कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेदांत, ५-६ लाख म्हणजे लहान, पेट्रोल कार. यामध्ये डिझायर बहुतेक बसणार नाही.
घेणार्‍या कारची सरासरी प्रतीमहिना धाव किती राहील?
प्युअर पेट्रोलच हवी का? की सिएन्जी पण पाहाताय?
या बजेटमध्ये डिझेल च बेस मॉडेल बहुतेक बसू शकेल.

आता गाड्या -
ओल्ड गूड वॅगन आर आहेच, सेलेरिओ, ऑल्टो के१०, ऑल्टो ८००, स्विफ्ट / रिट्झ चं बेस मॉडेल
ब्रिओ
आयटेन
ग्रँड आयटेन
पोलो चं बेस मॉडेल
बीट, स्पार्क
निस्सान मायक्रा
रेनो पल्स
व्हिस्टा

हे काही मॉडेल्स. यामध्ये तुलना करू शकता. काही मॉडेल्स शॉर्ट्लिस्ट केल्यास त्यामध्ये तुलना करून डिसिजन घेता येइल. Happy

योकु,
माहीती साठी धन्यवाद. मी मारुती सुझुकी ची पेट्रोल गाडी घेण्याचा विचार करत आहे. सध्या तरी वॅगन आर (व्ही एक्स) किवा डीझायर (एल एक्स) चा वीचार चालु आहे .माझी उंची ५.१०' आहे.

डीझायर एल एक्स घेवुन, त्यात नंतर एक्सेसरीज टाकु शकतो का? वॉरंटी चा प्रोब्लेम येऊ शकतो का?

टाटा zest XMS पेट्रोल मी ६.२५ लाखात घेतली (पुणे ग्रामीण). ABS, Two Airbags, excellent Music system. ऊत्तम आहे. तिचे Hatchback version बोल्ट चा ही विचार करा.

खसा, फोर्डच्या नव्या गाडीचा रिव्ह्यू इथे वाचा.

नाव - फोर्ड फिगो अ‍ॅस्पायर. पेट्रोल अन डिझेल दोन्हीं इंधन प्रकारात उपलब्ध होईल ही गाडी.

योकु, दोन लाखात येईल अशी सेकंड हँड कार किंवा नाहीच मिळाली तर मग नॅनो पाहतोय.
उद्देश : आई वडिलांना वेळी अवेळी दवाखाना वगैरे.

Latest WA :
If you buy a second hand Creta, you will be buying somebody's ex-creta..

माझ्या सासर्‍यांना २०१० डिसेंबरची नॅनो विकायची आहे. आठ हजार किमीच्या आसापास चालली आहे. सिल्व्हर कलर. गाडी वेल मेंटेन्ड आहे. एसी, पुढच्या काचांना पॉवर विंडोज, रिमोट एंट्री, ब्लूटुथ आहे. कुणाला इंटरेस्ट असल्यास संपर्कातून विचारु शकता.

दोन लाखात नॅनो पेट्रोल हा एक चांगला पर्याय आहेच. सिटीमध्ये चालवण्याकरता मस्त गाडी. दमदार एसी, नीट चालवली तर २३+ मायलेजही मिळतं.

धन्यवाद योकु

माझ्यापुढे २.२५ लाखात २०१२ ची मारुती अल्टो एलएक्सआय भारत ४ आणि (नवीन) नॅनो असे दोन पर्याय आहेत.
नवीच घ्यावी असं वाटतंय.

Pages