पुन्हा झुळूक

Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15

ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा.

गुलमोहर: 

सुर्यकिरण...

कारण प्रेमामधे बंद डोळेही,
खूप काही पाहून जायी...

पेक्षा ...

कारण प्रेमामधे बंद डोळेही,
खूप काही सांगून जायी... कसे वाटते?

मला अजूनही जमत नाही
तुझ्या डोळ्यांत डोळे घालून पाहणं
मन जातं गुंतून
आणि तनुच्या वाट्याला येतं शहारणं

विश्ल्या, तुला दाद रे मग....

पाउस तर नेहमीच भिजवतो
नभ ओथंबुन आल्यावर,
पण शहारा काय असतो ते कळतं,
तु अलगद स्पर्श केल्यावर.

पाऊस चिंब कोसळलेला
त्यावर मातीचा सुगंध दरवळलेला
स्वतावर ताबा ठेवू मी कसा
देह तुझा हा शहारलेला...

मल्लीनाथजी...

>> तुझ्या डोळ्यात मला
एकदा खोल उतरायचंय.
परतीची वाट विसरून
हळुच मनात शिरायचंय. >> सही आहे...

आज पाउस होउन बिलग तु
नको शहार्‍यास वाव ठेवु,
खवळला हा देह केव्हाचा
नको किनार्‍यास नाव ठेवु.

मल्ल्या...

तुझ्या चारोळीवर माझी त्रिवेणी...

वेडाच आहेस ....
जिथं पडायचं तिथं
उतरायचं म्हणतोयस....!

परतीची वाट विसरायची म्हणतोयस..
वेड्या, चक्रव्युहातून सुटका नसते म्हटलं...
कितीदा सांगितलं तरी सारखा विसरतोयस...!

विश्ल्या,

तुझ्या चक्रव्युहाला एक उत्तर Wink

चक्रव्युहात अडकल्यावर तर
लढण्याची मजा असते.....
असलं मरण तर मेल्यावरही जगवेल मला !!!!

मल्ल्या...

मेल्या, मरण आलं तर तो चक्रव्युह कसला?
लढणं, लढवणं नंतरच्या गोष्टी..
इथे गुरफटलेल्याला सुटका नसते, मुक्ती तर नसतेच नसते ! Proud

गुरफटायचं... पण ते सुटण्यासाठी नव्हेच
सगळे ओढेवेढे घेउन जगायचं.
सहज मिळालेली मुक्ती ते सुख काय देणार ?

सुकी, मोक्श आपसुक नाही मिळत, आणि नाही तो टॅक्स फ्री आहे Wink

मरतानाही माणुस
जरा व्यवहारी वागतो,
मरणाकडुनही त्याला
अत्म्याच्या बदल्यात मोक्ष हवा असतो.

मल्ल्या शेवटची ओळ बदल..

आत्म्याच्या ऐवजी देहाच्या हवं ते

अरे मेल्यावर देह जतो, पण अत्म्याला मोक्ष मिळल्याशिवाय सुटका नाही ना. म्हणुन तिथं आत्मा टाक्ला Wink

मरण समोर आल्यावर मी
माझ्या पुण्याईची ओंजळ त्यासमोर रिती केली
मरण हसले अन म्हणाले
चल वेड्या तुझी स्वर्गात लॉटरी लागली...

जन्म मरण हा सगळा 'त्याचा' डाव
आपण फक्त त्याचे खेळणे
विसरून मरणाची चिंता
चला साजरे करुया जगणे...

कशाला राव मरणाची चिंता
एक खंबा, थोडासा चखणा..
चला सगळे मिळुन करुया
आयुष्याच्या वार्ता...

(कै च्या कै सम्राट) Proud

एका सायंकाळी आपला गप्पांचा डाव
अतिशय रंगला
अन आपल्याला पाहण्यात दंग असणारा सूर्य
डोंगराआड बुडायचंच विसरून गेला...

Pages