हिंदी चित्रपटातील उत्तम रित्या चित्रीत झालेली गाणी

Submitted by दिनेश. on 16 November, 2009 - 17:21

गाणी आणि नृत्य, हा अनेक वर्षे हिंदी चित्रपटाची खासियत राहिलेली आहे. अर्थवाही शब्द, सुयोग्य चाल आणि गायकाची कारागिरी, याना पुरेपूर न्याय देणारे चित्रीकरण अनेकवेळा झालेय. इथे आपण अश्या गाण्यांची चर्चा करु. या चित्रीकरणात, नेमके काय आवडले, तेच लिहायचे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहज सुचलं म्हणून - 'रागिणी' नावाच्या चित्रपटात 'मन मोरा बावरा' हे गाणे गायले आहे रफीने पण पडद्यावर मात्र किशोरकुमारच्या तोंडी आहे.

येस हे एकमेव गाणे असावे जिथ किशोरसाठी दुस-याने प्लेबॅक केलाय.

मला मुझे जिने दो मधले 'रात भी है कुछ भिगी भिगी' खुप आवडते. त्यावर वहिदाने नाचही ब-यापैकी केलाय. ब-याच वर्षांपुर्वी पाहिलेय. दिनेश तुम्हाला माहित असल्यास लिहा ना या गाण्याबद्दल. तुमचा अगदी हातखंडा आहे, गाण्याची सुंदर समिक्षा लिहिण्यात Happy

मंगेशकर भगीनींची duets ची यादी बनवतोय. जाणकारांनी भर घालावी...

१. अपलम चपलम - आझाद
२. मनभावन के घर जाये गोरी - चोरी चोरी
३. मन क्यू बेहका - उत्सव
३. क्या हुआ - जीस देस मे गंगा बहती है
४. कर गया रे - बसंत बहार
५. तुमको पिया - शिकारी
६. साचा नाम तेरा - ज्युली
७. ओ चाँद जहा वो जाये - शारदा
८. काहे तरसाए जियरा - चित्रलेखा
९. अजी चले आओ - हलाकू
१० . कोई आयेगा आयेगा - प्रोफेसर
११. जब जब तुम्हे भुलाया - जहॉआरा
१२. दुनीयामे हम आये है तो - मदर इंडीया
१३. मेरे मेहबूब मे क्या कमी - मेरे मेहबूब
१४. सखी री सून बोले - मिस मेरी

काहे तरसाये जियरा..
हुजुरेवाला, जो हो इजाजत, तो हम ये सारे जहांसे कहदे....

वरिल दोन्ही मंगेशकर बहिणींची आहेत का माहित नाही, पण एक मंगेशकर नक्कीच आहे. दोघी असतिल तर अ‍ॅड करा.

सावन बरसे तरसे दिल, क्यूं ना निकले घरसे दिल...
'दहक' नावाच्या पडेल सिनेमातलं गाणं होतं हे.>>सिनेमा पण चांगला होता, वेगळी कथा होती.

दक्षिणा, बाट चलत नयी चुनरी रंग डारी रे, कैसो बेदर्दी बनवारी, इतने दिनन मे मोसे कबहू ना अटक्यो, आवत फागुन, जात इतरात असे सुंदर शब्द आहेत.
मागे डॉ अलका देव मारुलकर, यानी मदनमोहनच्या संगीतावर आधारीत, संगीत सरीता मधे एक मालिका सादर केली होती (त्या स्वतः उत्तम शास्त्रीय गायिका आहेत. मी त्यांची प्रत्यक्ष मैफील ऐकलीय. त्यांच्या आयूष्यावर स्वरमयी (चुभुद्याघ्या) असे पुस्तक आहे. पण त्यांचे गायन युट्यूब वर उपलब्ध नाही )
तर त्यानी मदनमोहनच्या आणि खास करुन लताच्या गाण्यातले सौन्दर्य उलगडून दाखवले होते.
त्यानी गौरवलेले हे एक गाणे. सिनेमा मनमौजी. पडद्यावर साधना कट नसलेली साधना.
किती डौलदार हालचाली आहेत तिच्या. ज्या तर्‍हेने ती पायर्‍या उतरते ते बघाच.
आणि गाणे, उफ्
लता आणि तिचा मदनभैया एकत्र आले कि काय जादू घडायची ते बघाच. गाण्याचे शब्द आहेत,
चंदा जा, चंदा जा रे , काहे आया है अकेला
तूझे मानू अलबेला, मेरे पिया कोभी संग ले आ

http://www.youtube.com/watch?v=guHK23uljnw

लता आणि मदनमोहनचेच, चिराग मधले गाणे.
छायी बरखा बहार, करे अंगना फुहार
सैंया आके गले लग जा, लग जा.
मी असे वाचले होते, कि छ या अक्षराचा आदर्श उच्चार कसा असावा, हे ऐकवायला, मदन मोहन, आपल्या मुलाला घेऊन या गाण्याच्या रेकॉर्डींगला आला होता.
पडद्यावर आशा पारेख आणि तिचा नेहमीचा बटबटीत नाच आहे. तिचे अश्या टाईपचे बरेच नाच त्या काळात होते. पण ते सोडा, लताचे गाणे आणि ढोलकीचे विविध ठेके इथे ऐका

http://www.youtube.com/watch?v=7dqDRHBg7tM

माधव, अदालत सिनेमात (नर्गिसच्या ) जा जा जा बालमा, असे दोघीने गायलेले गाणे आहे. पण दोघींची चाल वेगळी आहे. (गाणे एकत्रच आहे ).

मराठीत, येशील कधी परतून, असे एकमेव गाणे, त्या दोघीनी गायलेय. सागरा प्राण तळमळला आणि, जयोस्तूते मधे आशाचा आवाज नाही, पण एका कार्यक्रमात मात्र पाचही जणांनी मिळून ते गायले होते.

रात भी है कुछ भिगी भिगी, हे मुझे जीने दो, मधले लताचे गाणे. मुजरा टाईप असूनही, ते गाणे लताला दिले हे विशेष (कारण पुढे लिहितोय) काळ्या काचेवर तिचा नाच आहे, पण प्रसंग तणावपूर्वक आहे.
वहिदाबाबत एक चुकीचा आक्षेप घेतला जातो, कि ती उत्तम नर्तिका असूनही, प्रत्येक नृत्य सुंदर रित्या करत नाही. तिच्यासारखा भुमिकेचा विचार करुन, गाणे सादर करणारा कलाकार वेगळा. (मला आठवतय त्याप्रमाणे तिला तीन वेळा राष्ट्रिय पुरस्कार मिळाला, मुझे जीने दो, गाइड, आणि रेश्मा और शेरा साठी )
अर्थात जयदेव ने लताकडून उत्तम कारागिरी करुन घेतलीय. या गाण्यातले मध्यम, छम छम हे शब्द, व्हायोलीन ने केलेली, नशेत चालण्याची कारागिरी...
इथे हे गाणे बघता येईल
http://www.youtube.com/watch?v=6jHCOLUsW6I&feature=related

आता लताला हे गाणे दिल्यावर जयदेव ने आशाला याच चित्रपटात दोन अवघड गाणी दिलीत. एक आहे थोडेफार परिचयाचे. नदीनारे ना जाओ श्याम पैया पडू. गाण्याची चाल मुजरा टाईप असली तरी पडद्यावर,
वहिदा आणि सुनील दत्त चा खेळकर अभिनय आहे. या गाण्याची सिनेमातली आणि रेकॉर्डवरची चाल वेगळी आहे. सिनेमात एक जास्तीचे कडवे आहे.
सवतीया जो लाओ तो, लैबे करो
हमका ना दिखाओ शाम पैया पडू

दुसरे जरा अपरिचित.
आँख मे भरलो रंग सखी री, ऑचल भरलो तारे
मिलन रुत आ गयी.
आश्याच्या गायकीचा कस लागलाय या गाण्यात. सहज तिच्यासोबत गुणगुणून बघा. (मग आपली आशा, कित्ती गुणाची ते लक्षात येते ). या गाण्याचे चित्रीकरण खास नाही. एका पुरातन किल्ल्यासमोर ती व सख्या नाचताहेत, असे चित्रीकरण आहे. इथेही फक्त ते ऐकताच येतेय.

http://www.youtube.com/watch?v=Li4lBtD18So&feature=related

या जून्या अमरदीप मधली आणखी काही गाणी. (यात बहुदा वैजयंतीला नाच नव्हता, पण पद्मिनी आणि रागिणी दोघीना होते )
हे आहे, ता दिन तिल्लाना, या दोघी आणि जॉनी वॉकर आहे. व्हीडीओ बराच धूसर आहे, पण त्या दोघीचे नृत्यकौशल्य लपत नाही.
http://www.youtube.com/watch?v=_CxSBTCK9Us&feature=related

या गाण्यात त्या दोघी, जॉनी वॉकर आणि चक्क देवसाब नाचलेत. (किस बाई किस, दोडका किस)
इस जहाँ का प्यार झुटा
http://www.youtube.com/watch?v=tADwEajGW-c&NR=1

हे एक लताचे सुरेल गाणे, दिल कि दुनिया बसाके सावरियाँ, तूम न जाने कहाँ खो गये.
यात सुनके बादलभी मेरी कहानी, बेबसी पे मेरे रो गये, असे सुंदर शब्द आहेत.
http://www.youtube.com/watch?v=uUvXgURDdQ0

आशा आणि रफीचे, देख हमे आवाज ना देना
http://www.youtube.com/watch?v=1AaVahZ78JM&feature=related

या सिनेमाला सी रामचंद्र यांचे संगीत होते. त्यानी प्रत्येक गाण्यात किती सुंदर ठेका दिलाय तो ऐका.
दिल कि दुनिया मधे एरवी न शोभणारा अतिजलद ठेका आहे तर देख हमे मधे, धागे नाते नाक धिन, असा केहरवा आहे.

आता पद्मिनीचा विषय निघालाच आहे तर...
एक रशिया आणि भारत यांच्या सहकार्याने, स्ट्रेंजर नावाचा सिनेमा आला होता. रशियन कलाकार ओलेक स्ट्रिझेनोव्ह, बलराज सहानी, आणि पद्मिनी त्यात होते (मला नीट आठवत असेल तर त्यात नर्गिसही होती. आणि मीना कपूरचे, रसिया रे मन बसिया रे, तेरे बिना जिया मोरा लागे ना, हे पण त्यातलेच. पण खात्री करावी लागेल. )
मी भरतनाट्यम बद्दल जे ऐकले आहे त्याप्रमाणे, यात भुमितीय आकृत्याना फार महत्व असते. खांदे नेहमी सरळ रेषेतच हवेत. एखादी स्टेप उजव्या बाजूने केली तर तशीच डाव्या बाजूने करायची. हातही सरळ रेषेतच ठेवायचे वगैरे. तर पद्मिनीने या सिनेमात केलेले (शेवटच्या काही स्टेप्स वगळल्या तर ) क्लासिक भरत नाट्यम. हा सिनेमा मूलात काळापांढरा होता, नंतर रंगीत प्रिंट आलीय, (आणि जास्तच सुंदर झाला)

http://www.youtube.com/watch?v=3drXukfiH4o&NR=1

आणि याच सिनेमात लताचे गाणे आहे. ना दिर दिन ताना देरे ना.
हे गाणे आहे गौड सारंग रागात. पण बाकिचा ताल आहे, भरत नाट्यमच्या तिल्लाना चा.
तिचा ड्रेस मात्र, भरतनाट्यमचा नाही, त्यामूळे नृत्यात पण बराचसा मोकळेपणा आहे.
(याच रागावर आधारीत, एक गाणे मेरा नाम जोकर मधे होते, गाण्याचे शब्द होते, काटे ना कटे रैना, मोरे लागे उनसे नैना, पदद्यावर पद्मिनीनेच क्लासिक भरतनाट्यम केलेय. सोबत, पडोसनमधल्या मेहमूद सारखा गेटप केलेला राज कपूर होता. पण आधी सिनेमात ते गाणे पूर्ण नव्हते आणि नंतर तर ते कापलेच गेले.
मेरा नाम जोकरच्या अपयशाचे खापर, बिचार्‍या आशाच्या डोक्यावर फोडण्यात आले, असे मी वाचले होते. नंतर बहुतेक लतानेच आर्के ची गाणी गायली. तर मी थोडक्यात वाहवत गेलो. तर बघा पद्मिनीचे ते नृत्य )

http://www.youtube.com/watch?v=bfFJAti47BE&feature=related

६. साचा नाम तेरा - ज्युली > माझ्या अंदाजाने हे गाण लता आणि उषा मंगेशकर ने गायल आहे.
चु.भु.द्या घ्या

माधव, मिस मेरी मधले, सखी री सून मोले पपीहा उसपार राहिले.
पडोसन मधेही लता आणि आशाचे, मै चली मै चली, देखो प्यार कि गली, असे गाणे आहे.
तसे काहे तरसाये, आणि साचा नाम तेरा, आशा आणि उषा चे आहे.
अपलम चपलम, लता आणि उषा चे आहे.
लता, उषा आणि मीना ने गायलेले, मदर इंडिया मधले, जीवन है अगर जहर तो पिनाही पडेगा, हे पण धरावे लागेल.
वर्षा भोसले ने सिनेमात आणि आशाने रेकॉर्डसाठी गायलेले, सावन की आयी बहार रे, हे जूनून मधले गाणे, पण कंसिडर करणार का ?

चान्स पे डान्स सिनेमातले पहिले गाणे आहे त्यात मालकंस चे सूर वापरलेत. पण तिथे ते सूर थोडे सवंगपणे वापरलेत असे मला वाटले. हे सूर ऐकलेत, तर लग्नातल्या सनईची नक्कीच आठ्वण येईल. बिस्मिल्ला खान साहेबांनी हि धून खुप लोकप्रिय केली होती. मालकंस राग तसा नेहमीच्या परिचयातला (सागत्ये ऐका, चित्रपटात, एका गाण्यात. सुलोचना च्या हसण्या बोलण्याला मालकंसाच्या तानेची उपमा दिलेली आहे)
मन तडपत हरी दर्शन को आज, (बैजू बावरा ) मधले गाणे या रागातले. मराठी निवडूंग मधे, पद्मजा फेणाणी च्या आवाजात (चूभूद्याघ्या) ना मानोगे दुंगी तूम्हे गाली रे हि रचना या रागातली, मग राधा मंगेशकरच्या आवाजात आलेले, आले रे गणपति आमच्या दारी रे, पण याच चालीवरचे.
आता हि मालकंसाची दोन नृत्यमय रुपे.
एक आहे लताचे, ऑपेरा हाऊस सिनेमातले. पडद्यावर वैजयंतीमाला आहे.
शब्द आहेत, बलमा मानेना, बैरी चूप ना रहे, लागे मनकी कहे.
तिने नेहमीप्रमाणेच सुंदर नृत्य केले आहेत, पण खास करुन लताच्या ताना ऐका.

http://www.youtube.com/watch?v=arECVqw3IxY

दुसरे आहे बडा आदमी सिनेमातले, रफीचे, पडद्यावर विजया चौधरी, आणि बहुतेक जयंत आहे.
विजया चौधरी काहि मोजक्याच सिनेमात होती.
गाण्याचे शब्द आहेत, अखियन संग अखिया लागे आज.
रफीने पहिल्यापासूनच जोमदार लय घेतली आहेत. सरग्म ऐकत रहावी अशी आहे.
http://www.youtube.com/watch?v=pLNEREmv14U

बघा ठरवता येतय का, कि कूठले सरस आहे ते !

दिनेश, आज तर मस्तच मेजवानीच दिलीत की - नेहमी खाण्याची मेजवानी देत असता आज गाण्याची दिलीत. एवढी मस्त गाणी काही बघितलेली काही न बघितलेली - आता रात्री सगळी गाणी बघणार.

पडोसन मधले मै चली मै चली मी लताच्याच आवाजात ऐकले आहे. आशाचा आवाज असलेले पण आहे का? कुठे मिळेल? सखी री सून बोले यादीत घातले आहे.

मन्या, सिंडरेला गाणी सुचवल्याबद्दल धन्यवाद.

माधव, त्याच गाण्यात दोघींचा आवाज आहे.या गाण्याचे एक हिडीस रिमिक्स पण आहे होते. पण ओरिजीनल ते ओरिजीनलच.

वरची गाणी बघून झाली कि सांगा, मग आणखी काही गाण्यांबद्द्ल लिहायचे आहे.

दिनेशदा, सावरे सावरे ( दूंगी दूम्गी गाली हटो जाओ जी... असे शब्द आहेत) हे गाणे कुठल्या चित्रपटातले आहे? लता-मदनमोहन.. गाणे भैरवीत आहे..

गीता दत्तचे, रसिया रे मन बसिया रे, तेरे बिना जिया मोरा लागे ना, हे पण त्यातलेच.<<<<<<<दिनेशदा,,हे गाणे मीना कपूर ने गायले आहे,गीता दत्तने नव्हे.संगीतकार अनिल विश्वास ने मीना कपूरशी लग्न केले होते.

हो आशुतोष, पण ते परदेसी मधलेच ना. मॉर्ट्ल मेन इमॉर्ट्ल मेलडीज कार्यक्रमात, मीना कपूरने सादर केले होते.
जामोप्या, ते गाणे अनुराधा मधले, संगीत पं. रविशंकर, सिनेमाची हिरॉईन, लिला नायडू, हिरो बलराज सहानी. पण या गाण्यात पडद्यावर फक्त रेडीओ दिसतो.
कैसे दिन बीते, कैसी बीति रतिया (माज खमाज), जाने कैसे सपनोम्मे खो गई अखिया (तिलंग शाम ) आणि हाये रे वो दिन क्यू ना आये, हि पण त्यातलीच. पण चित्रीकरण काही खास नाही.

दिनेश, आज तर मस्तच मेजवानीच दिलीत की >>>> अगदी अगदी

"जल बीन मछली नृत्यबीन बिजली" चित्रपटातील सर्वच गाणी चांगली आहे. वेगवेगळ्या थीमवर आधारीत चित्रीकरण केलेली.
१. मन कि प्यास मेरे मन से ना निकली (लता मंगेशकर)
२. बात है एक बूंदसी दिल के प्याले मे (लता मंगेशकर, मुकेश)
३. जो मै चली फिर ना मिलुंगी (लता मंगेशकर)
४. तारोमें सजके अपने सुरज से, देखो धरती चली मिलने (मुकेश)
५. ओ मितवा (लता मंगेशकर)
६. झुमके गाए दिल (लता मंगेशकर, मुकेश)
७. कजरा लगा के बिंदिया सजाके (लता मंगेशकर)

पण मला सगळ्यात जास्त आवडले ते "कजरा लगा के बिंदिया सजाक" हे गाणे. हे गाणे ऐकायला जितके चांगले वाटते तेव्हढेच पहायलाहि. संपूर्ण चित्रपट हा नृत्यावर आधारलेला असल्याने या गाण्यात एक नृत्यनाटिका आहे. "नाग आणि मोर" यांचा संघर्ष. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या संगीताबद्दल तर काहि बोलायलाच नको.
खुपच सुंदररीत्या चित्रित झालेले हे गाणे अभिनेत्री संध्या यांचा vibrant डान्सकडे किंचित दुर्लक्ष करून तु नळीवर प्रत्यक्षच पहा. Happy
http://www.youtube.com/watch?v=o-b3QeVOB4g&feature=PlayList&p=396A7B5B65...

दिनेशदा, या गाण्याबद्दल अधिक माहिती असेल तर अवश्य सांगा. Happy

दिनेश कालची गाणी बघून झाली. ते पद्मिनीचे रशीयन सिनेमातले पहिले गाणे सही आहे.

आज अजून लिहिणार होतात ना? Happy

रच्याकने, पारसमणीतील हेलनच्या 'उईमा उईमा ये क्या हो गया' या गाण्याची युट्युबवरची लिंक कोणी देईल का? मला ज्या मिळाल्या त्या खूपच खराब प्रतीच्या आहेत. तसेच कठ्पुतलीतले 'बागड बम् बम्' हे गाणे पण नाही मिळत आहे.

साचा नाम तेरा... आशा आणि उषा यानी गायले आहे..

सावरे सावरे-अनुराधा माहितीसाठी धन्यवाद.. आता बघतो कुठे मिळते का गाणे...

योगेश या गाण्यांबद्द्ल मी इथेच लिहिले होते.
तारोंमे सजके, हे गाणे मला आपल्या कुसुमाग्रजांच्या, पृथ्वीचे प्रेमगीत या गाण्याचा भावानुवाद वाटतो.
या सिनेमात पहिल्यांदा स्टीरीओफोनिक साऊंड वापरला होता, असे वाटते.
आज रात्री आणखी गाण्यांबद्द्ल लिहितो.

चला आज वैजयंती मालाची काही गाणी बघू.
नाथमाधव, नाव ऐकले असेलच. एका पिढीवर त्यांच्या पुस्तकांचे राज्य होते. अगदी वेगळीच (आता बालीश वाटेल अशी. ) शैली आणि विषय. त्यांची एक गाजलेली कादंबरी. तिचे नाव डॉ. कादंबरी. किंवा शिकलेली बायको. यावर मराठीत याच नावाने चित्रपट आला होता. (उषाकिरण आणि सुर्यकांत ) मग यावर हिंदीत डॉ, विद्या नावाचा सिनेमा आला होता ( वैजयंतीमाला, मनोजकुमार, हेलन)
त्यातली हि काही गाणी. शिकलेल्या एका मुलीचे एका अशिक्षित माणसाशी लग्न होते, मग काहि गैरसमज पण शेवट गोड वगैरे.
हे पहिले गाणे, अर्थातच तिचे. जानी तूम तो. नाच आहे तो, तिच्या क्षमतेपेक्षा खूपच कमी मागणी करणारा.
संगीत सचिनदेव बर्मन यांचे होते. या गाण्याची गंमत म्हणजे, या गाण्यात, आशाच्या बंदीनी सिनेमातल्या, ओ पंछी प्यारे, या गाण्याचे सूर बर्‍याच वेळा वाजतात.
http://www.youtube.com/watch?v=Tmw_A2wscrQ&feature=related

मराठीतले, आली हासत पहिली रात, हिंदीत, खनके कंगना, बिंदीया हसे , असे शब्द लेऊन येते. दोन्हीकडे लताच.
http://www.youtube.com/watch?v=QRcygS3mALs&feature=related

नवरा बायकोत बेबनाव झाल्यावरही, त्याकाळची आदर्श भारतीय नारी, पतिला परमेश्वर मानत असे. सिनेमातली, शांता, म्हणजे हेलन, जरा सुधारलेल्या विचारांची.
सिनेमात या दोघींची जुगलबंदी आहे. आशा आणि गीता दत्त ने गायलेल्या गाण्याचे शब्दही मजेदार आहेत.
हेलन, पुढे केवळ कॅबरे नर्तिका म्हणून गाजली असली तरी ती मूळात एक कुशल नर्तिका होती.
यात वैजयंतीमालानेही, पाश्चात्य पद्धतीचे नृत्य केले आहे. त्या काळात चित्रीकरणाची आधुनिक साधने नव्हती, फिल्म वाया जाऊ नये, म्हणून रिहर्सल करून, भरपूर लांबीचे शॉट्स घेतले जात असत.
इतक्या कठिण आणि वेगवान स्टेप्स असलेले हे नृत्य, दोघींनी कसे सुंदर सादर केले आहे ते बघाच.
त्या काळात, रेकॉर्ड ची लांबी मर्यादीत असायची. काही गाजलेल्या गाण्यांच्या (जसे कि ना तो कारवाँ कि तलाश है, ) दोन भागात रेकॉर्ड निघत असत. पण या गाण्याची रेकॉर्ड कधी निघालीच नव्हती.
त्यामुळे केवळ सिनेमातच हे गाणे बघायला मिळत असे (कधी रेडीओवर पण वाजले नाही )
इथे बघा.
आधीचे दोघींचे संवादही ऐका.
http://www.youtube.com/watch?v=zmcOPcaHkuU&feature=related

आणि हे माझ्या आवडीचे, खास वैजयंतीमाला नृत्य. शब्द आहेत

पवन दिवानी, न मानी, उडावे मोरा घुंघटा
यातल्या, लिपटी मोरी साडी वर तिने घेतलेली, गिरकी बघाच.
या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी ती विशी पंचवीशीतच असेल. तेंव्हापासून आजतागायत ती नाचत आहे.

http://www.youtube.com/watch?v=jF217bhzkIw

वैजयंतीमाला आणि गोपीकृष्ण एकत्र आल्यावर काय जादू घडली असेल ना ?
खरे तर ती भरत नाट्यम नर्तिका, पण इथे तिने खास कथ्थक शैलीत नृत्य केले आहे.
चित्रपट आहे, फूलों की सेज.
आवाज आहे लता आणि मन्ना डे चा.

http://www.youtube.com/watch?v=dq4iTJnLzMg&feature=related

आता कधी, वैजयंतीमालाला नावे ठेवू नका रे.

Pages