पुन्हा झुळूक

Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15

ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा.

गुलमोहर: 

आसवांनी भिजलेली फुले
पुन्हा एकदा फुलताना पाहीली,
स्वार्थ होता त्यांच्या फुलण्यात
म्हणून तर सुगंध द्यायचीच राहिली...

निवडणुक आली
निवडणुक आली..
सा-या गावात बोभाटा..
कुणाच्या हातावर चिल्लर
कुणाच्या खिशात नोटा.......

***************

शेजारची चिंगी
गेली एकदा वारीला.....
दुपारी केलं भजन
रात्री नाचली बारीला........

पाय निघेना म्हणुन मागे वळुन पाहिलं
वाटलं तु थोडा वेळ थांब म्हणशील
तर तुझ्या डोळ्यात पुढच्या भेटीचं स्वप्न
आजची भेट संपवण्याची इतका का घाई झालेली Happy

तुझ भयं मला फक्त,
तू अबोल झाल्यावर वाटतं,
कारण तसे होताना तुझा डोळ्यात,
दु:खाचं केवढं मोठ तळं साठतं...

शब्दांची भाषा तुला समजत नाही
अबोलपणातला अर्थ लगेच उमजतो
म्हणुनच अबोल व्हावं लागतं
मनातलं तुला सांगताना

तुझी ती मनाचा ठाव घेणारी नजर
डोळ्याच्या कोपर्‍यातुन भिडवलेली माझी नजर
तुझ्या नजरेला नजर देण्याइतपत
धैर्य कधी येइल माझ्या मनात

तु जवळ नसतानाही
एकटेपणा वाटत नाही
हा एकांतच कामी येतो मग
मला तुझ्याजवळ आणायला

जवळ असुनही जवळ नसलास
तर मात्र हा एकटेपणा असह्य होतो
तु नजरेआडच बरा
असा जीवघेणा विचार मनात डोकावतो

प्रश्न नसला तरी
तो निर्माण होताना दिसला
येवु घातलेल्या प्रश्नाचं दिलेलं उत्तर
अबोल मनाला कळुन अबोला हटला

सुंदर... गं चिमुरी...

सांग तुझ्या मनाला,
चोर पावलांनी येणं बरं नाही,
एकांतात गाठेल स्पर्श माझा,
तेव्हा त्याचं काही खरं नाही...

चांदण्या रात्री आपण एकेकटे
चंद्रासोबत बोलत असतो
आपल्याला झुलवत ठेवुन
तो चांदण्याची आरास सजवत असतो

Pages