न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २०१०-०९-२५ शनिवारी शोनु कडे

Submitted by अनिलभाई on 26 August, 2010 - 08:57

शनिवार २५ सप्टेंबर , सकाळी ११ पासून
कुठे? शोनु (मेधा) च्या घरी. पत्ता लवकरच कळविण्यात येईल. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अम्मो, तू अन असामी येऊन टाका . किरण नाहीतरी चिंबोरी वगैरे खाणार नाही, तो खाईल ते प्रकार बांधून ने त्याच्यासाठी. जुईला पण घेउन ये .

menu_list_11.gif

नका ग नका माझ्या नवर्‍याला असं वाळित टाकु ... >>> ह्या वाक्याबद्दल अमृताला योग्य ठिकाणी कोपच्यात घेण्यात यावे ~हुक्मावर्नं Proud

नाय नाय, कोपच्यात घेता येणार नाय तिला . तो 'जुना' मायबोलीकर आहे . त्यामुळे त्याला गटगमधून वगळण्याची कारस्थाने करू नयेत - हुक्मावरुन Happy

अरेरे! हे अमुल्य ट्रेनिंग आता कुठे मिळेल मला परत? सगळ्या जा ख बाया परदेशातच रहाणार. फळीतल्या भारतात कुणी असतील तर सांगा ग . Proud Sad

भारतातल्या बाया प्रेमळ मनमिळाऊ आहेत असं तुला म्हणायचय का ? इतक्यात कंपुबाजी सुरु केलीस ?

अंजली उद्या येणार आहे असा मला "दाट" संशय आहे Proud

मेधा, खरच प्रेमळ आहेस. पुढच्या फिलि ट्रीपमध्ये तुझं घर नक्की. नवरा पक्का भटजी फिशच्या बाबतीत.

आर्च, गेल्या वेळी फिलिला गेलीस तेव्हा तर टांग मारली होतीस गर्दीचं कारण सांगून हो की नै ? Proud

अनिलभाई, वैद्यबुवा व मेधा, नुकताच तुम्हाला मायबोलीवरून संपर्क साधायचा प्रयत्न केला आहे. दोनेक तास द्रुपाल शी झगडल्यावर संदेश पोचला असेल अशी आशा आहे. तरी nzakki@hotmail.com या पत्त्यावरच उत्तरे द्या. द्रुपाल वर आता अवलंबून रहायचे नाही असे ठरवले आहे.

तसेच वैद्यबुवा, एकदा नक्की काय ते सांगा - कोल्स पाशी किती वा. यायचे, अनिलभी, विकु व मैत्रेयि यांना नक्की कुठे व किती वा. उचलायचे ते.

सध्याच्या माझ्य समजूतीप्रमाने स्वाती_आंबोळे, पन्ना व सायो स्वतंत्रपणे कोल्स जवळ येतील, मला त्यांच्यापैकी कुणालाहि लिफ्ट द्यायची नाही.

यात काही चुकले असेल तर वरील पत्त्यावर ए-मेल पाठवा. मायबोलीवर नको.

धन्यवाद.

आता करोना व कच्चे लिंबू आणायला जातो. (तेच ते गोल, हिरवे असते ते ना? लाईम म्हणतात त्याला ते? चुकून हिरवा टमाटो , किंवा पेअर, अव्होकॅडो वगैरे आले तर गोड माणून घ्या! Happy )
उद्या भेटूच.

अरे बापरे,
२४ तासाहून कमी वेळ उरला. उद्या टण्या त्या वपु काळे परीक्षेत काय विचारतील याबद्दल आतल्या गोटातून काही कळले आहे का कुणाला? मला सांगा. मला वपूंची एकदम चार पुस्तके सापडली, पण सगळी वाचायला वेळ नाही. तसेच दोन्ही वपूर्झा फारच कठीण आहेत, एकहि संवाद नाही, काही गोष्ट नाही. देव करो नि 'बाई, बायको, कॅलेंडर' वरच जास्त प्रश्न असोत. तेच एक पुनः वाचायला जमेल.

दुपारी चार पर्यंत सांगितलेत तरी चालेल. तोपर्यंत वामकुक्षी करून ताजा तवाना होऊन वाचले तर लक्षात राहील.

शिवाय मोठ्या खिशाचा शर्ट घालून त्यात एखादे पुस्तक लपवून ठेवतो, कुणाचे लक्ष नाही असे पाहून हळूच त्यात बघून उत्तर लिहीन. सांगू नका कुणाला.

वि. सू. : मला फक्त पास (की पास आउट) होण्यापुरते मार्क पाहिजेत, नंबर शेवटचा आला तरी चालेल. त्यामुळे तुमच्या पेक्षा जास्त मार्क मिळतील याची भीति बाळगू नका, उदार मनाने मदत करा!
धन्यवाद.

आता हटकेश्वर, हटकेश्वर म्हणत बसतो उद्यापर्यंत.

झक्की
फडके, खांडेकर यावर उपप्रश्न येतिल ते विसरलात का ?
तुमची इमेल मिळालीय व उत्तर पण दिलेय.

"फडके, खांडेकर यावर उपप्रश्न येतिल ते विसरलात का ?
"

मेलो. यंदा मी ड्रॉपच घेतो. पुढल्या वर्षी पर्यंत अ‍ॅस्ट्रो फिजिक्स, किंवा रॉकेट सायन्स असे विषय निवडतो. भौतिकशास्त्र, गणित यांचे नियम पक्के असतात, कुणाच्या मतावर अवलंबून नसतात!
पास होण्याची तरी आशा आहे तिथे.

फडक्यांनी इतके उदंड लिहून ठेवले आहे, की कधी कधी तेच तेच वर्णन पुनः पुनः लिहीले तरी लोकांना लक्षातसुद्धा येत नसे की आपण हे पूर्वी कुठे वाचले आहे. त्यातून 'तसली' वर्णने पुनः पुनः वाचायला त्रास होत नाही त्या वयात!

बाकी विकू, तुमचे काय ठरले नक्की?? कुठल्या बस स्टॉपवर उभे रहाणार? बस कुठेहि येईल पण आधी सांगितलेले बरे. आयत्या वेळी घोटाळा होईल. २८७ नि १ हा थांबा जरा जास्त वेळ लागणारा आहे, पण चालेल.

>> भौतिकशास्त्र, गणित यांचे नियम पक्के असतात
नाही हो झक्की. काहीच पक्कं सांगता येत नाही हाच भौतिकशास्त्राचा पायाभूत नियम आहे आता.
(इच्छुकांनी 'अनसर्टन्टी प्रिन्सिपल'बद्दल वाचावे. :P)

मी आपला होल फूडस (प्रिंस्टन) मध्येच येतो.
माझ्या गाडीचे काही खरे नाही. प्रिंस्ट्न जंक्षन मध्ये ट्रेन ने येऊन तिथून टॅक्सी ने होल फूडस पर्यंत यायचा विचार आहे.

मी आत्ताच इ-मेल करून तुम्हाला हेच विचारले होते. कसे तरी करून प्रिन्सटन च्या होल फूड्स मधे (किंवा समोर) भेटलात तर फारच उत्तम. बराच वेळ वाचेल.
धन्यवाद.

फचिन,
"हे आतले गोटे कोण"
तुम्ही नसाल तर तुम्हाला माहित नाही.
तेच ते, ज्यांना खोका, फडके, खांडेकर वगैरे सगळे आधीच माहित आहेत ते. त्यांना कदाचित् प्रश्न व त्यांची उत्तरे सुद्धा आधीच कळली असतील. केवळ तुमच्या व माझ्या अति कुशाग्र बुद्धीचा हेवा वाटून ते मुद्दाम आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करताहेत, त्यांच्यापेक्षा जास्त मार्क मिळू नयेत म्हणून. जाउ देत!

खरे तर तुमच्यासारखे 'इकडून तिकडून गेले वारे' बघत बसण्याचे काम सुद्धा मला करता येईल. माझे काही अडले नाही, नाही पास झालो तर!!

Happy Light 1 Light 1

झक्की करोना 'घेउन' आले बहुतेक Happy अहो, बाकीच्या बसमधल्या लोकांसाठी पण ठेवा थोडी..

>> फडक्यांनी इतके उदंड लिहून ठेवले आहे, की कधी कधी तेच तेच वर्णन पुनः पुनः लिहीले तरी लोकांना लक्षातसुद्धा येत नसे की आपण हे पूर्वी कुठे वाचले आहे. त्यातून 'तसली' वर्णने पुनः पुनः वाचायला त्रास होत नाही त्या वयात >>> Rofl Rofl

बाकी झक्की ली स्मॉलिनचे 'द ट्रबल वुइथ फिजिक्स' हे पुस्तक वाचा. भौतिकशास्त्राचे नियम कसचे पक्के असे वाटून जाईल. रच्याकने, हे पुस्तक खरेच चांगले आहे. हा स्मॉलिन पार्टिकल फिजिसिस्ट व स्ट्रिंग थेअरीस्ट अश्या दोन्ही कंपूत विहार करुन आला आहे. आणि दोन्ही कंपूंकडे सम्यक् दृष्टीने पाहतो Proud

झक्की, Rofl
उद्या ते नॅव्हिगेशनच्या नादी तुम्ही लागू नका. तुम्ही रस्त्यावर लक्ष ठेवून बसलात तर अविरत बॅटिंग कोण करणार? Proud

Pages