पुन्हा झुळूक

Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15

ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा.

गुलमोहर: 

निंबुडाजी तुम्हांला उत्तर...

डोळे तुझे मी वाचू कसे
डोळ्यांवर लाजेचा पडदा असतो
तुझी प्रीत कळणार तरी कशी
ओठांवर नेहमीच तुझ्या 'नाही' असतो...

डोळ्यांवर चष्मा तुझ्या
डोळे तुझे वाचू तरी कसे?
तू काही बोलतही नाहीस
मनातल्या तुझ्या ओळखू तरी कसे? Lol

तुला वाटत असेल की
मी उगाच अंतर ठेवते आपल्यात,
अरे वेड्या मर्यादा पाळल्या नाही
शिल्लक काय उरेल चंद्रमिलनात !

छप्पर फाटलं म्हणून
दु:ख करायचं नसतं
आकाशातल्या 'सुर्यकिरनांना'
हलकेच ओंजळीत झेलायचं असतं...

थांब.., थांब
थेंब...थेंब... पुन्हा
चल मिळून.....
चिंब चिंब पुन्हा...!

नवकवितेसारखी नवचारोळी (by नवचारवळीकार ईरसाल म्हमईकर):-P

तुझ्या सुखाची तुलना करताना
फक्त मला पाऊस आठवतो,
एक एक साठवला तरी,
थेंब पसारा वाढवतचं जातो...

तुलना करणं सोडलय आजकाल
तु येतेस तसाच पाऊसही येतो ...
फरक एवढाच ....
तो दरवर्षी परत फिरून येतो .... !

विशाल मस्त रे भिडू ये हूई ना बात ...

माझं फिरणं फक्त
तुला विश्रांती असते,
मी परतून आलो की,
उसंतीला सुद्धा जागा नसते..

अंधार्‍यारातीला तुझ्यापेक्षा,
मला स्वप्नांचीच साथ जास्त भावते,
कारण मर्यादेची रेषा मी फक्त
तिथेच तर ओलांडते...

ओल्या पावलांचा स्पर्श होताच
उंबराही गेला सुखावून,
सताड उघडी दारे गडबडली जराशी,
तुझ्या अश्या अवेळी येवून..

डोळ्यांवर जाऊ नकोस
डोळे कधीकधी खोटं बोलतात
स्वतःचं कुसळ ठेवतात लपवून
दुसर्‍यांचं मुसळ आधी बघतात

मल्ल्या , बरसो रे मेघा !

अविनाश,

डोळे वाचायला ज्ञान
अवगत असणे जरूरी नाही,
कारण प्रेमामधे बंद डोळेही,
खूप काही पाहून जायी...

मल्ल्या... तेरे लिये

तुझं हळुवार थरथरणं
पाऊसभिजल्या.......
अबोल नभाचं अलवार
नखशिखांत शहारणं....!

Pages