Submitted by दिनेश. on 16 November, 2009 - 17:21
गाणी आणि नृत्य, हा अनेक वर्षे हिंदी चित्रपटाची खासियत राहिलेली आहे. अर्थवाही शब्द, सुयोग्य चाल आणि गायकाची कारागिरी, याना पुरेपूर न्याय देणारे चित्रीकरण अनेकवेळा झालेय. इथे आपण अश्या गाण्यांची चर्चा करु. या चित्रीकरणात, नेमके काय आवडले, तेच लिहायचे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इजाजत फिल्म मधील आणखि एक गाणं
इजाजत फिल्म मधील आणखि एक गाणं आशाजींच" छोटिसी कहानी से बारिशों की पानी से " खुप सुन्दंर गाणं मला फार आवडतं .पावसाळ्यात कायम रेडिओ वर ऐकायचे.या बाफ मुळे आज पाहिलं . सुन्दंर चित्रीकरण आहे निसर्गाचं सुरवातीलच आहे नावांमधे , कायम उत्सुकता होती पहायची .पन ऐकतानाच पावसाचं जे फिलिन्ग येतं ते अप्रतिम.
सिनि, हे गाणे आठवत नव्हते
सिनि, हे गाणे आठवत नव्हते मला. बघायला पाहिजे आता.
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=VdL9KucRjYM
पुर्वा सुहानी आयी रे , हे पूरब और पश्चिम मधले माझे आवडते गाणे. सुगीचा आनंद मस्त जाणवतोय त्यात.
सायरा बानो कडे जरा डोळेझाक करावी लागते. तशी ती आवडायची पण या गेटप मधे नाही आवडली.
पितल की मोरी गागरी... हे गाणे
पितल की मोरी गागरी... हे गाणे ऐकायला खुप आवडते ( मिनु पुरुषोत्तम आणि परवीन सुलताना - चित्रपट - दो बूंद पानी ) जयदेवची चालही छान आहे. पण पडद्यावर हे गाणे संपल्यानंतर एक करुण प्रसंग आहे.. म्हणून बघायचे टाळतो.
http://www.youtube.com/watch?v=LBMuFWpoIYo
नुसतं गाणं ऐकून अंदाज येणार
नुसतं गाणं ऐकून अंदाज येणार नाही असे काहीतरी सरप्राईज देणारी गाणी बघायला फार मजा येते
पटकन आठवलेली काही :
'हम दिल दे चुके सनम'मधली बहुतांशी सगळी गाणी ऐकण्याइतकीच बघण्यासारखी आहेत.
सगळीच छान आहेत पण बघायला विशेष आवडणारी ही तीनः
हम दिल दे चुके सनम ... काय कल्पनाशक्ती लावलीय ह्या गाण्यात. विशेषतः पहिल्यांदा पडद्यावर बघताना खरंच ठोका चुकला होता
आखोंकी गुस्ताखियां
झोंका हवा का आज भी
पल भर के लिये कोई हमें प्यार कर ले
वो लडकी हैं कहां
मि. इंडिया पॅरडी साँग
पडोसनमधली गाणी नुसती ऐकण्यापेक्षा बघायला जास्त आवडतात
एक चतुर नार करके सिंगार
मेरे सामनेवाली खिडकी में
बैरी पिया बडा बेदर्दी - देवदास
मैं कोई ऐसा गीत गाऊं - येस बॉस
ओम शांती ओमचं टायटल साँग छान
ओम शांती ओमचं टायटल साँग छान चित्रित केलंय. निसर्ग वगैरे काही नाहिये पण त्यात आमंत्रित असलेल्या सगळ्याच कलाकारांनी कमाल केली आहे.
पडोसन मधले... वांगा वांगा पण
पडोसन मधले... वांगा वांगा पण खुप आवडते. मन्ना डे आणि मेहमूद अगदी एकजीव झाल्यासारखे वाटतात.
कुठले शब्द मेहमूदने उच्चारलेत ते कळत नाही.
हम दिल दे चुके मधले...निंबुडा निंबुडा पण खुपच आवडते.. अलबेला सजन आयो रे.. जरा आणखी सविस्तर हवे होते !
फिर भी दिल है हिन्दुस्तानी
फिर भी दिल है हिन्दुस्तानी मधले, और क्या...https://www.youtube.com/watch?v=vra09dnsTcQ
खासच.. ( यातला १ सेट.. ट्रूमन शो मधून ढापलाय. )
बाँके तेरा जोगी.. https://www.youtube.com/watch?v=YOluwERbVU0 पण मस्तच...
दोन्ही गाण्यात जुही किती प्रसन्न हसतेय.
तुझे क्या सुनाऊ मै दिलरुबा..
तुझे क्या सुनाऊ मै दिलरुबा.. तेरे सामने मेरा हाल है - माझे all time फेवरेट. या गाण्यात नूतन ने जे नायकाकडे पाहिलेय तसे ज्याच्या प्रेयसीने प्रियकराकडे पाहिले असेल तो प्रियकर जगातील सर्वात सुखी होय
मजरूह चे अतिशय समर्पक शब्द आणि मदन मोहन चे संगीत! कपिलाषष्ठी!!
नूतन चा अभिनय, तिचे नजर चुकवणे, केसामधून बोटे फिरवणे तर कधी बावरून स्वतःचेच पंजे पकडणे ... अशक्य आहे! निर्विवाद सर्वात सुंदर अभिनेत्री -
http://youtu.be/jfBBDTKkYwI
सुलु, या गाण्याची चाल, ये
सुलु, या गाण्याची चाल, ये हवा ये रात ये चाँदनी शी किती मिळतीजुळती आहे ना !
पडोसन मधले वांगा वांगा... सापडले इथे..
https://www.youtube.com/watch?v=jv4wxnYJmzQ
पल्लवी जोशी, अलोकनाथ, नाना
पल्लवी जोशी, अलोकनाथ, नाना पाटेकर आणि नितिश भारद्वाज हे ( चारच ) कलाकार असलेला तॄषाग्नि नावाचा
चित्रपट आला होता. त्यात आशाचे ऐसा लगे.. असे एक छान गाणे होते. मला आठवतय वाळवंटात चांदण्या रात्री हे गाणे चित्रीत झाले होते.. पण ते गाणे यू ट्यूबवर पाहता येत नाही.. ऐकता मात्र येतेय इथे.
https://www.youtube.com/watch?v=nVaS_mxOcRc
अगो, 'हम दिल दे चुके सनम'मधली
अगो,
'हम दिल दे चुके सनम'मधली बहुतांशी सगळी गाणी ऐकण्याइतकीच बघण्यासारखी आहेत.>>> अगदी अगदी,
त्या मधलेच एक झोका हवा का आज भी, अतिशय सुंदर गाणे...आणि त्याचे पिक्चरायझेशन ही उत्तम केले आहे.
त्या गाण्यातली अजुन एक गम्मत म्हणजे त्या तील प्रत्येक ओळ ही प्रश्ना नी संपते.
झोंका हवा का आज भी, जुल्फें उड़ाता होगा ना ?
तेरा दुपट्टा आज भी तेरे सर से सरकता होगा ना ?
बालों में तेरे आज भी फूल कोई सजता होगा ना ?
ठंडी हवायें रातों में तुझ को थपकियाँ देती होगी ना ?
चाँद की ठंडक ख्वाबों में तुझ को ले के तो जाती होगी ना ?
सूरज की किरने सुबह को तेरी नींदे उड़ाती होगी ना ?
मेरे ख़यालों में सनम खुद से ही बातें करती होगी ना ?
मैं देखता हूँ छूपछूप के तुम को महसूस करती होगी ना ?
कागज पे मेरी तस्वीर जैसी कुछ तो बनाती होगी ना ?
उलटपलट के देख के उस को जी भर के हसती होगी ना ?
हसते हसते आँखें तुम्हारी भर भर आती होगी न? ?
मुझ को ढका था धूप में जिस से वो आँचल भिगोती होगी ना ?
सावन की रिमझिम मेरा तराना याद दिलाती होगी ना ?
एक एक मेरी बातें तुम को याद तो आती होगी ना ?
क्या तुम मेरे इन सब सवालों का कुछ तो जवाब दोगी ना ?
हम दिल दे चुके सनमबद्दल
हम दिल दे चुके सनमबद्दल अनुमोदन.
माझे त्यामधले फेवरेट "चांद छुपा बादलमे". त्यात अॅशचा तो निळा घागरा, तिचे निळे डोळे आणि तो सेट यांनी जे काय कॉम्बिनेशन केलंय ते कमाल आहे. त्यात अत्यंत रोम्यान्टिक दिसणारा सलमान खान. अहाहा!!! सुंदरच आहे.
सुलू, नूतनबद्दल करोडो मोदक. मला सर्वात जास्त आवडली, तेरे घर के सामने आणि सुजातामध्ये. सुजातामधलं तलतचं "जलते है जिस्के लिये" हे प्रचंड आवडतं गाणं.... तलतचा आवाज जितका रेशमी, तितकाच नूतनचा चेहरा गोड आणि भावपूर्ण.
चित्रपट - १९४२ ए लव्ह
चित्रपट - १९४२ ए लव्ह स्टोरी
संगीत- आर. डी. बर्मन
गायिका- कविता कृष्णमूर्ती, कुमार सानू
गाणी - १. एक लडकी को देखा तो ऐसा लगा
२. रिमझिम रिमझिम
३. कुछ ना कहो (लता मंगेशकर)
इजाजत मधली सगळीच गाणी सुंदर
इजाजत मधली सगळीच गाणी सुंदर आहेत.
'मेरा कुछ सामान..' मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा काही विशेष वाटलं/ कळलं नाही...माझी एक बंगाली रूममेट होती, तिला हे गाणं प्रचंड आवडायचं. तिच्यामुळे मी अगदी मन लावून अनेकदा ऐकलं आणि प्रेमातच पडले ह्या गाण्याच्या!!
खूप जणांनी त्याचं रसग्रहण करायचाही प्रयत्न केला आहे अगदी एका एका शब्दात्/वाक्यात खूप अर्थ दडलेला आहे..त्यामधीलच एक लिंक-
एकसो सोला चांद की राते..
आशिका, एक लडकी को देखा मधे
आशिका, एक लडकी को देखा मधे संकलानी कमाल आहे. गाण्यातील प्रत्येक उपमेला न्याय देईल अशी दृष्ये डोळ्यासमोर येतात.
त्यातल्याच एका गाण्यात अधांतरी उडालेली पिवळी ओढणी.... इतके सुंदर टिपलेय ना ते दॄष्य, कि आजही ते डोळ्यासमोर दिसतेय.
नासिर, रेखा आणि मुनमुन सेनचा
नासिर, रेखा आणि मुनमुन सेनचा मुसाफिर आठवतोय ? त्यात आशाचे एक गाणे होते. चित्रीकरण तसे खास नाही, पण मला त्याचे शब्दही आठवत नाही. कुणाकडे लिंक असली तर द्या.
तेंडूलकरांची एक कथा आणि अशी पाखरे येती, हे नाटक एकत्र करून हा चित्रपट बनला होता.
रंग दिलकी धडकन भी लाती तो
रंग दिलकी धडकन भी लाती तो होगी ..
http://www.youtube.com/watch?v=d6vg3qmpNr0
फार गोड तरल गाणं, लताचा आवाज,ह्रदयस्पर्शी सिच्युएशन .. सुंदर सेटिंग , माला सिंहाचं निरागस सौंदर्य ..
भारती, लहानपणी हे गाणे
भारती, लहानपणी हे गाणे भेंड्या खेळताना र चे आणि य चे म्हणून पण वापरायचो ( याद मेरी उनकोभी आती तो होगी. ) त्यावेळी गूगल वगैरे नसल्याने चॅलेंज करता येत नसे... रेकॉर्ड अशीच आहे किंवा सिनेमात असेच आहे.. असे दोन्ही बाजूंनी म्हणता यायचे.
भारती, लहानपणी हे गाणे
भारती, लहानपणी हे गाणे भेंड्या खेळताना र चे आणि य चे म्हणून पण वापरायचो
>>> हायला, दिनेशदा, मला वाटलं की
'रंग दिलकी धडकन' च्या ऐवजी तुम्ही 'यंग दिलकी धडकन' बोलायचात. म्हणजे जवान दिलकी धडकन टाईप.
मामी, त्या काळात गाण्याचे
मामी, त्या काळात गाण्याचे नेमके शब्द मिळवायचे एकमेव ठिकाण म्हणजे... ती चार आण्याची पुस्तके.
रेडीओ पण क्लीयर ऐकायला नाही यायचा. एफ. एम. नव्हते ना ! त्यामूळे वाट्टेल ते शब्द घुसडले जायचे.
नूतनच्या चाहत्यांना ही
नूतनच्या चाहत्यांना ही कव्वाली कशी विसरता येईल..
http://www.youtube.com/watch?v=K5SM4D515Jc
निगाहे मिलाने को जी चाहता है... रोशन ने ही कव्वाली आशाला दिली आणि तिने अक्षरशः जीव ओतला ( नेहमीप्रमाणेच. ) हे नृत्यदिग्दर्शिका सरोज ने केलेली पहिले गाणे. या गाण्यात तिही नाचलीय. बघा ओळखता येते का ?
नूतन हसताना ओठापेक्षा डोळ्यातून जास्त हसायची. हो ना !
लताकडुन मदनमोहनने गाऊन
लताकडुन मदनमोहनने गाऊन घेतलेली एक सुंदर कव्वाली. चाल अर्थातच खुप कठीण.. यातही नूतन आहेच पण
चित्रीत मात्र बहुदा शकिला बानू भोपाली वर झालीय ! वरच्या कव्वालीच्या विरुद्ध भाव नूतनच्या चेहर्यावर आहेत.
http://www.youtube.com/watch?v=323c5t8GW0U
मला जुन्या गाण्यांपैकी .. ओ
मला जुन्या गाण्यांपैकी .. ओ दय्या रे दय्या रे चढ गया पापी बिछुआ ह्या गाण्याच चित्रीकरण आवडत.. त्यांचा डान्स ,, हातांच्या स्टेपस्,नाचताना दोन रांगा किंवा गोल करण. आधी वाटायच किती बोअर कोरीयोग्राफी आहे.. नंतर मात्र गाण आणी डान्स दोन्ही आवडु लागल
या सुंदर गाण्याचे चित्रीकरण
या सुंदर गाण्याचे चित्रीकरण आउटडोअरला करायला हवे होते. तो सेट अपुरा पडलाय असे वाटते. अर्थात तरीही ते सुंदर आहेच.
दिनेश दा आणि इतर लोक्स
दिनेश दा
आणि इतर लोक्स हो...

परवाच टी वी पहाताना कळले की परवाच "वो कौन थी" मधल्या लग जा गले गाण्याच्या रेकॉर्डींग ला ५० वर्ष पुर्ण झालीत. दिदि आणि मदनमोहन combo चे एक अत्यंत सुरेल गाणे आहे हे. जितके तरल ऐकायला तितकेच पहायला पण गोड आहे...अर्थात मनोज कुमारांचा चेहरा वगळुन
मदनमोहन ह्यांनी खुप छान बांधले आहे हे गीत. राग भिमपलासी असावा, असा माझा अंदाज. दिनेश दा जरा प्रकाश टाका.
मनवा लागे.... अप्रतीम रीत्या
मनवा लागे.... अप्रतीम रीत्या चित्रीत केलेलं गाणं .आणि शाहरुख आणि दीपीका ची गोड स्माईल ....एकदम कातील.... जेव्हा गाण्यात 'मनके धागे' येतं तेव्हा तर कीती मस्त दिसते दिपु
. चित्रीकरणातला फनी एलिमेन्ट पन सॉलीड कोरीयोग्राफ केलाय फराह खान ने.
https://www.youtube.com/watch?v=52jQMfVAEEU
दिनेशदा , इथे पाहिजेच हे गाणं !
प्रसन्न.. इ प्रसारण वर
प्रसन्न.. इ प्रसारण वर मदनमोहनच्या आवाजात नैना बरसे ऐकवलं होतं.. गाण्याच्या रेकॉर्डींगच्या वेळी लता आजारी पडली. मग मदनमोहनने ते स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड केलं. साधनाने त्याच आवाजावर शुटींग केले आणि मग लताने रेकॉर्ड केले.
चाल आणि संगीत तेच असले तरी, तुलना करता ( करू नये खरी ) लताने त्यात आपल्या खास जागा घेतल्या आहेत ते नक्कीच जाणवतं..
सिनी... नक्कीच.
मला, रामलिला मधली धिन तणाक आणि लहू मूँह लग गया पण आवडली.. चित्रपट मात्र खास आवडला नाही.
नैना बरसे
नैना बरसे https://www.youtube.com/watch?v=9w5iETwBs2o चित्रपटात हे अनेकवेळा येते.
लहू मूँह लग गया .. https://www.youtube.com/watch?v=szVW_w-W8cQ
धिन तणाक . नगादा संग ढोल बाजे.. https://www.youtube.com/watch?v=vK5E_aeBGYA
दिनेश दा.... भारीच !! धन्स !!
दिनेश दा....
भारीच !! धन्स !! राग भिमपलासी आहे का ?
Pages