पुन्हा झुळूक

Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15

ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा.

गुलमोहर: 

माझ्यावर तुझ्यावर प्रेम नाही,
दुसरचं कोणावर तरी आहे,
अगं तुझ्या माझ्यात पाहिलसं
तर दुसरं तरी कोण आहे ?

अविनाशजी ..

चिंब-वणवा विरुद्धार्थि जोडि मस्त जमलीये

पावसाचे थेंब नेहमीच मला
चिंब भिजवून जातात...
तुझ्या माझ्या आठवणींच्या रानाचा
वणवा पेटवून जातात...

... ग्रेट लगे रहो

किती घालशील कोडी
तुझी नित्याचीच खोडी
जरा राहूदेना आता..
तुझ्या बोलांचीही गोडी..

रेश्माजी...

चिंब-वणवा विरुद्धार्थि जोडि मस्त जमलीये >>>

तेच अभिप्रेत होते मला त्या चारोळीतुन...
जाणकार रसिक आहात तुम्ही...

अशी अबोल राहू नकोस ना ग सखे
डोळ्यांची भाषा मला कळत नाही
शब्दं ओठांवर आण ना ग सखे
तुझ्या मनातली प्रीत मला कळत नाही...

प्रेमामध्ये प्रत्येकाला
काहीतरी त्यागावे लागते
भुंग्यासाठी फुलाला
मध गमवावे लागते...

भुन्ग्याने कधी कळीवर जीव जडवु नये
आपल्याकडच्या मधाने तिला कधी मढवु नये
कारण, मधाच्या ओढीने मग फुलपाखरे येतात
मध राहतो बाजुला, कळीचीच होऊन जातात.

अविनाश, तुमच्या

अशी अबोल राहू नकोस ना ग सखे
डोळ्यांची भाषा मला कळत नाही
शब्दं ओठांवर आण ना ग सखे
तुझ्या मनातली प्रीत मला कळत नाही...

या चारोळीला हे घ्या माझे उत्तरः

माझं तुझ्यावरचं प्रेम
माझ्या डोळ्यांत दिसत नाही काय?
तसं नसेल तर निदान
माझ्या कृतीतून कधी जाणवत नाही काय?

कृतीतून जाणवते फक्त,
आपल्या माणसाची वृत्ती,
प्रेम शोधायचे असेल तर,
सदैव रहावे त्याच्या चित्त्ती..

-- निंबुडे तुला उत्तर !

माप ओलांडून यायला,
उंबराच नव्हता माझ्या घराला,
भिजून गेलो साराच मी,
कारण छप्परचं ठेवलं नव्हत तुला झेलायला..

Pages