अनंताक्षरी - लॉजीकल (मराठी)

Submitted by admin on 31 March, 2008 - 00:04

अंताक्षरीचे नियम

१. गाण्याची सुरूवात ही सुरूवातीपासून केली जावी. फक्त सुरूवातीचे आलाप किंवा गुणगुणणे वगळावे. गाण्याचे धृपद पूर्ण लिहीले जावे. धृपद पूर्ण लिहीले नसेल किंवा गाण्याची सुरूवात सुरूवातीपासून केली नसेल तर गाणे बाद धरले जाईल.
२. गाणं त्या पानावरुन वाहून गेल्याशिवाय त्याची पुनरुक्ती करु नये.
३. दोन किंवा अधिक गाणी एकाच वेळी किंवा काही अंतराने पण एकाच अक्षरापासून लिहीली गेली तर सर्वात आधी आलेलं गाणं ग्राह्य धरुन पुढील गाणे लिहावे.
४. अ, आ, ओ सारखे स्वर स्वतंत्रपणे वापरले जावेत अपवाद इ / ई आणि उ / ऊ चा).
५. नवीन गाण्याची सुरूवात आधीच्या गाण्याच्या शेवटच्या अक्षराने किंवा शेवटच्या एक अथवा अधिक शब्दांनीही करता ये_ईल. शेवटचा शब्द घ्यायचा असेल तर तो आहे तसाच घेतला जावा. त्याची रूपे किंवा समानार्थी शब्द घे_ऊ नयेत.
६. फक्त मराठी अंताक्षरीमध्ये शेवटचे अक्षर ल\' असल्यास, पुढचे गाणे एकतर, \'ल\' पासूनच लिहावे, किंवा उपांत्य अक्षरापासून लिहावे. हा नियम हिंदी अंताक्षरीसाठी लागू नाही
७. मराठी अंताक्षरीमध्ये शेवटचे अक्षर ठ' असेल तर ते गाणे लिहीणार्‍याने पर्याय द्यावा अन्यथा पुढील गाणे लिहीणार्‍याने उपांत्य अक्षरापासून पुढचे गाणे लिहावे.
८. मराठी अंताक्षरीमध्ये सहज टाळता येण्यासारख्या काही चुका

८.१. 'पाहुनी रघुनंदन सावळा' ही गाण्याची सुरूवात आहे, 'लाजली सीता स्वयंवराला' नव्हे.
८.२. 'निंबोणीच्या झाडामागे' ही सुरूवात बरोबर आहे लिंबोणीच्या झाडामागे' नव्हे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी
रानहरिणी दे गडे भीती तुझी
मोहगंधा पारिजाता सख्या
हासशी कोमेजतां रीती तुझी

हा चंद्र तुझ्या साठी ही रात तुझ्या साठी
आरास ही तार्‍यांची गगनात तुझ्यासाठी
कैफात अशा वेळी मज याद तुझी आली
ये ना
Proud

रातीस खेळ चाले
या गुढ चांदण्यांचा
संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा

पुनवेचा चंद्रम आला घरी
चांदाची किरणं दर्यावरी
चांदण्याच्या चुऱ्यात
खाऱ्या खाऱ्या वाऱ्यात
तुझा माझा एकांत रे, साजणा

नविन लॉजिक
कै. यशवंत देव यांची गीते घेऊयात का?

अखेरचे येतील माझ्या
हेच शब्द ओठी
लाख चुका असतील केल्या
केली पण प्रीती

कुणी जाल का
सांगाल का
सुचवाल का त्या कोकिळा
रात्री तरी गाऊ नको
खुलवू नको आपुला गळा

जरि या पुसून गेल्या
सार्‍या जुन्या खुणा रे
हा चंद्र पाहताना
होते तुझी पुन्हा रे

जपून चाल पोरी जपून चाल,
बघणार्या माणसाच्या जिवात हाल
पोरू जपून चाल

आज शुक्रवार, वीकान्त आला!
म भा दि उपक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी माबोकर नेहमीच उत्सुक असतात.
लेख लिहायला आणि साहित्य वाचनासाठी ध्वनिचित्रमुद्रण करायला वेळ मिळावा म्हणून खुप आधीच म भा दि उपक्रम जाहिर करण्यात आले. तरीही साहित्य वाचन आणि गोजिरे बोल ह्या उपक्रमासाठी साहित्य पाठवण्याची मुदत २५ तारखेपर्यन्त वाढवत आहोत.
आता एकच वीकान्त राहिलाय मंडळी!
शिवाय मोरपिसारा आणि विज्ञानभाषा मराठी हे उपक्रम तुमच्या लेखांची वाट पाहत आहेत!!
साहित्य पाठवण्याची तयारी करताय ना?

IMG-20190222-WA0014.jpg