पुन्हा झुळूक

Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15

ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा.

गुलमोहर: 

हाय चिमुरी... Happy

तुझा साखरझोपेतला चेहरा
मला नेहमी आठवतो
अन उगाचच सारी
रात्र रात्र जागवतो...

पहाटेचे दंवबिंदु अलगद
तृणपर्णांवर विसावले
तुझी चाहूल लागताच
हलकेच सावरून बसले

कधी कधी उन्मादाच्या भरात
तिलाही चंद्राची उपमा देतो
विसरतो सोयिस्कररित्या
चंद्र स्वतःच शापीत असतो Happy

हाय अवि..विशाल..चिमुरी..

पात्यावरच्या दवांना
गवत खुप जपायचं..
छातीशी कवटाळुन
हळुच पानात लपायचं...

कुठुनसा पाण्याचा एक थेंब
पात्यावर येउन विसावला,
थरथर पाहुन पात्याची
क्षणभर तोही शहारला.

हाय पिलु...विशाल...मल्लिनाथ...

तुला मला चिंब भिजवनारा पाऊस,
थोडसं खट्याळ वागनारा पाउस,
तुझ्या वाटेवरच्या डोळ्यांना
तळं ओंजळीतलं मागनारा पाउस.

चिमुरी मस्त गं.......

ती भेटायला आली की
आभाळ भरुन आलेलं..
तिच्या प्रत्येक भेटीला असं
पावसानं भिजवुन टाकलेलं....

पाउस आला की मला तो
तर तुला आठवते ती
पावसात मला वडापाव आवडतो
तर तुला हवीच असतात भजी Happy
(काहीच्या काही चारोळी)

Pages