पुन्हा झुळूक

Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15

ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा.

गुलमोहर: 

वेड्यासारखं कुढंत जगणं,
आता मला जमत नाही,
तुझ्या प्रतिक्षेत त्या उंबर्‍यालाही,
न झिजता गप्प राहणं पसतं नाही...

एकाच छत्रीत दोघांनी भिजण्यापेक्षा,
एकाच मेघाखाली भिजत रहावं,
शहारलेल्या देहांनी मग
थेंबा थेंबातून एकरूप व्हावं...

तुझी आठवण...

पहिला पाउस देउन जातो तुझी आठवण...
जुन्या सोनेरी क्षणांची मग होते उधळण...
आठवणी तुझ्या या मनात घालतात अशी थैमान...
जसे टप टप टपोरया थेंबानी मोहरुन जाते सारे रान...

हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. कसा आहे ते सांगा.
इथे हिन्दी चारोल्या लिहिल्या तर चालेल का??

पल पल तनहाइ देते है लोग...
किये हुवे वादे भुल जाते है लोग...
एक हम हि है जो हर पल याद करते है...
वरना हमें पल भर के लिये याद करना भी भुल जाते है लोग...

मिटून जाती नयने अखेर,
क्षितीजरेषा ओलंडताना,
एवढेच घडते का हो,
आयुष्य मृत्युला आपसुख बिलगताना.. Sad

चमकली स्वरेल चांदणी,
आज पोर्णिमा संगित ऐकताना,
चंद्र तर लाज सोडून बसला होता,
चांदण्या मात्र लपल्या होत्या त्याला बिलगताना...

चेहर्‍यावरच्या त्या गुलाबी पाकळ्या,
मध्याच्या गोडीलाही फिक्या पाडतात,
इतक्या ओल्या गर्द मधूर व्हायला,
त्या कुठल्या गं डोहात बुडतात...

काजळाची किनार विस्कटेल,
म्हणून आज तरी टिप गाळु नकोस..
अंधार दाटला असेल विरहाचा जरी,
आठवणींना कोमजलेल्या गजर्‍यात माळु नकोस..

काहीचं क्षणांच असतं आयुष्य
म्हणून थेंब कधीच रुसत नाही,
दुसर्‍याच्या दु:खाला आधार म्हणून,
ओघळायला तो कधीच विसरत नाही..

त्याचा अंदाज बांधून,
तुम्ही त्याला कोड्यात टाकतात,
दोन चार कडवी कागदावर लिहून,
तुम्ही त्याला चक्क आंगणात मागतात...

तुमच्या आमच्या मर्जीने बरसायला,
तो काय आपला गुलाम नाही,
एक वचनी आश्वासने पाळायला,
तसा तो रामही नाही...

मोह आवरता येत नाही,
म्हणून काय मर्यादा सोडायच्या नसतात,
ओळंजळीत दिर्घ काळ टिकतो सुगंध,
म्हणून सगळीच फुले चुरगळाची नसतात...

>>इथे हिन्दी चारोल्या लिहिल्या तर चालेल का??
मराठी संकेतस्थळ आहे. मराठीमध्ये लिहीण्यासाठी ! हिंदी लिहीण्यासाठी इतर संकेतस्थळं आहेतच
तस्मात हिंदी नाही. चारोळ्यांना चारोल्या असे हिंदीकरण केले तरी नाही Proud

तू बोलशील मग मी बोलेल,
ह्या भरवश्यावर एक तप उलटून गेलं,
एकत्र चायलची वेळी आली तेव्हा,
एकाच रस्त्याला दुतर्फा वळण चिरून गेलं...

तुझ्यासारखं अबोल राहून,
स्वतःला झुरवून घेणं जमत नाही,
उंचावरून कोसळत असला तरी,
मी मानवनिर्मित धबधब्यात भिजत नाही..

धन्यवाद...
पण मला तुझ्याप्रमाणे पटापट सुचत नाही...
किती वर्षांपासुन लिहितोस तु?

Pages