पुन्हा झुळूक

Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15

ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा.

गुलमोहर: 

सुकि, आलास वाटतं....... छान.........
सांज ही कलली होती,
रातीच्या खांद्यावर >>

कल्पना कै छान Happy

सुक्या, झब्बु ... तोही तुझेच शब्द वापरुन Proud

कधी ना कधी कलणारच होती
सांजही रातीच्या खांद्यावर...
आता फक्त प्रतिक्षा...
तुझ्या वळून पाहण्याची ....!

सांज तर कलली केव्हाची
तरी सुर्य रेंगाळला अजुनही,
साथ तुझी सुटली केव्हाची
तरी त्याच वळनावर मी अजुनही,

वळणा-वळणाचे आधार कशाला
गुंतागुंतीच्या या आयुष्याला...
कलत्या सांजेचे संदर्भ कशाला
तुझ्या माझ्या चिरंतन नात्याला?

मखमलाचाही पडतो विसर,
तुझ्या तळहाती स्पर्श होताना,
जाते जाते म्हणतेस अन दाटून येते,
बोटांची ती साखळी निसटताना...

विशल्या बाय रे ...

श्वास चोरायचा खेळ तुझा,
मांडण्याआधीच मोडला होता,
जिंकला कोण नी हरला कोण,
यास फक्त कोमेजल्यांचा गंध उरला होता..

नाजुकश्या हिरव्या वळणावर
पायवाट होती थांबलेली,
बोटांनी नक्षी काढल्यावर
तिही तुझ्या सारखीच लाजलेली.

तू दिलेलं एक फुल सुद्धा,
माझ्या ओंजळीला पुरे होतं,
कधी केसातलं आभूषण
तर कधी देव्हार्‍यातलं हार तूरे होतं..

चारोळीच्या चालिने "तू"
आताच केलिस पन्चविशी पार....
कवितेच्या प्रान्गणात ये जरा
दाखव तुझी "शब्दबहार"................ अव्या खास तुझ्यासाठी रे......!

आयच्यान सांगतू...
मले लै भ्यां वाटून रायलं,
तुले लेटर तर लिवलं पर,
काळिज माजं कापुन रायलं ... Proud

विशल्या.. मस्त रे...

तुझ्यावानी देखणं रुपडं
कुठंच घावणार नाही,
तुला मिठीत घेतल्याविना,
मी भरून पावणारं नाही..

अविनाशी भ्रमर,
पण फुले कोमेजणारी.....
साताजन्माच्या आणाभाका घेउन
मधेच दगा देणारी..........

फुले कधीच वचन देत नाहीत
तरी भुंगा त्यांच्या प्रेमात पडतो
फुले त्याला सर्वस्व देऊन कोमजतात
तरी तो उगाच शोक करतो...

Pages