे करतात असंही नाही.
त्यातील काही नंतर पुन्हा आस्तीकतेकडे वळले तर ते सहसा त्यांच्यावर आलेल्या एखाद्या संकटाच्यावेळी त्यांच्या मनानी कच खाल्ल्यास होणार. आजुबाजुला लोक इतरांना श्रद्धेच्या अंधार्या गर्तेत खेचायला तयार असतातच. धर्मांतराच्या अनेक घटनाही अशाच वेळी संभवतात. भगतसिंगांसारखा एखादाच की जो मृत्युला सामोरं जातांनाही झुकत नाही.
पश्चीमेतलं इतक्यातलं उदाहरण घ्यायचं झालं तर फ्रान्सीस कॉलिन्सचं घ्यावं लागेल. हा संपूर्णपणे निरिश्वरवादी होता आणि नंतर आस्तीक बनला. तो जेंव्हा अमेरीकेच्या नॅशनल हेल्थ सेंटरचा डायरेक्टर बनला तेंव्हा अनेकांना स्टेम सेल रिसर्च बंद पाडेल की काय असं वाटलेलं पण त्याने कारभार बर्यापईकी प्रॅज्मॅटिकली सांभाळला आहे.
आताच सिद्धार्थ मुखर्जीच्या पुस्तकात वाचत होतो की थॉमस लिंच नावाचा कर्करोगतज्ञ रोग्यांना त्यांच्या आजाराबद्दल सांगतांना क्सा हळूवारपणे सांगायचा ते. तिथे ते योग्यच आहे. पण धडधाकट लोकांना जर कोणी आत्मनिर्भर व्हा म्हणत असेल तर ते चुकीचं नाही कारण प्रश्न फक्त त्यांचाच नाही. त्यांच्या मुळे अख्खं घराणं/पिढी त्यात अडकू शकते.
एक साधु एका गावात गेले
एक साधु एका गावात गेले गावकर्यानि त्याचे चांगले स्वागत केले .एक दोन दिवसांनि गावचा मुखिया साधु कडे गेला व त्याना विनंति केलि कि गावातल्या लोकांना काहि ऊपदेश द्या.साधु ऊपदेश द्यायला तयार झाले सगळे गाववाले जमा झाले.
साधुने लोकांना विचारले कि देव असतो का?एकजात सगळ्या लोकांनि सांगितले कि हो देव असतो साधुनि पुढे काहिहि बोलायला नकार दिला ते म्ह्नाले कि देव आहे हे तुम्हि जानता व मानता तर देवा विषयि। मि तुम्हाला आनखिन वेगळे काय सांगनार मि जातो
दुसरा दिवस साधुने लोकांना विचारले कि देव असतो का? एकजात सगळ्यानि सांगितले देव बिव काहि नसतो .साधुनि पुढे काहिहि बोलायला नकार दिला ते म्ह्नाले कि देव नाहि हे तुम्हि जानता व मानता तर मि त्या देवा विषयि तुम्हाला काय सांगनार मि जातो.
तिसरा दिवस साधुने लोकांना विचारले कि देव असतो का? निम्म्या लोकांनि सांगितले देव बिव काहि नसतो
निम्म्या लोकांनि सांगितले देव असतो .साधु त्यांना म्हनतात कि देव आहे मानर्यानि देव नाहि मानर्याना सांगावे कि तो कसा आहे व देव नाहि मानर्यानि देव आहे मानन्यार्या सांगावे कि तो कसा नाहि माझि आता ईथे काहि गरजच नाहि मि जातो.
गावचा मुखिया साधुला शेवटचि विनंति करतो आम्हाला तुमचे प्रवचन एकाचेच आहे शेवट्चि संधि द्या
पुन्हा साधुने लोकांना विचारले कि देव असतो का? कुनि काहि बोलायला तयार नाहि सगळे मौन। त्या दिवशि साधुने प्रवचन दिले.
सार- आपन हि आपल्या आहे/नाहि च्या कल्पना बाजुला ठेऊन नव्याने विचार करु शकतो कि हे असे होऊ शकते का? मि तरि करते जसे कि जो बाबा हवेतुन सोन्याचे लॉकेट काढु शकतो तो दान द़क्षना घेईल का? आंगारा देऊन आजार ठिक करनारे स्वता आजारि का पड्तात? चमत्कार ने इथुन तिथे जानारे गाड्या का वापरतात? अजुन बरेच काहि
. जिथे दान द़क्षना घेऊन देव धर्म चालतो तो देव धर्म नसुन काहि लोकांचा व्यवसाय आहे.या व्यवसायला बळि पडुन स्वताचि फसवनुक करुन घेन्यात कुठ्ले शहानपन
माझे लिखान अशुध्द आहे शुध्द अशुध्द पाहन्या पेक्षा भाव समजुन घ्यावा
कमला दास हे एक उदाहरण
कमला दास हे एक उदाहरण आस्तिक-नास्तिक-आस्तिक ईस्लाम स्विकार-नास्तिक
असं आठवतंय.
आंबेडकरांचं हळुहळू नास्तिक होणे (वेद नाकारून बौद्ध मत स्विकारणे ) हे एक उदाहरण.
आंबेडकरांनि बौद्ध मत
आंबेडकरांनि बौद्ध मत स्विकारले कारन ते सायन्सवर आधारित होते
निसर्गाचे सायन्स जे सर्वासाठि समान आहे.{बौद्ध धर्मात धर्माचा अर्थ निसर्गाचे नियम असा आहे}
जानुन घेन्यासाठि खुप सारे स्तोत्र आहेत.
आज आमच्या राज्यातल्या
आज आमच्या राज्यातल्या सुप्रसिद्ध दसर्याच्या सणाचे उदघाटन प्रसिद्ध कलाकार आणि विचारवंत गिरीश कर्नाड यांच्याहस्ते झाले.
कर्नाड स्वतः नास्तिक आहेत. याच कारणास्तव त्यांच्या हस्ते या सणाचे उदघाटन होऊ नये अशी हिंदुत्ववादी म्हणवणार्या संघटनांची मागणी होती. इतकेच नव्हे तर स्बतःला सेक्युलर म्हणवणार्या जनता दल (एस) या पक्षाचीही मागणी होती.
कर्नाड यांनी त्यांच्या भाषणात समाजातील अनिष्ट रूढी आणि अंधश्रद्धा यांवर प्रहार केला.
ते म्हणाले नास्तिक या शब्दाचा अर्थं वेदप्रामाण्य आणि वर्णव्यवस्था न मानणे हा आहे आणि त्या अर्थाने मी नास्तिक आहे (पण मी बिलिव्हर आहे(म्हणजे काय?) असे त्यांनी सांगितले.)
याप्रसंगी आमच्या मुख्यमंत्र्यांनीही आपण नास्तिक आहोत असे सांगितले.
स्वतः देवाची पूजा करत नाही पण घरच्यांनी पूजा केल्यास त्यांचे मन मोडू नये म्हणून आरतीवर हात फिरवतो (आरती घेतो) हेही
सांगितले.
नास्तिकतेकडे बघायचे हे दोन दृष्टीकोन.
Pages