वैयक्तिक अंधश्रद्धा, वैयक्तिक लढा

Submitted by aschig on 28 October, 2009 - 11:33

हा धागा अशा लोकांकरता आहे ज्यांना भविष्य सांगण्याचे विविध प्रकार हे चूक आहेत आणि समाजाकरता हानिकारक आहेत याची जाणीव आहे (हे लोकच चूक आहेत का याबद्दलचा वाद इथे अपेक्षित नाही - त्या करता इतर जागा आहेत). अंधश्रद्धा इतरही अनेक प्रकारच्या असतात, आणि या ना त्या प्रकारे समाजाला हानिकारक असतात. अशा गोष्टिंचा विचार येथे केला जावा.

जन्म व मृत्यु या दोन बाबतीत मनुष्य जास्त आगतीक असतो. त्यामुळे त्या दोन गोष्टिंभोवती सर्वात जास्त वलये निर्माण केल्या जातात. आपण मृत्युपासुनच सुरुवात करु या. नंतर इतर गोष्टि येतीलच.

नरेंद्र दाभोलकर यांच्या भ्रम आणि निरास या पुस्तकाचे परिशिष्ट आहे नार्वेकर गुरुजींचे मृत्युपत्र. ते येथे दिले आहे. (धन्यवाद प्रकाश घाटपांडें). त्या अनुषंगाने संभाषण सुरु करु शकु.

https://docs.google.com/file/d/0B2X6bSru0D7IYmt3bjNTYU9ZbWs/edit

(२३ नव्हेंबर २००९ च्या पोस्ट वरुन):

अशाप्रकारे स्वतःशिवाय सर्व गोष्टींना माया ठरविल्यावर तुम्हि करत असलेल्या गोष्टींना खालील प्रकारांमध्ये विभागा (१) आवश्यक (२) अनावश्यक (उदा. एखादी सवय किंवा कृती) - पण घरच्यांना, कुटुंबियांना, देश- व पृथ्विवासियांना त्यामुळे त्रास होत नाही (३) अनावश्यक, आणि शक्य आहे की स्वत:ला थोडि त्रासदायक, पण इतरांना (आप्तांना, किंवा अनेक गरजुंना) उपयोगी आणि (४) अनावश्यक.

स्वत:च्या मनःशांतीकरता कुणी पुजा करत असेल, आणि ते आवश्यक आहे असे वाटत असेल, आणि त्यामुळे कुणाला त्रास होत नसेल तर ते आवश्यक मध्ये येईल. पण त्यामुळे दुसर्यांनी अशी पुजा करावी आणि तशी करु नये असे म्हंटल्यास ते अनावश्यक मध्ये जाईल. त्याचप्रमाणे पुजेकरता एका फुलाऐवजी १००० endangered फुलांचा हार लागतो असे म्हंटल्यास तेही अनवश्यक.

वरील विभागणी योग्य वाटते का? त्यामध्ये काही बदल करावे लागतील का? कसे? ही विभागणी स्थिरस्त्वार झाली की मग पुढे जाता येईल.

(सप्टेंबर २०१४ मध्ये पुढे आलेले काही वैयक्तिक लढे) :

विश्वास नसल्यामुळे मुलाची मुंज न करणं, मृत्युनंतरचे विधी न करणं, सत्यनारायण न करणं, दृष्ट काढण्याची जबरदस्ती न करु देणं, मासीक पाळी असल्यामुळे डिस्क्रिमिनेट न करु देणं (हे सर्व फार त्रोटक झालं - त्या लोकांच्या भावना पोचण्यासाठी त्यांच्याच पोस्ट वाचाव्या).

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<पण मी बिलिव्हर आहे(म्हणजे काय?) असे त्यांनी सांगितले>

हा आरती म्हणत असलेला धार्मिक श्रद्धा आणि श्रद्धा यांतला फरक.

आस्तिक आणि नास्तिक हे आजचे अर्थ थोडे चुकीचे आहे.

जैन असतात ते पण नास्तिक आणि बौद्ध पण नास्तिक. आणि कट्टर धर्मनिष्ठ मुस्लीम अतिरेकी पण नास्तिकच.

आस्तिक असण्याचा संबंध वेदप्रामाण्याशी आहे. त्यामुळे नास्तिक = देव न मानणारा असं नाही.

आंबेडकरांनि बौद्ध मत स्विकारले कारन ते सायन्सवर आधारित होते >> कुठलाच धर्म सायन्सवर आधारीत नाही. उगाच आंबेडकर आणि बौद्ध धर्म अशी सांगड घालून लिहिलेले वाक्य.

बौद्ध धर्मात धर्माचा अर्थ निसर्गाचे नियम असा आहे} >> धर्म ह्या संस्कृत शब्दाचा अर्थ रिलिजन नाही. तेंव्हा कुठे गेला राधासुता तुझा धर्म, हे वाक्य मायबोलीवर देखील पाप्युलर आहे. त्याचे मुळ संस्कृत आहे.

माझे काका पण नास्तिक ते आता परत आस्तिक ( सश्रद्ध ते अश्रद्ध) असा प्रवास करून आलेले आहेत. त्यांचे आयुष्य पाहिले तर त्यांच्यावर कोणी दवाब टाकण्यापेक्षा ते इतरांवर टाकतात असे आहे. पण तुकारामावर त्यांनी केलेल्या Phd नंतर ते बदलले.

चिनूक्स तरिही मला त्यांना काय नेमके म्हणायचेय ते नीटसे समजले नाही.
म्हणजे सर्वशक्तीमान देवावर त्यांचा विश्वास आहे का? की हे जग बनविणार्यावर आहे? की या जगाला कोणी एक बनवतोय , सांभाळतोय यावर आहे?
त्यांनी मी निरीश्वरवादी नाही हे ही जरा संदिग्धपणेच सांगितले.
म्हणजे ते ईश्वरवादी असावेत का?

केदार आणि कर्नाडांची नास्तिक शब्दाची व्याख्या जवळपास सारखी आहे.
केदारच्या व्याख्येत चातुर्वर्ण्याचा उल्लेख नाही.

केदार जि बौद्ध धर्मा बद्द्ल तुम्हि किति जानता ?पालि भाषे विषइ किति जानता? मुळ बौद्ध सुत्त हि पालि भाषेत आहेत.ति वाचा त्यात धर्माचा अर्थ आहे.
आंबेडकरांनि बौद्ध मत स्विकारले कारन ते सायन्सवर आधारित होते असे मला वाटते.
मग तुम्हिच सांगा त्यानि हिंदु धर्माचा त्याग करुन मुस्लिम ईसाई न होता बौद्ध धर्मच का स्विकारला?

साती,

चातुर्वर्ण्याचा उल्लेखाचा आस्तिकाशी किंवा नास्तिकाशी काय संबंध?

आस्तिक म्हणजे जो वेदांना प्र्माण माणतो तो. ( वेद, वेदांगे, उपनिषद, स्मृती, शृती हे सर्व ओघाने येतेच)

बौद्ध मत आणि जैन मत पाखंड मत म्हणून वैदिक मानत तर नास्तिक वैदिक धर्मीयांची आस्तिक म्हणून हेटाळणी करत.

कारन ते सायन्सवर आधारित होते असे मला वाटते. >> सायन्टिफिक भाषा बोलणार्‍याने "कारन ते सायन्सवर आधारित होते असे मला वाटते" असं लिहू नये.

केदार जि बौद्ध धर्मा बद्द्ल तुम्हि किति जानता ?पालि भाषे विषइ किति जानता?
>>

कुठल्याही धर्मावर मला वाद घालायचा नाही. पण तुम्ही विचारले म्हणून या आधी मधुकरने असाच वाद घातला, आणि मी त्याला त्रिपिटकं आणि निक्काय मधून उत्तर दिली होती. बौद्ध धर्माचा तुमचा अभ्यास असेल तर तुम्हाला त्रिपिटकं / निक्काय माहिती असतीलच. आणि हो पद्मसंभव पण ! नसेल तर माहिती करून घ्या. त्यासाठी पाली यायची गरज नाही, मराठी, इंग्रजी मध्ये भाषांतर आहेत.

मी श्रद्धा / अश्रद्धा वर बौद्ध, हिंदू, जैन, ख्रिश्चन, मुस्लिम हे सर्व धर्म सारखेच तोलतो. कुठल्याही धर्माने मला फरक पडत नाही. तस्मात इथे श्रद्धेवर बोलता येईल. धर्मावर कुठेतरी बोलू.

दवे : अहो तो मुळ अर्थ. आता सर्रास आस्तिक म्हणजे देव मानणारा आणि नास्तिक म्हणजे नाही अशी मांडणी केली / झाली आहे.

मुळ अर्थापेक्षा सांगितलेला अर्थ म्हणणे जास्त योग्य ठरेल मुळात हिंदु या शब्दा आधी वैदिक हा शब्द होता त्यामुळे आस्तिक ही संकल्पना नंतर अस्तित्वात आली. जी चार्वक यांच्याकाळात अधोरेखित झाली. देवांनीच वेद निर्माण केले हे म्हणने देखील चुकिचे आहे म्हणुन देवाला मानले म्हणुन वेदांमधे असलेले योग्य अयोग्य देखील मानावेच असे नाही

देवाला मानले म्हणुन वेदांमधे असलेले योग्य अयोग्य देखील मानावेच असे नाही >> करेक्ट !

आणि तसे पाहिले तर - खरेतर कोण आस्तिक / नास्तिक हा प्रश्न मला चुकीचा वाटतो. कारण कोण सश्रद्ध आणि कोण अश्रद्ध त्यावरून त्या व्यक्तीची विज्ञानाधिष्ठता / बुद्धीप्रामाण्य ठरवणे मला चुकीचे वाटतं. कितीतरी सायण्टिस्ट देव मानणारे आहेत / होते आणि किती तरी माझ्या सारखे देव असला अन नसला त्याने काय फरक पडतो असे मानणारे आहेत. त्यामुळे बिईंग आस्तिक ऑर बिईंग नास्तिक इज वे ऑफ हिज पर्सनल लाईफ. नथिंग मोअर देन दॅट.

जो पर्यंत एखादी गोष्ट स्व विचाराने ताडून पाहत नाहीत तो पर्यंत प्रत्येक गोष्ट अंधच. पण म्हणून कोणी जर, जा रे देवाच्या पाया पड असे म्हणत असेल तर ती अंधश्रद्धा आहे, असे वैयक्तिक मला पटत नाही. माझ्या मते देव नसला तरी !

कलेक्टिव्ह सोसायटी म्हणून अंधश्रद्धा निर्मूलनाचे कायदे व्हावेत आणि त्या चौकटीत समाजाने राहावे असे मला वाटते. आता हे ठरवणार कोण हा मुलभूत प्रश्न आहे. तर तिथेही "उपद्रव मुल्यच" महत्वाचे. म्हणून तेवढेच खरे. आज "बळीत" उपद्रव मुल्य आहे म्हणून समाज तो कायदा पास करतो, उद्या भविष्यात "१० दिवस रस्त्यावर देव मांडून गोंधळ घालणे" हे कदाचित उपद्रव मुल्यात येईल !

"टोटल देव न मानणारी सोसायटी" असे कुणाचे स्वप्न असेल तर ते दिवास्वप्न आहे.

<<<<मी श्रद्धा / अश्रद्धा वर बौद्ध, हिंदू, जैन, ख्रिश्चन, मुस्लिम हे सर्व धर्म सारखेच तोलतो. कुठल्याही धर्माने मला फरक पडत नाही. तस्मात इथे श्रद्धेवर बोलता येईल. धर्मावर कुठेतरी बोलू.

जो पर्यंत एखादी गोष्ट स्व विचाराने ताडून पाहत नाहीत तो पर्यंत प्रत्येक गोष्ट अंधच.
या विचाराशि सह्मत.

आंबेडकरांनि हिंदु धर्माचा त्याग करुन मुस्लिम ईसाई न होता बौद्ध धर्मच का स्विकारला?
याचे ऊत्तर कोनि देईल का?

आंबेडकरांनि हिंदु धर्माचा त्याग करुन मुस्लिम ईसाई न होता बौद्ध धर्मच का स्विकारला?
याचे ऊत्तर कोनि देईल का?<<<

शांतताप्रिय धर्म असे त्या काळी त्या धर्माचे स्वरूप असल्यामुळे असेल असे वाटते.

निव्वळ अंदाज

धम्म आणि धर्म हे दोन्ही भारतीय शब्द आहेत केवळ भाषा वेगळी आहे. धम्म किंवा धर्म हि संज्ञा नेहमी व्यापक राहिलेली आहे, या शब्दाचा अर्थ होतो सत्य, (धर्मपद म्हणजे सत्याचा मार्ग, नितीवान जीवन जगण्याचा मार्ग) किंवा धर्म म्हणजे निसर्गाचे नियम, धर्म म्हणजे बुद्धांचे शब्द.. आपण या शब्दाचा अर्थ अशा प्रकारे घेऊ शकतो.. बाबासाहेबांनी सुद्धा 'धर्म आणि धम्म' असा फरक केला नसुन 'रिलीजन आणि धम्म' असा केला आहे. रिलीजन या शब्दाचा अर्थ संप्रदाय असा होतो. हिंदु, शीख, ख्रिस्ती हे संप्रदाय आहेत, रिलीजन आहेत..

पण धर्म किंवा धम्म वेगळा आहे. प्रत्येक पदार्थांचा स्वतःचा असा वेगळा धर्म असतो, ज्याप्रमाणे अग्नीचा धर्म जळणे, जाळणे..

याचबाबतीत दुसरे उदाहरण द्यायचे झाले तर :

भगवान बुद्धांच्या अनुयायांचा धर्म काय आहे असे विचारलल्यावर कोणी 'बौद्ध' असे उत्तर देईल परंतु बौद्ध हा धर्म नसुन तो संप्रदाय (रिलीजन) आहे. मग धर्म काय आहे..?

1. कोणतेही पाप न करणे, कुशल धर्माचे संपादन करणे हा धर्म आहे.

2. माता - पित्याची सेवा करणे, पत्नी मुलांचा सांभाळ करणे, सुभाषण करणे हा धर्म आहे.

3. दक्षिणा देण्यायोग्य व्यक्तींना दान देणे, काया, वाचा आणि मनाने अकुशल कर्म न करणे जीवहिंसा व मद्यपान न करणे हा धर्म आहे.

4. जेणेकरुन विद्वान लोक नावे ठेवतील असे लहानात लहान सुद्धा कार्य करु नये. सर्व प्राणी सुखी होवोत. सर्वांचे कल्याण होवो, सर्वच सिद्धीस प्राप्त होवोत, अशी मैत्रीभावना करणे हा धर्म आहे.

5. कोणाचीही कोणी वंचना न करोत, कोणीही कोणाचा अपमान न करोत. वैमनस्य किंवाविरोध चर्याने कोणीही कोणाला दुक्ख देण्याची इच्छा न करोत. अशी भावना करणे हा धर्म आहे..

6. ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाचे रक्षण करण्यासाठी आपले जीवन पणास लावते, त्याचप्रमाणे प्राणीमात्रांच्या प्रती मनात निस्सीम प्रेम भाव जागृत करणे हा धर्म आहे.

7. मनातील बाधा वैरभाव आणि शत्रुत्व झटकुन, वर खाली व आजुबाजुला सर्वच जगताच्या प्रती मनात निस्सीम प्रेम - भाव वाढविणे हा धर्म आहे.

हे सर्व धर्म आहेत. रिलिजन किंवा संप्रदाय नाहीत...
सर्व चिंता नष्ट करणारे श्रेष्ठ व उत्तम धर्मरत्न हे औषध आहे. त्याच्या सत्कारपुर्वक सेवनाने सर्व जीवांचे सर्वभय शांत होवोत

>> "टोटल देव न मानणारी सोसायटी" असे कुणाचे स्वप्न असेल तर ते दिवास्वप्न आहे.

फारसा प्रचार न करताही अधार्मिक (Secular/Nonreligious/Agnostic/Atheist) विचारसरणी जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. http://en.wikipedia.org/wiki/List_of_religious_populations

हेही नसे थोडके.

<<<<अथ दीप भव म्हणजे नक्की काय भव?>>>
स्वयंप्रकाशित व्हा । स्वावलंबी व्हा
‘अत्त दीप भव‘ (अपना दीप आप बनो). हे पालि भाषेतिल प्रसिध्द बुद्ध वचन आहे.

वा! सुरेख वचन आहे. आवडले. ओशो रजनीश यान्च्या एका पुस्तकात वाचले होते की अन्ध व्यक्तीला जेव्हा बाहेरचे जग दिसत नाही, तेव्हा ती उर्जा ती अन्ध व्यक्ती आतमधला प्रकाश वाढवाण्यासाठी वापरते. त्यामुळे त्याना जग डोळस व्यक्तीपेक्षा जास्त समजते.

Secular[a]/Nonreligious[b]/Agnostic/Atheist हे सर्व एकाच कॅटेगिरीत कसे शक्य आहे?

अमेरिका इज सेक्युलर कंट्री. भारत पण सेक्युलर देश आहे. तसेच बिईंग सेक्युलर म्हणजे Atheist नाही. आणि परत बिईंग नॉन रिलिजस = Atheist असेही म्हणता येत नाही.

According to one 2007 estimate, atheists make up about 2.3% of the world's population, while a further 11.9% are nonreligious.[20] According to a 2012 global poll conducted by WIN/GIA, 13% of the participants say they are atheists.[21] According to other studies, rates of atheism are among the highest in Western nations, again to varying degrees: United States (4%)[22] and Canada (28%).[23] The figures for a 2010 Eurobarometer survey in the European Union (EU), reported that 20% of the EU population do not believe in "any sort of spirit, God or life force".[24]

वरच्या डेटा मध्ये वेस्टर्ण कंट्री असा निष्कर्ष आहे. थोडक्यात रेट ऑफ atheism चे डायरेक्ट रिलेशन प्रगतीशी आहे. कारण प्रगती असेल तर = शिक्षित समाज = भौतिक गोष्टींची अव्हेलेबिलिटी = दैवावर तुलने कमी विसंबने = रॅशनल माईंड होण्यासाठी लागणारे बीज.

अर्थात हे सर्व भारतात किंवा सोमालियात राहूनही एखादा Atheist असतोच. पण रेट कमी.

> जैन असतात ते पण नास्तिक आणि बौद्ध पण नास्तिक. आणि कट्टर धर्मनिष्ठ मुस्लीम अतिरेकी पण नास्तिकच.

तसा अर्थ हिंदूंना इतर धर्म माहीत नव्हते तेंव्हाचा होता (किंवा इतर लोक खूप कमी किंवा खूप दूर होते)
आता त्यांना differently-सश्रद्ध अस म्हणायला हवं

>> कुठलाच धर्म सायन्सवर आधारीत नाही. उगाच आंबेडकर आणि बौद्ध धर्म अशी सांगड घालून लिहिलेले वाक्य. >> सायन्टिफिक भाषा बोलणार्‍याने "कारन ते सायन्सवर आधारित होते असे मला वाटते" असं लिहू नये.

बुध्दा नि सांगितलेला धम्म
चार आर्य सत्य
१. दु:ख है।

२. दु:ख का कारण है ।

३. दु:ख का निदान है ।

४. वह मार्ग है , जिससे दु:ख का निदान होता है ।
अष्टागिंक मार्ग

१. सम्यक दृष्टि ( अन्धविशवास तथा भ्रम से रहित ) ।

२. सम्यक संकल्प (उच्च तथा बुद्दियुक्त ) ।

३. सम्यक वचन ( नम्र , उन्मुक्त , सत्यनिष्ठ ) ।

४. सम्यक कर्मान्त ( शानितपूर्ण , निष्ठापूर्ण ,पवित्र ) ।

५. सम्यक आजीव ( किसी भी प्राणी को आघात या हानि न पहुँचाना ) ।

६. सम्यक व्यायाम ( आत्म-प्रशिक्षण एवं आत्मनिग्रह हेतु ) ।

७. सम्यक स्मृति ( सक्रिय सचेत मन ) ।

८. सम्यक समाधि ( जीवन की यथार्थता पर गहन ध्यान ) ।1.एक वस्तू म्हणजे काय? सर्व प्राणी आहारावर जगणारे आहेत.
2.दोन वस्तू कोणत्या? नाम(अदृशय वस्तू-मन) व रूप(दृष्य वस्तू-शरीर).
3.तीन वस्तू कोणत्या?तीन प्रकारच्या वेदनाये.(सुखद, दुःखद,असुखदःअदुखद)
4.चार वस्तू कोणत्या? चार आर्यसत्ये.(दुःख,दुःखाचे कारण, दुःखाचा निरोध, दुःखाच्या निरोधाचा मार्ग)
5.पाच वस्तू कोणत्या? पाच उपादान स्कंध.(रूप, वेदना, संज्ञा,संस्कार, विज्ञान).
6.सहा वस्तू कोणत्या? सहा प्रकारची आंतरिक आयतने.(चक्षू, स्त्रोत, घ्राण, जिव्हा, काया, मन)
7.सात वस्तू कोणत्या? सात बोध्यांगे(स्मृती, धर्मविचय, वीयॅ, प्रीती, प्रश्रबधी, समाधी, उपेक्षा).
8.आठ वस्तू कोणत्या? आर्य अष्टांगिक मार्ग--सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीव(आजीविका), सम्यक व्यायाम,(प्रयत्न), सम्यक स्मृती. सम्यक समाधी. ॥

हे सायन्स नाहितर काय आहे ?मन आनि बुध्दि शरिर कसे काम करते याचे सायन्स ॥रोबट बनवने म्हनजेच सायन्स
असते का?
याच्या शिवाय जर बुध्दाच्या नावावार काय खपवत असतिल तर माहित नाहि.
.

> जैन असतात ते पण नास्तिक आणि बौद्ध पण नास्तिक. आणि कट्टर धर्मनिष्ठ मुस्लीम अतिरेकी पण नास्तिकच.

मुस्लीम अतिरेकी नास्तिकअसतात कि नाहि माहित नाहि पन जैन आनि बुध्दाचे माहित आहे त्याना नास्तिक का
म्ह्नतात

यज्ञसंस्थेतून प्राणिहत्येची हकालपट्टी करावी असे म्हणणारा गौतम बुद्ध हे ह्या श्रमण-संस्कृतीचे प्रमुख म्हणून बौद्ध व जैन ग्रंथांतून दाखविलेले आहेत. हे सर्व श्रमण-संस्कृतीचे अभिमानी व वैदिक परंपरा न मानणाऱ्या पंथाचे पुढारी म्हणून समजले जात. ह्या निरनिराळ्या अवैदिक परंपरेच्या अनुयायांच्या पैकी जैन व बौद्ध ह्यांचेच धार्मिक ग्रंथ स्वतंत्रपणे उपलब्ध असून इतरांच्या धार्मिक मतांचा उल्लेख अनुषंगानेच किंवा प्रसंगोपात्तच उपलब्ध होतो. जैन व बौद्ध ह्यांना केवळ वैदिक ब्राह्मणांची यज्ञसंस्था व देव-देवता एवढेच मान्य नव्हते असे नसून, ब्राह्मणांनी प्रतिपादन केलेली जन्मजात उच्च-नीचता हीही मान्य नव्हती. म्हणूनच ह्या उभयपंथांच्या ग्रंथांतून यंज्ञसंस्थेबरोबर जन्मजात उच्च-नीचतेवरही कोरडे ओढले आहेत.
म्हनुन ते नास्तिक ठरतात का?

अहो सुरेख,

लिहिलंय की. अहो त्याकाळच्या वैदिकांच्या मते ज्यांची वेदांवर श्रद्धा ते आस्तिक आणि उरलेले नास्तिक.

आशिष, मुसलमान धर्म किंवा ख्रिश्चन, हे तेंव्हा निर्माण झाले नव्हते हे खरे असले तरी, बौद्ध अन जैन होते, त्यामुळे वैदिक साहित्यात "पाखंड मत" असा उल्लेख आहे.

आज आपण काय पाखंडी आहे, असे म्हणतो, त्याचा अर्थ कालानुरूप बदलला. तसेच

आस्तिक अन नास्तिक ह्यांची व्याख्या , व्याप्ती बदलली. त्यामुळेच सुरेख ह्या परत प्रश्न पडला की "जैन आनि बुध्दाचे माहित आहे त्याना नास्तिक का म्ह्नतात"

बाकी सुरेख, अहो मला बौद्ध धर्म म्हणजे काय हे थोडेफार माहिती आहे हो. Happy तुम्ही वारंवार बौद्ध धर्माविषयी लिहून धर्माची चर्चा करत आहात. ती दुसर्‍या बाफवर करता येईल. तिथे माहिती साठवता येईल. ( न भांडणं करता)

आता तुम्ही मन हा शब्द लिहिला आहे. सायन्स मध्ये "मन" ह्याला काही अर्थ नाही. ती फिलॉसॉफिकल टर्म आहे. इथेच तुम्ही लिहिलेले गंडते.

आता तुम्हाला हिंदू धर्माकडे आणतो.

इनफॅक्ट मन म्हणजे काय आणि ते कसे तयार होते, ह्यावर खूप छान चर्चा केनोपनिषदा आणि छांदोग्यौपौनिषदा मध्ये सापडेल.

वेदात तरी दुसरे काय म्हणलेय?

ॐ वाड़ मे मन्सि प्रतिष्ठिता |
मनो मे वाचि प्रतिष्ठितमाविरावीर्म एधि |
वेदस्य म आणीस्थः श्रृतं मे मा प्रहासी: |
अनेनाधीते नाहोरात्रान्सन्दधाम्यॄतं वदिष्यामि |
सत्यं वदिष्यामि | तन्मामवतु |
तद्वक्तारम्वतु | अवत मामवतु वक्तारमवतु वक्तारम् ||
ॐ शान्ति: | शान्ति: || शान्ति: |||

माझ्या वाणीचे मूळ माझ्या मनात असो आणि माझ्या मनाचे मूळ माझ्या वाणीत असो. हे ब्रह्म मला ज्ञान करुन दे. माझ्यात वेदांना ( शब्दशः वेद नाही तर वेद म्हणजे ज्ञान) आन. मी ऐकलेले कधीही विसरु नको असे कर. ह्या अभ्यासासाठी माझे सर्वस्व मी पणाला लावेन. असा अर्थ आहे.

म्हणजेच मला बुद्धीप्रामाण्यवादी बनव असे वेदात लिहिले आहे. Wink

चातुर्वर्ण्य ची व्याख्या ती पण वेदांमध्ये न येता पुरूष सुक्तामध्ये येते. त्याला प्रक्षिप्त म्हणतात त्यात आहे. आणि केवळ चार वर्णाची आजच्या व्याख्या पाहिली की सर्व वेद आणि त्यातील ज्ञान टाकावू बनते काय? सगळीकडे लोक वैदिक धर्माची हेटाळणी करताना दिसतात, त्यांनी कितीसा अभ्यास केला आहे?

ब्राह्मणांनी प्रतिपादन केलेली जन्मजात उच्च-नीचता हीही मान्य नव्हती. >>. हे परत एक रॅण्डम वाक्य आहे.

वेदांप्र्माणेच ब्राह्मणापेक्षा क्षत्रिय मोठा आहे. आणि केवळ क्षत्रियच मोक्षप्राप्तीचा मार्ग ब्राह्मणाला सांगू शकतो. (उलट नाही) तोच देवाचे रूप आहे. म्हणून हिंदूचे देव पाहा. ते सगळे क्षत्रिय आहेत. ब्राह्मण अपवादाला वामन !

सगळ्या गोष्टींना अगदी डे वन पासून आजपर्यंत ब्राह्मण जबाबदार असे म्हणून तुम्ही फार तर एका समाजाला बळी देऊ शकतात. तीच वस्तूस्थिती असायला हवीच असे नाही.

तस्मात, आधी लिहिल्याप्रमाणे विविध धर्माची चर्चा करण्यात काय हशील आहे ह्या बाफवर? सगळ्याच धर्मात श्रद्धा आणि अंधश्रद्धा आहेत आणि त्या अनुषंगाने चर्चा करावी असे मला वाटते.

(आणि तरीही मी इतके उत्तर दिले. Happy )

<<<<<<<आता तुम्ही मन हा शब्द लिहिला आहे. सायन्स मध्ये "मन" ह्याला काही अर्थ नाही. ती फिलॉसॉफिकल टर्म आहे. इथेच तुम्ही लिहिलेले गंडते>>
.शरिर आनि मन कसे काम करते हे ध्यानाच्या माध्यमातुन जानने हे सायन्स कसे होऊ शकत नाहि?
मग मनाचा अभ्यास करनार्‍याला मानसशास्त्रज्ञ का म्ह्नतात?

तस्मात, आधी लिहिल्याप्रमाणे विविध धर्माची चर्चा करण्यात काय हशील आहे ह्या बाफवर? सगळ्याच धर्मात श्रद्धा आणि अंधश्रद्धा आहेत आणि त्या अनुषंगाने चर्चा करावी असे मला वाटते.

(आणि तरीही मी इतके उत्तर दिले. ) सहमत. धन्यवाद

पण केदार, माझ्या समजण्यासाठी विचारत आहे, मानसशास्त्र ही संज्ञा फक्त मेंदूचाच अभ्यास करते का? आणि तसे असल्यास मानसशास्त्र अशी संज्ञा का निर्माण करावी लागली? न्युरॉलॉजीचाच एक भाग का नाही झाले ते शास्त्र?

मानसशास्त्र हे माणसाचे मन / विचार / वर्तणूक, एख्याद्या विशिष्ट वेळी त्याचे वागणे काय असेल ह्या बद्दल विचार करते हे तर खरेच आहे.
पण मुळ प्रश्न हा की मन नावाचा कोणता अवयव शरीरात नाही. तरीही माणसाला मन असतेच. असेच "विचारा" बद्दल लिहू शकता येते, पण विचार आणि मन हे परत वेगळे आहेत. म्हणून मी तो प्रश्न विचारला.

तुम्ही म्हणताय तो अभ्यास कदाचित Neuropsychology मध्ये ये येईल. पण इथे त्या विषयातील तज्ञ लोकं आहेत त्यांनीच मांडलेले बरे.

खरे तर जाणता अजाणता मी एका मोठ्या विषयाला सुरेखांमुळे मध्ये आणले. मन ! आणि मनाने ऐकले तर सगळ्याच अंधश्रद्धा लवकर दुर होतील. बुद्धीने ऐकून फायदा नाही असे सध्यातरी दिसतेय. Happy लोकं फक्त ऐकुण घेतात, पण त्यांचे मन मानत नाही की ते चुकीचे आहे.

मन आणि बुद्धी असा संगम झाला पाहिजे. Happy सारी जडोंका मुल ये मन ! ( हे सुरेखांसाठी हिंदी. Happy )

सॉरी मी तुमच्या प्रश्नाचे नीट उत्तर देऊ शकलो नाही.

पाच इन्द्रिया चा पदार्था शि संपर्क होऊन शरिरा वर उमटनार्‍या संवेदना जानुन घेनारा अवयव.म्ह्नजे मन
सुंदर फुलाकडे बघुन शरिरावर ऊमटनारि आनंदाचि संवेदना जानुन घेनारे ते मन.{डोळे आनि फुलाचा संपर्क}
कानाला शिवि एकुन शरिरावर ऊमटनारि रागाचि संवेदना जानुन घेनारे ते मन{कान आनि शब्दा चा संपर्क}

Pages