न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २०१०-०९-२५ शनिवारी शोनु कडे

Submitted by अनिलभाई on 26 August, 2010 - 08:57

शनिवार २५ सप्टेंबर , सकाळी ११ पासून
कुठे? शोनु (मेधा) च्या घरी. पत्ता लवकरच कळविण्यात येईल. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी वेळेत नाही वेळेआधीच पोचले बर्का Happy

होस्ट आणि होस्टिणबाईंचे कौतुक करावे तेव्हढे थोडे *. नेहमीप्रमाणेच खूप धमाल आली. न आलेल्यांनी न येऊन फारच चूक केली Proud रुनि आणि शोनू दोघींच्या आयांचे पेशन्स कमाल आहेत. मुलींनी आणि इतर काकांनी केलेल्या एवढ्या गोंधळाला अजिबात वैतागल्या नाहीत.

मला येताना बरेच ट्रॅफिक लागले आणि साडे-नवास जॉर्ज वॉशिंगटनवर आल्यावर थांबलेच अगदी. बाइकर ने एका जीपला ठोकले होते. चाचांची सगळी गाणी ऐकून झाल्यावर सव्वा दहाच्या आसपास माझा नागोबा झाला. आणि थोड्या वेळाने कधी तरी अजगर. ११:१५ वाजता एका माणसाने जंपर केबल मागायला नॉक केले तेव्हा जाग आली. बघितले तर ट्रॅफिक सुटले होते. शेवटी १२ वाजता घरी पोचले.

फोटो टाका रे लवकर Happy

आहाहा, काय मेन्यू आहे Happy
सिंडे, बापरे ... ते नागोबा आणि अजगर गाडीतले वर्णन होते होय. आधी वाचतावाचता वाटले ट्रॅफिक आणि दिवसभराचा ( छान ) शीण ह्यामुळे घरी पोचल्यावर सोफ्यात लुडकलीस तू.

बापरे, बरीच अडकलीस की ट्रॅफिकमध्ये.
पार्ल्याक्वांना मुली नी बाकी सगळ्यांना (टण्याही) काका म्हटल्याबद्दल धन्यवाद.
तुझे नी माझे फोटो कुणी काढलेत? फिदी:

कधी विंटर म्हणून, कधी समर म्हणून कधी कोण आलं म्हणून तर कधी कोणी गेलं म्हणून .... ट्रायस्टेट /नॉर्थईस्ट एरियामधल्या माबोकरांना गट्ग करायल निमित्तच हवं असतं. तसं ते मिळालं (यावेळी काय तर टण्या उसगावात आला म्हणून!) आणि रीतसर बाफ उघडून नांदी ला सुरुवात झाली! शोनू आणि श्री शोनू यांना विचार करायला सवड मिळण्यापूर्वीच त्यांच्याच घरी जमायचं ठरलं ! अन मग सुमारे सातशे पोस्टींचा उहापोह होऊन फायनल प्लॅन ठरला !!
तर मी सकाळी विकुंना प्रिन्स्टन स्टेशनातून पिकप करून भाईंकडे निघाले. विकु माझ्या ड्रायव्हींग कौशल्यावर फारसे खूष दिसले नाहीत. चेहरा रोलरकोस्टर मधे बसल्याप्रमाणे दिसत होता. असो. तर अशा रितिने भाईंकडे गेलो तेव्हा मंडळी आमचीच वाट पाहत होती. मग लगेच निघालो. इतके लोक, विशेषतः शेवटच्या सीट वर मी , स्वाती, सायो बसल्यावर बुवांची गाडी हाकताना दमछाक होत होती. अल्मोस्ट हाताने रिक्षा ओढत असावेत तसे बुवा घामाघूम होत होते, गाडीतून पण चढावर भयंकर आवाज येत होते! पन्ना नॅव्हिगेशन ला बसली असली तरी मागच्या सीट वरून विकु तिच्यावर लक्ष ठेवून होते, शिवाय बुवांना पण स्टॉप साइन, वेग मर्यादा वगैरे ची आठवण करून देत होते.
तासाभराने आम्ही शोनूच्या घरीपोहोचलो .
तिकडे पोहोचल्यावरची धमाल वर्णन करणे केवळ अशक्य आहे. सर्वप्रथम प्रमुख पाहुणे टण्याची भेट झाली. टण्याने आपण अगदीच बालमायबोलीकरांपैकी आहोत असे कुणाला वाटू नये म्हणून खोटी मिशी चिकटवली होती म्हणे. एवढे करूनही एकूण त्याच्या जड जड पोस्टींवरून मला जसा तो असेल असे वाटले होते त्यापेक्षा तो बराच साधा, सालस, नॉर्मल इ. दिसत होता! Happy
गप्पांचा गदारोळ उसळला होता. टिंगल टवाळ्या, गॉसिप्स, खिदळण्या-हसण्याला ऊत आला होता. बाया एकमेकीला प्रेमाने शेव पुरी, माश्याचे गरम गरम तुकडे, सखि वगैरे च्या प्लेट भरून आग्रह करून खायला लावत होत्या! Happy कुणाचे लक्ष नाही असे पाहून मधेच संयुक्ता सोल्जर्स ची एक गुप्त मीटींग पण उरकली गेली!
मधेच शोनूची बाग पहाण्याच्या निमित्तने नुस्तेच गवतात बसून दंगा- गप्पा झाल्या. झक्कींनी काही बंद पडलेल्या बाफंवर टाकायच्या राहिलेल्या त्यांच्या पोस्टी 'म्हणून दाखवल्या'. मग परत आत येऊन जेवण्याचा कार्यक्रम. खाऊन खाऊन खाली पडायची वेळ आल्यावर मग विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला. त्यात टण्यातर्फे माबोवरच्या पाप्युलर कथा कादंबर्‍यांची समीक्षा झाली. काही हृदयद्रावक साहित्याचे माबो स्टायलीत सामूहिक कौतुक(?)झाले, काही बायपोलर, मल्टिपोलर(?) पर्सनॅलिटींचा सायकोअ‍ॅनेलिसिस झाला, आणि हो, शिवाय कुण्या नैना नावाच्या महाठक बाईने कुणाचेसे लेंगे कसे चोरले याबद्दलचे एक गाणे स्वातीने गायले. Lol
शेवटी चहा घेऊन चाणाक्ष लोक झिपलॉकच्या बॅग्ज मधे जेवण पॅक करून घेऊन गाडीत टाकायला लागले. टण्याचे डोळे रिकामी भांडी बघून टचकन भरून आले! आता उद्या मी काय खायचं? असा भावनाविवश प्रश्न पण विचारून अधिक भावना मागाहून व्यक्त करण्याच्या हेतूने त्याने शोनूचा मोबाइल नं मागून घेतला.

मग बाहेर निघता निघता फोटोसेशन झाले. विकुंना एव्हाना घरचे वेध लागले असावेत. चला चला करत कोंडाळी करून गप्पा करत तिथेच उभे राहणार्‍यांना ते गुरांसारखे ढोसून चला चला म्हणून गाड्यांच्या दिशेने हाकत होते.
एवढे करून ते आमच्या गाडीत चढलेच नाहीत. येताना त्यांनी फचिन च्या गाडीतून जाण्यास पसंती दिली! का ते समजले नाही! Proud
तर अशा रितिनी जड मनाने,(अन बसलेल्या घशाने) परत गाडीत प्याक बसलो अन घरी आलो!
इतर गट्ग ला होते त्याप्रमाणेच आजही इतका वेळ घर, ऑफिस, इतर कोतबो छाप समस्या वगैरे काही काहीसुद्धा आठवत नव्हते. गटगचा हँगओव्हर इतका की आल्यावर पण झोपेपर्यन्त सहज टीव्ही पाहताना कोणतेही पात्र पाहून 'हिचा . याचा आयडी' काय बरं ? असले चित्र विचित्र विचार मनात येत होते!! Happy
पुढचं गटग कधी बरं ? :डोळे फडफडवणारी बाहुली:

टण्याचे डोळे रिकामी भांडी बघून टचकन भरून आले! आता उद्या मी काय खायचं? >>> अग तो बाथरुममध्ये जाऊन गुपचूप रडून नाही का आला? Proud
आणि खास बुवांच्या शब्दात गुलदस्त्यातली बायपोलर व्यक्ती ही आढळली. Biggrin
मै, वृत्तांत आणखीन खुसखुशीत चालला असता.

सायो, बघ ना, मुख्य खर्‍या मज्जेच्या गोष्टी नेमक्या इथे लिहिता नाहीयेत Proud अन तो गुलदस्त्यातला वृत्तान्त बुवाच लिहितील आता Proud Lol

Lol सिंडे, तु काढलेले फोटो कुठायत? फोटो काढलेल्यांनी भराभरा फोटो पाठवा. Happy

किरणच्या एका मित्राला भेटायला फिली मधे जाताना आम्ही पण जाम ट्रॅफिकमधे अडकलो. Sad वर तो मित्र भेटला नाहीचं.
१० नंतर दोन विरभद्र झोपेला टेकले, छोटी विरभद्र दिवसभर धुमाकुळ घालुन आधीच झोपली होती. मग मी एकटीने 'हम आपके है कौन' ची गाणी लोकांच्या घोरण्याच्या बॅकग्राउंड मधे ऐकत गाडी १ ला घरी सुखरुप पोचवली. Happy

छान वृ मै! Lol Lol

विकुंनी बुवांचा इंटर्व्यू घेतला आणि नंतर आमच्या जीवाशी खेळू नकोस अशी प्रेमळ सुचना पण केली. बुवांची दांडी गुल्ल!! Wink

कुण्या नैना नावाच्या महाठक बाईने कुणाचेसे लेंगे कसे चोरले याबद्दलचे एक गाणे स्वातीने गायले>> Rofl

सिंडे फोटो एकदम झकास आलेत. डाउनलोड करु का ग?
लालू, फोटो मिळाले. मस्त Happy आता मृ कडच्या हहगलो चे फोटो पहायचे. Proud

मै, धमाल वृत्तांत Lol
ते गाण्याचे डीटेल्स इमेलने पाठवा कुणीतरी. आणि फोटोसुद्धा!!!

मै Lol
लईच भारी मेन्यू.
मला कुणीतरी नैना ठग लेंगे [बाईंच्या आवाजातले] रेकॉर्ड केले असेल तर पाठवा राव !

जबरी वृतांत मै. Lol . फोटो जर इतरांना चालत असेल तर मला पण पाठवा आणि बाईंचे गाण असेल तर ते पण. Happy
बुवा Lol Lol मस्तच.

मधेच शोनूची बाग पहाण्याच्या निमित्तने नुस्तेच गवतात बसून दंगा- गप्पा झाल्या
<< 'गवतात बसणे' चा अर्थ काय घ्ययाचा इथे ?? Rofl

मस्त वृत्तांत आहेत.... गेले अनेक दिवस येथील पोस्टींचा पाऊस पाहून उत्सुकता वाढली होती.... प्रत्यक्षातही भरपूर धम्माल केलेली दिसत आहे सर्वांनी! वाचताना मजा आली! Happy

बुवा Lol मस्त. आता वृत्तांत ३५ भागात येणार नाही अशी आशा आहे. Biggrin
>>>दुखः अनावर होऊन मी घरात असलेल्या डझनभर बाथ्रुमांपैकी एका मध्ये घुसून रडून घेतलं. पुढे असं बाथरुम सापडुन रडायची वेळ बर्‍याच लोकांवर का आली हे आता हळू हळू कळेलच.>>>> Biggrin

गवतात बसणे' चा अर्थ काय घ्ययाचा इथे ??>>ते लेखक वाचक संबंधांवर अवलंबून आहे Proud

बुवा रडवलत ...... बाथरूमकडे निघतोय ... Lol

Pages