मराठी कविता - Marathi Poetry

Submitted by webmaster on 19 February, 2017 - 01:17

मराठी कवितांचं फक्त मराठी साहित्यातच नाही पण मराठी संस्कृतीमधे एक वेगळं स्थान आहे. मायबोलीवर मराठी कविता, काव्यसंग्रह याबद्दलचे अनेक विभाग आहे. या पानावर त्या सगळ्या विभागांची एकत्र माहिती देण्याचा प्रयत्न आहे.

प्रथितयश मराठी कवि, त्यांच्या कवितांचा, काव्यसंग्रहांचा रसास्वाद घेण्यासाठी , त्यावर चर्चा करण्यासाठी मायबोली हितगुजवर कवि आणि कविता हा ग्रूप आहे. हा ग्रूप सुरु होण्या अगोदर जुन्या मायबोलीवर भाषा आणि साहित्य - पद्य या विभागात जुनी चर्चा आहे.

मायबोलीकरांनी स्वतः केलेल्या मराठी कविता मायबोलीच्या गुलमोहर -कविता विभागात वाचता येतील. हा ग्रूप सुरु होण्यापूर्वीचं काव्य, कविता या शब्दखुणांचा वापर करून पाहता येईल. मायबोलीवर सगळ्यात सुरुवातीला गुलमोहर विभागात मराठी कविता प्रकाशित करण्याची सोय सुरु झाली. हा जुन्या मायबोलीवरचा गुलमोहर विभाग इथे आणि इथे आहे.

गझल हा कवितेचा एक लोकप्रिय प्रकार. गझलांसाठी गुलमोहरात स्वतंत्र ग्रूप आहे. ग्रूप सुरु होण्यासगोदरच्या गझलांचा आस्वाद , गझल या शब्द्खुणांचा वापर करून घेता येईल.
गझल परिचय - पार्श्वभूमी, दृष्टिकोन, तंत्र व आशय या माहितीपूर्ण लेखातून नवोदित कविंना गझल काव्यप्रकाराचा अभ्यास करता येईल. मायबोलीवर जगात प्रथमच झालेल्या गजल कार्यशाळा -१ आणि कार्यशाळा २ मधूनही खूप शिकण्यासारखे आहे.

काहीच्या काही कविता हा एक विषय मायबोलीकर कविंमधे बराच लोकप्रिय आहे. यातल्या काही गंभीर आहेत तर काही विडंबन कविता आहेत.

मराठी गाणी त्यासाठी असलेल्या स्वतंत्र हितगुज ग्रूपमधे पाहता येतील
गाण्यांमधे रूची असलेले मायबोलीवर अंताक्षरीवर भेटतील. १९९६ पासून , सतत 24X7 चालू असलेल्या जगातल्या सगळ्यात जुन्या अंताक्षरीमधे तुम्हीही भाग घेऊ शकता. अनंताक्षरी - नेहमीची (मराठी), अनंताक्षरी - लॉजीकल (मराठी), अनंताक्षरी - नेहमीची (हिंदी) , अनंताक्षरी - लॉजीकल (हिंदी) या चार वेगवेगळ्या पातळीवर हा खेळ सुरु असतो.

This page is an attempt to link with multiple pages on maayboli discussing poetry in marathi. modern marathi poetry , best marathi kavita , marathi poems , prem kavita

शब्दखुणा: 

धन्यवाद वेमा. जुन्या माबोवर एक "चित्रकविता" म्हणूनही भाग होता. तो ही खूप छान होता. त्यातील एका एण्ट्रीमुळेच मला मायबोलीची ओळख झाली. त्या एका कवितेची लिन्क मला मेल मधून आली , ती क्लिक करून इथे आलो, मग इतर पोस्ट बघितल्या आणि तेव्हापासून टोटल अ‍ॅडिक्ट झालो Happy

त्या लिन्क वरून आठवले - अनेक पोस्ट असलेल्या धाग्यांवरच्या प्रत्येक स्पेसिफिक पोस्टची ही स्वतंत्र लिन्क तेव्हा थेट कॉपी करून देता येत असे. आता काहीतरी काड्या करून ती मिळवावी लागते असे दिसते

>>गझल परिचय - पार्श्वभूमी, दृष्टिकोन, तंत्र व आशय या माहितीपूर्ण लेखातून नवोदित कविंना गझल काव्यप्रकाराचा अभ्यास करता येईल.<<

मनापासून आभार वेबमास्टरजी

<मायबोलीकरांनी स्वतः केलेल्या मराठी कविता मायबोलीच्या गुलमोहर -कविता विभागात>

वेबमास्तर https://www.maayboli.com/gulmohar/marathi-kavita पान हरवलेलं दिसतंय.

कोणे एके काळी संपादक मंडळ्/तत्सम चमू "या महिन्याची कविता" निवडत असत, असं वाचल्याचं आठवतंय. त्या कविता कुठे पाहता येतील?

https://www.maayboli.com/gulmohar/kavita?page=538 इथे २०१२ पासूनच्या कविता आहेत. त्याआधीच्या नव्या मायबोलीवरच्या कविता कशा मिळतील?

संपादित : मिळाल्या : https://www.maayboli.com/taxonomy/term/233