अनंताक्षरी - नेहमीची (मराठी)

Submitted by admin on 16 September, 1996 - 00:03

अनंत काळ चालणारी अंताक्षरी = अनंताक्षरी.

अंताक्षरीचे नियम

१. गाण्याची सुरूवात ही सुरूवातीपासून केली जावी. फक्त सुरूवातीचे आलाप किंवा गुणगुणणे वगळावे. गाण्याचे धृपद पूर्ण लिहीले जावे. धृपद पूर्ण लिहीले नसेल किंवा गाण्याची सुरूवात सुरूवातीपासून केली नसेल तर गाणे बाद धरले जाईल.
२. गाणं त्या पानावरुन वाहून गेल्याशिवाय त्याची पुनरुक्ती करु नये.
३. दोन किंवा अधिक गाणी एकाच वेळी किंवा काही अंतराने पण एकाच अक्षरापासून लिहीली गेली तर सर्वात आधी आलेलं गाणं ग्राह्य धरुन पुढील गाणे लिहावे.
४. अ, आ, ओ सारखे स्वर स्वतंत्रपणे वापरले जावेत अपवाद इ / ई आणि उ / ऊ चा).
५. नवीन गाण्याची सुरूवात आधीच्या गाण्याच्या शेवटच्या अक्षराने किंवा शेवटच्या एक अथवा अधिक शब्दांनीही करता ये_ईल. शेवटचा शब्द घ्यायचा असेल तर तो आहे तसाच घेतला जावा. त्याची रूपे किंवा समानार्थी शब्द घे_ऊ नयेत.
६. फक्त मराठी अंताक्षरीमध्ये शेवटचे अक्षर ल\' असल्यास, गाणे लिहिणार्‍याने पर्याय द्यावा. पर्याय दिला नसल्यास पुढचे गाणे एकतर, \'ल\' पासूनच लिहावे, किंवा उपांत्य अक्षरापासून लिहावे. पर्याय दिला असला तरी तो घेणे बंधनकारक नाही. हा नियम हिंदी अंताक्षरीसाठी लागू नाही
७. मराठी अंताक्षरीमध्ये शेवटचे अक्षर ठ' असेल तर ते गाणे लिहीणार्‍याने पर्याय द्यावा अन्यथा पुढील गाणे लिहीणार्‍याने उपांत्य अक्षरापासून पुढचे गाणे लिहावे.
८. मराठी अंताक्षरीमध्ये सहज टाळता येण्यासारख्या काही चुका

८.१. 'पाहुनी रघुनंदन सावळा' ही गाण्याची सुरूवात आहे, 'लाजली सीता स्वयंवराला' नव्हे.
८.२. 'निंबोणीच्या झाडामागे' ही सुरूवात बरोबर आहे लिंबोणीच्या झाडामागे' नव्हे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रामा रघुनंदना...
आश्रमात या कधी रे येशील.. रामा रघुनंदना

तू असतीस तर झाले असते
गडे उन्हाचे गोड चांदणे
मोहरले असते मौनातून
एक दिवाणे नवथर गाणे

या रे या सारे या
गजाननाला आळवू या
नाम प्रभूचे गाऊया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया

वेगवेगळी फुले उमलली
रचुनी त्यांचे झेले
एकमेकांवरी उधळले
गेले ते दिन गेले

प आ

ईश्वराचा ठाव कधी
एके ठायी सापडेना
शोधणारा शोध घेतो
मार्ग त्यासी गवसेना

निळासावळा नाथ, तशीही निळीसावळी रात
कोडे पडते तुला शोधिता कृष्णा अंधारात

मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं
मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं
काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळत
मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं