Submitted by दिनेश. on 16 November, 2009 - 17:21
गाणी आणि नृत्य, हा अनेक वर्षे हिंदी चित्रपटाची खासियत राहिलेली आहे. अर्थवाही शब्द, सुयोग्य चाल आणि गायकाची कारागिरी, याना पुरेपूर न्याय देणारे चित्रीकरण अनेकवेळा झालेय. इथे आपण अश्या गाण्यांची चर्चा करु. या चित्रीकरणात, नेमके काय आवडले, तेच लिहायचे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आणखी एक सुंदर गाणं म्हणजे,
आणखी एक सुंदर गाणं म्हणजे, 'फुल गेंदवा न मारो' (गायक मन्ना डे). यात, मागे रेकॉर्ड लावून आगा गात असतो. मधेच रेकॉर्ड अडकते, त्या वर आगाने केलेला अभिनय पहाण्याजोगा आहे....
काही मला आवडलेली गाणी: १.
काही मला आवडलेली गाणी:
१. जागो मोहन प्यारे: मला हे कायम एक Perfect Song वाटते. गाणे चित्रपटात ईतक्या योग्य टाईमिंगला टाकलेले अगदी rare आढळते. तसेच त्याचे picturization. ह्या एका गाण्यासाठी राज कपुरने म्हणे नर्गिसला रिक्वेस्ट केली होती.
२. धीरे धीरे मचलः अनुपमातील हे गाणे शर्मिलाच्या आईच्या तोंडी आहे. ती ह्या गाण्यापुरतीच आहे. लताने जसे गायले आहे त्याला तोड नाही.
३. बेकरार दिल तू गाए जा: दूर का राही मधील गाणे मला फारच आवडते. हा चित्रपट मी अनेक ठिकाणी शोधला पण कुठेच मिळाला नाही. अनेक जुन्या-जाणत्याना विचारले पण कोणलाच ह्या चित्रपटाची नीट गोष्ट माहित नाही. त्यावेळी सुलक्षणा पंडीत किशोर कुमारची मैत्रीण होती. त्याने तिला प्रॉमिस केले होते तुला एक गाणे असे देईन की वर्षनुवर्षे लोकांच्या लक्षात राहील. अगदी खरे आहे ते.
४. सच बता तू मुझसे फिदा: तलत आणि आशाचे सोने की चिडीयाँतील एक क्लासिक गाणे. मला वाटत ओपीसाठी तलत फारच ह्या एकाच सिनेमात गायला आहे. हा म्हणे नर्गिसच्या जीवनावर आधारीत सिनेमा होता. तलतने स्वतः ह्यात (राज कपुर) भुमिका केली होती. अभिनयाच्या बाबतीत तलत ठोकळा होता. त्यामुळे हे गाणे तलत सोडुन नुतनसाठी जरुर पहावे. ऐकताना मात्र तलत आणि आशा दोघांसाठी ऐकावे.
५. जीवन से लम्बे: ह्याचे picturization मला आवडते. चित्रपट आशीर्वाद. बैलगाडी... तिच्या चाकाच्या axel वर अडकवलेला कंदील... (मन्न डे, संगीत: वसंत देसाई)
ती 'आज कल तेरे मेरे प्यार के
ती 'आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे' मधे मुमताजच आहे का नक्की? मला ती राजश्री वाटली.
मुमताझच आहे ती फारएंडा...
मुमताझच आहे ती फारएंडा... मस्त गोड दिसते ती.. आणि प्राण कसला येडा नाचलाय
आज कल तेरे मेरे चर्चे हर जबान पर
पंजाबी नवर्याबरोबर लग्न
पंजाबी नवर्याबरोबर लग्न केल्यानंतर प्रत्येक सिनेमामधे पंजाबी कुडी बनून नाचायचं एवढंच शिल्लक ठेवलय.
पन्जाबी ? देवगण फॅमिली सौदिंडियन आहे ना? वीरू देवगण , अजयचे पिताजी फाईट मास्टर होते ना?
बेकरार दिल, पडद्यावर
बेकरार दिल, पडद्यावर तनुजाच्या तोंडी आहे. चित्रीकरण काहि खास नाही. सुलक्षणा नंतर अभिनय करायला लागली !!
मलाही ह्या बेकरार दिलवाल्या
मलाही ह्या बेकरार दिलवाल्या चित्रपटाबद्दल खुप उत्सुकता आहे. मलाही कधी कुठे केव्हाही हा चित्रपट पाहायला मिळाला नाही.तनुजाच आहे चित्रपटात.
आजकल तेरे.. मध्ये मुमताज आहे, पण चित्रपटात राजश्री पण आहे. कदाचित ह्या गाण्यातही असेल. अम्रूता थॅक्स, आज रात्री पाहिन तुनळीवर.. प्राण बेफाम नाचलाय यात..
फुल गेंदवा.. मधे शेवटी सा..प.. सा..प.. करत ताना घेताना खरा साप येतो.. ना मारो ना मारो.. करत शेवटी आगा पळुन जातो..... मस्त धमाल गाणे आहे हे.. चित्रपटही पाहिलाय पण आता काहीच आठवत नाहीये
देवगण फॅमिली सौदिंडियन आहे ना
कैच्या कैच. पंजाबी स्टँप आहे की चेह-यावर...... वीरू देवगण मात्र फाईटमास्टर होता हे खरे..
तो नेमका कुठला सिनेमा ते मला
तो नेमका कुठला सिनेमा ते मला आठवत नाही, पण राजश्री एका चित्रपटाचे शूटींग अर्धवट टाकून, अमेरिकेला गेली होती. मग दुसर्या अभिनेत्रीने तो पुर्ण केला !!
पन्जाबी ? देवगण फॅमिली
पन्जाबी ? देवगण फॅमिली सौदिंडियन आहे ना? वीरू देवगण , अजयचे पिताजी फाईट मास्टर होते ना?>>> नाय रे टोणग्या. देवगण फॅमिली पंजाबीच आहे. काजोल-अजयच्या लग्नाचे फोटो बघा की नेटवर. अजयचे वडिल फाईट मास्टर होते तसेच त्यानी हिंदुस्तान की कसम नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला होता.
आजकल तेरे.. मध्ये मुमताज आहे, पण चित्रपटात राजश्री पण आहे. कदाचित ह्या गाण्यातही असेल.>> ब्रह्मचारीची नायिका राजश्रीच आहे. मुमताझचा रोल साईड हिरॉइनपेक्षा पण छोटा आहे. प्राण बायकांना फसवणारा असतो आणि शम्मी कपूर गरीन नेक माणूस असतो. तो गाणी वगैरे गाऊन उदर निर्वाह चालवत असतो.त्याचं स्वतःचं अनाथाश्रम असतं, त्यामुळे चित्रपटात भरपूर लहान मुले आहेत. सचिन, बेबी फरीदा इत्यादि. (हाच प्लॉट मि. इंडियामधे पण वापरला होता.) या मुलासोबत असलेलं त्याचं चक्के पे चक्का गाणं धमाल आहे.
वीरू देवगण आणि फाईट मास्तर एम
वीरू देवगण आणि फाईट मास्तर एम बी शेट्टी (टकला)यात कन्फ्युजन झाले
पण राजश्री एका चित्रपटाचे
पण राजश्री एका चित्रपटाचे शूटींग अर्धवट टाकून, अमेरिकेला गेली होती. मग दुसर्या अभिनेत्रीने तो पुर्ण केला !!
>>
तो चित्रपट बहुधा नयना. राजश्रीचे डोळे साधनासारखेच बदामी सुन्दर होते.त्यावर तो चित्रपट होता शशि कपूरबरोबर. पन राजश्री पळाल्याने स्टोरीत काही बदल करून तो मौशुमी चतर्जीच्या साह्याने पूर्ण झाला (आणि आपटलाही !!)
शोलेचे फाईट कंपोझर वीरु देवगन
शोलेचे फाईट कंपोझर वीरु देवगन आहेत.
मराठी गाण्याबद्दल फारस लिहील नाही. कारण बरेच टिपीकल चित्रण असते. भुपाळी, तमाशाचे गाणे, बागेतील गाणी वगैरे. उषःकाल होता होता मला वेगळे वाटते. ते ज्याप्रकारे सिनेमात सुरुवातीला येते, ते एकदम येऊन आदळतेच. आधीचा संवादः "काय झालं?", "काही नाही, बेकारीला कंटालळून जीव दिला" ह्या सगळ्या संवादात अगदी अलिप्तपणे आहे. आणि लगेच गाणे चालू होते.
राजेश खन्नाच्या नाचाबद्दल वरती बरेच लिहीले आहे. मी त्या era तला असल्याने मला त्याची काही गाणी आवडतात:
१. सच्चाई छुप नही... मैं इंतजार करू: दुश्मन कोठीवरच हे गाण बघतानाही खास वाटते. बरोबर बिन्दू असुनही तीला फारसा वाव नाही आहे.
२. आनंद: ह्या सिनेमातील सर्वच गाणी. जिंदगी कैसी है... मध्ये ते हातातुन निसटुन गेल्यासारखे फुगे सोडणे, कहीं दूर जब दिन... ती संध्याकाळ.. तो वातावरणातील उदासपणा....
३. चिंगारी कोई जो: अमर प्रेमच हे गाणही सुंदर आहे आणि त्याचे चित्रीकरणही.
राजेश खन्ना.... i was his big
राजेश खन्ना.... i was his big fan.....
मला तरी असे नेहमी वाटले की जेव्हा तो हिरवीनीबरोबर प्रेमाच्या गोष्टी करायचा, त्याच्या त्या नखरेल अदांसकट, तेव्हा त्याच्या डोळ्यात खरेच तिच्याबद्दलचे प्रेम दिसायचे... मला तरी दुस-या कुठल्या नटात तसे आढळले नाही.
आणि त्याच्या उलट अनिल कपुर... तो जेव्हा हिरविनीला त्याचे किती प्रेम आहे ते सांगायचा तेव्हा त्याच्या डोळ्यात त्याला स्वतःबद्दल किती प्रेम वाटतेय ते अगदी ओसंडुन वाहायचे.. हिरविन बाजुलाच उभी आहे हेही त्याच्या गावी नसायचे...
माझे हिरो नेहमी बदलत गेले.. आधी राजेश, मग अगदी थोडा काळ अमिताभ.. मग सलमान... सध्या कोणीच नाही. पण सुरवातीपासुन अजुनपर्यंत टिकलेला मात्र फक्त शशी कपुर.... त्याला त्या दिवशी जीवनगौरव पुरस्कार मध्ये पाहुन मला खुप बरे वाटले.. अर्थात तो व्हिलचेअर्वर्होता..पण तरीही शशी तो शशीच....
Mr & Mrs. 55 मधले 'जाने कहा
Mr & Mrs. 55 मधले 'जाने कहा मेरा जिगर गया जी' सहीच आहे. या गाण्यात जी नटी आहे ती छान दिसलिये आणि वावरली आहे. जॉनी वॉकर बद्दल तर बोलायलाच नको. त्याची आणखी धमाल गाणी:
१. जंगलमे मोर नाचा - मधुमती
२. तेल मालीश - प्यासा
Mr. & Mrs. 55 मध्ये उधर तुम हसीन हो इधर दिल जवाँ है इतक सही घेतलय गुरुदत्तने. त्यातले 'मेरे घरपे छायी हुइ है बहार' वरचे त्याचे expressions लाजवाबच आहेत.
गुरूदत्तने ह्या चित्रपटात
गुरूदत्तने ह्या चित्रपटात धमाल केलीय. मला नेहमी प्रश्न पडतो की इतकी धमाल करणारा नंतर इतका गंभीर का बनला????
आज गावत मन मेरो झूमके तेरी
आज गावत मन मेरो झूमके
तेरी तान भगवान...
चित्रपट बैजू बावरा... तानसेन आणि बैजू यांची जुगलबंदी..... तानसेनच्या तंबोर्याची तार तुटते, तो आवाज आणि अखेर दगड विरघळून काचेचे भांडेही फुटते तो आवाज... दोन्ही अप्रतिम.... हे गाणे नुसतेच ऑडिओ ऐकणे म्हणजे स्वतःवरच अन्याय करण्यासारखे आहे.
..
"जाने कहाँ मेरा..." Mr & Mrs
"जाने कहाँ मेरा..." Mr & Mrs 55 मधील आहे. आर-पार मध्ये श्यामा आहे. त्यातील "सुन सुन सुन जालिमा..." हे एक सही गाणे आहे. गॅरजमध्ये चित्रीत केलेले पहिले गाणे असावे.
'जाने कहा मेरा जिगर गया जी'
'जाने कहा मेरा जिगर गया जी' सहीच आहे. या गाण्यात जी नटी आहे ती श्यामापेक्षाही (चित्रपटाची नायिका) छान दिसलिये आणि वावरली आहे.
>>
तिचं नाव नूर...
ती रिअल लाईफ मधे जॉनी वॉकर ची बायको होती...
देवगण फॅमिली राजस्थानी आहे.
देवगण फॅमिली राजस्थानी आहे. अजय देवगण काजोलच्या लग्नात अजय देवगणने राजस्थानी पेहेराव केला होता तर काजोलने नउवारी/नाकात नथ अशी टिपिकल मराठी वेशभुषा केली होती - संदर्भः रेडिफ.कॉम
हम दोनोचे दिग्दर्शन नावालाच अमरसिंग ने केले होते.. सिनेम सगळा गोल्डीनेच दिग्दर्शित केला होता - सं: एक होता गोल्डी
पान खाओ सैंया हमारो हे गाणे खरेतर शैलेंद्रने दादा बर्मनवर लिहिले होते.. आणि तिसरी कसममध्ये बासूच्या डोक्यात राज कपूर मुळीच नव्हता.. बासू तरुण असताना राज कपूर, दिलीप कुमार वगैरे तेव्हाच्या यशस्वी हिरोंना मजबूत नावं ठेवायचा (स्वतः तेव्हा मुंबईत स्ट्रगल करत होता). एका पार्टीत त्याची राज कपूरशी ओळख करुन दिली गेली.. योगायोगाने राज कपूरने त्याच्या नियोजित (तीसरी कसम) चित्रपटाची कथा ऐकली आणि बासूला बोलवून सांगितले की ह्या चित्रपटात मी काम करणार... राज कपूर एव्हडा मोठा स्टार होता की बासू नाही म्हणु शकला नाही (घाबरुन). त्याला मनातून मात्र राज कपूर भुमिकेला न्याय देउ शकेल का असे शेवटपर्यंत वाटत राहिले.. नायिकेसाठी त्याने पूर्व युपी/बिहार मधल्या अनेक नौटंकी पालथ्या घातल्या.. काही नर्तिका त्याला आवडल्या पण सिनेमात काम करायला कुणीही तयार झाले नाही (सिनेमात काम करणे खालच्या दर्जाचे काम आहे म्हणुन). शेवटी त्याने वहिदाला नायिका म्हणुन घेतले. (वहिदा ही खरे तर एका उच्च सनदी अधिकार्याची मुलगी). - संदर्भः बासूचे आत्मचरित्र
मला सर्वात आवडणारी चित्रीत झालेली गाणं म्हणजे: कभी खुदपे. गोल्डी बापच होता. दिन ढल जाये, अभि ना जाओ छोडकर, तेरे घर के सामने मधली गाणी, तिसरी मंझील मधली गाणी..
लता मंगेशकर यांनी गायलेल्या
लता मंगेशकर यांनी गायलेल्या गाण्यातील माझी आवडती गाणी. हल्लीच या गाण्याचे व्हिडीयो बघितला. हि गाणी ऐकायला जितकी छान तेव्हढीच ती बघायलाही छान वाटतात.
योगायोगाने दोन्ही गाणी हि अभिनेत्री निम्मीवर चित्रीत झाली आहे
दिल का दिया जलाके गया ये कौन मेरी तनहाई में
चित्रपटः आकाशदीप
संगीतः चित्रगुप्त
या गाण्यात लताचा स्वर आणि नायिकेची अदा अप्रतिम आहे.
http://www.youtube.com/watch?v=KXljiw0rgXs
आणि
मै पिया तेरी तु माने या ना माने
चित्रपटः बसंत बहार
संगीतः शंकर जयकिशन
http://www.youtube.com/watch?v=5F6exudlQxA
या गाण्यात शंकर जयकिशन यांचे संगीत आणि लताचा स्वर याला तोड नाही. विशेषतः गाण्यात वाजणारी बासरी आणि लताचा हळुवार आवाज यांची जुगलबंदी. त्यात नायिकेचा लाजवाब अभिनय (गाणे बघताना नायक "भारत भुषण" याच्याकडे लक्षच जात नाही
).
निम्मी या अभिनेत्रीचे आणखी कुठले चित्रपट आहे ???
दिल का दिया जलाके गया ये कौन
दिल का दिया जलाके गया ये कौन मेरी तनहाई में
ओह्ह.. हे गाणे मला खुप म्हणजे खुप आवडते.. पण कधीच बघायचा योग आला नाही.. हे ऐकताना इतके शांत आणि निवांत वाटते की कधी खुप अपसेट झाले की मी हे गाणे ऐकते....
निम्मीने कुंदन, भाईभाई त काम केलेय.. मला तीचा उडन खटोला खुप आवडला... विकिपिडियावर पहा तिची माहिती...
मला सुरैया पण खुप आवडायची.. मिर्जा गालीब मध्ये खुप छान काम केलेय तिने..
शमा नावाचा चित्रपट होता त्यात निम्मी आणि सुरैय्या दोघीही होत्या. अतिशय सुंदर चित्रपट.. मी खुप लहानपणी पाहिलेला, त्यामुळे त्या दोघींमध्ये खुप गोंधळ झालेला माझा. यातली गाणीही अतिशय सुंदर आहेत. मला रफीचे
वो सादगी कहे या दिवानगी कहे
उनका बढा जो हात यहा दिल लुटा दिया
आणि सुरैयाची
धडकते दिल की तमन्नाओ मेरा प्यार हो तुम
मुझे करार नही जबसे बेकरार हो तुम
आणि
आपसे प्यार हुआ जाता है
खेल दुश्वार हुआ जाता है
ही गाणी खुप आवडतात. निम्मीच्या तोंडची गाणी बहुतेक सुमन कल्याणपुरने गायलीत (की लता?? गुलाम मोहमदचे संगीत आहे म्हणजे बहुतेक लताच असावी).. तिचे
दिल गमसे जल रहा है, जले पर धुवा ना हो
मुमकिन है इसके बाद कोई इम्तेहा ना हो.. हे गाणे अतिशय सुरेख आहे.
साधना, निम्मिचे बरेच सिनेमे
साधना, निम्मिचे बरेच सिनेमे आहेत, बसंत बहार, दाग ( यात तिचा रोल छानच आहे )
ती शेवटची लव्ह अँड गॉड मधे संजीवकुमार बरोबर दिसली.
मै हूं पिया तेरी यातली बासरी
मै हूं पिया तेरी यातली बासरी पन्नालाल घोष यांनी वाजवलेली आहे...
आपण इथे, राजश्रीच्या एकाही
आपण इथे, राजश्रीच्या एकाही गाण्याचा उल्लेख केलेला नाही ना ?
ती एक उत्तम नृत्यांगना होती. बसंत है आया (शकुंतला , मुख्य भुमिकेत, तिची सावत्र आई, संध्या) गीत गाया पत्थरोंने ( गीत गाया पत्थरोंने ) हि तिची काही उल्लेखनीय गाणी. हे गीत गाया, सिनेमात दोनदा आहे. एकदा आशाच्या आवाजात आणि एकदा किशोरी अमोणकरच्या. (राग दुर्गा ) पण त्यावेळी काहि वाद झाल्याने, अमोणकर बाईंनी सिनेमाकडे पाठ फ़िरवली होती (ते थेट डिंपलच्या दृष्टीपर्यंत )
राजश्रीच्या, एका विसरलेल्या गाण्याची आज आठवण येतेय. सिनेमा जानवर. गायिका सुमन कल्याणपूर (राग बहुतेक मालकंस ) गाण्याचे शब्द आहेत, मेरे संग गा, गुनगुना, कोई गीत सुहाना. शब्द तितके खास नाहीत, पण याची चाल आणि संगीत लाजबाब आहेत.
सुरवातीला, क्वचितच सिनेमात ऐकू येणारा जलतरंग आहे. राजश्री आणि सख्यांचा नाच आहे. (हे गाणे बघून गाईडमधल्या, पिया तोसे ची आठवण आल्याशिवाय रहात नाही )
ती सुंदर नाचलीय. प्रत्येक शब्दाला आलापाला न्याय दिलाय तिने.
हिरो शम्मी कपूर असल्याने, त्याला बरीच गाणी आहेत, पण हे तिचे एकटीचे आहे. (तो या गाण्यात
नाचला नाही, हे नशीब. )
ती पांढर्या आम्रपाली ड्रेस मधे तर सख्या गडद गुलाबी. सेट पायर्या पायर्याचा. काही खास नाही, पण नाचात त्या सगळ्याचा वापर छान आहे.
"जाने कहाँ मेरा..." Mr & Mrs
"जाने कहाँ मेरा..." Mr & Mrs 55 मधील आहे. >> भुरे साहेब चूक दाखवल्याबद्दल धन्यवाद. योग्य तो बदल केला आहे.
दिनेश, राजकमलच्या 'स्त्री' नावाच्या सिनेमात पण संध्या आणि राजश्री होत्या. त्यात पण राजश्रीचे एक सुंदर नृत्य होते. कोणते ते आठवतेय का?
दिनेश, राजकमलच्या 'स्त्री'
दिनेश, राजकमलच्या 'स्त्री' नावाच्या सिनेमात पण संध्या आणि राजश्री होत्या.
स्त्री आणि शकुंतला ही एकाच चित्रपटाची नावे आहेत. स्त्री (शकुंतला) असे नाव आहे.
स्त्री (शकुंतला) असे नाव आहे
स्त्री (शकुंतला) असे नाव आहे >> असे आहे का? मला चित्रपट काहीच आठवत नाहिये फक्त त्याचे 'स्त्री' हे नाव आठवणीत रहिलय कारण संवादात त्याचा उल्लेख 'इस्त्री' असा केलेला आहे आणि तेंव्हा मला ते खूपच विनोदी वाटले होते.
प्योर हिंदीत असेच बोलतात....
प्योर हिंदीत असेच बोलतात.... त्यांना 'इ'स्टार्ट घेतल्याशिवाय जोडाक्षर प्रथम असलेले शब्द उच्चारता येत नाहीत..
मला वाटते असे नाव द्यायचे
मला वाटते असे नाव द्यायचे कारण शांतारामनी बरेच वर्ष आधी शकुंतला हा चित्रपट बनवला होता आणि मग त्यावरुन परत स्त्री हा चित्रपट बनवला... (जसे औरत आणि मदर इंडिया)
राजश्री होतीच सुंदर! 'गीत
राजश्री होतीच सुंदर! 'गीत गाया....'मधे कोवळ्या जितेंद्र (जितुबाबाचा पहिला चित्रपट ना! )बरोबरही छान दिसली ती आणि तेवढीच 'अराउंड द वर्ल्ड' मधे राज कपूर बरोबर! 'गीत गाया... मधले तिचे साडी ड्रेपिंग वाखाणण्याजोगे! अर्धा अधिक चित्रपटात तर चेह-यावर घुंघट घेउन आहे. अराउंड द वर्ल्ड...मधे तिला आवाज कोणी दिला होता? अगदी परफेक्ट व्हायचा तिला तो आवाज!

काही मोजकेच पण खास चित्रपट देउन ही गुणी हिरोईन मधेच कुठे गायब झाली ती काय कळले नाही.
Pages