Submitted by दिनेश. on 16 November, 2009 - 17:21
गाणी आणि नृत्य, हा अनेक वर्षे हिंदी चित्रपटाची खासियत राहिलेली आहे. अर्थवाही शब्द, सुयोग्य चाल आणि गायकाची कारागिरी, याना पुरेपूर न्याय देणारे चित्रीकरण अनेकवेळा झालेय. इथे आपण अश्या गाण्यांची चर्चा करु. या चित्रीकरणात, नेमके काय आवडले, तेच लिहायचे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
https://athavle-ani-sathavle
https://athavle-ani-sathavle.blogspot.com/2021/03/krushna-kashi-re-lagal...
कृष्णा कशी रे लागली रक्ताची धार
तुझिया बोटाला
मस्त धागा.
मस्त धागा.
उत्तमरीत्या चित्रित केलेलं हे 2019 चं गाणं श्रेया घोषाल आणि वैशाली माडे ने सुंदर गायलंय. अमिताभ भट्टाचार्य ने लिहिलंय आणि प्रीतम ने संगीत दिलंय.
https://youtu.be/ntC3sO-VeJY?si=NHnXutH8dczm6gvM
चित्रपट जरी नावाप्रमाणे कलंक असला तरी गाणं एक नंबर आहे .ऐकायला जितकं सुंदर आहे तितकंच बघायला अतिशय सुंदर आहे . गाण्याचे लोकेशन, सेट ,कॉश्च्युम सगळंच अप्रतिम आहे त्यात माधुरी आणि आलिया आणि आलिया काय नाचलीय ,मस्त .माधुरीबद्दल काय बोलणार
गाणं खूप सिनेमॅटिक आहे .गाण्याच्या शेवटाला जेव्हा दहा राम एकसाथ धनुष्य बाणासाहित पाण्यातून वर येऊन रावणाला आगीचे बाण मारतात, तो सीन तर सॉलिड वाटतो .गाणं करण जोहरने एकदम लार्जर दन लाईफ बनवलंय. साडे दहा मिनिटांचं हे गाणं आतापर्यंतचं बहुतेक सर्वात मोठं गाणं असावं.
Pages