पुन्हा झुळूक

Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15

ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा.

गुलमोहर: 

जाळत असेल रोज जिंदगी,
म्हणूनी मी कधीच थांबलो नाही,
असेल रोज एक आघात नवा,
म्हणून मी काही उन्मळून पडत नाही.. >>

हे बेस्ट, सुकि Happy

जिंदगी जगण्याची चौकट असेल,
तर तो पिंजरा वाटायला लागतो,
अन स्वातंत्र्याला अस्तित्व नसेल तर,
उगाच रोजचा मुजरा करायला लागतो..

कुठे ना कुठे संपतो रस्ता,
तिथेच का मग क्षितीज ठरवावे,
मागे वळूनी पाहता एकदा,
अंतरातले ऐकऐक मैलदगड मोजावे..

फक्त अल्विदा म्हणून तुझे जाणे,
पटत नाही या मनाला,
गोड गुलाबी लालीची सवय,
तूच लावली आहे ना गं या गालाला ...

निंबुडे तुझ्यासाठी...

दंवबिंदुची क्षणभंगुरता
प्रत्येकाच्या नशिबी नसते...
फाटक्या थेंबाची असहायता..
फक्त त्याचंच प्राक्तन असते ...!

अश्रू ओघळताना,
त्याला कधीच बोलवू नये,
वेगवेगळं असत्व अस्तित्व दोघांचं,
उगाच त्यांचात स्पर्धा लावू नये..

आपण भेटायचो त्या वाकड्या वडासारखी,
तुही आता वाकलियेस....
अजुनसुद्धा सव्वालाखाची,
मुठ बरी झाकलियेस.....!

अजूनही झाकलेली आहे मूठ,
तु भरलेल्या ओंजळीचा सुंगध राखण्यासाठी,
अबोल आहे ओठ माझे,
होकार फक्त तुझ्या ओठांवर उमटवण्यासाठी...

अवघड असते डोळ्यातल्या थेंबाला,
गर्दी करून मुसळधार बरसणे,
त्याच्या नशिबी फक्त दु:खात भिजून,
सुखासाठी जन्मभर तरसणे...

तुझ्या नसण्याने
माझ्या असण्याच्या जाणीवा पुसत नाहीत,
पण म्हणून काही मी
तुझ्या असण्याची जाहिरात करत नाही.

माझ्या डोळ्यातला प्रत्येक थेंब
तुझ्यासाठी वाहतो
अन तुझ्या माझ्या विरहाची गोष्ट
तो धरणीमायेला सांगतो...

माझ्या असण्यात तुझं नसणं
बोचंत रहातं
अन कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी
तुझ्या उणिवेचं दु:खं टोचत रहातं...

अविनाश......

छान लिहिताय......... हे फार फार आवडलं:

++++++++++++++++++++
तुझे माझे मिलन पाहुन
चंद्रही लाजतो
अन आपल्यामध्ये जराही अंतर नको म्हणून
वाराही 'बाजूने' वाहतो...
++++++++++++++++++++

धन्यवाद निंबुडाजी...
नवीन आहे...तुम्हा सर्वांच्या बरोबरीने लिहिन्याचा प्रयत्न करतो आहे...
मार्गदर्शन करत रहा... Happy

Pages