Submitted by दिनेश. on 16 November, 2009 - 17:21
गाणी आणि नृत्य, हा अनेक वर्षे हिंदी चित्रपटाची खासियत राहिलेली आहे. अर्थवाही शब्द, सुयोग्य चाल आणि गायकाची कारागिरी, याना पुरेपूर न्याय देणारे चित्रीकरण अनेकवेळा झालेय. इथे आपण अश्या गाण्यांची चर्चा करु. या चित्रीकरणात, नेमके काय आवडले, तेच लिहायचे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अंखियोंकी झरोखोंसे मैंने देखा
अंखियोंकी झरोखोंसे मैंने देखा जो सांवरे
तुम दूर नजर आयें बडी दूर नजर आयें
अप्रतिम गाणे, जितके ऐकायला गोड वाटते, तितकेच डोळ्यांनाही सुखावणारे आहे..
सहारा या चित्रपटातलं कोणाला
सहारा या चित्रपटातलं कोणाला फारसं माहिती नसलेलं एक गीत आहे - मीनाकुमारी आणि डेझी इराणी वर चित्रित झालेलं. मीनाकुमारी ही नवर्याने विनाकारण संशय घेऊन टाकलेली, अंध, रस्त्यावर गाणी म्हणून गुजारणा करणारी असहाय, हतबल स्त्री असते. डेझी इराणीने छोट्या अनाथ मुलाची भूमिका केली आहे. मीनाकुमारी तिला आपला मुलगा मानून आईसारखी ममता देत असते. एका झोपडीत हे दोघे राहात असतात पण तरीही भविश्याची स्वप्ने बघत असतात. खिन्न होउन बसलेल्या आईला हसवण्यासाठी डेझी हे गाणं म्हणते.
छम छम छम चले वो मा, दुनियासे ना डरे वो मा
जिसका बेटा राजकुमार, उसके घर मे सदा बहार
मग मीनाकुमारीही हसून त्यात सामील होते. सुंदर शब्द, त्याला साजेशी चाल आणि दोघींचा सहजसुंदर अभिनय यामुळे गाणं एका वेगळ्याच उंचीवर जातं.
youtube वर link मिळू शकेल जरा शोधाशोध केली की. नक्की बघा.
सापडलं.
सापडलं.
http://www.youtube.com/watch?v=PpAuAyE2C94
खरच निखळ आनंद देतं हे गाणं. ती एक जोडी मधे मधे नाचतांना दिसते ती ही मस्त.
छान आहे ते गाणे. मी ऐकले
छान आहे ते गाणे. मी ऐकले होते पण कधी बघितले नव्हते.
http://www.youtube.com/watch?v=T3RGbuT-DBY
हे पण जरा वेगळेच. अंगुलीमाल चित्रपटातले. अनिल बिस्वास यांचे संगीत आहे. कलाकार मला ओळखता आले नाहीत. गाणे ३ भागात आहे. मधला लताचा भाग खासच आहे. सगळ्या गाण्यात एक छान प्रसन्न मूड आहे.
छायागीतात एक गाणे मी वारंवार
छायागीतात एक गाणे मी वारंवार पाहिलेले. त्यात हिरो अगदी रडक्या आवाजात गात असतो आणि त्याचवेळी हिरोईन मात्र अगदी आनंदाने नाचत गात फिरत असते. गाण्यातली दृश्ये जरी आठवणीत रुतून बसली होती तरी गाण्याचे शब्द मात्र अजिबात आठवत नव्हते. शब्दच माहित नाही तर शोधणार काय?
आज हंसराज बहल यांच्य स्म्रुतीनिमित्त १००.७ वर त्यांची गाणी होती. त्यात 'नैन द्वारसे मन मे वो आके तन मे आग लगाये' हे मुकेश-लताचे गाणे ऐकले आणि अचानक इतक्या वर्षांत जी दृश्ये दिसत होती त्यांना शब्द मिळाले :). लगेच टुयबवर शोधले. अगदी चांगली प्रत उपलब्ध आहे.
अतिशय सुंदर गाणे आणि पडद्यावरही गाण्याला साजेसेच दृश्य.
चित्रपट : सावन
गायकः लता, मुकेश
पडद्यावरः भारत भुषण आणि अमिता.
साधना, हे गाणे मी प्रथम
साधना, हे गाणे मी प्रथम हंसराज बहल यांचं निधन झालं तेव्हा बिनाका गीतमालात अमीन सायानी यांनी श्रद्धांजली वाहताना लावलं होतं तेव्हा ऐकलं एकदम सैगली टेम्पोत गाणं चालू असतं आणि एखादं कारंजं अचानक सुरू व्हावं तसं लताचं गाणं सुरू होतं. हाये, रसिया ... नन्तर किती वर्षे गेली ते गाणं कशातलं आहे हे कळायला. काही मार्गच नसायचा . आता गुगलदेव आणि यूट्यूबदेव आल्यामुळे सगळं सोपं झालं
रडक्या आवाजात म्हनजे भाभू आहे त्यात , मग काय
तूनळी वर इथे आहे ते गाणे https://www.youtube.com/watch?v=ZBGLgkV0oIQ
मला परिणीता चित्रपटामधल
मला परिणीता चित्रपटामधल >>>कस्तो मझा है रे... ह्या गाण्याच चित्रीकरण फार आवडत... ट्रेन चा प्रवास.. त्यांच स्वप्नरंजन... सुरेख शब्द.. आनि चाल पण.. आनि सोनु निगम चा आवाज पण..
अंकु ...अनुमोदन... कस्तो मझा
अंकु ...अनुमोदन...:)
कस्तो मझा मधे 'धरती सजी अंबर सजा ' या कडव्यात बॅकग्राउंड्ला तसेच इन्टर्ल्युड म्हणून जी बासरी वाजवली आहे ती अतिशय अप्रतीम.....
परख सिनेमातील 'मिला है किसीका झुमका' आणि ' ओ सजना' उत्क्रुष्टरीत्या चित्रीत केली आहेत. अर्थात यात साध्यात साधी साडी घातलेली (साधना कट्च्या आधीची ) लाघवी साधना हिचाही वाटा आहेच.
मिला है किसीका झुमका गाण्या आधी गुराख्यानं पाव्यावर ती सुरेल धुन वाजवण, ती लता मंगेशकरांच्या गळ्यातून तश्शी निघणं (दोन्ही सलिल चौधरींच्या क्रुपेने) आणि पडद्यावर साधी सुंदर साधना असणं हा एक अवर्णनीय योगायोग असावा.
फक्त या गाण्याच्या शेवट्च्या कडव्यात ती नदीच्या (का तळ्याच्या ?)किनारी पायर्यांवर बसून घागर घेऊन काही ओळी म्हणते तेव्हा तिची साडी पाण्यात उतरण्याआधीच भिजलेली दिसते पायांपाशी. दोन तीन वेळा शॉट घेण्याचा परिणाम बहुतेक..... तरीही तिनं अप्रतीम काम ़केलं आहे.
अंकु +1
अंकु +1
सुस्श्मिता सेनचा, "चिंगारी"
सुस्श्मिता सेनचा, "चिंगारी" नावाचा चित्रपट आला होता. त्यात कितनी सर्दी कितनी गर्मी, असे एक गाणे आहे.
गाणे फार सेन्सुयली चित्रीत झालेय.. तरीपण फार वेगळे आहे.
( मला नीट माहीत नाही, पण कुणीतरी म्हणाले होते कि या गाण्याचे दिग्दर्शन तिनेच केले होते.
http://www.youtube.com/watch?v=qcGOkNxw69c
'बॉम्बे' सिनेमातील 'कहना ही
'बॉम्बे' सिनेमातील 'कहना ही क्या, के नैन इक अंजान से जो मिले" हे गाणं अतिशय आवडतं. अप्रतिम पिक्चरायझेशन!!
अरविंद स्वामी, मनिषा कोईरालाचा फ्रेश लुक आणी सोबत चित्राचा मधाळ आवाज!!
अरविंद स्वामी या सिनेमापासुन आपला एकदम फेवरीट्ट!!
इजाजत मधले कतरा कतरा गाणे कसे
इजाजत मधले कतरा कतरा गाणे कसे लिहिले नाही कोणी?
नसीर, रेखा, अप्रतिम लोकेशन आणि गुलजार+आरडी+आशा त्रिकुटाचे श्रवणीय गाणे!
सदे (चिमणने एस.डी.ला दिलेले
सदे (चिमणने एस.डी.ला दिलेले नाव
) आणि लता यांची अनेक अप्रतिम गाणी आहेत. पण मध्यंतरी त्यांच्यात काही कारणावरून अबोला होता. आरडी त्याचा पहिला सिनेमा करत होता आणि त्याच निमित्ताने सदे आणि लता पुन्हा एकत्र आले. त्या नंतर आलेला त्या युतीचा पहिला सिनेमा होता - बंदिनी. त्यातली सगळीच गाणी सुंदर आहेत. पण पडद्यावर आवर्जून बघावे असे - 'जोगी जबसे तू आया मेरे द्वारे'.
प्रेमाची ओळख पटलेली नायिका आणि तिचा तो मूड सदेने इतका अचूक पकडला आहे की कधीही गाणे ऐकले तर 'मन आनंद आनंद छायो' अशीच अवस्था होऊन जाते. सदेच तो अशा चाली बांधणे त्याला कठीण ते काय? आणि त्याला जे अभिप्रेत आहे ते आपल्या गळ्यातून अचूक उतरवणे हे लतालाही कठीण नव्हते.
पण सुंदर गाणे पडद्यावर पण तितकेच सुंदर दिसले पाहिजे. इथे पहा. पहाताना लता गात आहे हे विसरायला होते आणि नुतनच गाते आहे असेच वाटत रहाते. गाण्यात नूतनच्या चेहर्याचे अनेक क्लोज-अप्स आहेत. आणि तिची एकएक भावमुद्रा म्हणजे अगदी बावनकशी सोने आहे.
मुघल-ए-आझम मधल्या अनारकलीच्या भूमिकेकरता असिफने सर्वात प्रथम नुतनला विचारले होते. 'अनारकली इतिहासातली सौंदर्यखनी होती. मी तितकी सुंदर नाही' असे म्हणत तिने नम्रपणे ती भूमिका नाकारली होती. आणि तिनेच मधुबालाचे नाव असिफला सुचवले होते. पुढचा इतिहास तर आपल्याला माहितच आहे. आज अनारकलीला माझ्या मनात तरी मधुबालाचाच चेहरा आहे. पण के.असिफची प्रथम निवड पण सार्थच होती याची प्रचिती 'जोगी जबसे तू आया मेरे द्वारे' बघताना नक्की येते.
माधव, माहितीबद्दल धन्यवाद.
माधव, माहितीबद्दल धन्यवाद. 'जोगी जबसे...' मधे काहीतरी वेगळीच जादू आहे. ते गाणे 'रवीन्द्र संगीत' म्हणतात तशा प्रकारचे आहे का? 'मोरा गोरा अंग...' कदाचित जास्त लोकप्रिय असावे पण मला तरी जोगी जबसेच जास्त आवडते.
सुजाता मधले, काली घटा छाय..
सुजाता मधले, काली घटा छाय.. पण असेच. ( गायिका : आशा ) त्याच्या चालीतच थोडी हुरहुर / दबलेपण आहे.
पण पावसाचा आवाज, तिची पावले.. यांचा मेळ मस्तच जमलाय.
नेहमीची कामे करताना, अगदी नैसर्गिकपणे वावरत ती सहजसुंदर शैलीत गाणी सादर करत असे.
सौदागर मधली, तेरा मेरा साथ रहे, अब तो है तूमसे.. पण अशीच आहेत.
फारएण्ड, माझा रविंद्र
फारएण्ड, माझा रविंद्र संगिताचा काहीच अभ्यास नाही.
पण मला 'जोगी...' ची चाल देवदासमधील 'आन मिलो आन मिलो शाम सावरे' सारखी वाटते. दोन्ही गाण्यांचा मुड अगदी वेगळा आहे. गीता दत्त आणि लता यांच्या सादरीकरणात प्रचंड फरक आहे. दोन्ही गाण्यांचा वाद्यमेळ पण भिन्न आहे. पण बेसिक चाल मात्र सारखीच वाटते मला. आणि 'आन मिलो...' वर रविंद्र संगिताची खूप छाप आहे.
किती गोड गाणं आहे - जोगी जबसे
किती गोड गाणं आहे - जोगी जबसे तु आया मेरे द्वारे...
जाके पनघटपे बैठू मै राधा दिवानी,
बिन जल लिये चली आऊ...... लताने अगदी गोड गायलंय.
नंतर आलेला त्या युतीचा पहिला
नंतर आलेला त्या युतीचा पहिला सिनेमा होता - बंदिनी. त्यातली सगळीच गाणी सुंदर आहेत. पण पडद्यावर आवर्जून बघावे असे - <<< अजून एक गाणे "अबके बरस भेज भैय्याको बाबुल" http://www.youtube.com/watch?v=x3ktkurqM2g
गाणं नितांतसुंदर आहेच, आशाचा आवाज अप्रतिम आहेच, शब्द सहजसाधे आहेतच, पण गाण्याच्या चित्रीकरणामधे पूर्ण वेळ जी एक अदृश्य अशी उदासी आहे, ती निव्वळ ग्रेट. बघताना मला तरी कित्येकदा हमखास रडू येतंच.
अबके बरस.. चा संदर्भ तिसरी
अबके बरस.. चा संदर्भ तिसरी कसम मधल्या महुआ घटवारनच्या कथेशी आहे असे वाचले होते.
साधना, अगदी हिच कल्पना, एका दुसर्या गाण्यात आहे.
छोडो छोडो मोरी बैंया शाम रे
लाज के मारे मै तो पानी पानी हुई जाऊ.
हे ते गाणे आणि ओळी
नीरभरन के रोज बहाने करु,
चोरी चोरी आऊ तोसे मिलने
तोसे नित जाने क्या, कहने को आऊ
बिना कहे चली जाऊ...
चित्रपटाने नाव आठवत नाही, पण बहुतेक कामिनी कदम ( कौशल नाही ) आणि राजेंद्रकुमार होते या गाण्यात.
गाण्यातला भाव शब्दात, चालीत,
गाण्यातला भाव शब्दात, चालीत, गायनात नीट उमटला तर अनोखी किमया होते.
आशा आणि गीता ने हे गाणे अगदी दोन मैत्रिणी एकमेकिंची मस्करी करताना जसे शब्द उच्चारतील तसेच गायले आहे आणि पडद्यावर मधुबाला आणि मिनु मुमताजची छेडाछेडी.
गाणे.. जानू जानू रे काहे खनके है तोरा कंगना,
मै भी जानू रे, छुपके कौन आया तोरे अंगना
चित्रपट : ईन्सान जाग उठा ( सुनील दत्त, याच नावाचा श्रीदेवी / राकेश रोशन / मिथुन चा पण चित्रपट होता असे वाटतेय. त्यात श्रीदेवीचा छान नाच होता, असे पण वाचल्याचे आठवतेय.)
तो १९८४ मध आलेला 'जाग उठा
तो १९८४ मध आलेला 'जाग उठा इन्सान' आहे दिनेशदा. त्यात राकेश रोशन, श्रीदेवी, व मिथुन होते. मिथुन अस्पृश्य तर श्रीदेवी कट्टर ब्राम्हण. त्यांचं प्रेम, मग घरच्यांचा विरोध वै. मग तिचं लग्न राकेश रोशनशी लावुन देतात. पण त्याला तिच्यात पत्नीच्याऐवजी 'देवी' दिसत असते. अशी काहिशी स्टोरी आहे.
हो आर्या, तोच तो !
हो आर्या, तोच तो !
दिनेश, 'छोडो छोडो मेरी बैया'
दिनेश, 'छोडो छोडो मेरी बैया' मिया बिबी चित्रपटातले आहे. सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात.
पडद्यावर कधीच पाहिलेले नाही. त्यामुळे चित्रीत कसे झाले आहे ते माहीत नाही.
आभार माधव, अशी गाणी पुर्वीही
आभार माधव, अशी गाणी पुर्वीही छायागीत मधे कमीच दाखवत. पण गाणे कामिनीच्या तोंडी नाही. दुसरीच कुणीतरी म्हणते आणि तिचा फक्त मुद्राभिनय आहे.
जाग उठा इन्सान नवा आणि जुना
जाग उठा इन्सान नवा आणि जुना दोन्ही छान आहेत.
गेल्या वर्षीच्या दिवाळी
गेल्या वर्षीच्या दिवाळी अंकात, सरोज खानचा एक लेख वाचला होता. छान होता तो लेख. तिने एक वाक्य लिहिले होते, आजकालच्या गाण्यात पुरुष आणि बायका, एकाच प्रकारे नाचतात.
पुर्वी अनेक चित्रपटात, लोकगीतांच्या धर्तीवर गाणी असत. शब्द आणि चाल पण बहुदा तिच असे पण संगीतकार
वाद्यमेळात थोडेफार प्रयोग करत.
असे एक जोशपुर्ण नृत्य, सौतेला भाई चित्रपटात होते. गायक : मन्ना डे आणि मीना कपूर.
संगीतकार : अनिल बिस्वास. शब्द " आहा पिया काहा करु "
http://www.youtube.com/watch?v=NLxae6xNKtg
याच चित्रपटात, लता आणि मीना कपूर ने गायलेले, " जा मै तोसे नाही बोलू " हे पण सुंदर गाणे आहे.
गायन आणि नृत्य, दोन्ही सुंदर आहेत. ते पण वरच्या लिंकच्या आजूबाजूला सापडेलच.
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=a0pjdux87xo
'जोगी जबसे' च्या या लिन्क मधे राजा परांजपे आहेत का ते?
दिनेशदा धागा सार्वजनिक करा
दिनेशदा धागा सार्वजनिक करा
------------------------------------------------------------
"रामलीला" मधले "नगाडे संग ढोल बाजे" गाणे मस्त आहे त्याच बरोबर गरबा उत्तम रित्या चित्रीत केलेला आहे..
गरब्याच्या ज्या स्टेप्स आहेत त्या पारंपारिक वाटतात.. तसेच दिपिका ने त्या स्टेप्स अतिशय सुंदर आणि प्रामाणिक पणे केलेल्या आहेत... एका स्टेप्स मधे तिला गोल वळुन अगदी कमरेत वाकुन जमिनीजवळ टाळी घ्यायची आहे ती स्टेप्स सुध्दा पुर्ण पणे योग्य पध्दतीने वाकुन पुर्ण केली आहे...... दिपीका त्या वेळी आजारी होती आणि अंगदुखी सुध्दा होती ... कमरेचा मेडिकल बेल्ट बांधुन तिने ते गाणे पुर्ण केले आहे.......अशी बातमी पेपरात आलेली आहे...
बातमी खरी असेल तर खरच हॅट्स ऑफ दिपीकाला.....कारण त्या गाण्यात अत्यंत सुंदर आणि फुल्ल ऑन नाचली आहे.. वाटत नाही तिला अंगदुखी वगैरे काही होते
जो जिता वो ही सिकंदर मधल
जो जिता वो ही सिकंदर मधल "पहला नशा पहला खुमार" हे गाण पण श्रवणीय आणि प्रेक्षणीय आहे.....
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=cP8iEJy2x3A
दिल तो है दिवाना, ना मानेगा बहाना, रुक जाना
अशी सुरवात असणारे हे गाणे ( चि. मंझिल ) आशा आणि रफीने गायलेय आणि नूतन व देव आनंद ( आणि अचला सचदेव ) व चित्रीत झालेय. एकतर गाणे श्रवणीय आहेच त्यातही रफी / आशाने उच्चारलेले तू चुप हे शब्द आणि त्यावर त्या दोघांचे भाव मस्तच.
नूतनच्या अभिनयातला साधेपणा, तिचे हसरे डोळे, देव आनंदची कोंबडा चाल.
अधून मधून वाजणारी पहाडी धून.. ऐका आणि बघाच.
Pages