मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

पुन्हा अज्ञान! प्रतिक्रिया जरी पुन्हा संपादित करायची नसेल म्हणजे पुर्ण झाली असेल तरी संपादन का दिसते असे मला विचारायचे होते, ते सांगाल?

>>प्रतिक्रिया जरी पुन्हा संपादित करायची नसेल म्हणजे पुर्ण झाली असेल
तसे नाही आहे ते. तुमचीच पोस्ट तुम्ही 'य' वेळा संपादित करू शकता. त्यात 'लॉक कर दिया जाये' वगैरे भानगड नाहीय्ये. Happy

मी आजच एक उत्तर प्रदेशीय रेसिपी टाकली आहे. पण ती create करताना प्रादेशिक या drop down मध्ये "उत्तर भारत" असा ऑप्शन मिळाला नाही. तो जरा add कराल का प्लीज?

'विरंगुळा' विभागात लेखनाचा धागा काढता येत नाही का? तिथे फक्त 'नवीन गप्पांचे पान' असा पर्याय दिसतोय. पण त्यातली काही पानं धागे आहेत. तिथे धागा काढायला काय करायचे?

>>'विरंगुळा' विभागात लेखनाचा धागा काढता येत नाही का?

नाही, विरंगुळा भागात फक्त गप्पांचे पान सुरू करता येते. मा. अ‍ॅडमिन यांना सांगून तुम्ही ते पान, लेखनाच्या धाग्यात बदलू शकता.

मला माझे केलेल्या लिखिणाची लिंक माझ्या मित्रांना कशी पाठवायची ते सांगा.तसेच केलेल्या लिखिणावर आपली लिंक सेव्ह करता येते का?

नमस्कार सुनिल जोगः येथे आपले सर्व लिखाण सापडेल. हीच लिंक आपण मित्रांना आपल्या आवडत्या मेल पोर्टलवरून पाठवू शकता:

http://www.maayboli.com/user/29172/track/created

आपले मित्र मायबोलीचे सदस्य असतील तर विचारपूस आणि संपर्क सुविधा वापरत असतील तर तो पर्यायही आपल्याकडे उपलब्ध आहे. इथे याबद्दल जास्त माहिती मिळेल.

प्रश्नाचा दुसरा भाग
>>केलेल्या लिखिणावर आपली लिंक सेव्ह करता येते का?
हा समजला नाही, कृपया उदाहरण देऊन 'आपली लिंक' म्हणजे काय याचा खुलासा करणार का?

नमस्कार नन्या१०:

पानाच्यावरती , मदपुस्तिकेचा दुवा [लिंक] आहे, त्याच ओळीत बाकीच्या ईतर विभागात तुम्हाला लेख दिसतील.

* नवीन लेखन
* हितगुज
* गुलमोहर
* लेखमालिका
* रंगीबेरंगी
* मायबोली विशेष
* मदतपुस्तिका

गुलमोहर वर क्लिक केल की ७२ तासातले नविन लेखन दिसते त्यात सगळे विभाग म्हणजे
कथा, कविता , कादंबरी ,काहीच्या काही कविता, चित्रकला, प्रकाशचित्र, बालकविता,बालसाहित्य,मराठी गझल इ.
दिसते. पण यात केवळ ७२ तासामधलेच लिखाण दिसते. एखाद्याच विभागतले त्यापुर्विचे किन्वा सगळे बघायचे असेल तर काय करायचे? म्हणजे समजा सगळ्या बालकविता बघायच्या असतिल तर कुठे बघायच्या?

सावली :
दोन प्रकारे बघता येईल. जर एखाद्या कवितेला 'बालकविता' असा टॅग लावला असेल, तर त्यावर क्लिक करून सर्व बालकविता दिसतील.

दुसरे म्हणजे प्रत्येक पानावर सर्वात शेवटी दिसणारी गूगलची शोधखिडकी आहे ना, त्यामध्ये 'बालकविता' असे लिहून शोधता येईल.

हितगुजवरील नविन लेखन, हे सर्वात वरच्या पट्टीत असणार्‍या लाल रंगातील 'नवीन लेखन' दुवा वापरून शोधता येते. तसेच, नवीन लेखनावर टिचकी मारल्यानंतर जे पान उघडते त्यात दोन नवीन मेनू दिसू लागतात "निवडक मायबोली" आणि "बखर". बखर वापरून तुम्ही आलेले नवीन लेखन बघू शकता.

धन्यवाद नंद्या,
'बालकविता' असा टॅग लावला असेल >>> टॅग कसा लावायचा?
आणि मुळ लेखकाने टॅग लावला नसेल तर मिळ्णार नाहि रिझल्ट.

गूगलची शोधखिडकी >> हो पण मला तसे रिझल्ट नकोयेत.

समजा मला सगळ्या कादंबर्‍या वाचायच्या आहेत तर त्या एकत्र कुठे दिसतिल?

मुळात लिहिताना जर लेखक विभाग निवड्तो (ड्रॉप डाउन मेनु), तर वाचकाला पण विभाग निवडुन त्या विभागातले सगळे लिखाण का बघता येत नाहि? / कसे बघता येईल?
म्हणजे लेखन वर क्लिक केल्या वर खाली सगळे विभाग दिसतिल (७२ तासा सारखेच) पण यात आत्ता पर्यंतचे सगळे लिखाण दिसेल.
कोणाला सगले नविन लेखन बघायचे असल्यास ते नविन लेखन वर क्लिक करतील. तिथे हि विभाग्वार बघण्याची सोय आणि वेळे नुसार बघण्याची सोय हवी (सॉर्टींग) / आधिच आहे क?

>>मुळात लिहिताना जर लेखक विभाग निवड्तो (ड्रॉप डाउन मेनु),

हाच मेन्यू टॅग म्हणून वापरला जातो. त्यामुळे विभाग बघणे, हे टॅगनुसार क्रमवारी बघण्यासारखे आहे.
आता टॅग कसे शोधायचे?

इथे वरती लाल आयतात दाखवले आहे ते टॅग्ज , गुलमोहर या दुव्यावर टिचकी मारली असता दिसतात.
ते सोडून इतरही टॅग्ज आहेत जे ७२ तासातील जुने लेखन यात दिसतात उदा. चित्रकला. ७२ तासाच्या लेखनातील एखादी कलाकृती उघडून तुम्ही तो टॅग, शेवटी शोधू शकता, खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे

आता हे सर्व टॅग्ज एका ठिकाणी उपलब्ध असते तर ७२ तासात चित्रकलेची एकही कलाकृती न येऊनही तो विभाग शोधणे सोपे झाले असते.

समजा मला सगळ्या कादंबर्‍या वाचायच्या आहेत तर त्या एकत्र कुठे दिसतिल?
दोन प्रकारे दिसतील. एक म्हणजे गुलमोहर दुव्यावर टिचकी मारून कादंबरी विभाग बघायचा.
अथवा
लेखमालिकेमध्ये जाऊन कादंबरी/लेख वाचायचा.

गूगलची शोधखिडकी >> हो पण मला तसे रिझल्ट नकोयेत.

त्यामध्ये पहिला रिझल्ट हाच टॅगचा आहे [बहुतकरून असतो]. म्हणून सुचविले होते.

धन्यवाद नंद्या,
एवढ्या डिटेल उत्तराबद्दल.
अगदि बरोबर हेच मला म्हणायचे आहे <<आता हे सर्व टॅग्ज एका ठिकाणी उपलब्ध असते तर ७२ तासात चित्रकलेची एकही कलाकृती न येऊनही तो विभाग शोधणे सोपे झाले असते. >>

मी वदल सुचवायच्या धाग्यात हा बदल सुचवते

कण्वाची शकुंतला आणि माझी अप्पीचा टाईप केलेला भाग अचानक दिसेनासा झाला आहे. क्रुपया सापडतो का पहा.

नमस्कार नितीनचिंचवड
टाईप केल्यानंतर सेव्ह करताना दिसेनासा झाला आहे? कृपया लिंक दिलीत तर बरे होईल.

कण्वाची शकुंतला आणि माझी अप्पीचा टाईप केलेला भाग अचानक दिसेनासा झाला आहे. क्रुपया सापडतो का पहा.

नमस्कार नितीनचिंचवड
टाईप केल्यानंतर सेव्ह करताना दिसेनासा झाला आहे? कृपया लिंक दिलीत तर बरे होईल.

http://www.maayboli.com/node/17220

मी कथा आधी कागदावर न लिहीता टाईपकरुनच सेव्ह करतो. आता सगळी हरवलेली वाक्ये आठवुन पुन्हा लिहिण्यापेक्षा तुम्हाला विनंती आहे की बघा गहाळ लेखन सापडते का ?

हा अप्रकाशित लेख आहे का?
तसे असेल तर प्रशासकांशी संपर्क साधून विचारायला हवे.
पुढे असे होऊ नये यासाठी इथे सुचवलेले पर्याय वापरून बघता येतील.

नमस्कार मला माझे रायगडचे फोटो अपलोड करायचे आहेत पण साइझ जास्त आहे कसं करता येइल
प्रत्येक फोटो ३ एमबी चा आहे

घारूअण्णा, तुम्ही पिकासावर फोटो अपलोड करून येथे
< img src="/पाथ/टू/योर्/फोटो.जेपीजी" / >

असा टॅग मजकूरात लिहून लिंक देऊ शकता.
पिकासावर फोटो अल्बममध्ये उजव्याबाजूला तुम्हाला फोटोची लिंक दिसेल.

Pages