मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

माझा मूळ प्रश्ण असा होता की,

पाककृती गूगल सर्च मधे शोधून मिळत नाहीत.
उदा: डांगर,पालक राईस,काळ्या वाटाण्याची उसळ,पनीर माखनी.

पाककृतींचे टायटल्स copy-paste केले सर्च बार मधे तरी रीझल्ट्स मधे नाही मिळत.
तर यावर काही उपाय आहे का?

थॅन्क्स.

मी नुकताच एक विनोदी लेख लिहून सेव्ह केला पण तो लेख गुलमोहरमध्ये आलेला दिसत नाही. लेख प्रकाशित व्हायला किती दिवस लागतात? मी लॉगिन केल्यावर फक्त मलाच माझा लेख दिसतो. इतरांना तो लेख वाचता येऊ शकत नाही का?

अमित जी,
तुमचा लेख सगळ्यांना दिसत आहे. लेखन प्रकाशित केले की लगेच ते सगळ्यांना दिसायला लागते.
-मदत समिती

IE8 install kelyaanantar marathi text editor display hot naahee. lekhan prakriyaa an sampaadan yaa donhee thikaanee marathi text editor disable zaalaa aahe. issue resolve karanyaasaathi marathi text editor/ font vegala download karava laagel kaa..?
kathaa sampaadan window chyaa baaher dusaryaa text editor madhe lihun punhaa sampaadan window t paste karan khupach taapdaayak aahe. krupayaa varil samsyeche nirakaran kase karataa yeil yaabaddal maahitee dyaavi.
mahesh ghule.

महेश
IE8 मध्ये लवकरच तुमच्या प्रश्नाचे टेस्टींग केले जाईल, सध्या माझ्याकडे IE8 उपलब्ध नाही. तो प्रश्न सुटेपर्यंत तुम्ही Firefox वापरा. त्यात असा काही प्रश्न येणार नाही.
-मदत समिती

महेश,
तुम्हाला प्रतिसादाच्या खिडकीवर दिसतात तशी बटनं दिसतायत का? ती दिसत असतील तर सध्या तात्पुरते अ‍ॅपल लोगोच्या बटनावर टिचकी मारून पर्यायी जुना संपादक सुरु करा. तो सगळ्या ठिकाणी चालायला हवा. तो दिसत नसेल तर तुमच्याकडे जावास्क्रिप्ट चालते का ते पहा.

धन्यवाद रुनी, webmaster..!! अ‍ॅपल लोगोच्या बटनावर टिचकी मारून पर्यायी जुना संपादक सुरु करा?
म्हणजे ie6 का? संपादन खिडकीत दिसणारे कुठलेच बटण तिथं नव्या (ie8) संपादकावर दिसत नाही. अन firefox मधेही मराठी टेक्स्ट व्यवस्थित डिस्पले होत नाही. सध्या ie6 वरच काम चालु आहे.
दिलेल्या suggestions बद्दल मनापासुन आभार..!!
महेश घुले.

नमस्कार नितीन चिंचवड,
लिखाण काढून टाकण्याबद्दल http://www.maayboli.com/node/6882 इथे माहिती लिहीलेली आहे.
सदस्यत्व रद्द करण्यासाठी अ‍ॅडमिन यांच्याशी संपर्क साधा.

मी कर्ता नावाची कथा पोस्टकरण्याचा प्रयत्न करतेय. साहित्य क्रिएट झालय म्हणून मेसेज दिसतोय. पण कथा दिसत नाही . म्हणून संपादनमधे जाऊन पाहिलं तर व्यवस्थित कथा दिसते. पण सेव्ह केलं तर नुसतच शीर्षक सेव्ह होतय. प्लीज मदत करा.

मानुषी,
तुमची कथा बरीच मोठी असल्याने दिसत नव्हती. ती आता ३ भागांत विभागली आहे. तसेच प्रतेय्क परिच्छेदांमध्ये मोकळी ओळ सोडा.

मुखपृष्ठावरचं, वैभवच्या नवीन सीडीच्या प्रकाशनाबद्दलची लिन्क "पान उपलब्ध नाही" म्हणून येतेय.
का? तिथे टिचकी मारल्यावर 'पान हरवलेलं दिसतंय....' असा मेसेज येतोय Sad का बरं?

सुस्मिता, IE मधे तस दिसत पण firefox मधे काही प्रॉब्लेम येत नाही. श्न अगदी व्यवस्थित दिसतो. Happy पण कारण काय असाव माहित नाही.

मला माझ्या एक लेखात एक प्रकाशचित्र टाकायचं आहे. खाजगी जागे मध्ये ते अपलोड झालं आहे. पण लेखात ते कसं अ‍ॅड करावं ते कळत नाही आहे. Insert/Edit Link वापरून पाहिलं.

नविना,
लेख लिहायला घेतलात की जिथे टाइप करता त्या खिडकीखाली "मजकूरात image द्या" असे दिसेल त्यावर तिचकी मारलीत की तुम्हाला तुमच्या अकाऊंट्मध्ये अपलोड केलेली चित्रांची यादी दिसेल. त्यातल्या हव्या त्या फाइलवर टिचकी मारुन ती सिलेक्ट करा व send to text area वर टिचकी मारा.
मेधा,
तुमची विनंती प्रशासकांकडे पाठवली आहे.

आपण एखद्याच्या लिखाणावर प्रतिक्रिया दिल्यावर उजव्या कोपरयात संपादन असे दिसते त्याचे काय करायचे जरा सांगाल का?

जर तुम्ही दिलेला प्रतिसाद काही कारणासाठी तुम्हाला बदलायचा असेल (to edit your post), संपादित करायचा असेल तर त्यासाठी "संपादन" ची सोय दिलेली आहे.

माझे सदस्यत्व च्या मुख्य पानावर अगोदर लेखन आणी प्रतिक्रिया हा tab display व्ह्यायचा. पण गेल्या २-३ दिवसात तो तिथे display होत नाही. इतरांनाही तो दिसत नाही का..?
जर admin नेच तो disable केला असेल तर तो पुन्हा सुरु करावा ही विनंती..!!

Pages