न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २०१०-०९-२५ शनिवारी शोनु कडे

Submitted by अनिलभाई on 26 August, 2010 - 08:57

शनिवार २५ सप्टेंबर , सकाळी ११ पासून
कुठे? शोनु (मेधा) च्या घरी. पत्ता लवकरच कळविण्यात येईल. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेरे, बर्याच दिवसांनी हितगुजवर फिरकलो आणी हा धागा बघितला. शनिवारी मोकळा होतो, कार्यक्रम हुकला Sad

मै, बुवा ये-वन वृत्तांत लिहिताय. बुवा, अजून येऊ द्या.

खरंच श्री आणि शोनू या दोघांचं आगत्य अफाट आहे. आधल्या दिवशीपासून मुक्काम ठोकून ए वे ए ठीच्या दुसर्‍या दिवशीपर्यंत खाणे, हसणे आणि अखंड गप्पा असा कार्यक्रम झाल्यावर आता पुढले ३ दिवस लंघन करून, मौनव्रत घ्यायला हवंय. Proud शोनूच्या आईंमुळे तर खरोखरच इंस्टंट माहेरपणाचा अनुभव घेतला. गरम गरम अप्रतीम जेवायला ताट हातात, चहाचा वाफाळता कप हातात! श्री यांनी एरपोर्टाला एका संध्याकाळीच दोन चकरा केल्यात. (घर ते एअरपोर्ट अंतर भरपूर आहे.) एकदा मला आणि एकदा टण्याला घ्यायला. टण्या मध्यरात्री येऊन पोचला. (कुठे भटकत होता देव जाणे.)

बाय द वे, समस्त जनता जायला निघाली असता, "अरे टायरचा फोटो काढा" असं कोण म्हणालं?

मी असं सांगितलं? कधी?? मला ह्या ग ट ग बद्दल आजच कळलं ... असो, पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करतो यायचा ...

धमाल केलेली दिसते आहे मंडळींनी Happy

अरे वृत्तांत नीट स्वतंत्र धागे उघडून लिहा रे. इथे सापडेनासा होतो मग.

शोनू आणि श्रींचं अगत्य खरंच ग्रेट. शोनूचं घर, त्याची (पेन्टिंग्ज इ.) सजावट, झाडं - सगळंच झकास आहे.

खाद्यपदार्थ सगळेच अतिशय चवदार होते.
झक्कींनी खरंच उकडीचे मोदक आणून थक्क केलं.

अमृता-किरण येणार असं मलाही वाटलं होतं (पण मला अंजली येईल असंही वाटलं होतं!) Happy

सकाळी साडेआठपासून कल्ला केल्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांची वेळ होईस्तोवर बाईंचा आवाज फक्त 'तुम एक पैसा दोगे - वोह दस लाख देगा' म्हणायच्याच लायकीचा उरला होता. Proud तरी गाणी सौजन्याने ऐकून घेतल्याबद्दल सर्वांचे आभार.

(पण मला अंजली येईल असंही वाटलं होतं!) >>> Sad
खूप इच्छा होती गं. पण यावेळेस अगदी नाही जमू शकलं. मी अगदी शुक्रवार रात्रीपर्यंत यायला जमतंय का प्रयत्न करत होते. लालूनेपण ऑफर दिली होती. पुढच्या वेळेस नक्की. या गटग मधून बाहेर आलात की पुढच्या गटगची घोषणा करते Wink

बुवा, आता NJ, DC, PA इथे काही दिवस गटग करू नकात. Happy
वर्षाची सांगता NC गटगने होउ द्या Happy
भाई, जरा थांबा. Happy

मान्य आहे अंजली. एकदा खरच करायला पाहिजे, डी सी पर्यंत मजल गेलीच आहे आता आणखिन पुढे. दिवाळी च्या दरम्यान वगैरे लांब प्रवास जरा अवघड आहे. फेब्रुवारीतलं वगैरे करता येइल. ड्रायविंगचं टेन्शन नाही आजिबात. एन सी म्हणजे किमान ९ तास तरी लागतात बाराहून, नाहीका?

९ तास तरी लागतात बाराहून, नाहीका?>>> हो Happy
डिसेंबरच्या दरम्यानपण (ख्रिसमसच्या वेळेस किंवा New year दरम्यान) ठेवता येईल.

बास बाई एवढाच वृत्तांत ? आता जेवताना आमी काय वाच्चायच्च ? Proud

बाई अजिबात आढेवेढे न घेता गाणी म्हणतात हे मला भारी आवडतं Happy
('जां न कहो मेरी जां..' चं शेवटचं कडवं पाठ करा कृपया म्हणजे पुढच्या पेगास आपलं गटगस म्हणायाला बरं :))

अमृता, भावना पोहोचल्या Sad एक गटग नवी मुंबईला ठेवू Happy
अंजली, लोकांचे वेकेशनांचे प्लॅन असतात नोव-डिसेंबर मध्ये म्हणुन फेब्रुअरी म्हंटलो. Happy

बाई अजिबात आढेवेढे न घेता गाणी म्हणतात हे मला भारी आवडतं >> अगदी अगदी. Happy

बुवा, आर्च येणारच आहे माझ्या घरी . तेव्हाचं ठेवु. Wink

मलाही अमृता येणार ह्याची जवळजवळ खात्री होतीच पण तिची परत निघायची वेळ जवळ आल्याने कदाचित येणार नाही असंही वाटत होतं.
सरप्राईज गेस्ट म्हणून अंजली नंबर लावेल याची कुणकुण वाटत होती.
शोनूचंही घर, बाग, आदरातिथ्य, उरक, पेंटिंग्ज छान. Happy

>>>बाईंचा आवाज फक्त 'तुम एक पैसा दोगे - वोह दस लाख देगा' म्हणायच्याच लायकीचा उरला होता>>> मोठेपणा लागतो हो असं कबूल करायला Proud
आता टण्याचा वृत्तांत अपेक्षित आहे.
बुवा, पुढे येऊ द्या. तुमच्या फॅन्सना आणखी वाट बघायला लावू नका.

आदल्या दिवशी पर्यंत नक्की नव्हतच केलं यायचं. पण हे सगळे नग परत भेटतील न भेटतील म्हणुन जमवलं. Proud Happy खरच खूप मजा आली. कायम लक्षात राहिल हे गटग. Happy

म्हणजे आधीची गटग लक्षात ठेवण्यासारखी नव्हती असं म्हणत्येस? Wink ऐकत्येस ना लालू?
भारतात जाऊन तिकडच्या गटगमध्ये इथल्या भेटलेल्या लोकांबद्दल फक्त चांगलंच बोलायचं हे लक्षात आहे ना? Biggrin

आदल्या दिवशी पर्यंत नक्की नव्हतच केलं यायचं. पण हे सगळे नग परत भेटतील न भेटतील म्हणुन जमवलं. >>> मला तर २ दिवस आधीच सांगितलेलंस की Lol

काहीही सिंडे, शुक्रवारीच तर सांगितलं तुला. तुझा फोन आला त्याच्या तास दोन तास आधीच नक्की केलं.

बुवा पहा बर सायो काडी टाकत्ये. Proud मी भेटलेल्या लोकांबद्दल वाईट बोलत नाही माहित्ये न तुला? Wink

आज जरा सोमवार असल्यामुळे थोडा वेळ लागेल वृत्तांत संपवायला.
बाकी, इथून पुढे गटग ला माझं अस्तित्व सिद्ध करणं फार अवघड आहे असं दिसतय, मला स्वतःलाच माझा कॅमेरा घेऊन लोकांना (मी अख्खा असलेले) फोटो काढायला लावावं लागेल बहुतेक. देसाई, ह्या साठीच तुम्हाला लापि लावल्या मी.
मृ तुझ्याकडून आता फार अपेक्षा आहेत माझ्या (फोटो लवकर पाठव) . Proud
नशीब जेवायला तरी मिळालं मला. Wink Light 1

Pages