हिंदी चित्रपटातील उत्तम रित्या चित्रीत झालेली गाणी

Submitted by दिनेश. on 16 November, 2009 - 17:21

गाणी आणि नृत्य, हा अनेक वर्षे हिंदी चित्रपटाची खासियत राहिलेली आहे. अर्थवाही शब्द, सुयोग्य चाल आणि गायकाची कारागिरी, याना पुरेपूर न्याय देणारे चित्रीकरण अनेकवेळा झालेय. इथे आपण अश्या गाण्यांची चर्चा करु. या चित्रीकरणात, नेमके काय आवडले, तेच लिहायचे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महेंद्र्कपूर ने, ना मुह छुपाके जियो (पडद्यावर गोपीकृष्ण ) आणि, नीले गगन के तले,(पदद्यावर सुनिल दत्त आणि विम्मि) पण छान गायलेय. चित्रीकरणही छान आहे.

>>> पडद्यावर सुनील दत्त आहे. आणी नीले गगन के तले मध्ये राज कुमार आहे.

दिल एक मंदिर मधली सगळीचं गाणी छान आहेत.
सगळ्यात सुदंर "हम तेरे प्यार मे सारा आलम खो बैठे.."

हाही चित्रपट मी पाहिला नाहि

एकदा पाहायला हरकत नाही. शबानाचा नवरा गिरिश कर्नाड आहे आणि प्रियकर विक्रम (तो ज्युली वाला). कधा तीच टिपिकल, नवरा की प्रियकर या द्वंद्वात अडकलेली नायिका.. पण तरीही अतिशय सुंदर आहे. शबानाचे लग्न झाल्यावरचे सगळे प्रसंग खुप सुंदर चित्रित केलेत. शेवट अर्थातच जय भारतीय संस्कृती Sad (असला हा शेवट मला अजिबात पसंत नाही )

ऊंचे लोगची गोष्ट त्याकाळी जरा हटके होती. मुख्य म्हणजे टिपीकल नायिका नव्हतीच. मला वाटते फिरोज खान्च्या हातुन तिचा(?) खुन होतो. तो घाबरतो. त्याचा भाऊ राजकुमार पोलीस आणि वडिल अशोक कुमार जज्ज असतात. मग as usual केस राजकुमारकडे येते. वडिल मात्र मुलाला वाचवायला उभे रहातात. चु.भू. दे. घे.

वहिदाचे पान खाये सैंय्या.. हे सिनेमातील गाण्यावर चित्रीत केलेले एक उत्तम कथ्थक मानले जाते.

बम्बई का बाबू मध्ये देव आनंद लफंगा असतो. घरातील पैश्यावर मजा करता येईल म्हणून तो सुचित्रा सेनचा हरवलेला भाऊ बनून घरात घुसतो. (अमिताभचा जमीर याच स्टोरीवर आहे) "चल री सजनी.." हे गाणे रफी गाणार होता पण आशाने SD ला ते गाणे मुकेशकडुन गाऊन घेण्यास सुचवले (In fact she insisted) तीच गोष्ट "जलते है जिसके लिए" ची.

"देखिये साहिबो..." गाण्याच्या सुरुवातीला जे संवाद आहेत त्या वेड्यावाकड्या बडबडीत एक शिवी घातल्या सारखी वाट्ते. त्यामुळे कदाचित त्याची सुरुवात कापली असण्याची शक्यता आहे. कारण मी बरखाला मॅटनी बघितला होता त्यात ते गाणे पुर्ण होते. पण आता दाखवतात त्यात ते कापले आहे. तबकडीवर मात्र पुर्ण आहे.

"रफी अगदी वखवखल्यासरखे गातो" असे माझ्या एका मैत्रिणीचे मत. (तिला मुकेशची गाणी आवडायची, त्यामुळे उचलली जीभ...) मला लोक कुठच्याही एका पार्टीत कसे सामिल होऊ शकतात हेच कळत नाही. रफीची मला आवडणारी गाणी: आप के हसी रुख..., गाईडची सर्वच, मैने रख्खा है मुहोब्बत (शबनम), नाचे मन मोरा, अजहुना आए बालमा..., तुम तो प्यार हो (सेहरा)... आणि बरीच गाणी आवडता. आप के हसीन रुख.. मध्ये माला सिन्हा जरा Odd वाटते. पण सिमेनाची गोष्ट लक्षात घेतली तर चालसे..

वहिदाचे पान खाये सैंय्या.. हे सिनेमातील गाण्यावर चित्रीत केलेले एक उत्तम कथ्थक मानले जाते. >> भुरे साहेब तुम्हाला 'उत्तम वाट लावलेले गाणे' म्हणायचे आहे का? आशाने ज्या नजाकतीने ते गायलकणभरहीनजाकत वहिदा कणभरही दाखवू शकली नाहिये तिच्या नाचातून. तशी वहिदा सुंदर गाण्यांची वाट लावण्यात पटाईतच होती (भवरा बडा नादान दुसरे उत्तम उदाहरण). अर्थात हे माझे मत!

भुरेसाहेब, रफीच्या अत्यंत सुंदर गाण्यांमध्ये, 'पुकारता चला हुं मै, गली गली बहारके' आणि 'कौन है जो सपनोंमे आया' कसे विसरलात????

मला मुकेशही आवडायचा, पण रफीच्या तुलनेत त्याला खुपच मर्यादा होत्या.

देखिये साहिबो.. मला खुप आवडते हे गाणे. कधीच ऐकायला मिळत नाही रेडिओवर. माझ्याकडे चित्रपटाच्या कॅसेटमध्ये होते. आशा आणि रफीने एकदम वेगळ्याच अंदाजमध्ये गायलेय... चित्रपटाच्या सीडीत सुरवात कापुन गाण्याची मजाच घालवुन टाकलीय. ज्याला सुरवातीचा सीन माहित नाहीये, त्याला हे दोघेजण कशासाठी बडबड करताहेत गाण्यात ते अजीबात कळणार नाही. Happy

वहिदाचे पान खाये सैंय्या.. हे सिनेमातील गाण्यावर चित्रीत केलेले एक उत्तम कथ्थक मानले जाते. >> भुरे साहेब तुम्हाला 'उत्तम वाट लावलेले गाणे' म्हणायचे आहे का?>>>
वहिदा उत्तम प्रशिक्षित नर्तकी होती. मात्र 'तिसरी कसम'मधलं तिचं पात्र हे केवळ एक नौटंकीवालीचं आहे.अशा बाईला जितपत नृत्य जमते तेवढच नाचायचे जास्त कलाकारी नको अशी दिग्दर्शक बासू भट्टाचार्यची सूचनाच होती. तिसरी कसम हा नाचाच्या दॄष्ट्या माझा सगळ्यात अवघड सिनेमा आरण त्यात फार चांगलं नाचायचं नव्हतं अशी कबूली वहिदानेही दिली आहे.'रात ढलने लगी चांद छुपने चला' वरचा तिचा नाचही सामान्यच आहे.
रच्याकने 'तिसरी कसम' हा एक अत्यंत सुंदर सिनेमा आहे पाहिला नसल्यास जरुर पहा.

आगाऊ शी सहमत...

बाकी तेव्हा लोक असला विचार करायचे याचे खरेच आश्चर्य वाटते.

स्लमडॉग मिलियेनर मधल्या मुलाला त्याला विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे वाचनातुन किंवा इतर कुठून मिळालेली नसतात तर त्याच्या आजुबाजुच्या प्रसंगातुन मिळालेली असतात, अशा वेळी धारावीत राहणा-या त्याला 'आजा आजा जिंद शामियाने के तले, आजा जरीवाले नीले आसमांके तले' इतके उच्च काव्यात्म गीत कसे काय सुचले असेल असा प्रश्न मला नेहमी पडतो.

"चल री सजनी.." हे गाणे रफी गाणार होता पण आशाने SD ला ते गाणे मुकेशकडुन गाऊन घेण्यास सुचवले (In fact she insisted) तीच गोष्ट "जलते है जिसके लिए" ची. >>> जलते है जिसकेलिये तलतने गायलय ना??? इतका सुंदर आणि रेशमी आवाज नंतर कधीही ऐकू आला नाही.

वहिदाचे पान खाये सैंय्या.. हे सिनेमातील गाण्यावर चित्रीत केलेले एक उत्तम कथ्थक मानले जाते.>> वहिदाने तिच्या नृत्याची सर्व कमाल आणी धमाल गाईडमधे दाखवलेय.. सैया बेइमान हे मात्र खरोखर अगदी उत्तम कथ्थक आहे.

अशा बाईला जितपत नृत्य जमते तेवढच नाचायचे जास्त कलाकारी नको अशी दिग्दर्शक बासू भट्टाचार्यची सूचनाच होती. >> एकदम बरोबर. 'कलाकारी' नकोच पण मग अशा गाण्यात 'अदाकारी' पण नको असे बासूदांनी नक्कीच सांगितले नसणार. उलट ती ठासून भरलेली हवी. मीनाकुमारीसारखी नृत्यापासून दूरच असणारी अभिनेत्री फक्त एक दुपट्टा आणि गिरक्या ह्यांच्या जोरावरच इन्ही लोगोने सारखे गाणे चांगल्याप्रकारे सादर करू शकते, तीर-ए-नझर मध्ये आपल्या डोळ्यांवरच सारे गाणे तोलू शकते तर मग वहिदासारखी नर्तकी का नाही.

'बुगडी माझी सांडली गं' मध्ये नृत्य बेताचेच आहे, नायीका तमासगीरच आहे पण आशाचे ते 'हाssय' सादर करणार्‍या जयश्रीबाईं नजरेसमोर आणा मग समजेल वहिदा कुठे आणि किती कमी पडली आहे 'पान खाये सैंय्या' मध्ये.

मध्ये कुणीतरी काजोलची तुलना नर्गिसशी केली आहे. मला सुरुवातीला ती मावशीसारखी वाटायची. कुठच्याही टाईपच्या रोलमध्ये फिट्ट बसायची. परत शाहरुख खान असो किंवा अक्षय कुमार तिच्या रोलही महत्वाचा रहायचे. नुतनला बरोबर कधीही हिरो कोण आहे ह्याचा फारसा फरक पडला नाही तसेच सुरुवातीला काजोलचे होते. नंतर ती त्या "डेंजर ग्रुप" मध्ये सामील झाली आणि स्वतः वाट लावली. ह्यबद्दल तिला क्षमा नाही.

नर्गिसवरुन आठवले. ती जरी मोठी वाटत असली तरी मला तिचे रात और दिन मधील लताचे "आवारा ऐ मेरे दिल " फार आवडते. धुकट रात्री ती एका ब्रीजवरुन धावते आहे ...असा काहीसा शॉट घेतला आहे. लता आणि SJ ला तोड नाही. लताला एव्हढी विविध प्रकारची गाणी SJ सोडुन कोणीच दिली नाहीत. ह्याच सिमेनातील "दिल की गिरह खोल दो", "जीना हमको रास ना आया" ही छान आहे.

आशाला जरी दुय्यम गाणी दिली तरी त्यांचे तिने सोने केले. ती फार ऐकवली जात नाहीत ह्याचे वाईट वाटते. नौशादचे गंगा जमनातले "तोरा मन बडा पापी सावरियाँ रे" आणि लिडरमधले "दैंया रे दैंया लाज मोहे लागे", SJ च्या पडत्या काळातील "सुनी सुनी साँस की सितार पर"(लाल पथ्थर).....

गाणी उत्तम रित्या चित्रीत करण्यात विजय आनंद मला नेहमीच महान वाटतो. कुतुबमिनारचा जीना हे गाणे चित्रीत करण्याचे लोकेशन आहे हे फक्त त्यालाच सुचू शकते. गव्हाणीत घेतलेल आजा पंछी अकेला है (बरोबर डेंजर कल्पना कार्तिक), वेगवेगळ्या खिडक्या वापरून शूट केलेले "पलभर के लिये", ओ हसीना जुल्फोंवाली, पल पल दिल के पास, ढेकणाबरोबर धीर से जाना खटियन में.... हम दोनो जरी अमरजित दिग्दर्शित असला तरी गाण्याच्या शूटसाठी देव आनंदने भावाला बोलवले होते.

भूरेसाहेब,
ओ हसीना जुल्फोंवाली हे गाणं विजय आनंदचं आहे?
माधव,
वहिदाचे पान खाये सैंय्या हे गाणं खरंतर नृत्याचा एक संदर नमुना मानला जातो. नौटंकीवालीचं पात्र असून कुठेही अश्लील हावभाव नाहीत, सहज सुंदर स्टेप्स आणि साधेपणा याचा उत्तम वापर केला आहे. आणि हे मत एका प्रसिध्द नृत्यांगनेचे आहे. Happy

मला लोक कुठच्याही एका पार्टीत कसे सामिल होऊ शकतात हेच कळत नाही. >>>
रच्याकने 'तिसरी कसम' हा एक अत्यंत सुंदर सिनेमा आहे पाहिला नसल्यास जरुर पहा.>>>
दोन्हीशी सहमत. तीसरी कसम मलाही खूप आवडतो. विशेषतः गाणी. शैलेन्द्र ने अतिशय सुंदर गाणी लिहीली आहेत.

अंजली, तीसरी मंझिल विजय आनंद ने दिग्दर्शित केला होता.

तीसरी मंझिल विजय आनंद ने दिग्दर्शित केला होता.

सॉल्लीड चित्रपट.. आजही तितकाच खिळवुन ठेवतो...

भुरेसाहेब, माहितीबद्दल धन्यवाद..

तीसरी मंझिल मधील शम्मीचे विस्फारलेले डोळे. (खुनी माणसाचा कोट कपाटात बघताना.) Happy .. ग्रेट सीन..

भुरे,, काजोलबद्दल सहमत. खरंतर तिच्याकडे प्रतिभा होती पण तिने वेगळे रोल्स करायचाच नाही असा पण केलाय सध्या. पंजाबी नवर्‍याबरोबर लग्न केल्यानंतर प्रत्येक सिनेमामधे पंजाबी कुडी बनून नाचायचं एवढंच शिल्लक ठेवलय.

मला काजोल गुप्त आणि उधार की जिंदगी मधे फार आवडली होती. कुच कुच होता है आणि आचरट खान बघताना तिचा जाम राग आला होता.

गाणी उत्तम रित्या चित्रीत करण्यात विजय आनंद मला नेहमीच महान वाटतो. >>> माझ्या दृष्टीने सगळ्यात उच्च रित्या चित्रीत झालेले गाणे म्हणजे तेरे घर के सामनेचं टायटल साँग.

अगदी एव्हरग्रीन म्हणावा असा हा सिनेमा. विषय
टून झालेला देवानंद आणि दारूच्या ग्लासमधली नूतन.. या कल्पनेलाच लाखो सलाम!!! त्या वेळच्या तंत्राची मर्यादा लक्षात घेऊन देखील खरोखर हे गाणे अप्रतिम दिसतं... आणि गाणं तर काय सुंदर लिहिलय आणी म्हटलय..
"मुहब्बत मे ताज बने ये भी तुम्हे याद होगा..
मुहब्बत मे ताज बने ये भी तुम्हे याद होगा..
मै भी कुछ बनाऊंगा.. "

यावर नूतनचं अफलातून "देखे?"

यावर नूतनचं अफलातून "देखे?">>>नंदिनीला १०० मोदक Happy

आता नुतनचा विषय निघाला आहे तर त्यांच्यावरच चित्रित झालेले अजुन एक सुंदर गाणे

तेरा मेरा साथ रहे
धूप हो, छाया हो, दिन हो कि रात रहे
तेरा मेरा साथ रहे

सौदागर (जुना) या चित्रपटातील हे गीत. संगीतकार रविंद्र जैन यांचे एक सुमधुर कंपोझिशन आणि लता मंगेशकरचा मखमली आवाज. रविंद्र जैन आणि लता मंगेशकर यांची बहुतेक गाणी चांगली आहेत, पण "तेरा मेरा साथ रहे" हे थोडे हटके आहे Happy
हिंदी चित्रपटातील प्रतिभावान आणि सुंदर नायिकांपैकी एक "नुतन". गाणे बघताना "नुतनला" पहायचे कि "लता मंगेशकरला" ऐकायचे अशी अवस्था होते. लताचा आवाज तर ग्रेटच पण नुतनचा अभिनयसुद्धा लाजवाब यावर दुमत नाही Happy

http://www.youtube.com/watch?v=DKRHhVY6kQw

तेरा मेरा साथ रहे
धूप हो, छाया हो, दिन हो कि रात रहे
तेरा मेरा साथ रहे

दर्द की शाम हो, या सुख का सवेरा हो
सब गवारा है मुझे, साथ बस तेरा हो
साथ बस तेरा हो
जीते जी, मर के भी, हाथ में हाथ रहे

कोई वादा न करे, कभी खाये न कसम
जब कहे बस यह कहे, मिलके बिछडेंगे न हम
मिलके बिछडेंगे न हम
प्यार की, प्रीत की, यूँही बरसात रहे

तू कभी मेरे खुदा, मुझसे बेज़ार न हो
बीच हम दोनों के, कोई दीवार न हो
मुझसे बेज़ार न हो
सबके, होठों पे, अपनी ही बात रहे

तेरा मेरा साथ रहे
धूप हो, छाया हो, दिन हो कि रात रहे
तेरा मेरा साथ रहे

रफीच्या गाण्याला " वखवखलेला " म्हणणार्‍या " म्हान " व्यक्तीचं काय करु ?>>> त्याने रफी कधीच ऐकला नाही असे मानायचे... आणि गा. गु. च. का?? असे म्हणून सोडून द्यायचे.

रफीचं अभि ना जाओ छोडकर पण खूप सुंदर गाणं.. आणि आशाचा साथ तर विचारायला नकोच. आशा आणि रफीची गाणी ऐकताना त्यानी कुणाला तरी प्लेबॅक दिलाय यापेक्षा ती गाणी एकमेकांसाठीच म्हटली आहेत असा फील कायम येत राहतो!!! म्हणूनच की काय त्या दोघाची संवादात्मक खूप सारी गाणी आहेत. (किशोर आणि आशादेखील.)

रफीच्या गाण्याला " वखवखलेला " म्हणणार्‍या " म्हान " व्यक्तीचं काय करु ?>>> त्याने रफी कधीच ऐकला नाही असे मानायचे... आणि गा. गु. च. का?? असे म्हणून सोडून द्यायचे.<<<<<<१०० मोदक Happy

मी त्या'म्हान' व्यक्तीला रफीची २ च गाणी ऐकवली असती.
'न किसीका आंख का नूर हूं'
'जिन्हे नाज है हिंदपर वो कहां है'

विश्वजीत असाही कधी राव होता?? हिरविनीपेक्षा त्याची लिप्स्टिक जास्त चमकायची, मेकप उठुन दिसायचा, लडिवाळपणा जास्तच करायचा आणि गाताना इकडे तिकडे झुकणे, वाकणे, दुड्क्या चालीने चालणे इइ त्याला जास्त चांगले जमायचे...

काही विनोदी अभिनेत्यावर चित्रीत केलेली गाणीही आवडतात. त्यात महान: मेहमुद. त्याला स्वतःला नाचाचे अंग असल्यामुळे असेल पण अगदी हल्लीचे "मुत्तकोडी..." (दादा कोंडके स्टाईल नाच)पण बरे वाटते. सांज और सवेरा मधील "अजुहुन आये बालमा" तर भारीच आहे. गाणे तर खासच. मध्येच as serious singer आणि मध्येच comedian परत थोडीशी ढिलू वाटणारी शुभा खोटे. प्रथम तिला शिकवायला आलेला म्हातारा शिक्षक वाटतो. नंतर तिला कळते की तो आपला प्रेमी आहे. मेहमूदने तंबोरा/सतार ज्याप्रकारे प्रॉपसारखा वापरला आहे ते बघुन उ. विलायत खान त्याला गोळी मारतील. तरीही गाणे Overall मस्त TP आहे. तसेच हमराही मधील "वो दिन याद करो..." शुभा खोटे जेंव्हा वो दिन याद करो विचारते तेंव्हा मेहमूदच्या चेहर्‍यावरील प्रश्नचिन्ह आणि तोंडात बोट घालून केलेला अभिनय खासच. अजुन एक मेहमूदचे गाणे "ओ मेरी मैना ..."(प्यार किए जा). मुमतज आणि त्याने केलेला डान्स जबरीच आहे.

विनोदी सिनेमात (अलबेला) comedianच हिरो असल्याने त्याला गाणे असायचे पण फक्त विनोदी अभिनेत्याला सिनेमात खास गाने देण्याची सुरुवात मला वाटते जॉनी वॉकरच्या "ते मालिश.." पासुन चालू झाली असावी. त्याचे खास गाणे " जाने कहाँ मेरा जिगर गया जी..." लायब्ररीत कसले स्वैर वावरले आहेत. नंतर नूर (यास्मिन) ही त्याची पत्नी झाली.

किशोर कुमारवर तर एक अख्खा लेख होईल. मैं बंगाली छोकरा(रागिनी), एक लडकी भिगी भागिसी(चलती का नाम गाडी), मीना कुमारी बरोबर तेरा तीर ओ रे पीर (शरारत), नुतन आणि त्याचे C A T cat is the BEST आणि पुर्ण पडोसन.

परवाच बीफोरयु म्युजिक वर सगळी ट्वीस्ट ची गाणी दाखवले गेली...!

तेव्हा 'आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबांपर" हे मुमताज चे गाणे बघत असतांना
राहुन राहुन वाटायचे ...की हिच्या तोडीस तोड अभिनेता कोणी नव्हताच त्या काळात!
तिच्या प्रत्येक गाण्यातली बॉडी लँग्वेज, नृत्यातली नजाकत ,फेशियल एक्स्प्रेशन्स आणि मुख्य म्हणजे तिचा ड्रेस सेन्स जे फारच उच्च दर्जाचे होते ते बघितले तर तिची बरोबरी करु शकेल/ तिला शोभेल असा सहअभिनेता कोणी मिळाला नाही तिला! हा राजेश खन्नाशी थोडं फार केमेस्ट्री जुळलेली वाटते पण तो ही नाचात मार खायचा.
त्या मानाने नूतन, मधुबाला यांना ड्रेस सेन्स चांगला होता म्हणायचा! नूतन चे 'सी ए टी कॅट" हे किशोरकुमार बरोबरचे गाणे , हाल कैसा है जनाब का मधली मधुबाला, दोन वेण्या किंवा कुरळे, मोकळे केस आणि उगिचच कपाळावर येणारी एखादी चुकार बट ...आहाहा मधुबाला सारखेच आरस्पानी सौंदर्य नूतन कडे ही होते. उगाचच डोक्यावर झोपडे घालायचा शर्मिला / आशा पारेख सारखा प्रयत्न त्यांनी केला नाही. सायरा चे कुठलेसे ते गाणे ...सोनेरी केस...आणि तो ड्रेस...याक!
परवाच्या त्या ट्वीस्ट गाण्यात बबिता, जितेंद्र चे एक गाणे होते....त्यातली बबिताची हेअरस्टाईल....तिची तिलाच माहित काय केली होती ते!

बबीता Happy ह्या बाईला कसलाही सेंस नव्हता, ना ड्रेस सेन्स, ना हेअरस्टाईल सेन्स, ना अ‍ॅक्टींग सेन्स... कपुर फॅमिलीत लग्न करुन चित्रपट पाहणा-यांची सुटका केली हीच एक सेन्सिबल गोष्ट तिने केली...

तिचा आणि शशीचा हसिना मान जायेगी मी केवळ शशी मुळे पाहु शकले. हा एकमेव चित्रपट असावा जिथे नायकाचा हमशकल असुनही तो त्याचा जत्रेत हरवलेला जुळा भाऊ नाहीये. आणि आयी मिलनकी बेला हा एकमेव चित्रपट असावा जिथे जुळे भाऊ मोठे झाल्यावर धर्मेद्र आणि राजेंद्रकुमार झाले Happy

मुमताज खरेच ग्रेट होती. ती नेहमी पेस्टल शेड्सचे अंगाबरोबर बसतील असे कपडे घालायची. तिला खुप शोभायचे ते कपडे. एका चित्रपटात ती आणि शर्मिला आहेत. मला मुमताजच जास्त आवडलेली त्यात.. अ‍ॅक्टींगमध्येही ती चांगली होती... एक्स्ट्रा म्हणुन सुरवात करुन टॉपची हिरोइन झालेली ती एकमेव असेल..

b4u वर खरेच मस्त गाणी लागतात.. एक थिम घेतात आणि त्यावरची गाणी लावतात. शिवाय मध्येमध्ये जाहिरातींचाही जास्त त्रास नसतो.

आज १००.७ एफेम वर कॉमेडी गाणी लागलेली. Happy

मुमताजचा विषय निघालाच आहे तर.
तिच्या बहुतेक गाण्यात एक लाइव्हलीनेस असायचा. आणि मी कुठेतरी वाचल्याप्रमाणे,
ती अतिशय सुस्वभावी होती. तिने त्याकाळच्या अनेक अभितेत्रींबरोबर सहनायिका
म्हणून काम केले. दोन अभिनेत्रीत सुसंवाद नसेल, तर चित्रीकरण करणे मुष्कील
होऊन बसते. मुमताजने इतर नायिकांबरोबर काम केलेले चित्रपट बघा.
संध्या (सेहरा), मीनाकुमारी, पद्मिनी (काजल), वहिदा रेहमान (पत्थर के सनम, राम और शाम),
राजश्री (सूरज, ब्रम्हचारी), शर्मिला टॅगोर ( बात एक रात की, मेरे हमदम मेरे दोस्त ),
हेमामालिनी (तेरे मेरे सपने), लीना चंदावरकर (हमजोली, यात मुमताज, पाहुणी कलाकार)
रेखा, योगिता बाली वगैरे (नागिन), मीनाकुमारी (दुष्मन)

आणि विनोदी कलाकारांची आठवण काढायची तर उत्तम चित्रीकरण झालेली, हि
आणखी काही गाणी. सर जो तेरा चकराए (जॉनी वॉकर, प्यासा, रफ़ी), यातले तेल मालीश
या शब्दावर त्याचे हावभाव.
नजारा मुझे किसने चिल्मन से मारा ( जॉनी वॉकर, बात एक रात की, मन्ना डे )
ही कव्वाली आहे, एका जागी बसूनच गायलीय, तरीपण मजेशीर आहे.
जंगल मे मोर नाचा ( जॉनी वॉकर, मधुमति, रफ़ि)
हम काले है तो क्या हुवा (मेहमूद, गुमनाम, रफ़ी ) हेलन आणि मेहमूद चा नाच, आणि तोही खयालोंमे
प्यार कि आग मे तनबदन जल गया (मेहमूद, जिद्दी, मन्ना डे) मन्ना डे चे उसासे, त्यावर त्याचा अभिनय
शिवाय मधेच ट्वीस्ट नाचणे वगैरे.

Pages