न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २०१०-०९-२५ शनिवारी शोनु कडे

Submitted by अनिलभाई on 26 August, 2010 - 08:57

शनिवार २५ सप्टेंबर , सकाळी ११ पासून
कुठे? शोनु (मेधा) च्या घरी. पत्ता लवकरच कळविण्यात येईल. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा राग अनाठायी होता. सकाळी अमेरिका व भारत दोन्हीकडचे लोक आधाशासारखे मायबोलीवर तुटून पडतात. चिवडा, लाडू, उकडीचे मोदक, नुसते ऐकूनच लोकांना वाटते लवकर काही लिहीले नाही तर संपतील की काय.

आता दुपारी ३ नंतरच मायबोलीवर यायचे, म्हणजे त्रास कमी होईल.
तरी द्रुपाल काही कामे चटाचटा करणार नाहीच! हल्या!

सकाळी देशी दुकानातून पोह्यांचे आणखी दोन पुडे आणलेत. आता चिवडा : बॅच २ करायला घेते. फ. चि. ब्येक्कार झालाय. तो पुन्हा करावा की नाही हे ठरलं नाही.

आपआपल्या पुड्या बांधून घ्याव्या.

मी पुरवून पुरवून इडल्या खाणार आहे. तेव्हा सगळे पदार्थ नॉनव्हेज असले तरी चालेल. Proud

खेळ आणि मनोरंजनाचे कार्यक्रम ठरले नाहीत का? झक्कींचा काव्यवाचनाचा कार्यक्रम असू(च) द्या. त्यांनी कविता बुवांना द्याव्या. बुवा चाल लावून म्हणतील. मोटारीतील समस्त जनतेला कोरसात घ्या. 'आले हाणत' या अष्टफैलू चमूचं आगाऊ अभिनंदन. (मायबोलीवर अशीच पध्दत आहे.)

मृ, फ.चि फोटोत तर चांगला दिसत होता की. असू देत, घेऊन ये. तिकडे गप्पांच्या नादात कुणाला चव कळणारे? कुणावर सूड उगवायचा असल्यास त्यांच्या पिशवीत हळूच टाक.

काव्य वाचन वगैरे माहित नाही पण अख्खा रस्ता, ए वे ए ठि झक्की निसते ब्याटिंग करत असतात. गाडीत गाणी, कविता म्हणायची कल्पना चांगली आहे. ह्या वेळी मै, सायो ह्यांनी पुढाकार घ्यावा, किती दिवस आपले गायनी गळे गुलदस्त्यात ठेवणार? Proud

झक्कींचा काव्यवाचनाचा कार्यक्रम असू(च) द्या. त्यांनी कविता बुवांना द्याव्या. बुवा चाल लावून म्हणतील.
हो! आणि नाचणार कोण?

त्यापेक्षा टण्या मुख्य पाहुणे आहेत, त्यांनाच वाचू द्या कविता, नि त्यावर तुम्ही चर्चा करा. शक्यतो, जेवण आटोपल्यावर हा कार्यक्रम ठेवा. म्हणजे मी मधे मधे करणार नाही. फक्त परत निघण्या आधी मला आठवणीने उठवा.

अळूची पानं, १०० ग्रॅम ओली हळद +१०० ग्रॅम आंबे हळद, ताज्या असल्या तर थोड्या शेवग्याच्या शेंगा मला पण . जर कोणी जाणार असेल ग्रोसरीला तर,

मी काल गेले तेव्हा अंबाडी, अळू, हळद, शेवगा यातलं काहीच दिसलं नाही.
शुक्रवारी पुन्हा बघेन.

आज घरी गेल्यावर लाडू.

मी काल गेले तेव्हा अंबाडी, अळू, हळद, शेवगा यातलं काहीच दिसलं नाही.

तसा मी पण बरेचदा गेलो होतो. पण काय पाहिले ते ओळखायचे कसे? हिरवा पाला होता, पण अळू की पालक की शेपू की आणखी काही? पिवळी हळदीची पूड दिसली. त्यातच पाणी घातले की ओली हळद नाही का होणार? नि शेवग्याच्या शेंगा माहित नाही, पण गवारीच्या मिळतात, फ्रोझन. तश्याच तर लागतात ना चवीला. विशेषतः तो दगडू तेली मसाला भरपूर घालायचा, म्हणजे चवीवरून पत्ताच लागू नये, कशाची भाजी आहे. त्यालाच वाळक्या भेद्राचे लोणचे म्हणून पण वेगळ्या भांड्यात ठेवायचे! तो काय प्रकार आहे देव जाणे.

मस्त बीअर प्यावी. म्हणजे मग चिंता नाही कसली भाजी आहे, काय आहे. काय तरी दोन घास पोटात ढकलून गप बसायचे. एव्हढ्या नाना तर्‍हा करायला सांगितले आहे कुणी?

Happy Light 1

हा सद्विचार तुम्हाला सम्यक बीबीवर कसा सुचत नाही>>> ते तिथे बिअर पिऊन लिहित असतील असं नाही वाटलं असामी? Wink

मस्त बीअर प्यावी.>>>>>> झक्की, बियर पिऊन ग्रोसरी करायला गेलात तर असच होणार ना? Proud
आयडिया चांगली आहे पण! Wink

विकुंना प्रिन्स्टन खूपच लांब पडेल ना, २०-२२ माइल्स असेल. तुम्ही नॉर्थ वाले २८७ वरून येणार असाल तर २८७ /रूट १ चे जंक्शन विकुंना जवळ आहे की.
बाकी यावेळी वृंदाताई नाहीत त्यामुळे गाडीत काय खायचं हा मोठाच प्रश्न आहे Happy

हो खरंच! Happy

पण यावेळी गाडीत वेळही कमी आहे. भुका लागेलागेपर्यंत शोनूकडे पोचूच आपण. Proud

आम्हाला काहीच प्रॉबलेम नाहीये मै. विकु, फोन नं कृपया मला इमेल करा.
झक्कींनी नॅविगेशनची जवाबदारी उचलली आहे त्यामुळे खरं चिंता करायचं कारण नाही. Proud

भुका लागेलागेपर्यंत शोनूकडे पोचूच आपण.>>> हो,हो, इडली चटणी वाट बघत असेलच तिकडे Wink
बरं, मी पण कोल्सच्या इथे यायचंय की जाता जाता मला उचलताय? नक्की काय ते कळवा.
बुवा, माझ्याकडे आज साडेपाच सहापर्यंत येताय का?

सायो, थोडा उशीर चालेल का? आज हापिसतून घरी येऊ पर्यंत ७ तरी वाजतील, ८.००, साडे आठ पर्यंत चालेल का?

Pages