पुन्हा झुळूक

Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15

ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा.

गुलमोहर: 

चारोळी - पाणी

चाहुल लागली उन्हाची
गेली लाट थंडीची
दुष्काळी आपल्या भागाला
गरज आहे पाण्याची.

- सचिन नागरे, किनगाव जटु ता.लोणार जि.बुलढाणा मो.9604321432

हपापलेली माणसं

शब्दांच्या आगीत पोळले तरी
बदलणारे नाही बदलत
पैशासाठी हपापलेली माणसं
विचारांनी का नाही पटत.

मनातले

मनातल्या भावनामुळे
कधीकधी सुचते चारोळी
कल्पनेतल्या विचारांची
अशीच असते आरोळी.

कायदा व अधिकार

नका करु सहन आता
होणारा अन्याय अत्याचार
चला जाणून घेऊ आता
कायदा व अधिकार

विकास

कितीही कायदे झाले तरी
भ्रष्टाचार काही थांबत नाही
योजना येतात, निधी येतो
विकास मात्र दिसत नाही.

लोणार सरोवर

निसर्गाची देणगी
खार्या पाण्याची शान
अखंड वाहणार्या धारेचे
लोणार सरोवर महान.

- सचिन जगन नागरे, किनगाव जटु ता.लोणार जि.बुलढाणा मो.९६०४३२१४३२

एखाद्या अनेक घाव सोसून कणखर बनलेल्या व्यक्त्तीवरही आघात होतो पण दु:खातिरेकाने अश्रूही येत नाहीत डोळ्यात. अशाच एका व्यक्तीसाठी सुचलेली चारोळी:

किती सोसू सोसवेना
सरेना यातनांचे माळ
गेले झरे सारे आटून
डोळ्यात कोरडे आभाळ

नीलाक्षी

तुझ्याकडे येणारे अश्रू आनंदाने फुलता.
बोल माझे तूज साठी हास्यात भिजू दे
व्यथेच्या भावनांही तेव्हा जरा बोथट होता
अबोल नजरेच्या भावना तुलाच कळू दे

चांगली नोकरी सोडून नुकताच
लागला नवीन धंद्याला
गिर्‍हाईक नाही म्हणून
लागला कविता करायला ।।

दवबिंदू हे गवतावरचे

त्यावर सोनेरी ऊन दिसे

घ्यावे कवेत , सामावून सारे

आले हे वर्ष नवे ..........
Charoli_0.jpeg

जेव्हा
समोर असूनही पाहता येत नाही...
इच्छा असुनही बोलता येत नाही...
मनात असुनही मिळवता येत नाही...
तेंव्हा असं समजा,
नशिबात असुनही वेळ आली नाहीं.

वीज होते जी नभी तळपते
कुठे शोधू ती मजला नाकळते
अंधारमन, तार्‍यात फिरते, जेव्हां
पदरात तारांगण उतरू येते..

हे परमेश्वरा

हे परमेश्वरा कशीही तुझ्या जगाची अवस्था झाली
पुण्याला वनवास पापाची राजमहालात व्यवस्था झाली

तुझ्यावरचा विश्वास तुझी भक्ती नाही रे आता तुझ्या भक्तांची भोंदू बाबा वर आस्था झाली।।

तुझ्या युगा स्त्रीला देवी म्हणून पुजत होते
या कलियुगात ती देवी
वासनेच्या राक्षसांच्या हातची भोग वस्तू झाली।।

अवतार घेऊन तुने अधर्म मिटवला
आज का रे इतका अधर्म वाढला आहे
तुझ्या अवतार घेण्याच्या क्रियेची काय दुरावस्था झाली।।

एका पक्षाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या देहाचा मांस कापून देणारा राजा इतिहासाच्या पुस्तकात कुठेतरी अदृश्य झाला
आता तर जनतेचे लचके तोडून खाणाऱ्यांची सत्ता झाली।।

कुठे लपून बसला आहे तू हे परमेश्वरा
तुझ्या द्रौपदीची अब्रू लुटून
खुलेआम पणे हत्या झाली।।

मुस्ताक अली शायर.....

7887481053

स्त्री शब्द नाही सामर्थ्य आहे
तिला योग्य सन्मान मिळू द्या...

करते सगळ्या धरतीला
आपल्या प्रेमाने प्रफुल्लित
तिलाही छोटसं का होईना
प्रीतीचे रान मिळू द्या....

स्त्री शब्द नाही सामर्थ्य आहे
तिला योग्य सन्मान मिळू द्या....

स्त्री गुरुकिल्ली आहे
माणसाच्या नशिबाची
जीवनात आपल्या
तिला जागा महान मिळू द्या.....

स्त्री शब्द नाही सामर्थ्य आहे
तिला योग्य सन्मान मिळू द्या....

बलिदान देते क्षणोक्षणी
प्रत्येकाच्या सुखासाठी
तिलाही आनंदाची तहान मिळू द्या....

स्त्री शब्द नाही सामर्थ्य आहे
तिला योग्य सन्मान मिळू द्या....

मोठमोठ्या विकासाच्या इमारती
असू द्या तुमच्या नावावर
तिच्या हिश्यात निदान
प्रगतीचे घर लहान मिळू द्या.....

स्त्री शब्द नाही सामर्थ्य आहे
तिला योग्य सन्मान मिळू द्या....

कुठे बलात्कार कुठे आत्याचार
कुठे विनयभंग तर कुठे जाच
स्त्री जन्माची त्यांना वाटते लाज
चला बदलूया ही विचारसरणी
करूया स्त्री जातीचा इतका आदर
की स्त्री जन्मावर त्यांना अभिमान मिळू द्या....

स्त्री शब्द नाही सामर्थ्य आहे
तिला योग्य सन्मान मिळू द्या....

मुस्ताक अली शायर.....

7887481053

का गेली......

का गेली तू मला असं
एकटं सोडून जीवनात
आठवणीचा समुद्र
सोडून माझ्या मनात

छोट्याशा वाटेवरही
सावली बनून तू माझ्या संग राहिली
जीवनाच्या एवढ्या मोठ्या वाटेवर
का गेली सोडून मला
या दुःखाच्या उन्हात

का गेलीस तू मला असं
एकटं सोडून जीवनात
आठवणीचा समुद्र
सोडून माझ्या मनात.....

जिवापाड प्रेम केलं होतं तुझ्यावरती
एक प्रीती च घर ही
बनवलं होतं तुझ्या मनात
कोण जाणे कुठून
विश्वासाच्या महासागरात
शंकेची सुनामी आली
आणि सगळं उध्वस्त करून
गेली एका क्षणात......

का गेली तू मला असं
एकटं सोडून जीवनात
आठवणीचा समुद्र
सोडून माझ्या मनात......

किती आनंदी होतो मी
जेव्हा तू माझ्या आयुष्यात आली
असं वाटलं होतं मला
माझा परमेश्वर मिळाला तुझ्या रूपात.....

का गेली तू मला असं
एकटं सोडून जीवनात
आठवणीचा समुद्र
सोडून माझ्या मनात.....

किती सहजपणे म्हटली
तू विसरून जा मला
कसं विसरु तुला
तुझ्याशिवाय काहीच नाही माझ्या स्वप्नात...

का गेलीस तू मला असं
एकटं सोडून जीवनात
आठवणीचा समुद्र
सोडून माझ्या मनात....

डोळे तुला बघण्यासाठी उघडे आहेत
हृदय तुझ्या प्रेमासाठी धडकत आहे
श्वास उरला आहे तो फक्त आणि फक्त
तुझ्या परत येण्याच्या आशेवर
माझ्या या तनात.....

का गेलीस तू मला असं
एकटं सोडून जीवनात
आठवणीचा समुद्र
सोडून माझ्या मनात.....

माझा परमेश्वर रागावून
माझ्यापासून दूर गेला आहे
परत येशील का गं कधी मला माफ करून
तुझा भक्त झाला रे तुझ्याविना अनाथ....

का गेलीस तू मला असं
एकटं सोडून जीवनात
आठवणीचा समुद्र
सोडून माझ्या मनात........

मुस्ताक अली शायर.......

7887481053

निघालीच आहेस डावलून तर,
एकदा वळून पाहशील का?
मुठभर वेदना माझ्या,
आठवण म्हणून नेशील का?
अडखळणाऱ्या या शब्दांना,
थोटका आधार देशील का,
हजार यातना त्यांच्या,
पण,थोड्या ऐकून घेशील का?

Pages