Submitted by दिनेश. on 16 November, 2009 - 17:21
गाणी आणि नृत्य, हा अनेक वर्षे हिंदी चित्रपटाची खासियत राहिलेली आहे. अर्थवाही शब्द, सुयोग्य चाल आणि गायकाची कारागिरी, याना पुरेपूर न्याय देणारे चित्रीकरण अनेकवेळा झालेय. इथे आपण अश्या गाण्यांची चर्चा करु. या चित्रीकरणात, नेमके काय आवडले, तेच लिहायचे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ग्रेट सुपर वंडर फुल.
ग्रेट सुपर वंडर फुल.
आता कधी, वैजयंतीमालाला नावे
आता कधी, वैजयंतीमालाला नावे ठेवू नका रे.
मी तरी नाही ठेवत :).. तिच्या प्रत्येक गाण्यात गालाला हात लावत लाजायची तिची एक अदा असायचीच, इतकी गोड दिसायची....
किशोरबरोबर इना मिना डिका मध्ये ती पुतळा बनुन उभी असते (की त्यातल्याच दुस-या एका गाण्यात?? आत आठवत नाहीये), तिने अगदी जराही अंग न हलवता अस्सल पुतळ्याचा अभिनय केलाय त्यात.
वैजयंतीमालावर चित्रित झालेले
वैजयंतीमालावर चित्रित झालेले अजुन एक भन्नाट गाणं
"तुम संग प्रीत लगाई रसिया"
http://www.youtube.com/watch?v=OUdJ4BGl73k
चित्रपटः न्यु दिल्ली
स्वरः लता मंगेशकर
संगीतः शंकर जयकिशन
बिलासखानी तोडी हा किती अनोखा
बिलासखानी तोडी हा किती अनोखा राग आहे हे बर्यापैकी कानसेन असणार्या अनेकाना माहित असेलच.
बिलासखान हा तानसेनचा मुलगा. तानसेन मृत्यूशय्येवर असताना, त्याने या रागाची रचना केली असे सांगतात. अब मोरे कांता, मोरे संग पलछिन, हि रचना ऐकली असेलच.
पण शास्त्रीय गायनाची आवड नसली तरी, लेकीन मधले, आशा आणि सत्यशील देशपांडे यानी गायलेले, झूठे नैना बोले, साची बतिया, हे नक्कीच आवडते गाणे असेल. या सिनेमात लताने जबरदस्त गाणी गायली आहेत (सिनेमात नसलेले, पण केसरीया या सिनेमातल्या गाण्याची मूळ रचना असलेले, बावरी बोले लोग, हे पण लताने रेकॉर्ड केले होते ) तरीही आशा या एकाच गाण्यात बाजी मारुन गेलीय.
पण शेवटी थोरली ती थोरलीच. सन ऑफ इंडिया सिनेमात, लताने याच रागावर आधारीत,
दिया ना बूझे री आज हमारा, असे गाणे गायले होते (संगीत नौशाद )
तिच्या अवघड ताना, या गाण्यात आहेत. कुमकुम ने ते गाणे पडद्यावर अप्रतिम सादर केलेय. (या सिनेमात सिम्मी नायिका होती ) या कुमकुम ची अनेक गाणी गाजली होती. मोरा नादान बालमा, मधुबन मे राधिका, दगा दगा वई वई, कर गया रे मुझपे जादू, जा जा रे जा बालमा, किती सांगावीत !
तर इथे हे दिया ना बुझे बघा .
http://www.youtube.com/watch?v=WBq8joUoUmA
या सिनेमातले, दुसरे एक
http://www.youtube.com/watch?v=cu7v5s236hE&NR=1
मला आवडलेल्या काही गझल १.
मला आवडलेल्या काही गझल
१. माना तेरी नजर में तेरा प्यार हम नही, कैसे कहे के तेरे (चित्रपटात पद्मिनी कोल्हापुरेवर चित्रित)
चित्रपटः आहिस्ता आहिस्ता
गायिका: सुलक्षणा पंडित
संगीतः खय्याम
यातील शेवटच्या कडव्यासाठी गीतकार "निदा फाजली" यांना सलाम.
"धोखा दिया है खुदको मोहब्बत के नाम पर,
ये किस तरह कहे के गुनहगार हम नही".
२. चांद अपना सफर खत्म करता रहा, शम्मा जलती रही रात ढलती रही (चित्रपटात शबाना आझमीवर चित्रित)
चित्रपटः शमा
गायिका: लता मंगेशकर
संगीत: उषा खन्ना
३. आपकी याद आती रही, रातभर आपकी याद आती रही (चित्रपटात ??? चित्रित?)
चित्रपटः गमन
गायिका: छाया गांगुली
संगीतः जयदेव
शेवटच्या गाण्याचे व्हिडीयो उपलब्ध असेल तर जरूर सांगा.
मला 'हर घडी बदल रही है रुप
मला 'हर घडी बदल रही है रुप जिंदगी', 'कुछ तो हुआ है','होशवालों को खबर क्या', 'हम आपके है कौन चं टायटल साँग, 'ए हैरते आशिकी', 'पियू बोले पिया बोले', 'अगर मै कहूं' (लक्ष्य) आणि 'दिल क्यूं मेरा शोर करे'(काईट्स) या गाण्यांचही चित्रीकरण फार आवडतं.
आपकी याद आती रही, रातभर आपकी
आपकी याद आती रही, रातभर आपकी याद आती रही (चित्रपटात ??? चित्रित?)
स्मिता पाटील आहे.. गाणे बॅकग्राउंडला वाजत राहते आणि मुंबईला टॅक्सी चालवण्यासाठी म्हणुन गेलेल्या नव-याच्या वाटेकडे, घरातली कामे नकळत करत डोळे लावुन बसलेली ती... .... हा चित्रपट अगदी सुन्न करतो..
धन्यवाद साधना!!! स्मिता पाटील
धन्यवाद साधना!!!
स्मिता पाटील आहे..>>> अरे व्वाह!!!! माझी अत्यंत आवडती एक अष्टपैलु अभिनेत्री. म्हणजे आवडते गाणे आवडत्या अभिनेत्रीवर चित्रित केलेले. आता याचा व्हिडियो पहायलाच पाहिजे.
याच चित्रपटात सुरेश वाडकरांनी गायलेले "सीने में जलन आखों में तूफान क्यों है" हे नितांत सुंदर गाणे आहे.
हा चित्रपट अगदी सुन्न करतो..>>>>>
साधनाजी जर वेळ असेल तर चित्रपटाचे थोडक्यात विश्लेषण करा ना. (हा बाफ ह्या विषयाचा नाही हे माहित असुनही :))
चित्रपट गमन. याच सिनेमात,
चित्रपट गमन.
याच सिनेमात, हिरादेवी मिश्र यानी गायलेली, अप्रतिम चीज आहे,
आजा रे सावरीया, तोसे गरवा लगा लू
रस के भरे तोरे नैन ...
यात त्यांनी छोटिशी भुमिका देखील केली होती.
आपकी याद, गायलेय छाया गांगुली ने. पण चित्रीकरण खास नाही.
आपकी याद आती रही, रातभर आपकी
आपकी याद आती रही, रातभर आपकी याद आती रही या गाण्यासाठी छाया गांगुली यांना १९७९ साली राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
या गाण्यात सगळेच वेगळे
या गाण्यात सगळेच वेगळे आहे.
कव्वाली सहसा लताला देत नसत. तिने अगदी मोजक्या कव्वाल्या गायल्या आहेत. घडीभर तेरे नजदीक आकर, जब रात है ऐसी मतवाली या मोगले आझम मधल्या दोन.
तिच्या आवाजात, कभी ए हकिकते मुंतजर, नजर आ लिबासे मजाज मे, अशी एक कव्वाली, मी एकदा ऐकली होती, पण ती आता कुठे मिळत नाही.
तर ही, मेरे हमदम मेरे दोस्त मधली,
अल्ला ये अदा, कैसी है इन हसीनोमे
रुठे पलमे न माने महिनोंमे ..
आता वेगळेपणा असा, की हि लताने गायलीय. नायिका शर्मिला टॅगोर असूनही, हि सहनायिका मुमताज वर चित्रीत झालीय. गाण्याचे शब्द ऐकता, हि एका नायकाची, नायिकेबद्दल तक्रार आहे, पण तरी ती लताने गायलीय. चित्रपटात खरे तर ती शर्मिलापेक्षा, धर्मेंद्रला उद्देशून आहे.
चाल कव्वालीची असली तरी नृत्य कव्वाली पेक्षा खुपच वेगळे आहे. मुमताजचा ड्रेस पण, अनारकली टाईप नाही.
पण एकंदर मस्त नाच आहे. मला आधी वाटत होते कि या गाण्यात तिच्या सोबतीला भगवान आहे कि काय, पण चक्क ओमप्रकाश आहे. आणि हो, किती वेगवेगळ्या प्रकारे एकच ठेका, वाजवलाय तो ऐका.
http://www.youtube.com/watch?v=Vzu_R6GX3Vg
दिनेशदा, ह्या लिंकवर पाहा -
दिनेशदा,
ह्या लिंकवर पाहा - http://www.youtube.com/watch?v=94Buq_-tmxw&feature=related
कभी ए हकिकते मुंतजर - त्या लिंकवर दिसेल.
अमी
आभार अमी मी कभी ने शोधत होतो,
आभार अमी
मी कभी ने शोधत होतो, म्हणुन नव्हते मिळत.
खुप सुंदर गायलीय तिने, पडद्यावर बहुतेक शकिला बानू भोपाली दिसतेय.
त्याच्याच बाजुला आणखी एक लिंक सापडली
तूम्हे हुस्न देके खुदाने, सितमगर बनाया
चलो इस बहाने तूम्हे भी, खुदा याद आया.
(पुढचे शब्द खासच आहेत.) लता, आशा, रफी ,मन्ना डे
हे गाणे खास साधनासाठी, कारण शशी कपूर आणि शम्मी कपूर दोघे आहेत.(सोबत कुमकुम, श्यामा, ओमप्रकाश, भगवान )
http://www.youtube.com/watch?v=LD88JWjiSHs&feature=related
थोडे विषयांतर,
भरभर लिहूनही अक्षर सुधारावे, म्हणुन मी रेडीओवरची गाणी लिहून काढत असे, त्या काळातली हि गाणी !!
मेघा रे मेघा रे लता जी व
मेघा रे मेघा रे लता जी व सुरेश वाड्कर, प्यासा सावन मधील.
गोड गोडुली मौसमी व जितू ( याला विशेषणाची गरज नाही) यांवर चित्रित केलेले सुन्दर गाणे. शास्त्रीय बैठक आहे. वाद्यव्रुंद व वाद्यांची विविधता भरपूर आहे. मेळ नीट साधला आहे. सतार संतूर व बासरी आपली आवड्ती वाद्ये इथे आहेत. पावसाळ्याच्या शुभ मुहूर्तावर हे मधुर गीत जरूर ऐका. लता मीठे से नश्तर जसे म्हणते ना,
हाय, एक शिरशिरी जाते अंगातून.
ये रुत भीगी भीगी भिगोने लगी है yes indeed.
http://www.youtube.com/watch?v=8GFO2nrtZT
गुड नाइट. स्वीट ड्रीम्स.
मामी काय मस्त आठवण करून दिलीत
मामी काय मस्त आठवण करून दिलीत या गाण्याची. माझ्याही आवडत्या गाण्यांपैकी (अगदी चित्रिकरणासहित).
लता मीठे से नश्तर जसे म्हणते ना, हाय, एक शिरशिरी जाते अंगातून.>>>>>मामी तुम्हाला १०००० मोदक
हे गाणे खास साधनासाठी, कारण
हे गाणे खास साधनासाठी, कारण शशी कपूर आणि शम्मी कपूर दोघे आहेत
धन्यवाद दिनेश... आज ब-याच दिवसांनी मायबोलीवर परतले आणि आधी इथेच आले
गाणे आवडले,..
योगेश, मी गमन ब-याच वर्षांपुर्वी दुरदर्शनवर पाहिलाय. आता फारसे आठवत नाहीये.. उत्तर प्रदेशमधल्या एका खेड्यातुन मुंबईत पोटासाठी म्हणुन आलेला आणि मग इथेच अडकुन पडलेला तरुण आणि तिथे गावी त्याच्या वाटेकडे अक्षरक्षः डोळे लावून बसलेली त्याची नववधु यांची शोकांत कहाणी आहे. आपकी याद आती रही... नुसते ऐकले तरी त्यातली व्यथा काळजाला चिरत जाते, पडद्यावर फारुख शेख आणि स्मिता पाटिलने ती व्यथा अगदी जीवंतपणे मांडलीय. 'सीनेमे जलन.... ' सुरेश वाडकरचे हिंदी चित्रपटातले हे बहुतेक पहिलेच गाणे... हा चित्रपट पाहुन माझे वडिल फारुखचे फॅन झाले होते अगदी. त्यानंतरचे त्याचे बहुतेक सगळे चित्रपट त्यांनी पाहिले
आपकी याद, गायलेय छाया गांगुली ने. पण चित्रीकरण खास नाही.
हो, कामात मग्न असलेली स्मिता दाखवलीय गाण्यात, पण तिचे ते डोळे मात्र त्याचीच वाट पाहात असतात.. स्मिताचे डोळे खुप सुंदर होते. मला उंबरठा मधल्या पोस्टरवरचेही तिचे डोळे आठवतात.
http://www.youtube.com/watch?v=mykcmB1HZfY
रसके भरे.. इथे ऐका...
या गाण्याबद्दल मी लिहिले होते
या गाण्याबद्दल मी लिहिले होते वाटते. गूंज उठी शहनाई मधले, लता रफीचे, हौले हौले घुंघट पट खोले, बलमवा बेदर्दी.
राजेंद्र कुमार आणि अमिता आहेत. पण मला यातला सगळ्यात जास्त आवड्तो, तो त्या लोककलाकारांचा नाच. इतका जोशपूर्ण आहे हा नाच, कि नजर ठरत नाही. अमिताने पण त्यांच्यासारखे नाचायचा प्रयत्न केलाय.
असा नाच नंतर कुठल्याच सिनेमात मी बघितला नाही.
http://www.youtube.com/watch?v=fzt-jDgOgUA
शशि कपूरचा मुलगा, कुणाल कपूर
शशि कपूरचा मुलगा, कुणाल कपूर हिरो असलेला एक विजेता नावाचा सिनेमा येऊन गेला होता. लढाईच्या पार्श्वभुमीवरचा छान सिनेमा होता तो. पण कूणाल अजिबात देखणा नसल्याने फारसा पुढे आलाच नाही, तर त्याचा भाऊ करण, अत्यंत देखणा असल्याने पुढे आला नाही.
तर या सिनेमात रेखा, कुणालची आई असते.
आणि तिच्यावर चित्रीत झालेले हे गाणे. मन आनंद आनंद छायो.
सिनेमात हे गाणे दोन तीन तूकड्यात आहे. आशा आणि सत्यशील देशपांडे यांनी गायलेय. इथे मात्र ते केवळ आशाच्या आवाजात आहे. निव्वळ तानपूर्याच्या साथीने गायलेय तिने. आणि त्यावरचा रेखाचा अभिनय खास आहे. आशा काही तीव्र स्वर लावते आणि त्यावेळी रेखाच्या चेहर्यावर सुंदर भाव आहेत. हे गाणे पुर्ण ऐकायला मिळाले तर अवश्य ऐका,
http://www.youtube.com/watch?v=MGkb-1Rv7Ng
हो खुप वर्षांपुर्वी टीवीवर
हो खुप वर्षांपुर्वी टीवीवर आलेला! 'विजेता' नाव होते त्या सिनेमाचे. हिरोईन सुप्रिया पाठक होती ना दिनेशदा?
हो सुप्रिया पाठक च होती, पण
हो सुप्रिया पाठक च होती, पण तिला गाणे नव्हते बहुदा.
नव्हतेच... तरी एक पार्टीतले
नव्हतेच... तरी एक पार्टीतले गाणे होते असं आठवतय! ती मेजर्/कॅप्टनची मुलगी असते! त्यातला एक सिन वेगळाच होता.

कुठल्याशा किल्ल्यावरुन दगडी पाय-या धडाधड उतरत येत असतांना ती इतक्या स्पिडमधे येते की तिला ते कंट्रोल होत नाही आणि थांबणे मुश्किल होते!
विजेता अतिशय सुंदर चित्रपट
विजेता अतिशय सुंदर चित्रपट होता. शशी कपुरने निर्माता म्हणुन एक अजुबा सोडला तर बाकी दोन्-चार अतिशय सुंदर चित्रपट निर्माण केले. त्याचा जुनून हा ब्रिटिश सत्तेची पार्श्वभुमी असलेला चित्रपटही छान होता. ३६ चौरंगी लेनही त्याचाच होता बहुतेक. उत्सव तर सर्वांगसुंदर (अर्थात शेखर सुमन वगळुन, मला तो खुप बायल्या वाटला त्यात
)
कुणाल कपुरने आहिस्ता आहिस्ता मध्ये पद्मिनीबरोबर काम केलेले. पण तो दिसायला अतिशय सामान्य होता. आईचे रुप पण त्वचा आणि केस भारतीय. त्याउलट करण दिसायचा शशी कपुरसारखा पण ब्लाँड होता, त्यामुळे हिंदीत कामे मिळणे कठीणच होते. त्याने सल्तनत हा एकच चित्रपट केला. बॉम्बे डाइंगच्या अॅडमध्ये मात्र तो अगदी भारी दिसलाय. संजना कपुरमध्येही विदेशी झाक होती....
साधना अनुमोदन पूर्ण पोस्टीस.
साधना अनुमोदन पूर्ण पोस्टीस.
गोरी तोरे नैनवा, कजर बीन कारे
गोरी तोरे नैनवा, कजर बीन कारे कारे
हे देस रागातले गाणे, चित्रपट मै सुहागन हु. यातले कलाकार मला ओळखता आले नाहीत.
पण हे गाणे अत्यंत श्रवणीय आहे. हि एकच ओळ, रफी आणि आशाने, किती वेगवेगळ्या तर्हेने गायलीय, ते ऐकाच. मी आधी हे गाणे, अर्धवटच ऐकले होते. शेवटचा तत्कार मी बघितलाच नव्हता कधी,
तो इथे बघता येईल
http://www.youtube.com/watch?v=wAhHyZkI0P8
शतरंज के खिलाडी मधे पण एक अस्सल कथ्थक सादर झाले होते. यातले कलाकार पण (अमजद खान सोडला तर ) ओळखता आलेले नाहीत. (तसे या सिनेमात संजीव कुमार, सईद जाफरी, शबाना, फरिदा जलाल, असे बरेच कलाकार होते) तर ते कथ्थक इथे आहे
http://www.youtube.com/watch?v=MZ7KYyg3gEo&feature=related
दिनेशजी , ती शाश्वती सेन आहे
दिनेशजी , ती शाश्वती सेन आहे ना? अमजाडखान ओळखू येतोच.. :))
असेल. पण छान नाचलीय. अस्सल
असेल. पण छान नाचलीय. अस्सल कथ्थक म्हणून या नृत्याची तारीफ झाली होती.
रझिया सुलतान मधे, बेगम परवीन सुलताना आणि दिलशाद खान यांनी गायलेले एक गाणे आहे.
या गाण्यांवर गोपीकृष्ण आणि त्याच्या शिष्या नाचल्या आहेत. याचे चित्रीकरण, सेट यापेक्षा जास्त चांगले असू शकले असते. गायकांनी देखील यापेक्षा जास्त चांगली कामगिरी केली असती. पण तरीही गोपीकृष्ण आणि शिष्यगण, यांचे अत्यंत समन्वयाचे (सिंन्क्रोनाइज्ड ला हाच शब्द वापरायचा ना ? ) नृत्य आहे हे.
शब्द आहेत, शुभ घडी आयी रे ..
http://www.youtube.com/watch?v=ZkcfGa1AAwg
राहुल देव बर्मन ने स्वतःच्या
राहुल देव बर्मन ने स्वतःच्या नावाने संगीत दिलेला पहिला चित्रपट छोटे नबाब. त्यातले लताचे, मालगुंजी रागातले सुंदर गाणे, घर आजा घिर आये, बदरा सावरीया
या गाण्याच्या तालमीच्या वेळी, लता आणि थोरल्या बर्मन साहेबांचे भांडण मिटले होते.
लता ने गाणे अप्रतिम गायलेय (त्यात नवीन ते काय, त्या काळातल्या तिच्या प्रत्येक गाण्याबद्दल हेच म्हणता येईल)
या गाण्याला उत्तम चित्रीत झालेले, असे पुर्णपणे म्हणता येणार नाही. शीला वाझचा (रमैया वस्तावैया, आणि लेके पहला वहला प्यार वाली ) नाच गाण्याशी सुसंगत नाही, त्यापेक्षा गाणे अमिताला द्यायला हवे होते आणि शीलाला नूसतेच नाचायला लावायला हवे होते.
या गाण्यात टप टीप सूनके मै तो भयी रे बावरीया, अशी ओळ आहे. त्यातला टप टीप चा उच्चार अंगावर शहारा आणतो.
http://www.youtube.com/watch?v=GAUXqsaLYd0
मीना कुमारी म्हणजे रडव्या
मीना कुमारी म्हणजे रडव्या भुमिका आणि रडवी गाणी हे समीकरण पुढे झाले होते.
पण १९५९ सालच्या चार दिल चार राहे मधले तिचे हे गाणे बघा,
अनिल बिस्बास चे उत्तम संगीत, गीता दत्तचा आर्जवी आवाज, (तिची गाण्याच्या सुरवातीची, गोविंदा म्हणून मारलेली साद ऐका ) मीना कुमारीचा वेगळा नाच
कच्ची है उमरिया, कोरी है चुनरीया
मुझे भी संग लेता जा, मोरे सजना
http://www.youtube.com/watch?v=CulhKQfPzbQ&feature=related
आणि त्याच सिनेमातले, लताचे
आणि त्याच सिनेमातले, लताचे अप्रतिम
इंतजार और अभी, और अभी
http://www.youtube.com/watch?v=aUw6vKBHCaU
पडद्यावर निम्मी आहे.
लेटेस्ट हे पाहिले टिव्ही वर.
लेटेस्ट हे पाहिले टिव्ही वर. आवडले
बागोंमे बहार है -
http://www.youtube.com/watch?v=OhZsEwgmCi0
Pages