Submitted by दिनेश. on 16 November, 2009 - 17:21
गाणी आणि नृत्य, हा अनेक वर्षे हिंदी चित्रपटाची खासियत राहिलेली आहे. अर्थवाही शब्द, सुयोग्य चाल आणि गायकाची कारागिरी, याना पुरेपूर न्याय देणारे चित्रीकरण अनेकवेळा झालेय. इथे आपण अश्या गाण्यांची चर्चा करु. या चित्रीकरणात, नेमके काय आवडले, तेच लिहायचे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला, रामलिला मधली धिन तणाक
मला, रामलिला मधली धिन तणाक आणि लहू मूँह लग गया पण आवडली..>>
ते गाणं चित्रपटाच्या सुरुवातिला येत आणि एक जबरदस्त परिणाम सोडुन जात .
त्यानंतर शेवटी शेवटी येणार " ढोल बाजे " फिक्क वाटतं , ओव्हररेटेड .
राग मला कन्फर्म करावा लागेल.
राग मला कन्फर्म करावा लागेल. पण बहुतेक तोच आहे. नैनो मे बदरा छाये - भीमपलासी आहे.
मेरा साया साथ होगा - नंद आहे.
बूँद जो बन गयी मोती.. हा व्ही
बूँद जो बन गयी मोती.. हा व्ही शांताराम यांचा चित्रपट होता. यात त्यांनी संध्याला नायिका न बनवता, मुमताजला नायिका म्हणून घेतले होते. त्यामुळे तिने शांताराम बापूंची नक्कल न करता स्वतःचा नैसर्गिक अभिनय केला होता. ( तिला पहिली संधी शांतारामबापूंनीच दिली होती. नवरंग मधे ती सहनर्तिका होती. सेहरा मधे छोटासा रोल होता. पंख होते तो उड आती रे मधे ती संध्याबरोबर नाचलीय. )
या चित्रपटाला सतीश भाटीया यांचे संगीत होते. हरीभरी वसुंधरा... ये कौन चित्रकार है, हाँ मैने भी प्यार किया..
अशी छान गाणी होती. ये कौन चित्रकार चे चित्रीकरण ढोबळ आहे. ( गवताला कागदी फुले बांधलीत ) मैने भी प्यार किया ची चाल सुंदर आहे. (मुकेश आणि सुमन ) नायिकेला अपेक्षित असणारे उत्तर न मिळाल्याने ती थोडी निराश होते तरी साथ देतेच.त्यामुळे यातल्या ओळी सुमन मुकेशनंतर किंचीत अवकाशाने म्हणते. याचे चित्रीकरण टांग्यात झाले होते पण तो टांगा सेटवरच चालवला होता.
सुमनच्याच आवाजातले, अखिया तरसन लागी, हे चित्रीकरणासाठी मला आवडते. चाल सुंदर आहेच. मुमताज आणि सहनर्तक तालात तरीही जोषात नाचलेत. ललिता पवारचा एक छान क्लोज अप आहे.
(सबटायटल्स भयानक आहेत )
https://www.youtube.com/watch?v=l_3f39LZssg
मिलन चित्रपट म्हंटला कि
मिलन चित्रपट म्हंटला कि आपल्याला नूतन - सुनील दत्तचाच आठवतो ( तसा जॅकी आणि मनिषा कोईरालाचा पण होता. ) पण त्याही पुर्वी नलिनी जयवंत आणि अजितचा, याच नावाचा चित्रपट आला होता.
त्यातले हे लताचे गाणे, " हाये जिया रोये, रोये रे " एकतर अतिशय सुंदर चाल आणि तितकेच आर्त स्वरात लताने गायलेय. ही क्लीप अंधूक आहे पण निदान आवाज तरी उत्तम ऐकू येतोय.
नलिनी जयवंतने हे पुर्ण गाणे चेहर्यातून सादर केलेय. ८० % गाण्यात तिचा क्लोजपच आहे. तूमने तो देखा होगा, ए चाँद तारों.. या ओळीच्या आगेमागे कॅमेराने टिपलेला ( खोटा का असेना ) चंद्र बघा. त्याकाळात चित्रीकरणाचे तंत्र तितकेसे चांगले नव्हते, तरीही हे गाणे मला ऐकायला आणि बघायलाही आवडते.
https://www.youtube.com/watch?v=U8TC4ORgzT8
शांताराम बापूंनी, स्त्री /
शांताराम बापूंनी, स्त्री / शकुंतला असा एक द्वैषाषिक चित्रपट काढला होता. त्यात ते आणि संध्याच होते. पण एका गाण्यापुरती राजश्री पण होती.
वसंत रागावर आधारीत हे गाणे, आशाने असे काही गायलंय कि बोलता सोय नाही. सोबत काही ओळी महेंद्रकपूरच्या आवाजात पण आहेत. ( संगीत. सी रामचंद्र )
शांताराम बापू अभिनेत्यांना प्रत्येक सीन स्वतः करून दाखवत आणि त्यांनी तो तंतोतंत तसाच करावा असा आग्रह धरत. संध्या नेहमीच याला बळी पडली, म्हणून तिचा अभिनय आता हास्यास्पद वाटतो. नाही म्हणायला नवरंग मधला, जमुना चा रोल मात्र तिने आपल्या शैलीत केलाय.
तर ते असो, या गाण्यात राजश्री उत्तम नाचलीय पण चित्रीकरणही सुंदर आहे. ( काळाच्या ओघात फिल्मचे रंग खराब झालेत ) सहनर्तकांचे कपडेही, खास करुन फुलपाखरांचे कपडे फार सुंदर दिसताहेत.
https://www.youtube.com/watch?v=Tp_BPGKGwRc
याच गाण्याच्या आजूबाजूला तूम्हाला, ओ निर्दयी प्रीतम ( लता ) आणि आज मधुवातास डोले ( लता आणि महेंद्र कपूर ) ही दोन गाणी दिसतील. दोन्ही अवश्य ऐका. खुप सुंदर आहेत. ( पण चित्रीकरण खास नाही.)
आज मधुवातास.. तर खुप सेन्सुअल आहे.
हाच चित्रपट मराठीतही निघाला होता. आशाचे हे गाणे, मराठीतही ऐकल्याचे आठवतेय. पण ही वरची दोन गाणी कधी मराठीत ऐकल्याचे आठवत नाही. मधुवातास साठी काय मराठी शब्द योजला असेल ?
रात और दिन, हा नर्गिसच्या
रात और दिन, हा नर्गिसच्या उत्तम अभिनयाने नटलेला चित्रपट. हा प्रदर्शित झाला १९६६ साली. माझे वय त्यावेळी ३ वर्षांचे. हा थिएटरला बघितला असणार आम्ही.. मला यातल्या आ वा रा, ए मेरे दिल या गाण्याच्या धूसर आठवणी बरीच वर्षे होत्या.
हे गाणे मला नर्गिसवर चित्रीत झाल्याचे आठवत होते. त्यातला पाऊस, दोन पुतळे या प्रतिमा बरीच वर्षे मनात होत्या.
नंतर खुप वर्षांनी, फुल खिले है गुलशन गुलशन मधे नर्गिस या भुमिकेबद्दल बोलली होती. नंतर तो चित्रपट परत दूरदर्शन वर बघितला.
त्यावेळी लक्षात आले, हे गाणे चित्रपटात दोनदा येते. एकदा लक्ष्मीछायावर चित्रीत झालेय. शब्द तेच आहेत, दोन्ही लतानीच गायलीत. पण परीणाम अगदी भिन्न. केवळ लय बदलून हे साधलेले आहे. अर्थात लक्ष्मीछायाचा नाच आणि नर्गिसचा अभिनय, याचाही मोठा वाटा आहेच. काल यू ट्यूबवर हि गाणी बघताना सहज वाटले, यातले एक व्हर्जन आशाने गायले असते तर !!! कुठलेही व्हर्जन तिने गायले असते तर सर्वस्वी वेगळाच परिणाम साधला असता.
https://www.youtube.com/watch?v=yMTyZdUjsuI
या चित्रपटातील सर्व गाणी इथे पहा. ही दोन गाणी सुरवातीला आणि शेवटी आहेत. अर्थात बाकी सर्वच गाणी श्रवणीय आहेत.
राग मला कन्फर्म करावा लागेल.
राग मला कन्फर्म करावा लागेल. पण बहुतेक तोच आहे. नैनो मे बदरा छाये - भीमपलासी आहे >>>
करेक्ट, दिनेशदा!
नीं सा ग म प नी सा ....
नैनो मे बदरा ...
सुरुवाती वरूनच समजतंय की
हा धागा शोधून वर आणला.
हा धागा शोधून वर आणला.
बाहुबली चे 'धीवरा...' गाणे फार नितांत सुंदर चित्रीत केलेय. चित्रपटात अजिबात अनावश्यक वाटत नाही. अगदी चपखल जागी चपखल गाणे. शुभ्रधवल धबधब्याच्या पार्श्वभूमीवर श्वेतधवल वस्त्रांकिता तमन्ना विहरत राहते.
प्रभास चे व्यक्तिमत्व खरे म्हणजे खूप खास नाही. त्याच्या ऊंचीमुळे आणि खास बाहुबली सिनेमासाठी कमावलेल्या शरीरामुळे ह्या सिनेमात खूप छान दिसला आहे.
मास्कच्या आधारे प्रेयसीचा चेहरा कल्पून तिला शोधण्याच्या नादात जलपर्वत चढून पार करण्यसाठी गाण्याची सिच्युएशन योग्य रीत्या वापरली आहे.
इतक्या सुंदर गाण्यासाठी त्यातले गूफ अप्स मी माफ केलेत.
काल परवाच सौदागर चित्रपट
काल परवाच सौदागर चित्रपट बघण्यात आला (अमिताभ-नूतन) . त्यातले 'तेरा मेरा साथ रहे' आणि 'सजना है मुझे' काय सुरेख चित्रित केलेली आहेत. आधी ऐकेलेली दोन्ही गाणी. पण पहिल्यांदाच पाहिली, आणि अजुन आवडली.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=2YE3ShJGzAs
हे एक अतिशय आवडीचं गाणं.
कुठेही उत्तानपणा , भडक प्रणय प्रसंग नाहीत. नायिकेने कपडे उतरवलेले नाहित. द्व्यर्थी शब्द नाहित आणि तरीही पति पत्नी मधील intimacy , naughtiness नेमकेपणानं जाणवतात. रेखाचा अभिनय लाजवाब. विनोद मेहेराही खूप छान.
आजचं वाचला छान धागा आहे .
आजचं वाचला छान धागा आहे .:स्मित:
मस्तं धागा.
मस्तं धागा.
मी संजीवनी भेलांडेलाआ युट्यूबवर फॉलो करते. संजीवनीला प्रत्यक्ष गाताना पाहणे हे सुखद असते. हिरॉईनपेक्षा लाडीक भाव असतात तिचे. मोठ्ठे डोळे, त्यातले विभ्रम, ओठांचा चंबू करणे हे फक्त ऑ करून बघत रहावं.
तिच्या चॅनलवर तिने "ओ सजना बरखा बहार आयी "
हे गाणं कसं म्हणावं हे सांगितलंय. त्यात गाण्यातले इतके सूक्ष्म्य बारकावे सांगितलेत की शास्त्रीय संगीत न शिकलेल्या माझ्यासारखीला पण ते समजते. जितकं मूळ गाणं ऐकण्या पाहण्यासारखं आहे तितकंच संजीवनीचं पण.
मी हे गांणं त्या आधी (शास्त्रीय गाण्यांची भीती असल्याने) ट्राय केलं नव्हतं. पण संजीवनीच्या व्हिडीओमुळे खूप फरक पडला.
दोन्ही व्हिडीओज माझे आवडते !
अहाहा किती आवडीची गाणी
वा... किती आवडीची गाणी लिहीली इथेत इथे.
चोरी चोरी मधलं “ये रात भीगी भीगी”.
https://youtu.be/f1DZxkiMjRo
मन्ना डे आणि लताने सोने केलेले अप्रतिम शब्द, त्यांना जोजवणारं संगीत, प्रेमाची चाहूल लागलेली राज आणि नर्गिसची जोडी. चित्रीकरण सेटवरच झालंय पण हॅमॉकवरचा राज ( कृष्णधवल चित्रपटातही जाणवणारा त्याचा डोळ्याचा रंग) आणि खिडकीतून त्याच्याकडे बघणारी नर्गिस.
ऐसे मे कही क्या कोई नही भुले से जो हम को याद करे
एक हल्की सी मुसकान से जो सपनो का जहां आबाद करे
शीअर रोमान्स.....
पावसाळा आणि त्यातून मुंबईचा विशेष आवडत नाही. पण “रिमझिम गिरे सावन”
https://youtu.be/IRPCMEJpQaw
ऐकलं की मला तो मरीन लाईनचा पाऊस अनुभवावासा वाटतो. लताचा आवाज अप्रतिम लागलाय या गाण्यात. ( म्हणजे बेसूर कधीच नसतो तो पण This has something special) दक्षिण मुंबईतला हा भाग खासच आहे आणि या गाण्यात पाऊस एक नितळ लुक देतो मुंबईला. चेहर्यावर मेकपचे थर थापून टबमधे गाणी म्हणणार्या असंख्य हिरॉईनी आणि ओलेत्या हिरॉईनचे अंगप्रत्यंग दाखवण्यात तरबेज असलेले दिग्दर्शक असण्याची सवय असतेच आपल्याला. पण झिरो (किंवा मिनीमल) मेकप ल्यालेली, चिंब भिजलेली मौसमी लक्षात राहते ती फक्त पाऊस एंजॉय करताना.
१९४२ अ लव स्टोरीमधलं अतिशय अंडररेटेड “ये सफर बहोत है कठीन मगर”,
https://youtu.be/zkBHOktDi44
इतर गाण्यांपुढ् काहीसं झाकोळलं गेलं. इतकी वर्षं गेल्यावर मला कुछ ना कहो नाही ऐकावसं वाटत परत. पण हे गाणं मी कधीही ऐकू शकते. काळाच्या कसोटीवर हे गाणं नक्कीच टिकलयं
मध्यंतरात एका धमाक्याबरोबर झालेली शुभंकर(जॅकीची)एंन्ट्री आणि त्यानंतर हे गाणं, उरलेल्या चित्रपटाचा टोन सेट करतं. शिवाजी चट्टोपाध्याय यांचा अनवट आवाज नंतर फारसा कधी ऐकला नाही.
लुटेरामधलं “सवार लूं” अलिकडचं आहे पण फील मात्र ब्लॅक ऍंड व्हाईट चित्रपटांचा आहे. सोनाक्षी जरा अम्मा दिसते. पण जुन्या जमान्यातल्या हिरॉईन्स असायच्या हट्ट्याकट्ट्या. एक हलकंफुलकं गाणं आणि चित्रीकरणही तसंच
https://youtu.be/24twxrXRiII
https://youtu.be/F1t_Eeo-OQM
छोटीसी बातमधलं “न जाने क्यों”.
स्ट्रीटस्मार्ट असरानीपुढे काहीसा भोट वाटणारा साधासरळ अमोल पालेकर आणि त्याच्या अनुपस्थितीत विद्या सिन्हाला त्याच्याविषयी वाटू लागलेली ओढ आणि तो नसण्याची हुरहुर. योगेश यांचे कालातीत शब्द आणि चित्रपटासारखंच साधंसरळ चित्रीकरण
Last but not the least “ प्यार किया तो डरना क्या”
https://youtu.be/3zGlIEFqhx0
जोपर्यंत हे गाणं फक्त ऐकलं होतं, पाहिलं नव्हतं तोपर्यंत काही खास वाटलं नव्हतं. पण ज्याक्षणी पाहिलं त्या क्षणी प्रेमात पडले. त्याकाळी गाजलेला सेट, वेशभुषा आता कदाचित गॉडी वाटू शकतात. पण हे गाणं पहिल्या काही रंगीत गाण्यांपैकी एक होतं हे लक्षात घेतलं तर एवढं माफच आहे. माझ्यासाठी हे गाणं is synonymous to defiance.
आता मी ते बघते ते मधूबालाच्या आणि पृथ्वीराज कपूरच्या अभिनयासाठी. दिलीपकुमार एक कटाक्ष टाकून वीणाला तिची जागा दाखवून देतो त्यासाठी, मुगल सम्राटासमोर धारिष्ट्य दाखवणारी लोकं बघण्याची सवय नसलेल्या दूर्गा खोटेंसाठी.
‘पर्दा नही जब कोई खुदा से, बंदों से पर्दा करना क्या’ लिहीणार्या शकील बदायुनीसाठी.
रिमझिम गोरे सावंत
रिमझिम गिरे सावन
https://youtu.be/IRPCMEJpQaw
अमिताभ आणि माैशमी
सोबतीला ममुंबयचा धुंवाधार पाऊस
आणि लता चा आवाज
वर अस्मानीने दिलेल्या लिंक
वर अस्मानीने दिलेल्या लिंक मधला विनोद मेहरा किती हॅण्डसम आहे.
कदाचित चुकीच्या वेळी आला तो.
आत्ता असता तर ?
आता 6 abs च्या जमान्यात
आता 6 abs च्या जमान्यात त्याला कोणी भाव दिला असता?
तेव्हाचे हिरो हिरोईन खरे वाटायचे... आताचे सुपरहुमन्स असतात. बॉडी तर बघायला नकोच पण नाचायला लागले तर अमानवीय वाटेल अशा स्टेप्स घेऊन नाचतात. तरी आता राजकुमार राव, आयुष्यमान च्या जमान्यात परिस्थिती परत सुधारतेय.
आत्ता म्हणजे राजकुमार राव,
आत्ता म्हणजे राजकुमार राव, आयुष्यमान खुराणा, वरूण धवन असे नायक येऊ लागलेत त्या काळात.
शाहीद कपूर पण येऊन गेलाच की सिक्स पॅक अॅब्जच्या जमान्यात
संजीवनी भेलांडेचं ओ बरखा
संजीवनी भेलांडेचं ओ बरखा नक्की बघा..
https://www.youtube.com/watch?v=TrpRlhgL1U0
कृष्णधवल जमान्यातील साधी
कृष्णधवल जमान्यातील साधी साधना कमालीची सुंदर दिसायची. तिची ती साधना हेअरस्टाईल गाजली असली तरी माझ्यामते ती साधी वेणी किंवा अंबाडा, कपाळावर ती साधना fringe नाही, साधी साडी अशा पेहरावात जास्त सुरेख दिसायची. यात मला आवडणारी तिची गाणी.
परख - मिला है किसीका झुमका, मेरे मनके दिये. यातलं ओ बरखा हे गाणं जास्त गाजलं तरी ही दोन्ही गाणीही सुंदर आहेत. साधना कमालीची निरागस आणि फ्रेश दिसते.
असली नकली - तेरा मेरा प्यार अमर. आहाहा! आकाशीच्या चंद्राला स्पर्धा करेल अशी साधना दिसली आहे!
मनमौजी - मै तो तुमसंग प्रीत लगाके. व्याकुळता अतिशय सहजतेने साधनाने दाखवली आहे.
या साध्या गेटअप मधल्या साधनाची तुलना माझ्या मनात नूतनशी व्हायची. साधनाचाही नूतन ही आदर्श होती. तिने अजून असे काही चित्रपट करायला हवे होते असं प्रकर्षाने वाटतं. पण वक्त, आरजू आले, त्यात ती एकदम fashionable, glamorous झाली आणि मग असे चित्रपट मागेच राहिले. तिच्या रंगीत चित्रपटात ती सुंदर दिसत नाही असं नाही पण आधीच्या या चित्रपटातील साधं निरागस रूप, चिरतरूण तजेला जास्त भावून जातो. दुर्दैवाने thyroid च्या प्रॉब्लेमने तिचं रूप उतरवलं. १९६७ नंतरच्या चित्रपटांमधे ती खूपच वेगळी दिसते. इव्हन मेरा सायामधेही 'झुमका गिरा रे' आणि 'नैनोमे बदरा छाये' या दोन गाण्यांमधेही ती एकमेकांहून थोडी वेगळी दिसते. इष्कपर जोर नही मधे ये दिल दीवाना है हे माझं आवडतं गाणं पण फक्त ऐकायला, त्यातली साधना खरंच बघवत नाही
"तेव्हाचे हिरो हिरोईन खरे
"तेव्हाचे हिरो हिरोईन खरे वाटायचे" - हे आता वाटतं असं मला वाटतं. तेव्हा ते सुद्धा ग्लॅमरस च वाटत असणार. आता मस्क्युलर बॉडी असणं ही 'इन-थिंग' आहे. वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या कपड्यांच्या फॅशन्स, वेगवेगळ्या हेअर स्टाईल्स, वेगवेगळे मॅनरिझम्स 'इन' होते. ही पदड्यावरचे कलाकार आणी सामान्य प्रेक्षक ह्यातलं 'perceived अंतर' असंच असणार आणी असंच असण्यातच सिल्व्हर स्क्रीन विषयीचं आकर्षण लपलं आहे. कितीही रिअॅलिस्टीक असला तरी सिनेमा भासमान च आहे आणी तो तसा असण्यातच त्याचं मनोरंजनात्मक मूल्य आहे.
असली नकली - तेरा मेरा प्यार
असली नकली - तेरा मेरा प्यार अमर. आहाहा! आकाशीच्या चंद्राला स्पर्धा करेल अशी साधना दिसली आहे! >> +१. कृष्ण धवल सिनेमांमधली साधना अफलातून दिसली आहे.
वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या कपड्यांच्या फॅशन्स, वेगवेगळ्या हेअर स्टाईल्स, वेगवेगळे मॅनरिझम्स 'इन' होते. >> अनुमोदन !
फेरफटका + 1
फेरफटका + 1
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=LjxNvViZxew
पल पल दिलके पास
एव्हरग्रीन चित्रीकरण!!!
https://youtu.be/E5N7k1V2bQk
https://youtu.be/E5N7k1V2bQk
सुहाना सफर औंर ये मौसम हंसी..
तसे तर मधुमतीची सगळीच गाणी छान चित्रित झालेली. वैजयंतीमालाचा फ्रेश चेहरा, दिलीप साब पण फॉर्मात.
या गाण्यात सुरवातीला तीतर, सुतारपक्षी आदी पक्ष्यांचे आवाज, मेंढपाळ मेंढ्या घेऊन जातांना करतो ते हुर्र.. हुर्र.. डोंगर दऱ्या, धबधबा.. तो जंगलाचा फिल आणि अचानक एका क्षणी गाणे सुरू होते. बरे प्रत्येक वेळी 'सुहाना सफर aur ये मौसम हसी.. ' वाक्य झाले की सगळी वाद्ये स्टॉप, आवाज स्टॉप.. ! मला हे फार आवडले.
>>>>>>>सुहाना सफर औंर ये मौसम
>>>>>>>सुहाना सफर औंर ये मौसम हंसी..
हे गाणे कधीच कसे जुने होत नाही??? मला खूप नवल वाटते. जेव्हा जेव्हा ऐकते तेव्हा तितकेच आवडते.
Dil Ki Nazar - Raj Kapoor -
Dil Ki Nazar - Raj Kapoor - Nutan - Anari
https://www.youtube.com/watch?v=t8vDu-C7u1Q
Tum Agar Mujhko Na Chaho - Dil Hi To Hai
https://www.youtube.com/watch?v=lIrvq5-Cp40
पहिल्या काही प्रतिसादात जी
पहिल्या काही प्रतिसादात जी गाणी दिसली नाहीत ती... ( नंतरच्या पानात असतील तर माहिती नाही).
प्यासा मधली
१. ये दुनिया अगर मिल जाये तो क्या है - या गाण्यात थिएटरच्या दरवाजात उभा असलेला गुरूदत्त आणि त्याच्या पाठीमागून येणारा लख्ख प्रकाश. काळ्यापांढर्या फ्रेम्स मधलं हे दृश्य कोरलं गेलंय मेंदूवर.
२. जिन्हें नाज है हिंद पर कहा है - या गाण्याचे शब्द, गुरूदत्तच्या चेहर्यावरचे व्याकूळ भाव आणि चित्रण तिन्ही.
कागज के फूल
३. वक्त ने किया क्या हसी सितम - या ही गाण्यात छाया प्रकाशाचा अद्भुत खेळ आहे. गाण्याचे शब्द, चाल, संगीत सर्वच अप्रतिम
चिंधीवर 3 गाणी आहेत
चिंधीवर 3 गाणी आहेत
भरजरी ग पितांबर
चिंधी बांधते
तिसरे कोणते ?
तुझ्या गाठोड्याची चिंधी
तुझ्या गाठोड्याची चिंधी
कर टार टार चिंधी
चल फाड फाड चिंधी
आज सारी सारी सारी सारी !!
हे तिसरं त्याच चालीवर हिंदीत
हे तिसरं
त्याच चालीवर हिंदीत
Pages