कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टू व्हीलर घ्यायची आहे.

बजेट १ - १.५ लाख
पूर्वी वापरलेल्या आणि पर्याय म्हणून विचार करत नाही अशा

येझ्डी
सीडी १००
सीबीझी
सध्या थंडरबर्ड (२००६)..

सध्या नवीन गाडी घ्यायच्या विचारात आहे

करीझ्मा , अवेंजर , क्लासिक ३५०, अपाची १८० हे पर्याय विचाराधीन आहेत. त्याचे रीव्हु कसे आहेत ?
१५० सीसी अंडरपॉवर वाटतात त्यामुळे तो पर्याय विचारात घेतला नाहिये .
सीबी १५० आर इ. गाड्या लाँग रनिंगसाठी कंफर्टेबल वाटत नाहीत.

२०१५ साली अजून कोणत्या गाड्या लाँच होणार आहेत का ?

नवी स्विफ्ट डिजायर, होंडा अमेज आणि फोर्ड इको स्पोर्ट या गाड्यांबद्दल माहिती हवी आहे. तुलना केल्यास कोणती गाडी चांगली आहे? अधिक-उणे काही? कोणाला काही अनुभव?

इको स्पोर्ट्स चे after sale services,spare parts and maintenance चे काही प्रॉब्लेम्स आहेत का?कोणाला काही चांगले वाईट अनुभव?

डिझायर अन अमेझ मध्ये कुठलं मॉडेल पाहाताय? पेट्रोल की डिझेल?
डिझायर डिझेल ला फियाट चं नॅशनल एंजिन आहे. परफॉर्म्स वेल अ‍ॅजपर एक्स्पेटेशन्स. टर्बोलॅग आहे या एंजिन ला त्यामुळे १८००+ आरपीएम रेंज मध्ये ठेवलं तर मस्तच रिस्पॉन्स आहे.
अमेझ हाही डिझेल मध्ये चांगला पर्याय आहे. फ्रेश लूक्स. डिकी वेगळी चढवलेली वाटत नाही या गाडीला.

एकोस्पोर्ट ही एन्ट्रीलेवल एसयूव्ही म्हणता येईल. त्याची तुलना वर दिलेल्या नॉच्बॅकसोबत नाही होणार. एकोस्पोर्ट - ड्स्टर असा एक पर्याय होऊ शकेल.

नवी स्विफ्ट डिजायर, होंडा अमेज आणि फोर्ड इको स्पोर्ट >>>

प्राची स्विफ्ट डिझायर, होंड अमेज यांची तुलना कार या कॅटेगरीत होऊ शकेल.किंमतीत बहुधा दीड लाखाचा फरक आहे. या कॅटेगरीशी फोर्ड इको स्पोर्टची तुलना नाही होऊ शकत. तुमच्या गरजा नेमक्या काय आहेत हे आधी निश्चित करा म्हणजे निर्णय घेणं जास्त सोपं जाईल.

स्विफ्ट चं इंजिन १२०० सीसी, ७५ बीएचपीचं तर होंडा अमेझ १५०० सीसी आणि ९९ बीएचपी. हे डिझेल इंजिनसाठी. जर पावर तुमच्यासाठी महत्वाची असेल तर मग होंडा अमेझ सरस ठरतेय. मायलेज पण स्विफ्टचं च चांगलं आहे. जर तुम्हाला मायलेज हा क्रायटेरीया महत्वाचा नसेल तर मग प्रश्न मिटला. या कॅटेगरीत टोयोटा इटीऑस ही आणखी एक कार आहे.

स्विफ्ट डिझायर आणि होंडा अमेझ ची व्हॅल्यू फॉर मनी अशी तुलना केल्यास स्विफ्ट डिझायर (पेट्रोल किंवा डिझेल दोन्ही) उजवी ठरेल . होंड अमेज चं इंटीरीयर पाहून ही कार होंडा या जगप्रसिद्ध कंपनीची आहे यावर विश्वास बसत नाही. आय टेन, स्पार्क या छोट्या गाड्यांचं इटीरीयर यापेक्षा कितीतरी सरस आहे.

एक फॅमिली कार घ्यायची आहे.

ईनोवा की रेनॉ लॉजी? तुमच्या काही सूचना?

मोबिलिओ, एर्टिगा, XUV500 या आमच्या यादितून आधीच बाद झाल्या आहेत.

मी ईनोवा वापरतो आणि खूष आहे. पंजाब बॉर्डर ला आतापर्यंत सहा वेळा तर ओरीसात तीन वेळा जाऊन आलोय. जबरदस्त कार आहे.

XUV5OO बाद? एक मस्त गाडी आहे ती. Happy
काय निकषांवर ती तुमच्या लिस्टमधून बाद केल्या गेली ते सांगू शकाल का?

तिसर्‍या ओळीतील जागा... या निकषांमध्ये नाही बसली योकु. कुटुंब मोठं आहे ना. गाडी मस्त आहे यात वाद नाहीच. एका आठवड्यात ३ वेळा शोरुमच्या चकरा मारल्या आहेत आणि २ वेळा टेस्ट राईड घेतली आहे, ते फक्त तिचं आकर्षण म्हणूनच. फार जड अंतःकरणाने बाद केलीय हो.....

तिसर्‍या ओळीतील जागा या निकषांवर फक्त ईनोवा आणि लॉजी बसतेय. लॉजी आठवडाभरात येईल शोरुम मधे. तिची किंमतही अजून नक्की नाही. त्यामूळे तीचंही काही खरं नाही. आवडली तर नंतर डिल्हिवरीला वेळ लागू नये म्हणून प्री-बूक करुन ठेवलीय ( रु. ५१०००), तेही डीलर चेक वठवण्यासाठी पाठवणार नाही म्हणाला म्हणून. नाहीतर ईनोव्हाच.

ईनोव्हाचंही या वर्षाअखेर नवीन मॉडेल येतंय राव....मस्त नवीन इन्फोटेनमेंट सिस्टीम सहीत बरेच नवीन फिचर घाळणार आहेत म्हणे. सध्या तरी (awfully over-priced असूनही) इनोव्हाला पर्याय नाही दिसत आहे....

@ योकु
व्हिडीओ दिसत नाही. असो.

एक राहीलं सांगायचं. साफ विसरलो होतो. मी इनोव्हा फक्त मोठ्या रस्त्यांवर, पुण्याबाहेर, लांबच्या अंतरासाठी वापरतो. पुण्यातल्या छोट्या रस्त्यांवर माझी छाती होत नाही. बाह्यवळण, सेबा रस्ता, जंम रस्ता, गणेशखिंड रस्ता, ईस्ट स्ट्रीट अशा भागात प्रॉब्लेम नसतो पण पार्किंगला खूप जागा लागते. पार्किंग मिळेलच असंही नाही. त्यामुळं जेव्हां ड्रायव्हर असेल तेव्हांच पुण्यात इनोव्हा नेता येते. शहरात छोटी कारच सूट होते. मुंबईत तर फिल्म्स डिव्हीजनच्या कार्यालयासमोरून गाडी उचलून नेली होती. मग टॅक्सी करून भायखळ्याच्या जवळपास कुठली चौकी आहे तिथं दंड भरून सोडून आणली ड्रायव्हरने.

मी पाहिला त्या इनोव्हाचा स्कूप! भारी असेल नवी गाडी!
लॉजीही एक पंच असेल, असं सध्या तरी वाटतंय कारण सेम ड्स्टरचं एंजिन देऊन उतरवत आहे. Happy

Datsun GO Plus कशी आहे ? तिची किंमत बजेटमध्ये आहे, सर्विस आणि परफॉरमन्स कुणी सांगु शकेल का ??

कि याच किंमतीच्या रेंजमधील आय १० ग्रॅंड चा विचार करावा ??

आबा, गाडी कुठे चालवायची आहे तिथे सर्व्हीस सेन्टर्स, पार्ट्स अव्हेलेबेलिटी, काहि प्रोब्लेम्स झाले तर कंपनीकडुन मिळणारे रोड असिस्टन्स वै गोष्टींचा विचार कर.

माझं मत आय१० ग्रँड. पण माझ्यामते हिचे टायर्स आर१३ असल्यानी, ग्रीप अन बॉडी रोल जरा जाणवतो. यापेक्षा आर१४ टायर्स अपग्रेड पर्याय असेल तर उत्तम. बाकी ह्युंदाई चा सर्वीस सेंटर चा प्रॉब्लेम नाहीच. इक्विपमेंट लिस्ट्मधेही ह्युंदाई टॉपवर असतात.

रच्याकने पेट्रोल पाहाताय की डिझेल?
झकासरावांना +१

डॅट्सन पेक्षा निस्सान पाहा जर अजून एक पर्याय हवा असेल तर. मायक्रा एक चांगली गाडी आहे.
पेट्रोल मध्ये बाकी पर्यायांत, ब्रिओ, आयटेन, पुंटो, स्विफ्ट, रिट्झ, पोलो, पोलो, पोलो जीटी टीएसआय, लिव्हा, बीट, फिगो, पल्स आहेत... Happy

ग्रॅण्डला मत देइन जर शॉर्ट लिस्टेड असेल तर आधीच.
मख्खन आहे. स्टेअरिन्ग फील आणि गीअर शिफ्टिन्ग स्मुथ.
मारुतीच्या सोबतीने हुन्डाइच आहे सगळीकडे.

Pages