वैयक्तिक अंधश्रद्धा, वैयक्तिक लढा

Submitted by aschig on 28 October, 2009 - 11:33

हा धागा अशा लोकांकरता आहे ज्यांना भविष्य सांगण्याचे विविध प्रकार हे चूक आहेत आणि समाजाकरता हानिकारक आहेत याची जाणीव आहे (हे लोकच चूक आहेत का याबद्दलचा वाद इथे अपेक्षित नाही - त्या करता इतर जागा आहेत). अंधश्रद्धा इतरही अनेक प्रकारच्या असतात, आणि या ना त्या प्रकारे समाजाला हानिकारक असतात. अशा गोष्टिंचा विचार येथे केला जावा.

जन्म व मृत्यु या दोन बाबतीत मनुष्य जास्त आगतीक असतो. त्यामुळे त्या दोन गोष्टिंभोवती सर्वात जास्त वलये निर्माण केल्या जातात. आपण मृत्युपासुनच सुरुवात करु या. नंतर इतर गोष्टि येतीलच.

नरेंद्र दाभोलकर यांच्या भ्रम आणि निरास या पुस्तकाचे परिशिष्ट आहे नार्वेकर गुरुजींचे मृत्युपत्र. ते येथे दिले आहे. (धन्यवाद प्रकाश घाटपांडें). त्या अनुषंगाने संभाषण सुरु करु शकु.

https://docs.google.com/file/d/0B2X6bSru0D7IYmt3bjNTYU9ZbWs/edit

(२३ नव्हेंबर २००९ च्या पोस्ट वरुन):

अशाप्रकारे स्वतःशिवाय सर्व गोष्टींना माया ठरविल्यावर तुम्हि करत असलेल्या गोष्टींना खालील प्रकारांमध्ये विभागा (१) आवश्यक (२) अनावश्यक (उदा. एखादी सवय किंवा कृती) - पण घरच्यांना, कुटुंबियांना, देश- व पृथ्विवासियांना त्यामुळे त्रास होत नाही (३) अनावश्यक, आणि शक्य आहे की स्वत:ला थोडि त्रासदायक, पण इतरांना (आप्तांना, किंवा अनेक गरजुंना) उपयोगी आणि (४) अनावश्यक.

स्वत:च्या मनःशांतीकरता कुणी पुजा करत असेल, आणि ते आवश्यक आहे असे वाटत असेल, आणि त्यामुळे कुणाला त्रास होत नसेल तर ते आवश्यक मध्ये येईल. पण त्यामुळे दुसर्यांनी अशी पुजा करावी आणि तशी करु नये असे म्हंटल्यास ते अनावश्यक मध्ये जाईल. त्याचप्रमाणे पुजेकरता एका फुलाऐवजी १००० endangered फुलांचा हार लागतो असे म्हंटल्यास तेही अनवश्यक.

वरील विभागणी योग्य वाटते का? त्यामध्ये काही बदल करावे लागतील का? कसे? ही विभागणी स्थिरस्त्वार झाली की मग पुढे जाता येईल.

(सप्टेंबर २०१४ मध्ये पुढे आलेले काही वैयक्तिक लढे) :

विश्वास नसल्यामुळे मुलाची मुंज न करणं, मृत्युनंतरचे विधी न करणं, सत्यनारायण न करणं, दृष्ट काढण्याची जबरदस्ती न करु देणं, मासीक पाळी असल्यामुळे डिस्क्रिमिनेट न करु देणं (हे सर्व फार त्रोटक झालं - त्या लोकांच्या भावना पोचण्यासाठी त्यांच्याच पोस्ट वाचाव्या).

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख,

हे तुम्ही जे लिहिले आहेत त्या संवेदना मेंदूत असतात असे ऐकून माहीत आहे. मन त्यापेक्षा काहीतरी निराळे आहे.

मला एक विधान करायचे आहे.

'मन हा एक अवयव म्हणून दाखवता यायला हवा' ही मागणीच रास्त नाही किंवा ही अपेक्षाच रास्त नाही. शिवाय, मन ही वस्तू प्रत्यक्ष दिसत नाही तरीही ती असल्यासारखे वाटत राहते ह्याचा अर्थ विज्ञानाला अजून न समजलेली व ह्यापुढे विज्ञानाच्या कधी नियंत्रणात येईलच अशी नसलेली एक बाब अस्तित्त्वात आहे. येथे अस्तिक व नास्तिक ह्या चर्चेची एक सीमारेषा दिसून यावी.'

बेफि,
तारेतून वाहणारी, बॅटरीमधे साठवलेली, हात लागला तर झटका देणारी वीज 'वस्तू' म्हणून दाखवता येते का?

तिला विज्ञानाने नियंत्रणात आणले आहे का?

तुम्हाला निद्रानाश झाला, तर झोपेची गोळी देता येते. अँक्झिओलायटिक्स म्हणजे चिंता काळज्या कमी करणारी, मन शांत करणारी औषधे आहेत, तशीच इतर अनेक आहेत, अन त्यांवर रिसर्च सुरूच आहे. हिस्टेरिया, ल्युनसी, असे शब्द वापरून 'वेडा'चे प्रकार ठरवणे अन त्यावरचे अघोरी इलाज मागे पडताहेत. हे आजचे नव्हे. मनाशी खेळण्यासाठी, त्याला मॉडीफाय करण्यासाठी (बहुतेकदा रात्री Wink ) घ्यायची वेगवेगळी रंगीत औषधे आदिमानवाच्या काळापासून वापरात आहेत.

त्यामुळे मन ही गोष्ट विज्ञानाला समजलेलीच नाही, अन तिच्यावर संपूर्ण नियंत्रण येणारच नाही, असे तुम्ही कसे म्हणू शकता?

इब्लिस,

प्रतिसाद द्यायचा प्रयत्न करतो. (वीजेची तुलना होईल हे अपेक्षित होते)

तारेतून वाहणारी, बॅटरीमधे साठवलेली, हात लागला तर झटका देणारी वीज 'वस्तू' म्हणून दाखवता येते का?<<<

वीजेवर चालणारी उपकरणे वीज आहे हे सिद्ध करतात. मनावर चालणारे विश्व मेंदूवर चालते असे गृहीत धरले जाऊ शकते. उदाहरणार्थः दुर्योधन वाईट होता व त्याने पांडवांशी युद्ध केले (जसा इतिहास सांगितला जातो तसे लिहीत आहे) ह्यातून दुर्योधनाचा मेंदू क्रौर्य व स्वार्थ या भावनांच्या संदर्भात प्रभावी होता तर युधिष्ठिराचा मेंदू न्याय व सत्याबाबत प्रभावी होता असे म्हंटले जाईल. पण समजा दुर्योधन मुळात चांगला असला व त्याला फक्त आणि फक्त पाच पांडवांचाच राग असला व त्याने त्यांच्याशी युद्ध केले पण बाकी कित्येकांवर उपकार केले तर काय सिद्ध होईल? तर मग असे सिद्ध होईल की त्या त्या परिस्थितीत त्याचा मेंदू तसा तसा वागला. पण त्याचे मन तसे बनलेले होते हे सिद्ध करा म्हंटले तर सिद्ध नाही करता येणार. त्याचे मन तसे होते म्हणून त्याने युद्ध केले असे नाही म्हणता येणार. कारण मन तसे असते तर त्याने सगळ्यांशीच युद्ध केले असते. जसे, वीजेने सगळ्यांनाच झटकाच बसतो, त्यात आपपरभाव नसतो.

समजा मला कोणी शिवी दिली तर मला दु:ख होते म्हणजे नेमके काय होते? मेंदूतील कोणता भाग दुखावतो? माझ्या अंदाजानुसार मेंदू फक्त इतकाच संदेश देतो की तुझा चारचौघात अपमान झालेला आहे व हे तू सहन करता कामा नयेस. मेंदूला हळूहळू नियंत्रणात आणून त्याला हे शिकवणे की दुसर्‍याने शिवी दिल्याने माझे प्रत्यक्षात काहीच बिघडत नसते ही अहंवर विजय मिळवण्याची प्रक्रिया असून ती मेंदूत कुठे घडते हे विद्यानाला सिद्ध करता येणार नाही असे वाटते कारण ती मनात (? - हे प्रश्नचिन्ह त्यांच्यावतीने जे मन म्हणजे काय असे विचारत आहेत, माझ्यावतीने नव्हे) घडते. मेंदूलाही विशिष्ट पद्धतीने विचार करावयास लावण्याची यंत्रनाही मेंदूतच असते हे कदाचित सिद्ध होईलही, पण ती यंत्रणा हा मेंदूचाच एक भाग असता तर ती कार्यान्वितच झाली नसती कारण मेंदू व ती यंत्रणा ह्यांच्यातच दुही माजली असती. म्हणून ती यंत्रणा 'वैज्ञानिकदृष्ट्या जरी कदाचित मेंदूच्या ठायी वसल्याचे सिद्ध झाले' तरीही तिची कार्यप्रेरणा मेंदूपेक्षा वेगळी आहे हे मान्य व्हायला हरकत नसावी व त्याला मन म्हंटले गेल्यास ते कुठे असते ते दाखवा असे म्हणण्याव्यतिरिक्त युक्तीवाद उरणार नाही.

तिला विज्ञानाने नियंत्रणात आणले आहे का?<<<

होय, वीजेला आणले आहे पण मनाला आणले आहे असे वाटत नाही. म्हणूनच नेस्तनाबूत झालेला शत्रू पुन्हा डोके वर काढू शकत नसला तरी त्याच्या मनातील शत्रूत्वाची भावना नष्ट करणे त्याच्या प्रतिस्पर्ध्याला शक्य नसते.

तुम्हाला निद्रानाश झाला, तर झोपेची गोळी देता येते. अँक्झिओलायटिक्स म्हणजे चिंता काळज्या कमी करणारी, मन शांत करणारी औषधे आहेत, तशीच इतर अनेक आहेत, अन त्यांवर रिसर्च सुरूच आहे. हिस्टेरिया, ल्युनसी, असे शब्द वापरून 'वेडा'चे प्रकार ठरवणे अन त्यावरचे अघोरी इलाज मागे पडताहेत. हे आजचे नव्हे. मनाशी खेळण्यासाठी, त्याला मॉडीफाय करण्यासाठी (बहुतेकदा रात्री डोळा मारा ) घ्यायची वेगवेगळी रंगीत औषधे आदिमानवाच्या काळापासून वापरात आहेत.<<< हे तुम्ही जे लिहीत आहात ते माझ्या अंदाजानुसार मेंदूशी संबंधीत असून मनाशी नसावे, मला त्यातले तुमच्याइतके समजत नाही, पण इतके समजते की तुम्ही म्हणता ती औषधे मेंदूवरील उपचारांची असावीत.

त्यामुळे मन ही गोष्ट विज्ञानाला समजलेलीच नाही, अन तिच्यावर संपूर्ण नियंत्रण येणारच नाही, असे तुम्ही कसे म्हणू शकता?<<<

हे वर लिहून दाखवले आहेच. Happy

<<हे तुम्ही जे लिहिले आहेत त्या संवेदना मेंदूत असतात असे ऐकून माहीत आहे. मन त्यापेक्षा काहीतरी निराळे आहे.>>>आपल्या पायाला जर ठेच लागलि तर दुखन्याचे जे तरंग ऊमटतात ते मेंदुत कि शरिरात? दु;खाचे किंवा आनंदाचे जे तरंग मन अनुभवत त्याला संवेदना हा शब्द वापरला आहे.

शाब्बास.

विजेची तुलना याचसाठी आहे, की जेव्हा मेंदूतल्या दोन पेशी एकमेकांशी, वा इतर पेशींशी 'बोलतात', त्यावेळी त्या अतीसूक्ष्म विद्युत्प्रवाह वापरत असतात. अन सोबतीला केमिकल्स. ज्यांना न्यूरोट्रान्स्मिटर्स म्हणतात. मेंदूतील विशिष्ट भागात योग्य तितका विजेचा प्रवाह इलेक्ट्रोडमार्फत सोडला, तर वेगवेगळ्या 'भावना' देखिल तयार करता येऊ शकतात.

चिंता करणे हे मेंदूचे काम आहे की मनाचे?

चिंता कमी करायची, तर त्यासाठी गोळी आहे. मग त्याने मेंदूवर परिणाम झाला की मनावर?

अतीसोपे करून सांगायचे, तर 'मन' हे मेंदूत चाललेल्या विद्युत्प्रवाहामुळे निर्माण होणारे 'फिल्ड' आहे. कॉम्प्युटरमधे वीज फिरायला लागली की त्याला "जाग" येते अन "अक्कल हुशारी" देखिल, तसेच. मेंदू जन्माला येताना बूट होतो, अन मधे झोपेत हायबरनेट होतो. शटडाऊन केला, की 'वरचे' तिकीट कटते.

रिबूट करायची सोय अजून सापडलेली नाहिये. सापडली की कळवीनच. सध्या एक्झिस्टिंग सॉफ्टवेअर अन हार्डवेअर मधे काड्या करण्याचे रिसर्च सुरू आहे.

>>>मेंदूतील विशिष्ट भागात योग्य तितका विजेचा प्रवाह इलेक्ट्रोडमार्फत सोडला, तर वेगवेगळ्या 'भावना' देखिल तयार करता येऊ शकतात. <<<

मग विश्वातील अनेकांच्या मेंदूतून शतृत्वाची भावना नष्ट करणे किंवा मैत्रीची भावना निर्माण करणे हे जर काही काळाने जमणार असले तर उत्तम होईल. मुळातच शतृत्व नसेल तर शस्त्रास्त्रे, सीमावाद वगैरे उरणार नाही.

ह्यातून असे मुळीच सुचवू शकत नाही की तुम्ही जे म्हणता ते असंभव आहे. इतकेच म्हणायचे आहे की ते विज्ञानाच्या नियंत्रणात नाही आहे व येईल असे वाटत नाही आहे.

चिंता करणे हे मेंदूचे काम आहे की मनाचे?<<<

चिंता करणे हे काम मेंदूचे आहे, मेंदूने कशाची चिंता करणे सोडायला हवे हे मेंदूला शिकवणे हे मनाचे काम आहे असे म्हणण्याचा माझा प्रयत्न आहे. म्हणजे असे, की फासावर जाण्याची चिंता वाटते म्हणून एक माणूस स्वातंत्र्ययुद्धात भाग घेणार नाही, पण त्याचे मन त्याच्या मेंदूला हे सांगू शकते की तू मरण्यासाठी लागणार्‍या दोन मिनिटांच्या तीव्र वेदना सोडल्या तर तू करत असलेले कार्य हे कित्येकांच्या मेंदूवरील पारतंत्र्याचा ताण व भय नष्ट करणारे आहे, तेव्हा ते कार्य कर!

अजून सर्वसामान्याना समजेल अश्या भाषेत सगळेच वैज्ञानिक ज्ञान सहज उपलब्ध नाही.
सध्या कोणत्या भावभावनांच्या वेळी मेंदूच्या कुठल्या भागात कार्य सुरू होते, कुठले केमिकल्स रिलीज होतात हे बर्याच प्रमाणात ठाउ़क झाले आहे. एवढेच नव्हे तर एखादा पेशीसमूह(मेंदूचा) उद्दिपित केला असता प्रत्यक्ष इतर कारण नसतानाही त्याप्रकारचे भाव जागृत करणे साधलेले आहे. अजूनही शोध लागत आहेतच.
विज्ञान आणि वैज्ञानिक स्वतःला परिपूर्ण असण्याचा, सर्व ़काही ठाऊक असण्याचा दावा करित नाहीत. विज्ञान ही एक न संपणारी प्रक्रिया आहे.

मात्रं काही लोकांना कित्येक गोष्टींचा कार्यकारणभाव आपोआपच माहिती असतो.
प्रत्येक गोष्टीचे कारण 'देवाची इच्छा/ पूर्वजन्मीचे संचित.
वीज का वाहते- देवाची इच्छा
राग का आला- देवाची इच्छा

>>>अजून सर्वसामान्याना समजेल अश्या भाषेत सगळेच वैज्ञानिक ज्ञान सहज उपलब्ध नाही.
सध्या कोणत्या भावभावनांच्या वेळी मेंदूच्या कुठल्या भागात कार्य सुरू होते, कुठले केमिकल्स रिलीज होतात हे बर्याच प्रमाणात ठाउ़क झाले आहे. एवढेच नव्हे तर एखादा पेशीसमूह(मेंदूचा) उद्दिपित केला असता प्रत्यक्ष इतर कारण नसतानाही त्याप्रकारचे भाव जागृत करणे साधलेले आहे. अजूनही शोध लागत नाहि.
विज्ञान आणि वैज्ञानिक स्वतःला परिपूर्ण असण्याचा, सर्व ़काही ठाऊक असण्याचा दावा करित नाहीत. विज्ञान ही एक न संपणारी प्रक्रिया आहे.<<<

विज्ञान ही एक न संपणारी प्रक्रिया आहे ह्या विधानाशी अर्थातच कोणीही सहमत होईल. काही गोष्टी अजूनही विज्ञानाला ज्ञात नाहीत म्हणजे देव असणारच अश्या प्रकारचा दावाही मला करायचा नाहीच आहे. माझे म्हणणे वेगळेच आहे. विज्ञान एखादी गोष्ट समजूच शकणार नाही हेही शक्य आहे हे वैज्ञानिकांना मान्य न होणे हे मला व्यक्तिशः पटत नाही. मुळात विज्ञान ही एक न संपणारी'च' प्रक्रिया का आहे ह्याचेही उत्तर विज्ञानाकडे नसावे असा माझा अंदाज आहे. म्हणजे असे, की कधीतरी ही प्रक्रिया संपली तर विज्ञान परीपूर्ण होईल. पण ती कधीच संपणारी नाही असे जेव्हा वैज्ञानिक म्हणतो तेव्हा तो स्वतःच कोठेतरी मान्य करत असतो की त्या प्रक्रियेला चालना देणे व ती कितीही काळ चालू राहिली तरी परीपूर्ण न होणे किंवा तोवर अभ्यास करण्याजोग्या घटना त्या प्रक्रियेच्याही पुढे पोचलेल्या असणे ह्याच्या मुळाशी एक स्वयंप्रेरणा आहे. ही प्रेरणाच विज्ञानाच्या नियंत्रणात नाही आहे.

जे घडत आहे ते कसे घडत आहे हे समजून घेण्याला विज्ञान हे नांव देण्यात आलेले आहे. जे घडत आहे ते विज्ञानामुळे घडत नाही आहे आणि जे घडत आहे ते विज्ञानाच्या सहाय्याने थांबवणे, त्याचा वेग कमी जास्त करणे किंवा ते नव्याने सुरू करणे हे विज्ञानाला शक्य नाही आहे.

>>>मात्रं काही लोकांना कित्येक गोष्टींचा कार्यकारणभाव आपोआपच माहिती असतो.
प्रत्येक गोष्टीचे कारण 'देवाची इच्छा/ पूर्वजन्मीचे संचित.
वीज का वाहते- देवाची इच्छा
राग का आला- देवाची इच्छा<<<

विज्ञान नाही म्हणजे देववादी (दैववादी नव्हे, देववादी) असे समीकरण निदान मी तरी मांडलेले नाही. त्यामुळे ह्या प्रतिसादावर काही बोलू इच्छित नाही. Happy

'भावना' काय आहेत, त्याबद्दल लिहिलं. बिहेवियर मॉडीफिकेशन साठी 'संस्कार' नामक आयटम वापरला जातो. त्यावरून मनावरच कंट्रोल मिळवला जातो.

ब्रेनवॉश केलेला मानवी बाँब काय असतो?

पण, हे विज्ञानाला कळणारच नाही, अन कधीकाळी संस्काराची गोळी अथवा इंजेक्शन निघणे अशक्य आहे असे काहीसे स्टेटमेंट करुन पुढे तुमचा ट्र्याक तिसरीकडेच जातो आहे असे वाटते. @ बेफि.

प्लीज काय म्हणताय ते अधिक विस्कटून लिहा.

शिवाय सध्या कामात. सम अदर टाईम.

इब्लिस,

तुम्ही व साती ह्यांच्याशी एकाचवेळी दोन वेगळ्या विषयावर प्रतिसाद देत आहे. Happy

>>>'भावना' काय आहेत, त्याबद्दल लिहिलं. बिहेवियर मॉडीफिकेशन साठी 'संस्कार' नामक आयटम वापरला जातो. त्यावरून मनावरच कंट्रोल मिळवला जातो.

ब्रेनवॉश केलेला मानवी बाँब काय असतो?

पण, हे विज्ञानाला कळणारच नाही, अन कधीकाळी संस्काराची गोळी अथवा इंजेक्शन निघणे अशक्य आहे असे काहीसे स्टेटमेंट करुन पुढे तुमचा ट्र्याक तिसरीकडेच जातो आहे असे वाटते. @ बेफि.

प्लीज काय म्हणताय ते अधिक विस्कटून लिहा. <<<

मी तुम्हाला सरतेशेवटी एक प्रश्न विचारला होता की युद्धेच करू नयेत, सर्वांशी सर्वांची मैत्रीच असावी असा विद्युतप्रवाह इलेक्ट्रोडद्वारे मेंदूत सोडणे कधी शक्य होईल असे तुम्हाला वाटते का? तसे झाले तर दहशतवाद, सीमावाद व युद्धे हे सर्व प्रश्न संपतील. Happy

ह्यावर विज्ञानाचे नियंत्रण येऊ शकेल का?

ह्यावर विज्ञानाचे नियंत्रण येऊ शकेल का?
<<
नक्कीच. मात्र या प्रकारचा रिसर्च पुढे नेण्यात व्यक्तीस्वातंत्र्य नामक प्रकार आड येतो. एथिक्स कमिटी अ‍ॅप्रूव्ह करत नाही.

<<<< मी तुम्हाला सरतेशेवटी एक प्रश्न विचारला होता की युद्धेच करू नयेत, सर्वांशी सर्वांची मैत्रीच असावी असा विद्युतप्रवाह इलेक्ट्रोडद्वारे मेंदूत सोडणे कधी शक्य होईल असे तुम्हाला वाटते का? तसे झाले तर दहशतवाद, सीमावाद व युद्धे हे सर्व प्रश्न संपतील. स्मित

ह्यावर विज्ञानाचे नियंत्रण येऊ शकेल का? >>>>>

असे करणे शक्य आहे नाही माहित नाही. पण असे करणे इष्ट ठरेल काय ?
दहशतवाद, सीमावाद व युद्धे हे सर्व भस्मासुर मुलभूत भावनांचे मिश्रण, त्यांची अमर्याद वाढ ई. कारणांमुळे असावी. पण मुलभूत भावना उत्क्रांती मध्ये विकसित झाल्या असून आजही परिपूर्ण जीवन जगण्यासाठी त्यांची गरज आहे.
उदा. राग नष्ट करण्याचे औषध निघाले तर योग्य कारणासाठी सुद्धा राग येणार नाही. योग्य कारणासाठी आलेला माफक राग गरजेचा आहे.

शिवाय, आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना ब्रितीशानी दहशतवादी ठरवले होते. त्यांना असे औषध दिले गेले असते तर आपण स्वतंत्र झालो असतो काय ?

तर, अश्या भास्मासुरांचा बिमोड करण्यासाठी मुक्त विचारसरणी, योग्य शिक्षण, नैतिकता, इतरांच्या स्वातंत्र्याचा आदर आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण याच गोष्टी ची गरज आहे.

>>>योग्य कारणासाठी आलेला माफक राग गरजेचा आहे.<<<

राग येण्यासाठी योग्य कारणही निर्माण होणार नाही असा तो विद्युतप्रवाह असेल असे गृहीत धरावे असे मी इब्लिसांचा तो विशिष्ट प्रतिसाद वाचून म्हणत आहे.

तुमचा वरील प्रतिसाद हा एक असा वेगळा फाटा आहे जो खरंच सध्या चालू असलेल्या चर्चेशी संबंधीत नाही. एक स्वतंत्र प्रतिसाद म्हणून तो उत्तम वाटत आहे, पण येथे सुसंगत मात्र वाटत नाही आहे.

>>>नक्कीच. मात्र या प्रकारचा रिसर्च पुढे नेण्यात व्यक्तीस्वातंत्र्य नामक प्रकार आड येतो. एथिक्स कमिटी अ‍ॅप्रूव्ह करत नाही.<<<

ही चांगली बाब आहे की असा रीसर्च होऊ शकतो. (रीसर्च होऊ शकतो ह्याचा अर्थ ते - एथिक्स कमिटीने अ‍ॅप्रूव्ह केले तरीही - अस्तित्त्वात येईलच असे नसते हेही तितकेच खरे).

पण जर सर्व जग आज दहशतवादाविरुद्ध लढत आहे, सीमावाद संपवू इच्छित आहे तर व्यक्तिस्वातंत्र्याचा बाऊ करणे सोडून तसा विद्युतप्रवाह सोडण्याचे सर्वांनी मान्य करावे वा त्याबाबत करार तरी करावा, नाही का? अण्वस्त्रांबाबत करार झाला तसा?

एखाद्या गोष्टीचा रीसर्च होऊ शकतो, एखादी गोष्ट होऊ शकते, एखाद्या गोष्टीचा रीसर्चही लरण्यात अडथळा येतो, एखादी गोष्ट होऊ शकते की नाही ह्याबाबत आज काहीही सांगता येत नाही, ह्या सर्व भिन्न भिन्न बाबी आहेत.

मला कुनि शिवि दिलि आनि मला राग आला म्ह्नजे नेमके काय झाले?
त्या क्षनि शरिरावर अप्रिय{तरंग} संवेदना ऊमटल्या ज्या आपल्याला नको आहेत ज्या आपन कुनाला दाखवु शकत नाहि.
अशावेळि आपन काय करतो एक तर ति घटना विसरायला मनाला दुसरिकडे वळवतो किंवा परतुन दोन शिव्या देतो याने काय होते तर दु;खद संवेदना वाढुन व्याकुळता येते दु;ख वाढ्ते .
इथे सायन्स हे सांगते कि परिवर्तनशिलता हा निसर्गाचा नियम आहे जे विश्वातिल सगळ्या गोष्टिना समान रुपात लागु पडते
जसे मनुष्यप्रानि पशु पक्षि,झाड फुल पान निसर्गातिल सगळ्याच गोष्टि
तर जेव्हा मला राग आलेला असतो तेव्हा निसर्गाचा परिवर्तनचा नियम माझ्या शरिरात हि चालु असतो संवेदनांच्या रुपात ज्या आपन अनुभवु शकतो परिवर्तनशिलता म्हनजे सततबदलनार्‍या क्रिया त्यालाच अनित्यता असे हि म्ह्नतात
तर अनित्यतेचा स्वभावगुनधर्म घेऊन निर्मान झालेल्या रागाच्या संवेदनांना प्रत्युतर देऊन पुन्हा राग वाढ्वने कि त्याच गुनधर्माला लक्षात ठेऊन तटस्थ राहने योग्य
. हे मानसाला रोजच्या जिवनात ऊपयोगात आनन्यसाठि आहे. ज्याने अंधश्रध्देला बळि न पडता माणुसाला जिवनात येनार्‍या चांगल्या वाइट प्रसंगाशि लढ्न्याचे सामर्थघेता येते.

थेअरिला ला धरुन तर्क करुन पुस्तक वाचुन वादविवाद चालवायचा असेल तर काहिच निष्यण होनार नाहि
गाडि कशि चालवायचि यावर पुस्तक लिहुन पि एच डि करुन ऊपदेश देऊन तो क्लासेस घेउ शकल पन
प्रत्यक्षात गाडि चालवायचि वेळ येइल तेव्हा या शिक्षनाचा काहिच अपयोग होनार नाहि.

जिवन जगन्याचे सायन्स जिवनात उपयोगि पडत असेल तर घ्यायचे नाहितर सोडुन द्यायचे
मेंदुला शरिराचाच एक भाग मानुन प्रयोग करुन बघु शकतो शरिर आनि मन कसे काम करते ते.

बेफ़िकीर जि
.
<<<समजा मला कोणी शिवी दिली तर मला दु:ख होते म्हणजे नेमके काय होते? मेंदूतील कोणता भाग दुखावतो? माझ्या अंदाजानुसार मेंदू फक्त इतकाच संदेश देतो की तुझा चारचौघात अपमान झालेला आहे व हे तू सहन करता कामा नयेस>>>>>
हे असे होते तेव्हा{शिवि दिल्याचे दु;ख}तेव्हा शरिरात काय घडतच नसते का? राग येऊन हात पाय थरथरने श्वावाचि गति वाढने, हार्ट बिट वाढने<<<<< म्हनजे मेंदु संदेश देतो की तुझा चारचौघात अपमान झालेला आहे व हे तू सहन करता कामा नयेस>>>हे वाटते तेव्हा शरिर संवेदना विरहित होऊन रोबट झालेले असते का? असे जर कुनाच्या बाबतित होत असेल तर त्याला कसले दु;ख होनार नाहि आनि सुख हि होनार नाहि कारन सुख दु;ख वाटने ह्या शरिरा वर उमटनार्‍या संवेदना असतात.आनि त्या अनित्य असतात.हे निसर्गा चे सायन्स आहे.
प्रत्येक जन अनुभव घेऊ शकतो.

सुरेख,

तुम्ही जे लिहीत आहात त्यातील शुद्धलेखनाचा भाग सोडून दिला तरी मी मांडलेल्या मुद्याशी ते कसे सुसंगत आहे हेच मला समजत नाही.

क्षमस्व

मला एक कळत नाही. एखादी बुद्धीप्रामाण्यवादी व्यक्ती पुजेत प्राण्याचा बळी गेला की त्याला अंधश्रद्धा म्हणते आणि दुसरीकडे स्वतःचे पोट भरण्यासाठी मात्र मास खाते. दोन्ही ठिकाणी प्राण्याचा बळी गेलाच ना? मग स्वतः ला काय तर बुद्धीमान मानायचे आणि दुसर्‍याला अंधश्रद्धाळू. हो पण जर ती व्यक्ती शाकाहारी असेल तर जे आपण समजू शकतो पण मासाहारी व्यक्तीने अशी विधाने केली की एकदम पारा चढतो.

बेफ़िकीरजि

जाउदे हा विषय शब्दात मांडन कठिन आहे.शुद्धलेखनाचा मोठाच प्राब्लेम आहे.मराठिचा पन प्राब्लेमच आहे तरि एवढ लिहतिय.
धन्यवाद.

.

<<<<<<<मला एक कळत नाही. एखादी बुद्धीप्रामाण्यवादी व्यक्ती पुजेत प्राण्याचा बळी गेला की त्याला अंधश्रद्धा म्हणते आणि दुसरीकडे स्वतःचे पोट भरण्यासाठी मात्र मास खाते. दोन्ही ठिकाणी प्राण्याचा बळी गेलाच ना? मग स्वतः ला काय तर बुद्धीमान मानायचे आणि दुसर्‍याला अंधश्रद्धाळू. हो पण जर ती व्यक्ती शाकाहारी असेल तर जे आपण समजू शकतो पण मासाहारी व्यक्तीने अशी विधाने केली की एकदम पारा चढतो.>>>>>>>
सहमत

बी, अगदीच हास्यास्पद विधान!
मांसाहार आणि श्रद्धा / अंधश्रद्धा याचा संबंध काय ! देव जेवतो, त्याला अमूकच जेवण लागते, अशा कल्पनेला अंधश्रद्धाच म्हणावे लागेल. मग समोर मटण ठेवले काय अन मोदक ठेवला काय!!

मै, पर्फेक्ट! पण हा एक व्ह्यूपॉइंट झाला.
>>
बी | 27 September, 2014 - 22:41 नवीन

मला एक कळत नाही. एखादी बुद्धीप्रामाण्यवादी व्यक्ती पुजेत प्राण्याचा बळी गेला की त्याला अंधश्रद्धा म्हणते आणि दुसरीकडे स्वतःचे पोट भरण्यासाठी मात्र मास खाते. दोन्ही ठिकाणी प्राण्याचा बळी गेलाच ना? मग स्वतः ला काय तर बुद्धीमान मानायचे आणि दुसर्‍याला अंधश्रद्धाळू. हो पण जर ती व्यक्ती शाकाहारी असेल तर जे आपण समजू शकतो पण मासाहारी व्यक्तीने अशी विधाने केली की एकदम पारा चढतो.
<<
बी, मी तुम्हाला उद्देशून प्रतिसाद लिहिणार आहे. पारा ठिकाणावर ठेवून वाचा.
आता,
मुद्दा जीव घेणे हा आहे.
फूड चेन मध्ये माणूस ज्या ठिकाणी आहे, तिथे, तुम्हाला अन मला जीव घेतल्याशिवाय, अन मेलेले मांस खाण्याशिवाय जगण्यास पर्याय नाही.
मग ते मांस मारलेल्या बटाट्याचे असो, जिवंतपणी खुडलेल्या गिलक्या दोडक्याचे असो, की फुलण्याआधीच उपटलेल्या कोथिंबिरीचे असो.

जीवोऽजिवस्य जीवनम्!

तेव्हा मै म्हणतात,, त्या प्रमाणे, देव जेवतो हाच अंधश्रद्धेचा मूळ भाग असला, नॉट्विथस्टँडिंग व्हेज्/नॉनव्हेज, तरीही, जेवायचे तर "जीव" घ्यावाच लागतो. मग तो सजीव प्राणीसृष्टितला, की वनस्पती. दोघे जीवच, ही बाब अलाहिदा, ही पहिली फॅक्ट.

दुसरी महत्वाची फॅक्ट म्हणजे तो जो देवाचा पुजारी/भगत इ. असतो, तो तुम्हाला 'बळी' मागतो.

'देव अंगात आल्यावर
मान हलवून हात हात उडं
मागतो बकरं कोंबडं गं!
शेजारीण सखे बाई'

नैवेद्य, म्हणून जेव्हा मी बळी देतो, तेव्हा ते माझ्यावर कंपल्शन असते. की अमुक सण आला, तमुक नैवेद्य देच! बकरी ईद आली, बळी देच! लाखालाखाला बकरे विकले जातात. बेसिक कन्सेप्ट काय ? तर माझ्याजवळचे 'सर्वोत्तम' ते मी 'बळी' दिले. देवाला नैवेद्य 'चढवला'. अन हे मी करायलाच हवे.

का?

कारण, कुण्या पुराणातल्या त्या अमुकने त्याच्या मुलांचाच बळी देवाला दिला होता!

वारेवा!

तुझी इच्छा, ऐपत असो नसो. इतना तो करनाच पडता.

हे कसे जमते भाउ?

नॉनव्हेज्/व्हेज जीव घेणे, हे मला जेवण्यासाठी अपरिहार्य असले, तरी अमुक देवाच्या नावावर तमुकच जीव घे, अन तो 'मला' नैवेद्य म्हणून दे, असे सांगणे, ही अंधश्रद्धा!

वाघाने भूक भागविण्याकरिता शिकार करणे हा जर त्याचा धर्म असेल, तर नैवेद्य म्हणून बळी न देणे, हा माझा धर्म होतो. कारण त्यात मला व माझ्या कुटुंबाला पुरून शंभरपट उरेल इतक्या मांसाची / अन्नाची नासाडि करणे, व ती होऊ नये म्हणून इतर निकम्म्यांना फक्त अमुक सणाच्या निमित्ताने मेजवानी देणे अपेक्षित आहे.

Did i manage to make myself a little clear?

इथे एक गम्मत दिसून येते.

जितके लोक धार्मिकतेच्या, 'श्रद्धेच्या' बाजूने बोलतात, ते सगळे, "मग स्वतः ला काय तर बुद्धीमान मानायचे आणि दुसर्‍याला अंधश्रद्धाळू." अशा स्टाईलची विधाने करतात.

मुद्दा काय असतो? की 'मानवी' बुद्धीमत्ता तोकडि आहे.
'शास्त्र' लिमिटेड आहे.
'तिकडे' 'पलिकडे' काहीतरी अनलिमिटेड आहे...

अरे यार, तुमची बुद्धी तोकडी आहे, हे तुम्हीच स्वतःला का सांगताहात पुनःपुन्हा? आहे तितकी तर वापरून पहा?? ह्युमिलिटी अन मूर्खपणातला फरक समजतो का??

हुमिलिटीच्या नावाखाली तुम्हाला मूर्ख रहाण्यास भाग तर पाडले जात नाहिये ना??

तुमच्या बाजूने विचार करून पहा,
जर तुम्हाला 'देवाने' बुद्धी दिली आहे, तर ती कशासाठी दिलिये? वापरायला, की बंद करून कपाटात ठेवायला??
माणूस अन जनावरात फरक काय, तर म्हणे माणसाला देवाने बुद्धी दिली!!

अन तुम्ही एकझॅक्टली त्याच बुद्धीप्रामाण्याला शिव्या घालता??

वेक अप.

उठा!!

जापान मधे १०० टक्के लोक नॉनव्हेजिटेयिन आहेत तिथे शेत जमिन खुप कमि व समुद्र जास्त आहे .तिथले लोक खुप शांत, मेहनति, शिस्तप्रिय असतात दिर्घ आयुष्यि असतात.१००व त्याहुनहि जास्त वर्ष जगनारे लोक आहेत तिथे दुकानात शेव चकलि चिवडा सारखे पदार्थ घेतले तरि त्यात फिशचि पावडर मिसळलेलि असते.आनि वर सगळ जापनिज मधे लिह्लेल असते काहि कळत नाहि.
भारतात शेत जमिन भरपुर आहे, दुध दुपत आहे मग शाकाहार करायला काय हरकत आहे?.
मांसाहार आणि श्रद्धा / अंधश्रद्धा याचा व देव,नैवेद्य याला धरुन मि बोलत नाहिय माझे वैयक्तिक मत.

सुरेख, कृपया शाकाहार की मांसाहार या ट्रॅकवर इथला विषय नेऊ नका. त्यासाठी हवंतर वेगळा ट्रॅक मांडा.

देवासाठी म्हणून प्राण्याचा बळी देणे आणि माणसाने अन्न म्हणून मास खाणे हे दोन्ही चुकीचे आणि अ-मानुष आहे. हा माझा खरा मुद्दा आहे.

तुम्ही देव मानता ना मग त्याच्यासाठी कुठलेही शाकाहारी अन्न प्रसाद म्हणून ठेवा. तसेच, तुम्हाला भुक लागली आहे ना मग माणसाने कुणाचा जीव घेऊन स्वतःची भूक शमवू नये.

आता ह्यातून एक वाद उपस्थित होतो की, भाजीपाला फळफळावळ ह्यांना देखील जीव असतो. मान्य आहे, ह्यांना देखील जीव आहे. पण मनुष्य वार्‍यावर जगू शकत नाही. अन्नाची जर निवड करायचीच झाली तर उपलब्द्ध असेल तर भाजीपाला, कडधान्य, फळ ह्यांची निवड करा. कुणा प्राण्याचा जीव घेऊ नका. शाकाहाराची निवड करणे हे जास्त मानवी वाटते.

भाजीपाला, कडधान्य, फळ ह्यांना जरी जीव असला तरी त्यांचा जीव आणि प्राणीमात्रांचा जीव ह्यात ठळक फरक आढळतो. जसे की:

१) जीवशास्त्रानुसार, प्राण्यांना माणसासारखीच Nervous system असते. त्यामुळे त्यांना कापले असता, चिरले असता त्यांना वेदना होतात. पण, ज्ञाडाची फळे तोडली असता, फांद्या तोडल्या असता अशा वेदना झाडांना होत नाही. झाडाची एक फांदी कलम करुन परत एक नवीन झाड तयार करता येते. पण प्राण्याचे हात पाय तोडून नवीन प्राणी निर्माण करता येत नाही.

२) कडधान्य जसे घरात अनेक महिने साठवून परत जमिनित पुरुन नवीन रोपे तयार करता येतात त्याप्रमाणे मेलेले प्राणी घरात साठवून नवीन प्राणी जन्माला आणता येत नाही.

३) प्राणी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रतिकार करतात. तडफडतात. झाडे आपला प्रतिकार करत नाही. पिकलेले फळ गळून पडते आणि परत नव्याने बहरायला झाड सज्ज होते. एक सफरचंद तोडले की झाड नष्ट होत नाही.

मनुष्य हा नुसता वार्‍यावर तगू शकत नाही. जगायला खावे लागणारच. शाकाहाराची निवड करणे हा जास्त मानवी निर्णय वाटतो. आणि शाकाहार उपलब्द्ध असून मांसाहार करणे हे कृत्य अमानुष वाटते. अशा बुद्धीची किव येते जी मुक्या जनावराच्या भावना समजू शकत नाही. सबंध जगामधे किती क्रुरपणे प्राण्यांची हत्या होत आहे. देवीसाठी जेवढे बकरे कापले जातात त्यापेक्षा कैक पटीने प्राण्यांची अन्न म्हणून कत्तल होते आहे.

झाडांना देखील जीव असतो शाकाहारात झाडे खाउ नयेत
आणि धागा बहुदा अंधश्रध्दे वर आहे
कोणत्याही धर्मावर नाही आहे

Pages