वैयक्तिक अंधश्रद्धा, वैयक्तिक लढा

Submitted by aschig on 28 October, 2009 - 11:33

हा धागा अशा लोकांकरता आहे ज्यांना भविष्य सांगण्याचे विविध प्रकार हे चूक आहेत आणि समाजाकरता हानिकारक आहेत याची जाणीव आहे (हे लोकच चूक आहेत का याबद्दलचा वाद इथे अपेक्षित नाही - त्या करता इतर जागा आहेत). अंधश्रद्धा इतरही अनेक प्रकारच्या असतात, आणि या ना त्या प्रकारे समाजाला हानिकारक असतात. अशा गोष्टिंचा विचार येथे केला जावा.

जन्म व मृत्यु या दोन बाबतीत मनुष्य जास्त आगतीक असतो. त्यामुळे त्या दोन गोष्टिंभोवती सर्वात जास्त वलये निर्माण केल्या जातात. आपण मृत्युपासुनच सुरुवात करु या. नंतर इतर गोष्टि येतीलच.

नरेंद्र दाभोलकर यांच्या भ्रम आणि निरास या पुस्तकाचे परिशिष्ट आहे नार्वेकर गुरुजींचे मृत्युपत्र. ते येथे दिले आहे. (धन्यवाद प्रकाश घाटपांडें). त्या अनुषंगाने संभाषण सुरु करु शकु.

https://docs.google.com/file/d/0B2X6bSru0D7IYmt3bjNTYU9ZbWs/edit

(२३ नव्हेंबर २००९ च्या पोस्ट वरुन):

अशाप्रकारे स्वतःशिवाय सर्व गोष्टींना माया ठरविल्यावर तुम्हि करत असलेल्या गोष्टींना खालील प्रकारांमध्ये विभागा (१) आवश्यक (२) अनावश्यक (उदा. एखादी सवय किंवा कृती) - पण घरच्यांना, कुटुंबियांना, देश- व पृथ्विवासियांना त्यामुळे त्रास होत नाही (३) अनावश्यक, आणि शक्य आहे की स्वत:ला थोडि त्रासदायक, पण इतरांना (आप्तांना, किंवा अनेक गरजुंना) उपयोगी आणि (४) अनावश्यक.

स्वत:च्या मनःशांतीकरता कुणी पुजा करत असेल, आणि ते आवश्यक आहे असे वाटत असेल, आणि त्यामुळे कुणाला त्रास होत नसेल तर ते आवश्यक मध्ये येईल. पण त्यामुळे दुसर्यांनी अशी पुजा करावी आणि तशी करु नये असे म्हंटल्यास ते अनावश्यक मध्ये जाईल. त्याचप्रमाणे पुजेकरता एका फुलाऐवजी १००० endangered फुलांचा हार लागतो असे म्हंटल्यास तेही अनवश्यक.

वरील विभागणी योग्य वाटते का? त्यामध्ये काही बदल करावे लागतील का? कसे? ही विभागणी स्थिरस्त्वार झाली की मग पुढे जाता येईल.

(सप्टेंबर २०१४ मध्ये पुढे आलेले काही वैयक्तिक लढे) :

विश्वास नसल्यामुळे मुलाची मुंज न करणं, मृत्युनंतरचे विधी न करणं, सत्यनारायण न करणं, दृष्ट काढण्याची जबरदस्ती न करु देणं, मासीक पाळी असल्यामुळे डिस्क्रिमिनेट न करु देणं (हे सर्व फार त्रोटक झालं - त्या लोकांच्या भावना पोचण्यासाठी त्यांच्याच पोस्ट वाचाव्या).

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारत के कई प्रमुख टीवी चैनल और समाचार चैनलों पर दरबार लगा है. बड़ी संख्या में भक्तों के बीच चमत्कारी शक्तियों का दावा करने वाले शख्स सिंहासन पर विराजमान हैं.

लोग प्रश्न पूछते हैं और बाबा जवाब देते हैं. सामान्य परेशानी वाले सवालों के असामान्य जवाब. एक छात्रा पूछती है, बाबा मैं आर्ट्स लूँ, कॉमर्स लूँ या फिर साइंस. बाबा कहते हैं- पहले ये बताओ आखिरी बार रोटी कब बनाई है, रोज एक रोटी बनाना शुरू कर दो.

एक और हताश और परेशान व्यक्ति पूछता है, बाबा नौकरी कब मिलेगी. बाबा कहते हैं क्या कभी साँप मारा है या मारते हुए देखा है. ये है निर्मल बाबा का दरबार.

जनता मस्त है और बाबा भी. बाबा की झोली लगातार भर रही है. बाबा के नाम प्रॉपर्टी भरमार है. होटल हैं, फ्लैट्स हैं, बड़ी-बड़ी गाड़ियाँ हैं. कई अखबार दावा करते हैं कि जनवरी से बाबा के बैंक खाते में हर दिन एक करोड़ रुपए आ रहे हैं.

ये है 21वीं सदी का भारत. आधुनिक भारत. अग्नि-5 वाला भारत. कौन कहता है भारत में पैसे की कमी है. गरीब से गरीब और धनी से धनी बाबा के लिए अपनी संपत्ति कुर्बान कर देना चाहता है.

कई प्रमुख टीवी चैनलों और समाचार चैनलों पर जगह बना चुके निर्मल बाबा पर एकाएक मीडिया की तिरछी नजर पड़ गई है. अब टीवी चैनल निर्मल बाबा की पोल खोलने के लिए कमर कस चुके हैं.

कितनी अजीब बात है कई समाचार चैनल बाबा की बैंड बजाने पर तुले हैं और उन्हीं के चैनल पर बाबा अपने भक्तों को बेमतलब का ज्ञान बाँट रहे हैं.

बाबाओं को लेकर भारतीय जनता का प्रेम नया नहीं है. कभी किसी बाबा की धूम रहती है तो कभी किसी बाबा की. कभी आसाराम बापू और मोरारी बापू टीवी चैनलों की शान हुआ करते थे, तो आज निर्मल बाबा का समय आया है.

ये बाबा भी बड़ी सोच-समझकर ऐसे लोगों को अपना लक्ष्य बनाते हैं, जो असुरक्षित हैं. आस्था और अंधविश्वास के बीच बहुत छोटी लकीर होती है, जिसे मिटाकर ऐसे बाबा अपना काम निकालते हैं.

लेकिन नौकरी के लिए तरसता व्यक्ति या फिर बेटी की शादी न कर पाने में असमर्थ कोई गरीब इन बाबाओं का टारगेट नहीं. इनका टारगेट हैं मध्यमवर्ग, जो बड़े-बड़े स्टार्स और व्यापारिक घराने के लोगों की ऐसी श्रद्धा देखकर इन बाबाओंकी शरण में आ जाता है.

बच्चन हों या अंबानी, राजनेता हों या नौकरशाह- इन बड़े लोगों ने जाने-अनजाने में इस अंधविश्वास को बल दिया है.

ऐश्वर्या राय की शादी के समय अमिताभ बच्चन का ग्रह-नक्षत्रों को खुश करने के लिए मंदिरों का दौरा, अंबानी बंधुओं में दरार पाटने के लिए मोरारी बापू को मिली अहमियत. चुनाव जीतने के लिए बाबाओं के चक्कर लगाते नेता.

दरअसल समृद्धि अंधविश्वास भी लेकर आती है. वजह अपना रुतबा, अपनी दौलत कायम रखने का लालच. जो जितना समृद्ध, वो उतना ही अंधविश्वासी. और फिर समृद्धि के पीछे भागता मध्यमवर्ग, इस मामले में क्यों पीछे रहेगा.

इसलिए इन बाबाओं के पौं-बारह हैं. फिर क्यों न निर्मल बाबा डायबिटीज से पीड़ित व्यक्ति को खीर खाने की सलाह देंगे. आखिर हमारी मानसिकता ही तो ऐसे तथाकथित चमत्कारियों को समृद्ध बना रही हैं.
माहितीचा स्रोत:
bbc hindi
www.bbc.co.uk/blogs/hindi/2012/04/post-235.html

बी, कृपया शाकाहार की मांसाहार या ट्रॅकवर इथला विषय नेऊ नका. त्यासाठी हवंतर वेगळा ट्रॅक मांडा.<<< अनुमोदन

============

देवाला दाखवल्या जाणार्‍या नैवेद्यातील अंधश्रद्धेचा / श्रद्धेचा भाग सोडला तर बाकीचा भाग नुसताच शाकाहार योग्य की मांसाहार ह्या विषयावर येत आहे.

>>कृपया शाकाहार की मांसाहार या ट्रॅकवर इथला विषय नेऊ नका. त्यासाठी हवंतर वेगळा ट्रॅक मांडा.<<
भरत मयेकरांशी सहमत आहे.
मी खालील अंधश्रद्धा बाळगतो
१) भांड्याचा होणारा आवाज घरात अशांतता निर्माण करतो. मी लगेच आवाज बंद करतो
२) भुभु लोकांना माझी भाषा समजते. त्यांनी स्वतःहुन पंजा दिला की माझा दिवस चांगला जातो
३) आपण मेलो जग बुडाल
४) मला गुदगुल्या करुन वा पाय, डोके अंग वगैरे चेपुन कुणी दिले की माझ्या शरीरातून सदिच्छा तरंग बाहेर पडतात व त्याच्या मनोकामना पुर्ण होतात
५) शांतपणे बिअर पिताना भविष्यकथन केले तर ते जातकाला मार्गदर्शक ठरते
६) माझ्या फँटसी त मीच देव असतो.तो मला मदत मार्गदर्शन सगळे करतो.
७) मी अश्रद्धांसाठी सश्रद्ध आहे तर सश्रद्धांसाठी अश्रद्ध आहे.
.
.
.चला आपापल्या वैयक्तिक अंधश्रद्धा पटापटा सांगा Happy
.

सुरेख | 28 September, 2014 - 11:25 नवीन <<<

सुरेख,

निर्मलबाबांना एक बातमीचा चॅनेल जणू डेडिकेट झाल्यासारखा लोकांसमोर आणत राहतो हे खरे आहे. पण हा प्रतिसाद ह्या धाग्यापेक्षा 'कल्ट्स' नावाच्या धाग्यावर उत्तमरीत्या शोभून दिसेल असे वाटते. तसेच, हा तुमचा मूळ प्रतिसाद आहे का? मग तो हिंदीत का आहे? नसल्यास कृपया संदर्भही द्यावात अशी विनंती! Happy

<नसल्यास कृपया संदर्भही द्यावात अशी विनंती!>

अनुमोदन +
नसल्यास फक्त संदर्भ आणि त्या लेखातले मुद्दे अतिसंक्षिप्त स्वरूपात किंवा या विषयाशी रेलेव्हंट असलेला मुद्दा मराठीत द्यावा ही विनंती.

"मी इथे जीव तोडून टंकल्यामुळे वाचणार्‍या प्रत्येकाचे प्रबोधन होणार आहे, व लवकरच अवघा मराठी भाषक बुद्धीप्रामाण्यवादी, पुरोगामी व निधर्मांध होणार आहे", अशी माझी एकमेव अंधश्रद्धा आहे, व त्या अंधश्रद्धेपोटी मी इथे मरेपर्यंत लढायला, आय मीन टंकायला तयार आहे.

बेफिकिर जि
<<<<<<<हा तुमचा मूळ प्रतिसाद आहे का? मग तो हिंदीत का आहे? नसल्यास कृपया संदर्भही द्यावात अशी विनंती! >>>>>>हा माझा प्रतिसाद नाहि. कुठुन घेतले ते आता मिळात नाहिय मिळाला कि संदर्भ देते
शाकाहार व मांसाहार वर धागा घसरायला नको म्ह्नुन पटकन शोधुन टाकला होता गुगलवरुन.

सुरेख, मराठी टाईपिंग नीट न जमताही

<<<धम्म आणि धर्म हे दोन्ही भारतीय शब्द आहेत केवळ भाषा वेगळी आहे. धम्म किंवा धर्म हि संज्ञा नेहमी व्यापक राहिलेली आहे, या शब्दाचा अर्थ होतो सत्य, (धर्मपद म्हणजे सत्याचा मार्ग, नितीवान जीवन जगण्याचा मार्ग) किंवा धर्म म्हणजे निसर्गाचे नियम, धर्म म्हणजे बुद्धांचे शब्द.. आपण या शब्दाचा अर्थ अशा प्रकारे घेऊ शकतो.. बाबासाहेबांनी सुद्धा 'धर्म आणि धम्म' असा फरक केला नसुन 'रिलीजन आणि धम्म' असा केला आहे. रिलीजन या शब्दाचा अर्थ संप्रदाय असा होतो. हिंदु, शीख, ख्रिस्ती हे संप्रदाय आहेत, रिलीजन आहेत..

पण धर्म किंवा धम्म वेगळा आहे. प्रत्येक पदार्थांचा स्वतःचा असा वेगळा धर्म असतो, ज्याप्रमाणे अग्नीचा धर्म जळणे, जाळणे..

याचबाबतीत दुसरे उदाहरण द्यायचे झाले तर :

भगवान बुद्धांच्या अनुयायांचा धर्म काय आहे असे विचारलल्यावर कोणी 'बौद्ध' असे उत्तर देईल परंतु बौद्ध हा धर्म नसुन तो संप्रदाय (रिलीजन) आहे. मग धर्म काय आहे..?

1. कोणतेही पाप न करणे, कुशल धर्माचे संपादन करणे हा धर्म आहे.

2. माता - पित्याची सेवा करणे, पत्नी मुलांचा सांभाळ करणे, सुभाषण करणे हा धर्म आहे.

3. दक्षिणा देण्यायोग्य व्यक्तींना दान देणे, काया, वाचा आणि मनाने अकुशल कर्म न करणे जीवहिंसा व मद्यपान न करणे हा धर्म आहे.

4. जेणेकरुन विद्वान लोक नावे ठेवतील असे लहानात लहान सुद्धा कार्य करु नये. सर्व प्राणी सुखी होवोत. सर्वांचे कल्याण होवो, सर्वच सिद्धीस प्राप्त होवोत, अशी मैत्रीभावना करणे हा धर्म आहे.

5. कोणाचीही कोणी वंचना न करोत, कोणीही कोणाचा अपमान न करोत. वैमनस्य किंवाविरोध चर्याने कोणीही कोणाला दुक्ख देण्याची इच्छा न करोत. अशी भावना करणे हा धर्म आहे..

6. ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाचे रक्षण करण्यासाठी आपले जीवन पणास लावते, त्याचप्रमाणे प्राणीमात्रांच्या प्रती मनात निस्सीम प्रेम भाव जागृत करणे हा धर्म आहे.

7. मनातील बाधा वैरभाव आणि शत्रुत्व झटकुन, वर खाली व आजुबाजुला सर्वच जगताच्या प्रती मनात निस्सीम प्रेम - भाव वाढविणे हा धर्म आहे.

हे सर्व धर्म आहेत. रिलिजन किंवा संप्रदाय नाहीत...

सर्व चिंता नष्ट करणारे श्रेष्ठ व उत्तम धर्मरत्न हे औषध आहे. त्याच्या सत्कारपुर्वक सेवनाने सर्व जीवांचे सर्वभय शांत होवोत>>

ही पोस्ट मस्तं टाईप केलीत.

धान्यवाद साति
खरे तर हे पालि भाषेतिल एक सुत्त आहे ज्याला" महामंगल सुत्त" म्ह्नतात.त्याचे हे मराठि भाषांतरआहे जे मि माझ्याकडे लिहुन ठेवलेले आहे.ते बघुन लिहायला मला सोपे गेले.मनातुन ऊमटनारे भाव लिहने अवघड वाटते.
काना, मात्रा, ऊकार वाक्याचिरचना याच्यामधे खुप चुका होतात सुधरावन्याचा प्रयत्न चालु आहे.
तुम्हि सगळे खुप छान लिहता.

बी तुम्ही लै भारी आहात राव. Happy कित्ती इनोसंटली लिहताय. तुमच्याबरोबर बसुन एकदा कॉफी प्यायली पाहिजे मस्तपैकी.

अगदी रहावल नाही म्हणुन लिहलं.....

आमच्या अंधश्रध्द्दा:
बीएस एन एल ३ जी चा डोंगल दोनदा ट्राय करुन सुरु नाही झालं तर मशीन रिस्टार्ट केल्यावर सुरु करतो.
फोन वर ३ जी चा ढळढळीत लोगो दिसत असुन नेटवर्क अनअ‍ॅव्हेलेबल अस्ते तेंव्हा हॉटस्पॉट ऑन ऑफ करतो अथवा फोन रिस्टार्ट करतो.
नेहमीच्य ४ शिट्या झाल्यावर देखिल मटण शिजले नसल्यास अजुन ३ शिट्या करतो.
कधी मधी टायट्रेशन्चे रिडिंग चुकते आहे दिसळ्यावर ग्लासवेअर्स धुवुन घेतल्यावर रिडिंग बरोबर येतात.
आम्ही सल्फ्युरिक अ‍ॅसिड पाण्यात टाकतो, पाणी अ‍ॅसिड मध्ये नाही (ते आमच्यात पाप आहे).
अजुन आठवतील तसे लिहतो.

माझी अन्धश्रद्धा, अनूभव म्हणा हवे तर. जुन्या घराचे नूतनीकरण चालु म्हणून तात्पुरत्या दुसर्या प्लॅटमध्ये रहायला गेलो ते ही पितृ पक्षात. ( आमचा विश्वास नव्हता, कारण आई बाबानी एकमेकान्च्या सासु सासर्‍यान्चा योग्य तो मान राखला, प्रेम दिले, आदर होता), मग ते कशाला कोणाचे खाली येऊन वाईट करतील असे.

पण गेल्याबरोबर लगेच दुसर्‍या दिवशी दूधवाल्याच्या मागे चक्क २ उन्दीर जिन्यावरुन टणाटण उड्या मारत आमच्या घरात शिरले. हाकलायला म्हणून बर्‍याच उड्या मारल्या, पण ते गेले नाहीत, नवीन सन्सार मान्डुन पोरे-बाळे पैदा केली. मग मात्र त्या पोराना पोत्यासकट उकीरड्यावर हाकलुन दिले आणी मग गोळ्या ( उन्दरान्साठी ) घातल्या. ते जातात न जातात पालीनी आक्रमण केले. पिट्टुल्या मिनी घोरपडीच होत्या त्या, एवढ्या मोठ्या. त्यान्च्या साठी खिडक्या बन्द केल्या. आणी २ दिवसात खालुन झुरळान्ची पलटण आली. विश्वास बसणार नाही, पण खरच मोठ्ठाल्ली झुरळे होती.

अज्जुनही वैताग येतो ते दिवस आठवले तरी. काही असो, मला कुणी काही म्हणले तरी निदान पितृ पक्षात तरी मी नवीन वास्तुत ( बनवली तरी ) जाणार नाही रे बाबौ.

माझे वरील विधान अन्धश्रद्धा पसरवण्यासाठी लिहीलेले नाही. तो माझा वै. अनूभव समजा हवे तर. आणी गम्मत म्हणून वाचा. पण आजू-बाजूला काहीही नसताना एवढे छोटे प्राणी-किटक माणसाला कसे सळो की पळो करुन सोडतात ते बघा.

आमच्या घरात एकमेकांच्या थेट हातात मीठ दिले जात नाही. जर दिली तर देणार्यांची व घेणार्याची भांडणे होतात असा समाज आहे. जर कोणाला मिठाची बाटली पास करायची असेल तर तो ती टेबलावर ठेवतो. Happy

वैयक्तिक अंधश्रद्धांबरोबर वैयक्तिक लढ्याचंही लिहीणार का?

काही वर्षांपुर्वी आमच्या मुलाच्या मुंजीचा प्रस्ताव होता, त्याच्या मावस- मामेभावांबरोबर. त्यांच्याखातर घरच्याघरी सहज म्हणून चाललंही असतं, पण जेंव्हा लक्षात आलं की ते अनेक लोकांना बोलावून साग्र्संगीत विधीवत करायचा प्लान आहे तेंव्हा ठरवलं की ज्यात आपल्याला विश्वास नाही ते करायची गरज नाही. मुलाला नंतर मोठं झाल्यावर करायची असेल मुंज तर करेल स्वतः (तसं तो मोठा झाल्यावर त्यालाही सांगीतलं - अजून तरी काही म्हणालेला नाही)

> माझे वरील विधान अन्धश्रद्धा पसरवण्यासाठी लिहीलेले नाही.
> काही असो, मला कुणी काही म्हणले तरी निदान पितृ पक्षात तरी मी नवीन वास्तुत ( बनवली तरी ) जाणार नाही रे बाबौ.

ही दोन विधानं परस्परविरोधी आहेत.

ओक्टोबर २०१४ च्या सायंटीफीक अमेरीकन मध्ये मयकल शरमर नी त्याच्या स्केप्टीक या सदरात त्याचा असाच एक अनुभव लिहीला आहे - खुलासा न करता येऊ शकणारा. तो सांगून तो थांबतो. असं म्हणत नाही की याचा अर्थ काही तरी अतर्क्य असतं

http://www.scientificamerican.com/article/anomalous-events-that-can-shak...

वैयक्तिक पातळीवर जास्तं जोरदार लढा द्यायचं सोडून दिलंय.
घरातल्या ज्येना ना जे काही करायचंय ते करू देतो.
मुलांची बारशी वैगेरे केवळ गेट टुगेदर म्हणून केली.
कोणताही विधी न करता.
मात्रं मुलांची धर्मदिक्षा हा लईच सेन्सिटिव इश्यू असल्याने जन्माच्या सहाव्या दिवशी केला गेला त्याला काही अपोज केले नाही.
ज्येना त्यांच्या गावी परत जाताच धर्मासंंबंधित गोष्टी परत मुलांच्या अंगावरून उतरवून गुंडाळून ठेवल्या त्या आजतागायत घातलेल्या नाहीत.
(म्हणजे इथे आम्ही श्रद्धा-अंधश्रद्देच्या लढाईत उतरलोच नाही, ज्येना जिंकले , त्याना जिंकू दिलं.)

मुले शाळेत जाताना त्यांना धर्माप्रमाणे शूचिर्भूत करून पाठवावे असा इथे रिवाज आहे पण तसे करायला स्ट्रीक्ट विरोध केला आहे.धर्माची कोणतीच खूण घराबाहेर पडताना वापरायची नाही यावर आम्ही उभयतां फर्म आहोत. त्यामुळे ती एक लढाई जिंकलेली आहे.

बाकी सत्यनारायण वैगेरे इथे नसतातच त्यामुळे प्रश्न नाही.
क्लिनिकमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये माझ्या रूमात एक धन्वंतरिची मूर्ती आहे जी माझ्या पहिल्या पेशंटने महाराष्ट्रात असताना दिली होती.
पण तिची काही पूजा अर्चा होत नाही. इथल्या लोकांना तर ती मूर्ती कुणाची हा पत्ताही लागत नाही.

बाकी क्लिनिक्/हॉस्पिटल यांपैकी जो भाग पार्टनरशिपमुळे इतरांबरोबर शेअर्ड आहे तिथे पार्टनरमंडळी पूजाअर्चा वैगेरे करतात आम्ही प्रसाद खातो.

ओटीत ओटीटेबल कसे असावे, कुठल्या दिशेला इ. पाहण्यासाठी पार्टनर्सनी त्यांच्या गुरूंचा सल्ला घेतला होता.
आमच्या भागातल्या आय सी यू, वॉर्डस इ ची रचना पेशंट आणि नर्सिंगची सोय पाहून आहे.
ओटीत चेंजिंगरूमात बरेचसे देवादिक आहेत. आमच्या भागात अतिक्रिटिकल पेशंट असूनही असलं काही नाही.
खाली वेटींगरुमात मात्रं सगळ्यांच्या पेशंटसाठी मिळून देव्हारा आहे.
त्याला नमस्कार करूनच हॉस्पिटलचे दिवसाचे काम सुरू करायचे असा आमच्या ज्येनांचा आदेश होता पण आम्ही काही ते करत नाही.

आमच्या गावात दवाखान्याचे नावही आपापल्या गुरूंवरून्/मठावरून ठेवायची पद्धत आहे. पार्टनर्सनी (इतर दोघांचे मिळून एकच गुरू आहेत) आम्ही गुरूचा सल्ला घेऊ का असे विचारताच 'घ्या, पण जे नाव ठेवाल त्यात कोणताही धार्मिक उल्लेख असू नये असे सांगितले. गुरू मॉडर्न असल्याने त्यांनी हे ऐकून वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित नाव सुचवले जे अगदी समर्पक असल्याने आम्ही विरोध केला नाही.
हे गुरू येताच त्यांच्या पायाची पप्पी घ्यावी लागते आणि एखादी मोठ्ठी दक्षिणा द्यावी लागते. शक्यतो ते आम्ही ऑट ऑफ टाऊन असताना येतात. जर आम्ही असताना आले तर आम्ही फक्त वाकून नमस्कार करतो.दक्षिणेचा खर्च हॉस्पिटलच्या जॉईंट अकाऊंटमधून करायचा नाही अशी कल्पना देऊन ठेवलेली आहे.ते पार्टनर स्वतः करतात.
मात्रं ते आल्यावर मेजवानी, गणेशोत्सव, ईद, ख्रिसमस यांप्रसंगी मेजवानी हॉस्पिटलच्या सामाईक खर्चाने देतो.

आत्ता वॉकिंग करून येतानाच शेजारचीने नवरात्रात अष्टौप्रहर दिवा लावून ठेवता का ती चौकशी केली. नाही म्हणताच बरिच कानऊघाडणी केली. वाद ऩको म्हणून जास्त बोलले नाही. आता गावाला साबा करतात नंतर तरी तुम्ही करा असं बाई म्हणाल्या.
नंतरही कधी करणार नाही म्हटल्यावर बाई अवाक झाल्या.

अजून बरंच आहे. अतिलहान गावात आणि सगळे नातेवाईक असलेल्या गावात (आमचे ज्येना महारष्ट्रात रहातात तर आम्ही त्यांच्या जन्मभूमीत) सतत धार्मिक कार्ये चाललेली असताना आणि त्यातही मूळ धर्माचे उत्तम स्वरूप जाऊन अंधश्रद्धा आणि कर्मकांडाचे अवडंबर माजलेले असताना (नाहीतर आमचे धर्मगुरू बसवेश्वर म्हणजे त्या काळातले नरेंद्र दाभोळकरच हो.) प्रत्येक शुभकार्यात लढा द्यावा लागेल अशी परिस्थिती आहे. पण आता जवळपाससगळ्यानी हे लोक वेगळे आहेत हे अ‍ॅक्सेप्ट केले आहे.
आणि आम्हीपण सटल पण फर्म विरोध सातत्याने केल्याने आणि शक्यतिथे ़ज्ये नांना न दुखविल्याने गाडं नीट चाललंय.

वैयक्तिक अंधश्रद्धांबरोबर वैयक्तिक लढ्याचंही लिहीणार का?>>>

सुरवात कुठुन करावी आणि काय काय लिहावे इतका मोठा गहन प्रश्न आहे.

वडील गेले तेंव्हा त्यांच्या इच्छेनुसार देहदान केले (आई खुप स्ट्राँग राहिली यात). नातेवाइकांचा अतिप्रचंड विरोध होता. त्यानंतर आम्ही कोणतेच धार्मिक विधी केले नाहीत / करत नाही आहोत. पण काहि जवळच्या नातेवाईकांनी त्यांना त्रास होउ नये म्हणुन काहितरी विधी परस्पर केले. मात्र नंतर आजोबा गेले त्यावेळी नातेवाईकांनी सगळ साग्रसंगीत केले. आम्ही हजर होतो. नो वाद विवाद. मला वाटतय कि मृत्यु प्रसंगाचे विधी हे सगळ्यात भितीदायक असे जे चित्र आहे, चुकले कि त्रास होतो इत्यादी इत्यादी याला हे उदाहरण पुरेसे आहे. बाकि अजुन जमेल तसे लिहतोच. आणि हो आमच्या कडे दर महिण्याला अंधश्रध्दा निर्मुलनाचा अंक येतो. Wink

कित्येक वर्षापुर्वी मी अतिप्रचंड आस्तिक होतो.

वैयक्तिक पातळीवर बर्‍याच गोष्टी मनाविरुद्ध केल्या आहेत घरातील जे का ना दुखावले जावू नयेत म्हणून.
सुरवात लग्नातच झाली. लग्न फक्त नोंदणीकृत पद्धतीने सकाळी करायचे ठरले होते. नंतर संध्याकाळी रिसेप्शन. पण मग समीरच्या आईंना काही विधी करायचे आहेत, त्याचे वडील गेल्यानंतरचा हा घरातला पहिला कार्यक्रम इ. कानावर पडलं. शेवटी त्यांच्या म्हणण्यानूसारव मध्यरात्री (त्यांनी काढलेल्या मुहूर्तावर फेरे झाले.)
नंतरही लग्नानंतरच्या काही पुजा आणि मुलाच्या जावळ काढण्याच्या विधी आणि पुजेला मी नकार देवू शकले नाही.

दरवर्षी दिवाळीत लक्ष्मीपुजन होतं सासरी, मी पुजा करत नसले तरी तिथे असते. लक्ष्मीपुजनाच्या दुसर्‍या दिवशी घरासमोरच्या भावकीच्या मालकीच्या मंदिरावर नवा झेंडा चढवणे, किर्तन करणे आणि गावजेवण असा कार्यक्रम असतो. भावकीतले सगळेच जण या साठी तिथे येत असतात. आमचं आंगण मोठं असल्याने स्वैपाक आणि पंगती तिथेच होतात. या पूर्ण कार्यक्रमात आम्ही सहभागी असतो.
याशिवाय साबांच्या इच्छेसाठी आम्ही दोघंही करवा चौथ ला उपास करतो. त्या खूप धार्मिक आहेत. मी किंवा त्यांची कोणतीही सुन तशी नाहीये हे त्यांना माहितेय. त्यांच्या बर्‍याच अंधश्रद्धा (गुरवारी, मंगळवारी आणि शनीवारी केस आणि कपडे न धूणे.. ही एक पटकन आठवली. अश्या खूप सार्‍या आहेत) त्या आमच्यावर लादत नाहीत. इन्फॅक्ट आताशा कोणत्याच श्रद्धा/अंधश्रद्धा लादत नाहीत म्हणायला ही हरकत नाही. उलट त्यांनी आमच्यासोबत राहून बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत. त्यामूळे त्यांच्यासाठी कसलीही श्रद्धा नसताना या काही गोष्टी मी फक्त त्यांच्यासाठी करते. (करवा चौथ च्या उपासात उपासाबरोबर कसलीशी कथा ऐकणं आणि पुजा पण असतं. मी ते करत नाही.... हे साबां माहित आहे. त्यांच्यासाठी बहूतेक मी जे करतेय तेच खूप आहे. Wink )

एक स्त्री म्हणून मला हा लढा फार महत्त्वाचा वाटतो. मासिक पाळी आणि शिवाशीव, कार्यात सहभागी न होणे हे कसे चुकीचे आहे ह्याबद्दल फक्त वैयक्तिक भूमिका घेऊन राहायचे नाही तर समोरच्याचं जमेल तितकं प्रबोधन करत राहायचं असं आता ठरवलं आहे. मा फलेषु कदाचन... हे डोक्यात ठेवून ! ही एक अंधश्रद्धा समाजाला गर्तेत नेत आहे असे ठाम मत आहे आणि सुशिक्षित समाजातही कमीजास्त मात्रेत का होईना पण पाळली जातेच आहे असे खेदजनक निरीक्षण आहे.

आश्चिग, ह्या विषयावर अजून एक प्रश्न खूप दिवसांपासून मनात आहे तो स्वतंत्र पोस्टमध्ये विचारते.

* मला वाटतं आपल्या श्रद्धा दुसर्‍यांवर लादणे आणि वैयक्तिक अंधश्रद्धा/ लढा ह्याबाबत गल्लत झाली आहे माझ्याकडून त्यामुळे पोस्ट संपादित. ( जरी त्यातल्या काही श्रद्धा मला अंधश्रद्धा वाटत असतील तरी त्यामुळे कुणाचे नुकसान होत नसेल तर ह्या धाग्यावर त्याबद्दल नाही लिहिले तरी चालेल. )

माझ्यामते 'लढा' हा काहीतरी वेगळाचं असतो. त्याचे स्वरुप खूप ज्वलंत असते. जसे की सतीची चाल बंद करण्यासाठी राजाराय मोहनराय ह्यांनी लढा दिला. आणि ज्या स्त्रिया सति गेल्यात तो प्रकार केवढा भयानक असेल. तो लढा आठवून ह्या पानावरील लढे एकदम अति अति अति.. किरकोळ वाटतात.

बी आम्ही लहान माणसे , बारिक सारिकच लढे देणार!
Happy
त्यात धाग्याचा विषयच वैयक्तिक पातळीवरचा लढा असा आहे.

> माझे वरील विधान अन्धश्रद्धा पसरवण्यासाठी लिहीलेले नाही.
> काही असो, मला कुणी काही म्हणले तरी निदान पितृ पक्षात तरी मी नवीन वास्तुत ( बनवली तरी ) जाणार नाही रे बाबौ.
या अनुभवात त्या व्यक्तिचि मानसिक, शारिरीक, आनि आर्थिक हानि झालेलि नाहि किंवा दुसर्‍याचि हि झालि नाहि.फक्तअंतरमनात रुजलेला एक विश्वास या अनुभवाने दॄढ झाला

ईथे जर त्यानि छोटे प्राणी-किटक घालवन्यासाठि पुरोहित बोलाऊन पुजा केलि असति आनि त्या साठि १० ह्जार रुपये दिले असते तर आर्थिक हानि झालि असति त्या पुजेला लागनार्‍या सामानात धुर होनारि सामग्रि वापरलि असति तर पुजेत आलेल्या एखाद्या अस्थमा पेशंटला त्रास होउ शकला असता.धुरामुळे वायुप्रदुशन होऊ शकले असते
पुजेत जर आवाज गोंधळ होनार्‍या वस्तुचा वापर झाला असता आनि शेजारि एखादि आजारि वृध्द व्यक्ति रहात असति किंवा अभ्यास करनारे मुल असति तर त्याचि शांति भंग झालि असति.
पुजेत जर झाडांच्या फाट्यांचा वगेरे उपयोग झाला असतातर तर पर्यावरनाचा र्‍हास झाला असता.ईथे असे काहिही झालेले नाहि मग नुकसान काय आनि कुनाचे?
तर या व्यक्तिच्या आसपास यांचि मुले वगेरे जे कोनि वावरत असतिल त्यानि त्यांच्या हि नकळत एक संदेश गृहन केलाकिंवा एक संदेश दिला गेला कि पितृ पक्षात या वास्तुत येन्याचा निर्नय चुकिचा होता त्या मुळे हे असे घडले
{छोटे प्राणी-किटक माणसाला सळो की पळो करुन सोडने }
मग यात नुकसान काय आनि कुनाचे? मुलांचेच त्याच्याअंर्तर मनात या व अश्या सार्‍या गोष्टी साठुन भरुन राहतिल त्यात नविन काय घालायला जागा च राहनार नाहि आनि हे इथेच न थांबता ते त्यांच्या पुढच्या पिढिला हि ते पास करतिल मग यात नुकसान हे आहे कि आपन अश्या जुन्या गोष्टिना पकडुन पुढे कसे जानार?
मि या जमान्यात हि फोन न वापरता पत्रच लिहतो म्हनन्यात नुकसान कुनाचे आहे.
त्या पेक्षा आपन असा नाहि का वाचार करु शकत कि पालि झुरळे ऊंदरे का येतात?नवीन सन्सार मान्डुन पोरे-बाळे पैदा कशि करु शकतात? त्याना तसे वातावरन मिळाले असेल त्याना तशि अडगळचि जागा मिळालि असेल सगळ्याच्या घरि अश्याअडगळच्या जागा असतात माझ्याकडेहि कपाटाच्या मागे एकदा ऊन्दंराचि पिल्लावळ झालेलि. आनि जिथे झुरळे असतात तिथे पालि पन असतात झुरळे जेवढि जास्त तेवढा पालिचा साइज मोठा
मला वाट्त पालि झुरळे आधिपासुन तिथे असावित घरात गेल्याबरोबर दिसलि नसतिल खान्यापिन्याच्या वस्तु वापरात यायला लागल्य खरकट वगैरे सांडायला तसा त्याचा वावर वाढ्ला असेल.मि या अनुभवातुन गेलि आहे.
दोन महिने गावाला गेलो होतो मला वाटले खायलाप्यायला न मिळाल्यामुळे झुर्ळ पालि जातिल पन कसल काय ऊलट पालि मोठ्या झाल्या होत्या मि हे खरतेच सांगतिय.
यात अन्धश्रद्धा नसुन मान्यतेचा पगडा जास्त आहे ज्या आपन तर्क करुन सोडऊ शकतो.
या मान्यता नाहि सोडल्या तर हानि काहिच होनार नाहि फक्त अंर्तर मनात या गोष्टी साठुन राहतिल.
चांगल्या मान्यता किंवा हानिकारक मान्यता काळानुसार प्रसंगा नुसार आपन तर्काच्या कसैटि वर पारखुन बघु
शकतो.
त्या बुध्दि संगत आहेत का?
त्या तर्क संगत आहेत का?
त्या न्याय संगत आहेत का?
तर्काच्या कसैटि वर पारखुन मगआपन जो निर्नय घेऊ किंवा ज्या मान्यता मानु त्या त्याप्रसंगानुसार योग्यच असतिल
आई ने सांगितलेआहे म्हनुन, पुस्तकात लिहले आहे म्हनुन ,किंवा लोक करतात म्हनुन करने योग्य कि
तर्काच्या कसैटि वर पारखुन बघुन करने योग्य.प्रत्येकानि स्व्;तच ठरवायचय

> अगो आणि अल्पना, मस्त पोस्टस!
+१

साती, निवांत, तुम्हाला पण +१

> बी आम्ही लहान माणसे , बारिक सारिकच लढे देणार!

बी, एव्हरी बी-ट काऊण्ट्स

इतरांच्या भावनांचा विचार करतांना आपल्या भावनांचा आपण बळी देत नाही ना हे ही पहायला हवं.

>>इतरांच्या भावनांचा विचार करतांना आपल्या भावनांचा आपण बळी देत नाही ना हे ही पहायला हवं.<<
हाच तर कळीचा मुद्दा आहे. सहजीवनात जर एकाच अन्न दुसर्‍याच विष असेल तर?, एकाच्या आनंदाच्या कल्पना दुसर्‍याच्या त्रासाच्या असतील तर? अशावेळी परस्परांसाठी त्याग त्याग खेळता येत नाही ना! एका विशिष्ट मर्यादेपर्यंत माणुस सहन करतो त्याच्या सहनशक्ती पलीकडे गेल की मग त्याचा अस्तित्वाचा लढा चालू होतो.
परस्परांविषयी आदर बाळगून आपापल्या मर्यादेत राहण ही मार्ग म्हणजे डोंबार्‍याच्या तारेवरच्या कसरतीसारख असत. कधी कधी अशा वातावरणात परस्परांची वाढ खुटते. हेच जर ते स्वतंत्र राहिले तर त्यांची व्यक्तिमत्व बहरतात.
पण शेवटी माणुस हा समुहजीवन जगणारा समाजशील प्राणी आहे. त्यामुळे काही तडजोडी कराव्याच लागतात.

मायबोलिवर गणेशोत्सव आणि दिवाळी हे दोन कार्यक्रम होतात. देव ही फार मोठी अंधश्रद्धा आहे असे माणून उद्याला जर हे दोन्ही कार्यक्रम बंद केले तर तुम्हाला नाही वाटत की आपण एक फार मोठ्या आनंदाला मुकणार आहोत? मुळात सणवार हे गरीब दीन दु:खी लोकांच्या जीवनात चार क्षण आनंदाचे घेऊन येण्याकरिता आलेले असतात. देवासाठी म्हणून ही लोक चार घास गोड धोड करतात खातात. नवीन कपडे विकत घेतात. ऐरवी त्यांना रोजच्या दिवसाचे फार महत्त्व नसते. निदान त्या लोकांचा तरी विचार कर.आ

शब्दार्थांच्या धाग्यावर विचारण्याचा प्रश्न इथे विचारतो.
पालथा घडा या शब्दाचं स्पेलिंग B असं करतात का?

Pages